Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शामसुंदर घननिळा......

न — निनाद जोशी, Tue, 05/12/2015 - 07:50
दारि तुझ्या बैसुनी आहे होवुन दारिची शिळा का तरी ना भेटला मज तु शामसुंदर घननिळा जातोस तु लिला कराया गोपिकांच्या सोबती फोडीसी हंडे दह्याचे गोपाळ घेउन संगती जातो कधी समजेच ना तुज पाहाया मी थांबलो देउनी सर्वस्व माझे तव पायरी वरी राहीलो नाही मी अर्जुन अथवा नाही मीराबाई रे अरे मी वेडा पिसा आलो तुझीया पायी रे आज मजला भेट थोडा तुज पाहण्याची संधी दे वसुनी या नयनात मजला जन्मांतरीची शांति दे ये त्वरेने आज आता जीवज्योत संपत आहे ह्या तुझ्या भक्ताकडे बघ काळ थोडा राहीलाहे थांबलो आहे इथे मी पाहण्या तुझीया लीळा दारात ये आता तरी हे शामसुंदर घननिळा………

प्रतिक्रिया द्या
1244 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
वेल्लाभट Tue, 05/12/2015 - 08:21 नवीन
वाह ! सुरेखच ! छान लय असलेली कविता. सखोल भावपूर्ण. आवडली. शेवटच्या कडव्यात, लीळा हा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ काय? की ल चा ळ करण्यास कवीचे स्वातंत्र्य समजावे?
  • Log in or register to post comments
न
निनाद जोशी Tue, 05/12/2015 - 08:30 नवीन
स्वातंत्र्य वगैरे काही नाही हो ...... फक्त छपाई मधली चूक आहे. थांबा नीट करतो.... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/12/2015 - 08:58 नवीन
छान प्रयत्न.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 05/12/2015 - 10:00 नवीन
मस्त ! :)

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा