कोकणी भुते
कोकणी माणसांच्या मनातील भूते.
भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात.
आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ.
कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.
१वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस
७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या
१२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा.
१ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो.
२ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.
३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही.
४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.
५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.
६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.
७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.
कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो.
८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते.
१० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.
11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते .
12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते
13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते
14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही ....
संग्राहित / संपादित *
💬 प्रतिसाद
(163)
उ
उगा काहितरीच
Wed, 05/06/2015 - 20:18
नवीन
बाबौ ! पळून जाऊ का मग मी गुरुजी ?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 05/06/2015 - 20:29
नवीन
नक्को! :-/
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
गुरुवार, 05/07/2015 - 04:54
नवीन
अंदाज चुकला की तुमचा गुरुजी ! काहीच तर राडा झाला नाही की.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/07/2015 - 13:17
नवीन
तो मी प्रतिसादातून आधीच काढुन नै का घेतला? ;) अच्च काय ते? :D
- Log in or register to post comments
र
रामपुरी
Wed, 05/06/2015 - 23:03
नवीन
ऐला.. लै भारी.. घाऊक मध्ये भुतं विकत घेतली तर डिस्काऊंट मिळेल काय? थोडी तिकडे सीरीयात सोडीन म्हणतो. एक णाडी केंद्रात पण सोडायचंय. थांबा, आता लिष्टच करायला घेतो. ते डिस्काऊंटचं तेवढं बघा हां.. अंमळ जास्तच भूतं लागतील.
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 05/07/2015 - 04:28
नवीन
संकलन जबरी!
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 05/07/2015 - 04:36
नवीन
विं दा करंदिकरांची, किर्र रात्री,सुन्न रानी .....
अशी भुतांवरची सुंदर कविता आहे, वर्षा भावे यांची चपखल चाल आहे, जरूर ऐका.
- Log in or register to post comments
क
कहर
गुरुवार, 05/07/2015 - 12:33
नवीन
'पिशी मावशीची भुतावळ'पण छान आहे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 05/11/2015 - 07:50
नवीन
http://www.transliteral.org/pages/z71226074737/view
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Sat, 06/06/2015 - 14:26
नवीन
हीच कविता! धन्यवाद!
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/07/2015 - 04:47
नवीन
भुतांविषयी इतकी वैविध्यपूर्ण माहिती प्रथमच वाचण्यास मिळाली :-) .
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/07/2015 - 05:11
नवीन
लहानपणी वारंवार कानावर पडणार्या "गिर्याला गवसला" या शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ आता कळला.
हे लेख प्रकाशित करण्यासाठी योग्य जागा मला माहिती आहे. ;)
- Log in or register to post comments
य
योगी९००
गुरुवार, 05/07/2015 - 05:17
नवीन
खूप छान माहिती... भूतयोनीत सुद्धा मंडल आयोग लागू असावा असे उगाच वाटले. एका जातीच्या भूताने दुसर्या जातीच्या माणसाला त्रास दिला तर त्यांच्यात सुद्धा आपापसात जुंपत असावी. बाकी माझ्या जाती/धर्माची भूते माझे रक्षण करत असतील का हो?
बादवे झोटींग, आग्यावेताळ हे काय असते?
मा.बो. वर अमानवीय असा धागा आहे. त्यात बर्याच जणांच्या खर्याखुर्या अनुभवावर चर्चा आहे. त्यात बायंगीवर सुद्धा एक चर्चा आहे. या भुताला म्हणे कायम काही नेवेद्द्य द्यावा लागतो. आणि जर तुमच्या कडून आगळीक झाली तर तर हे भूत त्याने तुम्हाला जे दिले त्याच्या दसपट वसूल करून अक्षरशः तुम्हाला रस्तावर आणतो...असे लिहीले आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/07/2015 - 07:31
नवीन
माबोची लिंक मिळेल काय?
- Log in or register to post comments
य
योगी९००
Tue, 05/26/2015 - 13:32
नवीन
http://www.maayboli.com/node/49229
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
गुरुवार, 05/07/2015 - 05:19
नवीन
ज्या ने धागा टाकला तो मंका बहुतेक उरलेल्या तीन १५) हडळ १६ भानामति १७ चकवा यांच्या तावडीत सापडला असावा. कारण धागा टाकुन तो गायबलाय.
आणि उका लेडिज भुत वेगळं कशाला पाहिजे ते पुण्याला असं रुमाल बांधुन
आजुबाजुला वावरत असतातच की तुम्ही सावध असा फक्त.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/07/2015 - 05:24
नवीन
पुण्यातील लेडीज भूतांचा तुमचा सखोल अभ्यास दिसतो.
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
गुरुवार, 05/07/2015 - 06:07
नवीन
कस चं कस चं आम्ही आलो होतो तेव्हा काही मांत्रिक आमच्या अवतीभवती होते.
त्यामुळे ती भुते आमच्या पासुन १० हात दुर वावरत होती. 
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
गुरुवार, 05/07/2015 - 06:15
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/07/2015 - 05:26
नवीन
मंदार काञे, तुम्हाला तुमचा आयडी नीट लिहिता येतोय, म्हणजे हे ढकलपत्रातून आलेले समजून याच्यावर भानामती करू काय?
म्हसोबा, हडळ आणि भानामती यांच्याबद्दल दुसर्या मेसेजमधे आले होते का? तो मेसेज पण पेस्ट करायचा त्रास घ्या जरा!
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/07/2015 - 05:38
नवीन
तुम्ही भानामती वगैरे करता?
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/07/2015 - 05:41
नवीन
मिपावरच्या भुतांसाठी लै जालीम भानामती माहिती आहे. आणि भुताटकी उतरवणारा मांत्रिक पण!
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/07/2015 - 05:46
नवीन
म्हणजे मिपावरची उपद्रवी भूते जेव्हा गायब होतात तेव्हा त्यांना मांत्रिकाकरवी बाटलीत भरले जाते तर.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/07/2015 - 05:47
नवीन
कसं बोल्लास!
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/07/2015 - 05:48
नवीन
चलो इस बातपे (पुण्यात) एक चाय हो जाय. ;)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/07/2015 - 05:51
नवीन
कोण पाजणार? पुणेकार की गोयंकार? =))
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/07/2015 - 06:01
नवीन
उत्तर तुम्ही स्वतःला पुणेकर समजता की कोकणी यावर अवलंबून आहे.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/07/2015 - 06:17
नवीन
आम्ही स्वत:ला मिपाकर समजतो.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/07/2015 - 08:52
नवीन
अरे वा. छान. आता मिपाकर या नात्याने तुम्हीच चहा पाजा.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/07/2015 - 08:56
नवीन
भेटा, चहा पाजण्यात यील.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/07/2015 - 08:57
नवीन
मला पण.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/07/2015 - 08:59
नवीन
भेटत तर नाय, आणि मलापण काय! =)) तुम्हीपण भेटा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/07/2015 - 09:01
नवीन
चला अक्षरधारा किंवा साधनाला.
पुस्तके पण घेऊ.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/07/2015 - 09:13
नवीन
हो चला. मृत्यूंजयाला पण सांगा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/07/2015 - 09:22
नवीन
हो. तो पण येईल.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 05/07/2015 - 12:09
नवीन
मी तयार बसलो आहे. कधी जायचे ते सांगा
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/07/2015 - 12:26
नवीन
१६ मे, शनिवार संध्याकाळी ६ अक्षरधारा?
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/07/2015 - 13:01
नवीन
माझ्या नावाने एक पुस्तक काढून ठेवा, नायतर तुमची सगळी पुस्तके लोक उधारीवर घेऊन जातील असा शाप देईन.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/07/2015 - 19:07
नवीन
"आणि परत करणार नाहीत" हा महत्वाचा क्लॉज राहिला की शापामध्ये. लोकांनी पुस्तके परत केली तर काय उपयोग त्या शापाचा?
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 05/07/2015 - 19:10
नवीन
खरंच की! तो पुरवणी शाप!
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 05/07/2015 - 19:12
नवीन
आपली पुस्तके पुण्यातलेच लोक नेण्याची शक्यता जास्त असल्या कारणाने ते परत करणार नाहीतच हे गृहीत धरलं असावं त्यांनी!! आणि मेलेल्याला आणखी का मारा म्हणून क्लॉज मुद्दाम वगळला असेल.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/07/2015 - 20:20
नवीन
तुम्ही पुण्यातले की पुण्यातल्या लोकांचा "अनुभव" असलेले?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/07/2015 - 20:18
नवीन
कोण घेऊन जाईल? सरळ देत नाही जा असं सांगू की आम्ही. पुणेरी स्पष्टवक्तेपणा कधी कामी यायचा? =))
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 05/07/2015 - 20:23
नवीन
ओ तै, सकाळी तुम्ही पुणेकर की कोकणी असे विचारल्यावर "आम्ही मिपाकर" असे सांगितलेत. आणि पुणेरी स्पष्टवक्तेपणा वापरण्याच्या गोष्टी करुन तुम्ही पुणेकर असल्याचे सिद्ध करताय. हे चिटिंग आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 05/07/2015 - 09:16
नवीन
तिथे तुम्हाला कट मिळतो अशी अफवा उठवावी म्हणतो ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/07/2015 - 09:21
नवीन
हाहा.
पुस्तकांची दुकाने आमची अवडती ठिकाणे.
अत्रे सभागृह पण लिस्टात अॅड कर.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/07/2015 - 09:31
नवीन
मॅजेस्टीकचे गोडाऊन राहिले ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 05/07/2015 - 09:33
नवीन
व्हय. :)
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 05/07/2015 - 09:33
नवीन
:D
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 05/07/2015 - 09:39
नवीन
ह्यात काय गोगोड अहे मेल्या?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »