Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सई

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 05/12/2015 - 06:47
माझी सई तशी समजूतदार किती थकलो आहे ते पाहून किती गोड हसायचं ते निट ठरवता येतं तिला --- माझी सई तशी शहाणी आई आजारी असेल तर आईची आई होणं जमतं तिला --- माझी सई तशी डँबिस बाबा आईचे ऐकत नसेल तर बाबाची सासू होणंही जमतं तिला --- माझी सई तशी लब्बाड किती अन् कोणाला लोणी लावल तर किती अन् काय मिळेल हे पक्क ठावूक तिला --- माझी सई तशी बदमाष कोण रागावल्यावर किती भोकांड पसरायचे हे व्यवस्थित माहीतीये तिला --- माझी सई तशी निरागस शुभ्र केकवरची लालचुटुक चेरी मिळवायला किती रुसायचं हे कळतं तिला --- माझी सई तशी हुशार बाबा रागवला तरी बाबाचं प्रेम समजतं तिला --- माझी सई आज आठ वर्षांची झाली.... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१२/०५/२०१५)

प्रतिक्रिया द्या
7164 वाचन

💬 प्रतिसाद (25)
ख
खेडूत Tue, 05/12/2015 - 06:54 नवीन
आवडली! सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Tue, 05/12/2015 - 11:40 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
य
यशोधरा Tue, 05/12/2015 - 06:58 नवीन
खूपच गोड कविता :) सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Tue, 05/12/2015 - 07:07 नवीन
+11111111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सस्नेह Tue, 05/12/2015 - 15:20 नवीन
सईला वादिच्या गोड शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मदनबाण Tue, 05/12/2015 - 07:25 नवीन
माझी सई तशी हुशार बाबा रागवला तरी बाबाचं प्रेम समजतं तिला वाह्ह... :) गोड आणि निरागस सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 05/12/2015 - 07:42 नवीन
सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/12/2015 - 07:52 नवीन
गोग्गोड सईला वाढदिवसांच्या शुभेच्छा ! बाबाची ही काव्यभेट तिला नक्कीच खूप आवडली असणार !!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 05/12/2015 - 08:50 नवीन
कविता आवडले हेवेसांन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गणेशा Tue, 05/12/2015 - 10:20 नवीन
मुलगी म्हणजे बापाचा जीव की प्राण ... शब्दांपलिकडले भाव छेदून ओतप्रोत मायेचा झरा .... सई ला वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 05/12/2015 - 11:23 नवीन
एक "बाप" लि़खाण !!!! वा.हा.शु.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 05/12/2015 - 11:38 नवीन
एकदम मिकास्टाईल... अतिशय सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Tue, 05/12/2015 - 11:39 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/12/2015 - 12:13 नवीन
मस्त कविता! सई ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/12/2015 - 12:28 नवीन
छान कविता, सईला वादिहाशु!!
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 05/12/2015 - 12:33 नवीन
डँबिस सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/12/2015 - 13:21 नवीन
माझी सई तशी निरागस शुभ्र केकवरची लालचुटुक चेरी >>> लै मत्त मत्त !!! ही घ्या आता सईला वाढदिवसानिमित्त माझ्याकडून एक तसलीच लालचुटुक भेट. Image removed.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 05/12/2015 - 13:31 नवीन
किती गोड!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 05/12/2015 - 13:57 नवीन
अगदी आवडली मुलीच्या वाढदिवसाला बाबाची उत्तम भेट
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 05/13/2015 - 08:07 नवीन
सर्वांचे मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 05/13/2015 - 15:53 नवीन
सईला खूप शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 05/13/2015 - 16:00 नवीन
बर्‍याच दिवसांनी तुमची सुंदर कविता वाचून मनापासून आनंद झाला. सईला बिलेटेड हॅपी रिटर्न्स !! मध्यंतरी बर्‍याच तोतया कवींनी अशी काव्ये प्रसवली होती की डोके भंजाळले होते. तुमची कविता वाचून तहान भागली.
  • Log in or register to post comments
ज
जडभरत Sun, 07/12/2015 - 11:55 नवीन
मस्त लिहिलंय, छानच. माझी सई तशी डँबिस बाबा आईचे ऐकत नसेल तर बाबाची सासू होणंही जमतं तिला हे मात्र एक्दम खरं.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 07/14/2015 - 14:43 नवीन
फारच छान लिहिलय. खूप गोड कविता. तुमच्या सईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 07/14/2015 - 15:00 नवीन
अरे! ही कविता नजरेतून सुटलीच होती. मस्त कविता एकदम! सईला अनेकोत्तम शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा