Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिकबाळी

क
क्रेझी
गुरुवार, 05/07/2015 - 08:43
🗣 13 प्रतिसाद
मला ह्या दागिन्याबद्दल माहिती हवी आहे. ह्याबद्दल असलेल्या काही शंका/ प्रश्न. १) 'भिकबाळी' हा योग्य शब्द आहे की ह्या दागिन्याचं मूळ नाव काही वेगळं आहे? २) ह्याचा नेमका इतिहास काय आहे? ह्याला 'भिक'बाळी असंच का म्हणतात? ३) हा दागिना एखाद्या मुलाला/ पुरूषाला विशिष्ट वयानंतरच घालता येतो किंवा एखाद्या खास प्रसंगानंतरच घालता येतो असा काहि नियम आहे का? ( प्रसंग - उपनयन संस्कार किंवा लग्न ) ४) ह्या दागिन्यामधे मोती, पोवळा आणि सोने ह्याव्यतिरिक्त कोणता धातू वापरतात किंवा फक्त ह्याच गोष्टी वापरून भिकबाळी बनविली जाते का? पेशव्यांच्या मालिकेमधे सर्वप्रथम ह्या दागिन्याचं दर्शन झालं आणि त्यानंतर पुण्यामधे ब-याच मुलांनी घातलेलं बघितलं. तेंव्हापासून हे प्रश्न मनात घोळत आहेत जाणकार मिपाकरांनी कृपया प्रकाश टाकावा.

प्रतिक्रिया द्या
6488 वाचन

💬 प्रतिसाद (13)
क
कपिलमुनी गुरुवार, 05/07/2015 - 09:13 नवीन
भिकबाळीचे महत्व
  • Log in or register to post comments
क
क्रेझी गुरुवार, 05/07/2015 - 09:24 नवीन
धन्यवाद कपिलमुनी पण त्या धाग्यावर विशेष माहिती मिळाली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ह
हेमन्त वाघे गुरुवार, 05/07/2015 - 09:39 नवीन
संकल्पनाकोश - लेखक - सुरेश वाघे .. खंड २ - मानवी शरीर व जीवनावस्था पण ५ - १२५ भिकबाळी - नाव - मुलांना दृष्ट लागू नये म्हणून नातेवाईकांनी व ओळखी पालखीच्या लोकांनी " भिक" मागून दिलेल्या पैश्यातून बनविलेली बाळी .. हा माझ्या वडिलांचा ५ खंडी ग्रंथ आहे. त्यांना अधिक माहिती आहे का विचारतो.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 05/07/2015 - 09:41 नवीन
जरूर विचारा. तुमच्या वडिलांनी बरंच मोठं काम केलेलं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे
स
सूड गुरुवार, 05/07/2015 - 10:48 नवीन
येवढ्या माहितीचा उपयोग काय करणार आहात ते कळलं तर लिहायचे कष्ट घेऊ!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/07/2015 - 15:33 नवीन
ज्ञानकंडु शमवणे हे एक सबळ कारण होत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 05/07/2015 - 15:34 नवीन
हा कंडू नेमका कुठे होतो ते कळलं तर काहीतरी करता येईल!! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/07/2015 - 15:37 नवीन
हेच म्हणतो ! ! "इतर" पिअर्सिंग विषयी माहिती विचारली असती तर लय कौतुकाने इन्टर्नेट्वर फोटो शोधुन शोधुन माहीती काढुन दिली असती , आणि प्रतिसाद डीलीट व्हायच्या आत ब्यॅकपही घेतला असता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/07/2015 - 15:54 नवीन
डोक्यात होतो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/07/2015 - 15:18 नवीन
भिकबाळी करुन झाली !! आता रुद्राक्षाचे कानातले Image removed. केयुर (फोटो मिळाला नाही ) आणि तोडर (फोटो मिळाला नाही ) लिस्ट वर आहेत आमच्या :)
  • Log in or register to post comments
ज
जवाहिरे Tue, 05/12/2015 - 19:55 नवीन
बाळी हा कानासाठी असलेला अलंकार. त्यातील एक प्रकार म्हणजे भिकबाळी.प्राचीन काळी हा दागिना पौराहित्य करणाऱ्या म्हणजेच भिक्षूकी करणाऱ्या पेशात आवर्जुन घातला जायचा. त्यामुळेच भिकबाळी हे नाव पडलं असावं. मराठेशाहीत हा मानाचा अलंकार म्हणून लोकप्रिय होता. हा दागिना घालण्यासाठी काही नियम नाहीत. सोने, मोती, पोवळा किंवा माणिक त्यासाठी वापरले जाते.
  • Log in or register to post comments
ज
जवाहिरे Tue, 05/12/2015 - 19:55 नवीन
बाळी हा कानासाठी असलेला अलंकार. त्यातील एक प्रकार म्हणजे भिकबाळी.प्राचीन काळी हा दागिना पौराहित्य करणाऱ्या म्हणजेच भिक्षूकी करणाऱ्या पेशात आवर्जुन घातला जायचा. त्यामुळेच भिकबाळी हे नाव पडलं असावं. मराठेशाहीत हा मानाचा अलंकार म्हणून लोकप्रिय होता. हा दागिना घालण्यासाठी काही नियम नाहीत. सोने, मोती, पोवळा किंवा माणिक त्यासाठी वापरले जाते.
  • Log in or register to post comments
ज
जवाहिरे Tue, 05/12/2015 - 19:55 नवीन
बाळी हा कानासाठी असलेला अलंकार. त्यातील एक प्रकार म्हणजे भिकबाळी.प्राचीन काळी हा दागिना पौराहित्य करणाऱ्या म्हणजेच भिक्षूकी करणाऱ्या पेशात आवर्जुन घातला जायचा. त्यामुळेच भिकबाळी हे नाव पडलं असावं. मराठेशाहीत हा मानाचा अलंकार म्हणून लोकप्रिय होता. हा दागिना घालण्यासाठी काही नियम नाहीत. सोने, मोती, पोवळा किंवा माणिक त्यासाठी वापरले जाते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा