Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

३. नको येवुस पोरी

ग — गणेशा, Wed, 05/13/2015 - 09:55
नको बोलु बाबा काही काय सांगतील पोरी या आसवांच्या ओळी दु:खाच्या खाणीत तव स्वप्नांची होळी नको येवुस माहेराला अवकळा सारी क्षीण आहे भाव अन जीव झाला भारी सुख गेली दावणीला शब्दही फितुर झाली झोपडीच्या झरोक्यातुन रात्र टिपुस ओली उजाडलं रान सारं तिथ आठवांची धुळ माखलेल मन आज जनु पारंब्याचा पिळ नाही काही इथं सार सार संपल तुझ्या पिर्तीची ओढ बस हीच जीवन वेल - शब्दमेघ

प्रतिक्रिया द्या
3351 वाचन

💬 प्रतिसाद (12)
च
चित्रगुप्त Wed, 05/13/2015 - 10:49 नवीन
व्वा. प्रथम ही कविता वाचली, तेंव्हा नीट अर्थबोध झाला नाही, मात्र वर दिलेल्या दुव्यावरून या आधीच्या दोन्ही कविता वाचल्यावर सर्व उलगडा झाला. तिन्ही कवितात हुरहुर, वेदना जास्त जास्त टोकदार होत गेली असल्याचे जाणवले. असा अनुभव मला चित्रकलेच्या बाबतीत अनेकदा आलेला आहे, परंतु "तुझ्या पिर्तीची ओढ - बस हीच जीवन वेल" असल्याने ती वेल पुन्हा पुन्हा बहरत जाते, हे नक्की.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/13/2015 - 20:48 नवीन
धन्यवाद ! अवांतर : चित्रकलेचा अनुभव जास्त उत्साह आणाणारा असेल कदाचित...चित्रकला ही मला आवडणारी ( येणारी नाही [:(] ) कला आहे. त्यातील नवनिर्मितीचा आनंद अती उच्च असतो असे वाटते.. रेषेच्या/रंगाच्या प्रत्येक फटकार्‍यात एक नविन भाव निर्माण होत असतो .. शब्दांचे तसे नसते कायम , तरी त्यांच्यातील भावना चित्रांच्या असंख्य तुकड्यांच्या वेड्यावाकड्या रेषाच असु शकतात... परंतु नवनिर्मितीचा आनंद त्यामानाने कमीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Wed, 05/13/2015 - 21:11 नवीन
कविता, गद्य लेखन आणि चित्रकला या तिन्ही प्रकारांबद्दल माझा अनुभव असा, की कविता ही फार क्वचित सुचून जाते, आणि तेंव्हाच्या तेंव्हा लिहून काढली नाही, तर विस्मृतीत जाते. गद्य लेखनाचा एकादा विषय बहुधा पहाटे सुचतो, अनेक दिवस तो मनात घोळत राहतो, आणि लेखन सुद्धा अनेक दिवस चालते. चित्रकला बहुधा सतत डोक्यात असतेच, प्रत्यक्ष निर्मिती जरी होत नसली, तरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती मन व्यापून असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 05/13/2015 - 10:53 नवीन
सुख गेली दावणीला शब्दही फितुर झाली झोपडीच्या झरोक्यातुन रात्र टिपुस ओली
__/\__!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 05/13/2015 - 10:57 नवीन
ही कविता पण आवडली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/13/2015 - 11:45 नवीन
शब्दमेघच!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 05/13/2015 - 12:01 नवीन
कवितामालिका आवडली. थोडं धाडस करुन खालचे बदल केलेत. बघ आवडतं का ? फक्त लय/ गेयता वाढतेय म्हणून काय सांगतील पोरी तुला आसवांच्या या ओळी दु:खाच्या खाणीत तव स्वप्नांची गं होळी नको येवुस माहेराला अवकळा आहे सारी क्षीण आहे भाव आज सारा जीव झाला की गं भारी सुख गेली दावणीला शब्द फितुर झालेती झोपडीच्या झरोक्यातुन रात्र टिपुस ओलेती उजाडलं रान सारं तिथ आठवांची धुळ माखलेल मन आज जनु पारंब्याचा पिळ नाही नाही काही इथं सारं सारं गं संपलं तुझ्या पीरतीची ओढ बस हीच जीवन वेल
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/13/2015 - 20:55 नवीन
बदल आवडला ! परंतु थोडासा भाव बदलला येथे. मी लिहिलेली कविता, त्या मुलीचा शेतकरी बाप, निराशेच्या गर्तेत .. स्वताशीच पुटपुटत आहे आणि ती बोली भाषा आहे.. पुढील शेवटच्या कवितेत असा गेय भाग नक्कीच वाचायला मिळेल कारण ती दूर असणार्‍या मुलीच्या तोंडुन आहे. सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
म
मदनबाण Wed, 05/13/2015 - 12:16 नवीन
छान... उजाडलं रान सारं तिथ आठवांची धुळ माखलेल मन आज जनु पारंब्याचा पिळ वा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Things
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 05/13/2015 - 12:58 नवीन
उच्च कविता.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 05/13/2015 - 13:16 नवीन
पु भा प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
र
रातराणी Wed, 05/13/2015 - 23:52 नवीन
खूप सुंदर! प्रचंड आवडली!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा