Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

२. नको बोलु बाबा काही

ग — गणेशा, Tue, 05/12/2015 - 10:30
१. हरवली पोर माझी ---------------------- नको बोलु बाबा काही नको सांगु काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई हातानी तुझ्या जेंव्हा मला भरवला घास कामामध्ये असे तुझ्या फक्त माझाच ध्यास कसे विसरेल बाबा तुझी करुण कहानी फाटलेल्या सदर्‍यात विनलेली नाती धुळीमधी माखलेली तुझी जिंदगाणी आधाराची परि माझ्या प्रेमाची सावली अंगणात विसावता मायेची अंगाई वेड्या या पोरीची बाबा तुच विठाई प्राजक्ताच्या सड्यामध्ये होती ओघळली कविता सासराला जाताना तुझी रडवेली बोली फाटक्या या संसाराला ठिगळाची घाई दूराव्याच्या अंतरात जीव जाळीत राहि नको बोलु बाबा काही नको सांगु काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई !!

प्रतिक्रिया द्या
3876 वाचन

💬 प्रतिसाद (15)
प
प्रचेतस Tue, 05/12/2015 - 10:37 नवीन
अप्रतिम. गणेशाच्या कविता म्हणजे क्या बात...!!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 05/12/2015 - 10:42 नवीन
सुरेख...

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Tue, 05/12/2015 - 10:45 नवीन
आवडली!!!!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 05/12/2015 - 10:50 नवीन
रडवून राहीलास रे ! जबहर्या रचना
अंगणात विसावता मायेची अंगाई वेड्या या पोरीची बाबा तुच विठाई
निशब्द बापूस नाखु
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Tue, 05/12/2015 - 10:58 नवीन
हळवे करणारी सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/12/2015 - 11:25 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 05/12/2015 - 11:38 नवीन
दोन्ही कविता आवडल्या, (हळवा बाप) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 05/12/2015 - 12:44 नवीन
कवी आणि कविता दोघांचीही बाजू..
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 05/12/2015 - 18:46 नवीन
भावस्पर्शी रचना खूप भावली. जुना गणेशा परतलाय याची खात्री पटली :-) .
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 05/13/2015 - 07:11 नवीन
नि:शब्द ....
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 05/13/2015 - 08:08 नवीन
__/\__!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/13/2015 - 10:03 नवीन
सर्वांचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
अ
अर्व Wed, 05/20/2015 - 11:50 नवीन
खुप सुरेख कविता
फाटक्या या संसाराला ठिगळाची घाई
ही शब्द बांधणी कमालीची प्रभावी वाटली..
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 05/20/2015 - 15:59 नवीन
खूप आवडली...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/20/2015 - 16:35 नवीन
हळवी कविता..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा