(सुचत नाही....)
तुझा माझा चंद्र आज थांबला आकाशी
कसा जाऊ स्वागताला , भिजलेली उशी...
तुझ्या माझ्या पावसाने अबोला धरला
कसे सांगू जीवनाचा मेघ हरवला...
तुझी माझी जाई पाणी असून सुकली
कुणी नाही पुसायला मायेने खुशाली...
तुझ्या माझ्या वाटेवर माजलेले रान
उजाड त्या माळरानी जाय आता कोण ...
सखी गेली अर्ध्यावरी सोडूनिया साथ
नाव "साफल्य" घराला, वाटतसे व्यर्थ .
💬 प्रतिसाद
(7)
ग
गणेशा
Fri, 05/08/2015 - 15:40
नवीन
अशीच अवस्था .. शब्द मस्त.. कविता द्यायलाच आलो होतो सेम भाव म्हणुन येथेच रिप्लाय म्हणुन द्यावी असे वाटले..
पण जावुद्या नंतर कधी सेपरेट देतो...
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Fri, 05/08/2015 - 16:25
नवीन
अरे,द्या ना! वाचायला,अनुभवायला खूप आवडेल.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 05/08/2015 - 17:16
नवीन
फार छान .
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Fri, 05/08/2015 - 17:59
नवीन
मस्त
छान
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Sat, 05/09/2015 - 03:47
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
स
सांजसंध्या
Sun, 05/10/2015 - 20:50
नवीन
छान कविता.
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 05/11/2015 - 11:59
नवीन
ह्म्म!!
- Log in or register to post comments