Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपण सगळेच सलमान

अ
अत्रन्गि पाउस
Fri, 05/08/2015 - 21:50
🗣 65 प्रतिसाद
क्षणभर कल्पना करा आणि शक्य झाला तर त्या कल्पनेत ४-५ तास घुसून राहा ...... आणि विचार करा तुमचे जगभरात पसरलेले आपला एकेक शब्द झेलणारे लाखो चाहते ... स्वत:च्या हिमतीवर कमवलेले ४०० -५०० कोटी रुपये आणि अजून तितकेच किंबहुना त्याहून जास्त कमवायची क्षमता ... पैशाने विकत मिळणारे कोणतेही सुख उपभोगायचे शिल्लक नाही किंवा पुढच्या ७ पिढ्यांना एक रुपया कमवायची गरज नाही इतके आर्थिक स्थैर्य ...उत्तम तब्ब्येत मोट्ठे कुटुंब ..एकोप्याने राहणारे ... अशा वेळेला तुम्ही नाही पण तुमच्या एखाद्या जिवलगाने किंवा मित्राने काही मोठा झोल केला ... तर तुम्ही पैशाच्या जोरावर हे आपण दाबून टाकू असा विचार सुद्धा तुमच्या मनात येणार नाही ??? भारतासारख्या समाजव्यवस्थेत आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे सलमान सारखे वागू शकतो ..किंबहुना माणसे मारणे वगैरे नसेल कदाचित पण लहान मोठ्या प्रमाणात ..आपण तसे वागतोही ... आत्ताच अमेरिकेत सेट्ल झालेय एका मित्राची chat आली कि अरे अमेरिकेत सुद्धा पैशाच्या जोरावर उत्तम वकील मिळवून सुटण्याची शक्यता खूप जास्त असते ... त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे घडतंय .. ते समाज म्हणून आपल्याला हवय आणि ते आपल्यापैकी बहुतांश लोकांना मान्यसुद्धा आहे ..हे एकदा जाणले कि ...मग आता पुढे काय ह्याचा ठोस विचार करायला हरकत नाही ...

प्रतिक्रिया द्या
16813 वाचन

💬 प्रतिसाद (65)
अ
अत्रन्गि पाउस Sat, 05/09/2015 - 22:15 नवीन
इतकेच म्हणूयात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 05/11/2015 - 11:35 नवीन
खंडेराव, सगळ्या बातम्या छापल्या जात नाहीत.७०च्या दशकात राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्याने हाजी मस्तान की करीम लाला ह्याच्या एका ईमारतीचे भूमीपूजन केले होते.कुठे आली बातमी तेव्हा?१९९२च्या दंगलीआधी राजकीय पक्षाच्या अनेक सुभेदारांची दाउद्,वरदराजनबरोबर ईमारत्,दारूच्या धंद्यात भागीदारी असायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
प
प्रशु Mon, 05/11/2015 - 07:13 नवीन
सहमत आपण सगळे उक्तित "सलिम खान" असतो आणि कृतित "सलमान खान"
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 05/14/2015 - 12:24 नवीन
अमेरिकेत सुद्धा पैशाच्या जोरावर उत्तम वकील मिळवून सुटण्याची शक्यता खूप जास्त असते ... अगदी अगदी वकील असावा तर असा
  • Log in or register to post comments
श
शि बि आय Fri, 05/15/2015 - 09:29 नवीन
जिथे पैसा आणि भौतिक सुखाला जास्त महत्त्व असते तिथे पैसे दिले कि काम होतेच.. आणि दुर्दैवाने आपल्या न्याय व्यवस्थेने ते सिद्ध आहे. आता सलमान ह्या परिस्थिथितही सुटतो तर आपण का नाही ?? आणि त्यामुळेच सहारा परिवारचे सुब्रोतो रोय आणि आसाराम बापूचे पोट दुखू लगाले आहे. आता प्रत्येक आजाराची गोळी वेगळी असते, सलमानच्या सुदैवाने त्याला ती गोळी मिळाली. बापू आणि सुब्रोतो ती शोधत आहेत. सामान्य मनुष्य अशी गोळी पुरेसे पैसे,वेळ आणि सत्ता नसल्यामुळे घेउ शकत नाही आणि शिक्षा भोगत राह्तो.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 05/15/2015 - 12:25 नवीन
भारतात पूर्वी देशासाठी तुरुंगवास भोगून बाहेर येणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना जनता हार तुरे घालून स्वागत करायची. अमेरिकेत सेलेब्रेटी बेकायदेशीर कृत्ये करून तुरुंगवास भोगून बाहेर आल्यावर त्याचे विजयी वीरांच्या सारखे स्वागत केले जाते. हेच लोण भारतात पसरले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अक्षय१ Sat, 01/02/2016 - 12:21 नवीन
सहमत .पण रवि पाटीलचे काय चुकले ?त्याला एवढी मोठी किंमत का चुकवावी लागली ?म्हणजे देशात पोलिसपण सुरक्षित नहि. सलमानने देशासाठी काय भरीव केल आहे ? रवि पाटील सिस्टिम मधलाच माणूस होता ना . त्याच्याच खात्यातील लोकांनी त्याची मदत का केली नाहि?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 01/04/2016 - 19:45 नवीन
अक्षय१, मुंबई पोलीस व्यवस्थितपणे माफियांना विकले गेलेले आहेत. संजय दत्त, सलमान खान वगैरे नटांवर माफियांचे कोट्यावधी रुपये गुंतलेले असतात. यांना तुरुंगात ठेवणं माफियांना परवडत नाही. य:कश्चित रवींद्र पाटील त्यांच्या दृष्टीने कीस झाडकी पत्ती आहे. भले तो पोलीस असेना. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय१
ब
बोका-ए-आझम Sun, 01/03/2016 - 19:39 नवीन
There is a little bit of wh$%& in all of us. Gentlemen, what's your price?
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Mon, 01/04/2016 - 14:16 नवीन
आपल्या देशात राजकारणी, हिरो, क्रिकेटर यांना सर्व सवलती, सेवा सुविधा व गुन्हे केले तरी पैशाच्या जोरावर सहज सुटका होते. पण प्रकाश आमटेना मदतीसाठी आवाहन करावे लागते. महाराष्ट्राची एवरेस्ट कन्या कृष्णा पाटीलला आर्थिक मदत एकाही राजकारण्यांनी, उद्योगपतींनी मदत केली नाही. शेवटी तिने सारस्वत बॅंकेतून 30 लाखाचे कर्ज काढून एवरेस्टवर विजयी चढाई केली. सारस्वत बॅंकेने 30 लाखाचे कर्ज व्याजासहित माफ करून कृष्णा पाटीलचा गौरव केला. नंतर मात्र महाराष्ट्रातील राजकारणी तिचा सत्कार करण्यासाठी पुढे आले.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 01/05/2016 - 02:36 नवीन
"अशा वेळेला तुम्ही नाही पण तुमच्या एखाद्या जिवलगाने किंवा मित्राने काही मोठा झोल केला ... तर तुम्ही पैशाच्या जोरावर हे आपण दाबून टाकू असा विचार सुद्धा तुमच्या मनात येणार नाही ???" १) असा विचार नक्की येणार. पण त्यानुसार कृती करेनच असे नाही. पुन्हा हा 'मोठा झोल' किती मोठा आहे ह्यावर पुढची कृती अवलंबून असेल. मित्र जिवलग आहे त्यामुळे (मित्राच्या जागी 'जवळचा नातेवाईक' असे वाचले तरी चालेल) हा विचार आणखीनच प्रबळ होईल. २) समजा ह्या जिवलग मित्राने कुणाचा खूनच केलाय, तरी देखील जवळ पैसे असल्यामुळे त्याला जामीनीवर सोडविण्याची, त्याला चांगला वकील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीनच. माझ्या मते गुन्हेगाराने स्वता वरच्या गुन्ह्याची अगदी कबुली दिली तरी देखील खटला उभा केल्याशिवाय त्याला शिक्षा होत नाहीच. मग अश्यावेळी त्याला जामीनीवर सोडविण्यासाठी स्वता जवळचे पैसे खर्च केले तर त्यात वाईट काय ? अत्रंगी साहेब, मी तुमच्या मताशी सहमत आहे. आपल्या पैकी बहुतेक जण अगदी पैशाच्याच जोरावर असे नाही म्हणत मी, पण अधिकाराच्या जोरावर, वडीलकीच्या जोरावर, किंवा भावनिकदृष्ट्या आपले वजन वापरून अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला वाचवायची खटपट करतोच.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 01/11/2016 - 13:55 नवीन
भेंडी* हा बाबा चांगल्या वर्तणुकिच्या कारणास्तव लवकर सुटतोय. बापाच्या पुण्याईमुळे आणि बापाने त्यावेळेस च्या सरकार पक्षातल्या लोकांचे उंबरठे झिजवल्याने ह्याच्यावर फक्त prohibited aamunition acts अंतर्गत गुन्हा दाखल झाला, फक्त एव्ह्ढ्याच करता म्हणालो कि संजुबाबा पेक्षा ह्या कटाचि कमि माहिति असणारे अजुनहि आर्थर रोड आणि नागपुर जेल मध्ये सडताहेत १९९४ पासुन. त्यानंतर हि हा सुधरला नाहिच ...श्रियुत महेश मांजरेकर, संजय गुप्ता आणि संजुबाबा चा फोन intercept करण्याता आला होता छोटा शकिल ला केलेला. ID Dicsovery वर काहि खरच छान प्रोग्राम असतात सत्यकथे वर आधारित ते पाहिल्या वर कळत साला अमेरिका अमेरिका का आहे म्हणुन्..न्याय justice कशाला म्हणतात. काल Gerald Parker ची केस बघत होतो एका निर्दोष माणसाला circumstantial evidence च्या आधारे आपल्याच पत्नि ला जिवे मारण्याच्या आणि तिच्या पोटातल्या अर्भकाच्या हत्येच्या आरोपाखालि जन्मठेपेची शिक्षा होते. ज्यावेळेस त्याला शिक्षा होते त्यावेळेस DNA तंत्रज्ञान तेव्हढे विकसित नव्हते पण १६ वर्षाचि शिक्षा भोगल्यानंतर अतिशय नाट्यमयरित्या DNA तंत्रज्ञानामुळेच खरा गुन्हेगार पकडला जातो आणि जो निर्दोष होता त्याचि सुटका होते सरकार त्याला साडे सहा लाख डॉलर compensation म्ह्णुन देते त्याच्या १६ वर्षाच्या कैदेच्या बदल्यात.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 01/11/2016 - 14:20 नवीन
In January 1999, Parker was sentenced to death by lethal injection, plus life without possibility of parole, plus 64 years in prison. ह्याला म्हणतात शिक्षा.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 01/11/2016 - 17:42 नवीन
हे सार्वत्रिक आणि सर्वकालिक आहे. अमेरिका असो की भारत. न्याय-अन्याय या कल्पना अतिशय लवचिक असतात. २००८ मध्ये अमेरिकेत बर्नि मॅडॉफला शिक्षा झाली कारण त्याने श्रीमंतांचे पैसे बुडवले. बाकी बेजबाबदारपणे मध्यमवर्गीय लोकांचे पैसे बुडवणारे सुटले आणि वर त्यांनाच खिरापत वाटली. अर्थात मध्यमवर्गीयही लुच्चेच. मिळतेय घरावर लोन तर घ्या म्हणून घेतले. भारतात हे आणखी अगदीच रानटी लेव्हलवर आहे आणि लोकांचा मात्र सारे जहाँ से अच्छाचा गजर वगैरे. हास्यास्पद आणि खतरनाक.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Mon, 01/11/2016 - 21:53 नवीन
सलमानचं प्रकरण आणि इतर अशीच उदाहरणं पाहून सांपत्तिक भोगवादातून जन्माला आलेल्या affluenza ची आठवण होते. The term "affluenza" has ....been used to refer to an inability to understand the consequences of one's actions because of financial privilege.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा