Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेअरबाजारः भुकंप पुन्हा पुन्हा होतात का ?? किंवा भुकंप पुन्हा पुन्हा का होतात??

प
प्रसाद भागवत
Fri, 05/08/2015 - 14:26
🗣 57 प्रतिसाद
04 मार्च 2015 रोजी दिवसांतर्गत 9119 ह्या आपल्या सर्वाकलीन सर्वोच्च पातळीवर गेलेला आपल्या शेअरबाजाराचा निर्देशांक नंतरच्या काळांत मात्र घसरु लागला आणि गेल्या महिनाभरापासुन (15 एप्रिल) ह्या घरसणीने अधिक तीव्र स्वरुप घारण केले आहे. कालची बंद पातळी गेल्या अदमासे 04 महिन्यांतील नीच्चांकी पातळी आहे. एखादा मोठा भुकंप होवुन गेल्यानंतर तसा भुकंप घडविण्यासाठी कारणीभुत ठरणारा दाब वा Energy पुन्हा लगे्च निर्माण होणे शक्य नसल्याने जरी छोटे धक्के (after shocks) परत परत जाणवले, तरी पहिल्यासारख्या मोठ्या धक्क्यांची पुनरुक्ती होण्याची शक्यता खुप कमी असते असे कोठेसे वाचले होते. (चु.भु.द्या.घ्या.) मात्र बाजारांतील 'भुकंपाच्या' बाबतीत नेमकी याच्या उलट स्थिती दिसते. एक मोठी पडझड बाजारांत मंदीची नवीन आवर्तने सुरु करते असे नेहमी पहायला मिळते. बाजाराची ही मानसिकता 'COCKROACH THEORY' या नावाने ओळखली जाते. ज्याप्रमाणे आपल्याला घरांत दिसणारे एखादेच झुरळ तेशी अनेक झुरळे आजुबाजुला नक्की असल्याची कल्पना देते, तसेच बाजारांत (अर्थातच अचानक) झालेली अशी घसरगुंडी पुढे आणखी वाईट बातम्यांचे ताट वाढुन ठेवले आहे याची खुणगाठ असते....When there is a bad news to the public, there may be many more related negative events that have yet to be revealed. याचेच प्रत्यंतर म्हणुन की काय, सर्वोच्च पातळी गाठल्यापासुन सुरु झालेल्या घसरणीचा तपशील पाहिला तर त्यापासुन आजपर्यंत झालेल्या 42 सत्रांतील 09 वेळा बाजार एकाच दिवशी 01 टक्यापेक्षा अधिक प्रमाणांत (म्हणजेच 09 वेळा जवळ जवळ 100 अंकांनी) पडला आहे. गाठलेल्या शिखरापासुन तो 10% खाली आला आहे. सहाजिकच आता पुढे काय?? ह्या महिनाभराच्या कालावधीतील 09 वेळा झालेल्या 'सफाई' कारवाईतुन 'झुरळां'चा सफाया झाला असेल की नाही?? हा नेहमीचाच प्रश्न आहेच. "थांबा, Don’t try to catch a falling knife.." असे कोणीसे म्हटले आहे, असे कोणी मंदीवाले म्हणणार असतील.. तर त्याला उत्तर म्हणुन बॅरॉन रॉथशिल्ड यांचे तितकेच सुप्रसिद्ध 'Buy, when there’s blood in the streets.' हे वाक्य तेजीवाल्यांच्या दिमतीला आहेच. थोडक्यात काय, स्व. सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे 'एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे! हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे?'..अशी स्थिती आहे. मान्सुन बाबतचे प्रतिकुल अंदाज, निर्देशांकातील कंपन्यांचे अपेक्षाभंग करणारे निकाल,विदेशी गुंतवणुकीवरील टॅक्स बाबत घेतलेले निर्णय असे घटक या मंदीला कारणीभुत आहेत वगैरे कारणांची जंत्री मांडुन मुलभुत विष्लेषण (Fundamental Analysis) कराण्याचा मानस होता पण सकाळीच ऑफिसात आलेल्या आलेल्या एका क्लायंट्ने 'In Fundamentals, you first lose your funds and then you lose your mental....' अशी विचारमौक्तिके मला ऐकवल्याचा परिणाम म्हणुन कंपन्यांचे वार्षिक निकाल,त्यांचे ताळेबंद वा परदेशी गुंतवणुकदरांना आयकर खात्याने बजावलेल्या नोटीसा यावर काही लिहिण्यापेक्षा थोडे तांत्रिक विष्लेषण करु पहातो. बाजाराचे तांत्रिक विष्लेषण करण्याच्या प्रसिद्ध जपानी 'Candlestics' तंत्राप्रमाणे जेंव्हा आलेखावर (charts) (1) प्रथम एका दिवशी मोठी घसरण होवुन बाजार दिवसातल्या निच्चांकाजवळ बंद होतो(Black Candle) (2)पुढच्याच दिवशी बाजार दिवसभरांत खालच्या वा वरच्या दिशेने मोठ्या हालचाली करतो मात्र बंद होताना सकाळी उघडलेल्या भावपातळीच्या जवळपासच बंद होतो(Doji Candle) (3) आणि पुढच्याच म्हणजे तिस-या दिवशी बाजार आधल्या दिवशीच्या सर्वाधिक भावापेक्षाही वर (Gap up) उघडतो, व दिवसभर तेजीत राहुन आणखी वर बंद होतो(White Candle)...या स्थितीस 'Morning Star Doji'असे म्हणतात. अशी रचना बाजारांतील विक्रीचा जोर मंदावला असुन मंदीवाल्यांकडुन सुत्रे तेजीवाल्यांकडे जात आहेत असे सुचित करते (का??... हे या तीन दिवसांतील भावपातळ्यांचे वरील वर्णन वाचल्यास अधीक स्पष्ट होईलच) महत्वाचे हे,की गेल्या चार पाच महिन्यात फक्त दोन वेळा निफ्टी आजच्याच, म्हणजे 8000 पातळीच्या जवळ आला असता दोन्हीही वेळा हीच 'Morning Star Doji' ची स्थिती आलेखावर पहायला मिळाली व तेथुन निर्देशांकाने परत तेजीचा मार्ग अवलंबला आहे. आजही (दि, 06/07/08 मे दरम्यान) पुन्हा अशीच रचना होताना दिसते आहे.यावरुन बाजाराने तळ (Bottom) गाठला आहे असे म्हणावयाचे का??...तुम्हाला काय वाटते?? -प्रसाद भागवत

Book traversal links for शेअरबाजारः भुकंप पुन्हा पुन्हा होतात का ?? किंवा भुकंप पुन्हा पुन्हा का होतात??

  • ‹ शेअरबाजार ; फक्त 'सुवर्ण'संधीची वाट पहाण्यापेक्षा नेहमीच्या 'संधी' साधणे महत्वाचे.
  • Up
  • शेअरबाजार- बस्स 02 मिनिट्स...आपण काय करावे?? ›

प्रतिक्रिया द्या
27276 वाचन

💬 प्रतिसाद (57)
क
काळा पहाड Mon, 05/18/2015 - 13:11 नवीन
६४०० चा कॉल बाय कराच भागवत साहेब. लँड अ‍ॅक्विझिशन बिल पास नाही झालं तर तीच पाळी येणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत
प
प्रसाद भागवत Mon, 05/18/2015 - 14:16 नवीन
पहाडसाहेब, तांत्रिकदृष्ट्या हा कॉल 28 तारखेलाच कालाबाह्य होईल. आणि तसेही मंदी अपेक्षीत असल्यास कोणताच कॉल घ्यायला नको, एकतर कॉल विकायला हवा किंवा पुट घ्यायला हवा. पण आपल्या भावना समजल्या.बाजार कसे वागेल हे कोणीच सांगु नये आणि अशा जाहिर ठिकाणी तर त्याची चर्चा म्हणजे नकोच नको हे पुर्णपणे पटुनही मी आपल्या मताशीही असहमत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ग
गणेशा Tue, 05/19/2015 - 10:48 नवीन
मला शेअर मार्केट चे शुन्य ज्ञान आहे, जर गुंतवनुक करावयाची असल्यास.. अभ्यास कश्या पद्धतीने करावा.. काहीच माहीनी नाही.. साईट्स कुठल्या ते ही माहिती नाही.. तुमचे मागिल २ लेख पण वाचले आहेत..
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 05/19/2015 - 11:11 नवीन
https://www.valueresearchonline.com/ ही साइट कंसिडर करा. छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
स
सिरुसेरि Tue, 05/19/2015 - 12:14 नवीन
नुकतेच युलिप मधील गुंतवणुक याबद्दल एका सल्लागाराशी बोलणे झाले . हि व्यक्ती एजंट नसुन एका इन्शुरन्स कंपनीमध्येच कामाला आहे . त्यांच्याशी बोलण्यातुन अशी माहिती मिळाली की , युलिप योजनांचे नवे स्वरुप ,झालेले नवे बदल हे गुंतवणुकीसाठी खुप फायदेशीर आहे . अलोकेशन चार्जेस आता खुप कमी झाले आहेत . त्यामुळे जास्तीत जास्त फंड हा युनीट्स मध्येच गुंतवला जातो . हे नविन बदल विचारात घेता युलिप मधे गुंतवणुक करावी का ? सध्या कुठल्या युलिप योजना चांगल्या आहेत .
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Tue, 05/19/2015 - 13:52 नवीन
पुरेशा किंमतीचे विमा संरक्षण देणारी टर्म पॉलिसी (यथायोग्य रायडर्ससह) घेल्यानंतर अन्य कोणत्याही विमा पॉलिसीचा गुंतवणुकीच्या दृष्टिने विचार करु नये असे मी सांगेन. (मात्र आपण जर अशी युलिप घेणारच असाल, तर मीही एक ब-यापैकी अनुभवी इन्शुरन्स उत्पादने विकणारा सल्लागार आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
प
प्रसाद भागवत Fri, 05/22/2015 - 17:10 नवीन
खरे म्हणजे ही माझी व्यावसायिक बाब आहे आणि ती जाहीर करावयास हवी असे नाही. मात्र एका पोस्ट्मध्ये अनावधानाने आणि तेही अप्रत्यक्षरित्या निफ्टीचे कॉल घ्यावे असे माझ्याकडुन सुचविले गेले, वास्तविक हा कोणताही गुंतवणुक सल्ला नव्हता, तरीही त्यानंतर काही सदस्यांनी तसे सौदे केल्याचे मला कळविले. सहाजिकच केवळ या वेळेपुरती ‘अपडेशन्स’ द्यावी असे मनांत आहे. मी निफ्टीचे या ( मे) महिन्याचे 8400 स्ट्राईकचे कॉल्स 58/60 या दरम्यान घेतले होते. निफ्टी हा या सौदेपुर्तीपर्यंत 8500च्या भावपातळी जवळ घोटाळेल असा अंदाज मी बांधला होता. आज निफ्टीची मला अपेक्षित भावपातळी आल्याने व या पातळीच्या वर जाण्यास निफ्टीस होणारा प्रतिकार पहाता मी घेतलेले सर्व कॉल्स 108/110 रुपयांस विकले. मी या फोरमवरुन केलेले लिखाण हे सर्वसामान्य स्वरुपाचे व बाजारविषयक गैरसमज दुर व्हावेत आणि बाजाराकडे सर्वसामान्य गुंतवणुक्दार आकर्षित व्हावेत यासाठी आहे. ह्या लिखाणांतुन मी कोणताही वेचक स्वरुपाचा खरेदी/विक्रीचा सल्ला देत नाही वा माझे लिखाण सल्ला म्हणुन मानले गेल्यास त्यातुन कोणताही नफा होईल वा नफा होईलच याचीही कोणतीही खात्री मी देत नाही वा तशी माझी जबाबदारीही नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा