पाककृती

मॉकटेल: मँगो पॅशन

Primary tabs

passion 1

साहित्यः
१. हापूस आंब्याचा पल्प - २ कप
२. फ्रेश ऑरेंज ज्युस - १/२ कप
३. सोडा - १/२ कप
४. व्हॅनीला आईसक्रिम - ३ मोठे चमचे
५. आईस क्युब्स - ८ ते १०
६. चवीनुसार पीठिसाखर **

कृती:

१. दिलेलं सर्व साहित्य ब्लेंडर मधे मिक्स करुन स्मुथ होईस्त ब्लेंड करा
२. आपापल्या आवडिप्रमाणे सजवुन गाssssरेssssगार मँगो पॅशन पेश करा

** माझ्या मते मॉकटेल मधे साखर घालत नाहि पण ऑरेंज ज्युस मुळे पिताना जरा जरी आंबटपणा जाणवला तर सगळाच मुड जाईल म्हणुन पीठि साखर घातली आहे जेणेकरुन पटकन मिक्स होईल आणि पिताना साखरेचे कण लागणार नाहित.

काळा पहाड

कुठे फेडतील ही पापं?

नीलमोहर

आंब्याची मोठी फोड घेउन त्याला उभ्या आड्व्या चिरा द्याय्च्या,शंकरपाळी प्रमाणे, पूर्ण कापायचे नाही.
मग फोड थोडी मागून वाकवायची, झाले !!

दिपक.कुवेत

किस्न्याला हे विस्कटून कसं सांगायचं हाच प्रश्न होता. धन्यवाद माझं काम केल्याबद्दल.

अजया

वा!कसलं सही दिसतंय!!करुन पाहिल्या जाईल.

छान आहे पेयाकृती.
आईसक्रिम + कोल्ड ड्रिंक (मिरिंडा वगैरे) असे काँबि ट्राय केले आहे ते छान लागतं पण मँगो पल्पसोबत ऑरेंज ज्युस असायलाच हवे का? नाही घातला तर चवीत फरक पडेल का?

दिपक.कुवेत

ऑरेंज ज्युस वगळला तरी चालेल. चवीत विशेष असा फरक पडणार नाहि. त्या एवजी फ्रेश क्रिम घालू शकता. अजून रिचनेस येईल.

स्रुजा

क्रिम ची आयडिया जास्त आवडली. या महिन्याअखेर मिळणार आम्हाला पण हापुस चे आंबे, मग लगेच करणार. जीवघेणा फोटो आहे.

पैसा

तुला बॅन करायला सांगते थांब!

जोरदार हणुमोदण

फार छळतो हा माणुस.

उन्हाळ्यात तर नको जीव करुन टाकतो.

पैजारबुवा,

अगदी अगदी. मी व्हॉट्सअ‍ॅप गृपवर पण हेचं ओरडतोय केव्हाचा. त्रास आहे हा माणुस. =))

सूड

ते ठीकाय, ह्यात पनीर कधी घालायचं म्हणे? रेशिपी अर्धीच वाटत्ये. ;)

सस्नेह

आपणाला अंडं असं म्हणायचं आहे काय ?

टवाळ कार्टा

नै...दीपक भौ मिपावर दिपक पनीरवाले म्हणून वल्डफेमस आहेत :)

सूड

बिंगो!!

पुण्याचं पाणी पोटात गेल्यावर पोरगं कसं हुशार झालंय बघा!!

टवाळ कार्टा

मी एकच दिवस पुण्याचं पाणी प्यायलोय म्हणून...तिथेच राहीले की काय होते हे तुझ्याकडे बघून कळेल =))

सूड

तिथेच राहीले की काय होते हे तुझ्याकडे बघून कळेल =))

असं का? बरं!!

मोहनराव

फोटो बघुन खपल्या गेलो आहे... किती तो छळ!! (लाळ गाळणारी स्मायली...... )

नूतन सावंत

मस्त,दीपक.सुरेख पेयाकृती.अतिसुंदर सादरीकरण.केलीच पाहिजे.पण मीही ऑरेंज ज्यूस वगळून फ्रेश क्रीम वापरून करेन.सानिका पेयाकृती हा शब्द आवडला.

Maharani

पाकृ छानच...फ्रेश क्रीम घालून करुन पाहीन.

नगरीनिरंजन

नावावरुन मँगो आणि पॅशनफ्रुट असेल असे वाटले होते; पण हरकत नाही. झकास दिसतंय.

भाते

कालच आस्वाद घेऊन झाला.
फक्त 'सोडा - १/२ कप' ऐवजी मी 'थोडीशी… व्होडका' इतकाच बदल केला आणि... वरती आणखी बर्फाचे खडे टाकले. :)

दिपक.कुवेत

आल्यावर सीजन असला तर व्होडका घालून परत प्यायचा आनंद लूटू. १५ जून ला बहूतेक डोंबोलीत असणार आहे. काहिही सबब न सांगता तू मला नंदी पॅलेस ला भेटतो आहेस.

दिपक.कुवेत

हो निदान सध्याच्या कार्यक्रमानुसार. एनीवे पुणे कट्टयाला क्न्फर्म सांगीनच.

ईश्वरसर्वसाक्षी

मँगो शेक घरी कसा करता येइल, इथे जर कोणि आधि क्रुति दिली असेल तर लिंक मिळेल का?

प्यारे१

व्हॉट दी-पक????
काय हे छळवादी प्रकरण.