मग कळेल मझा...!
तू काही माझं ऐकणार नाहीस
मीही आपला हट्ट सोडणार नाही...
तू घरात बसून....
बायकोच्या हातची भजी खात,
समाजातल्या विकृतींवर बोलणार...
वातानुकुलीत सभांमध्ये भाषणे ठोकणार
जमलंच तर झणझणीत कविता पाडणार
मला नाहीच रे जमणार...
तुझं हे तळ्यात - मळ्यात खेळायला
आत एक अन बाहेर एक जमवायला
आपलं कसं सारं एकदम सडेतोड असणार
आम्ही प्रत्येक प्रसंगाला थेट शिंगावर घेणार
नाही रे जमत मला असं जगणं
हे असं..., कौलातून झिरपणार्या..
थेंबभर कवडशांच्या मागे धावणं...
केव्हातरी उंबरठ्याबाहेर पाऊल टाक
चटके देणारं लखलखीत उन्ह अंगावर घे...
मग कळेल मझा...
बेभान होवून जगण्यातला
'मी'ला विसरून स्वतःलाच उधळून देण्यातला !
विशाल
तुम्ही सुरेश वाडकरांचे फ्यान आहात का?फ्यान नाही म्हणता येणार. पण त्यांची 'चप्पा चप्पा' सारखी गाणी आवडतात ;)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व Why on earth is Narendra Modi going to Mongolia? Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li India’s foreign policy must continue to move past the parochial Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery gunsश्या ह्यात काय मजा ??पंत, इथे 'मी'चा अर्थ 'स्वत्व' असा नसून 'अहं' असा वाचा, मग 'मी;ला विसरण्यातील 'मझा' लक्षात येइल. तो सहजासहजी विसरता येत नाही. कारण तो आपल्या व्यक्तीमत्वाचा एक मुलभूत घटक आहे. पण तो जर विसरता आला तर जे साधता येतं त्याला तोड नाही.