Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोल्हापूर कट्टा वृत्तांत

अ
अद्द्या
Wed, 05/13/2015 - 20:51
💬 72
सोमवार आणि मंगळवार झालेल्या प्रचंड पाउस आणि विजांमुळे हापिसातच २ दिवस वस्तीला होतो . बरेचसे नेटवर्क इक्विपमेंट जळाले होते . त्यामुळे मिपा वर येणं जमलेलं नाही . आणि त्यामुळेच वृत्तांत पोस्ट करण्यास उशीर झाला ---------------------------------------------------------------------------------------- स्थळ : राजारामपुरीतली एक खोली . . वेळ :- १०.५५ तरीही वेळ काळ आपल्यासाठी नाहीतच . . या अविर्भावात नाश्ता करत बसलेला तो . आणि यात मधेच फोन वाजतो " हेल्लो ? मी काशीकर बोलतोय !! " " काशीकर?? समजलं नाही . " "अहो मी ' अकौंटंट ' " "हो हो . बोला . काय म्हणताय?? " " अहो काय म्हणतोय काय . ११ वाजता भेटणार होतो ना सगळे आपण ? " "अं . . हो . पोचलात का तुम्ही ? " "हो . . अगदी वेळेवर . पण इथे कोणीच नाही . येताय ना?" "हो . पोचतोच . ५ मिनटात " असं म्हणून त्याने फोन ठेवला . आणि परत समोर असलेल्या ७-८ इडल्या आणि २-३ वड्यांनी भरलेल्या प्लेट वर ताव मारायला सुरुवात केली . . आणि परत फोन . . "हेल्लो . पोचलास का? " "कोण बोलतंय ?? " "मी रे स्नेहांकिता ताई . . कधी पोचतोस . . मी समोरच आहे हॉल च्या . लग्गेच ये " "हो . हे काय , निघालोच " परत इड्ल्यांची चिरफाड सुरु . . आणि एकदम आठवून तोच फोन लावतो . . "वल्लिशेट . कधी येताय? कुठे आहात ? सगळे पोचलेत . तुमची वाट बघ्ताएत . . " "हो रे, फडतरे ला आहे . . १५ मिनिटात पोचतो . ' "बरं या लवकर . " "हो अर्ध्या तासात येतो " १० सेकंदा पूर्वी १५ मिनिटात पोचतो म्हणून आता लगेच अर्धा तास . . मिसळ आली असावी समोर . असं म्हणत तो कसाबसा तयार होत , सुसाट गाडी चालवत पोचतो हॉल ला . . आणि मग त्याच्या लक्षात येतं . . मांडे घरीच राहिले . . मग गाडी आणि गडी जरी कर्नाटकचा असला आणि रस्त्याचे नियम पाळायची सवय असली . तरी टिपिकल कोल्हापुरी ष्टैल ने सिग्नल / वन वे सारख्या क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करीत तो घरी जाऊन मांडे घेऊन परत येतो . . आणि राव साहेब असं भारदस्त नाव असलेला हा कसा बसा ६५ किलो चा चालता फिरता हाडांचा सापळा भारतीय प्रमाण वेळेनुसार ११ वाजता सुरु होणाऱ्या कट्ट्याला पावणे बारा ला पोचतो . . हॉल मध्ये जवळपास सगळी मंडळी जमली होती . . अन्या कुठे तरी पाळण्याच्या तयारीत होता . . आणि मग सगळ्यांनी आपापल्या आयडी चं नाव सांगितलं . . तिथे "नाद खुळा " असं नाव ऐकल्यावर जसा माणूस समोर येईल तसाच दंगा ते करत होते . प्रगो शांतपणे सगळं ऐकत हळूच पिन टोचत होते . . हळू हळू सगळ्यांनी आपापले अनुभव मांडायला सुरुवात केली . नाखू काकांनी डबल डेकर यष्टी पण होती हे सांगून जवळपास सगळ्यांची यष्टी उडवून दिली . . ह्या सगळ्या गप्पा चालू असताना 'वेताळ ' नि प्रवेश केला . . त्यांचे पाय सरळच आहेत हे पाहून मी मनातल्या मनात हुश्श केलं . . मधेच स्नेहांकिता ताइनि भिंगरी ताई आणि अनन्या ताईंचा फोन आला आणि त्या त्यांना घेऊन आल्या . . थोड्या वेळात यमगर्निकर , जिनेन्द्र वगेरा मंडळी हि आली . . . ७ वाजता सुटलेला सूड १ वाजता पोचला कसाबसा आणि त्याने आणलेले रसगुल्ले सदृश बासुंदी / मलई चा जेवणात स्वीट डिश म्हणून देण्यात येईल असं जाहीर केलं . . कट्ट्यात खरी जान आणली ती शाह काकांनी . . पुण्यात राहणारे शाह बरेच दिवस मिपा फॉलो करतात . त्यांनी स्वतःचा आयडी नाही बनवला . पण रोज इथे दंगा मस्ती करणाऱ्या सगळ्या आयडीना ते ओळखतात . . अनन्या ताई आणि भिंगरी ताई आल्यावर आम्हा गरीब बिचाऱ्या भोळ्या भाबड्या सालस निरागस गुणी आणि कर्तव्यदक्ष मुलांवर कंपू करून अनाहीतांना त्रास देण्याचा आरोप करण्याचा प्रयत्न केला . पण नाखू काकांनी लग्गेच तो प्रयत्न हाणून पाडला . . (मेलो आता . पळा ) वल्ली , प्रगो , वेताळ , आणि नाखू यांनी मिळून गणपती उचलणे आणि तो विसर्जित करण्या दरम्यान गणपती आणि त्याला उचलणारे , या दोघांच्याही मनात चालणारे विचार बोलून दाखवले . . (याचा संदर्भ नाखू काकांच्या वृतांतात आलाय ) . याच दरम्यान आलेला सूड . . साडे सहाची गाडी सात ला आली , आणि साताऱ्यापर्यंत त्याने ती बस नसून बैलगाडी आहे या समजात अन त्याच वेगात मारली . आणि पुढे कोल्हापूर कमानी पासून बस स्टेन्ड ला हि त्याच वेगात आला . आणि आधी मला त्याला घेऊन येताना रस्त्यात आणि मग हॉल मध्ये आल्यावर प्रत्येकाला एकदा सांगून घेतलं . . पण नंतर "साय" वाचून त्याने या सगळ्याची भरपाई हि केली . हे सगळं होई पर्यंत दीड वाजत आलेच होते . हॉल पासून जवळच असलेल्या ' श्रीकृष्ण ' हॉटेल मध्ये स्नेहांकिता ताइनि जेवणाची व्यवस्था केली होती . आणि तिथली स्पेशालिटी म्हणजे मुंडी आणि पाया थाळी . तिथे आधी अनन्या ताईंनी आणलेल्या फणसाच्या चिवड्यावर सर्वांनी ताव मारला . याच दरम्यान यमगार्निकरांनी लिव इन रिलेशन बद्दल आपला अनुभव सांगितला . . आम्हा सगळ्या लहान मुलांच्या दंग्याला न जुमानता ' श्री कृष्ण ' वाल्यांनी अगदी शांतपणे सगळ्यांना जेवण वाढलं आणि जीभ आणि पोट तृप्त अगदी केलं . या कट्ट्या दरम्यान झालेले काही ठराव : - १ ) यमगर्निकर आपले लिव इन रिलेशन चे अनुभव लेख स्वरूपात इथे लवकरच मांडतील आणि आम्हा शिंगल मुलांना उपकृत करतील ( आणि त्या पुढचे प्रगो सांगतील ). २) शाह काका स्वतःचा आयडी घेतीलच, त्यांच्या बोलण्यावरून प्रेम पुजारी असा काहीसा आयडी त्यांना हवा होता . संपादक मंडळाने या कडे लक्ष घालणे . ३ ) सूड ने डब्यातून आणलेला पदार्थ नक्की काय आहे याचा पुरावा म्हणून फोटो अडकवणे. आणि सर्वात महत्वाचा भाग . . कट्ट्याच्या दरम्यान काही कमी जास्त झालं असल्यास लहान समजून विसरून जावं . आणि पुढे हि नक्कीच भेटूच . . माझा हा पहिलाच कट्टा . त्यामुळे मनात थोडी भीती होती . पण सगळ्यांनीच वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखं अगदी आपल्यात सामावून घेतलं . सगळ्यांचेच पाय कायम जमिनीला टेकलेले आहेत . सर्वांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा . मोबाइल गंडलाय . त्यामुळे माझ्याकडे फोटो नाहीत . अन्या , वल्ली , प्रगो , यस वाय जी , यांनी फोटो धाग्यात टाकावेत . .

प्रतिक्रिया द्या
20549 वाचन

💬 प्रतिसाद (72)
स
सूड Fri, 05/15/2015 - 11:44 नवीन
लैच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
य
यसवायजी Fri, 05/15/2015 - 12:00 नवीन
बघा बघा. निपाणीचा असलो म्हणून काय जाहले? आम्ही चूक काढूच नये की काय? :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 05/15/2015 - 12:07 नवीन
होय तर काढा की!! महाराष्ट्राचे मिष्टेका काढणे, जगी जालिया शहाणे मग का निपाणीकराने, चुका* काढोचि नये!! ;) *मिष्टेक या अर्थी वाचावे. खिळे का? आंबट चुका का? असले आचरट प्रश्न विचारु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
ब
बॅटमॅन Fri, 05/15/2015 - 09:19 नवीन
हीच शंका मलासुद्धा आलेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अनन्न्या गुरुवार, 05/14/2015 - 14:02 नवीन
थोडक्यात पण मस्त लिहिलय. मलाही पोहोचायला थोडा उशिर झाला, आधीच्या गप्पात फार सामिल होता आले नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/14/2015 - 14:35 नवीन
जबराट कट्टा!!!!! एकच नंबर!!!! बाकी आमचा डुआयडी आम्हांलाच नव्याने दाखवून देणार्‍या जालराजवाड्यांना एक कडक सलाम. ;)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 05/14/2015 - 19:02 नवीन
जालराजवाडे शब्द प्रचंड आवडला गेलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
भ
भिंगरी गुरुवार, 05/14/2015 - 15:30 नवीन
एकंदरीत पहिलटकरणीचा(पहिल्या कट्ट्याचा)अनुभव माझा एकटीचा नव्हता तर्.त्यामुळेच बरेच जण साळसुदासारखे बोलत होते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/14/2015 - 15:35 नवीन
साळसूदासारखे? आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
भ
भिंगरी गुरुवार, 05/14/2015 - 15:40 नवीन
नाहीतर काय.इथे मिपावर तर खेचाखेची कापाकापी चालू असते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/14/2015 - 15:44 नवीन
कॉलिंग स्नेहातै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
र
रेवती गुरुवार, 05/14/2015 - 16:09 नवीन
आता फोटू पाहिल्यावर कट्टा झाला यावर विश्वास ठेवत आहे. यशो, स्णेहातै भारत भ्रमन करायल्यात म्हने!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/14/2015 - 16:18 नवीन
असाय काय! त्या तलवार घेऊन सज्ज व्हत्या ना, तवा म्हनलं कापाकापीबद्दल सांगत्याल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
य
यसवायजी गुरुवार, 05/14/2015 - 16:15 नवीन
अरे तो सुरुवातीला गृप फोटो काढला होता तो कुणाच्या मोबल्यात आहे?
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत गुरुवार, 05/14/2015 - 16:58 नवीन
कट्ट्याचे वेगवेगळे वृतांत वाचून कट्टयाला हजार असल्याचा अनुभव आला.(खाद्यंती सोडून.)त्यासाठी कोल्हापूरला सदेहच जायला हवे.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/14/2015 - 20:14 नवीन
तरुण व अविवाहित कट्टेकर्‍यांचे फोटो पाहून अन अनुभव वाचून ईर्ष्या वाटत आहे. असे वाटते कालचक्र मागे फिरवावे अन विकांतांना कट्टे ट्रेक्स मध्ये सामिल व्हावे. वाटलं तेव्हा दुचाकी नाही तर एसटी किंवा ट्रेनने परगावचे कट्टे अनुभवावे... गेले ते दिवस... :-(.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 05/15/2015 - 06:23 नवीन
जबराट कट्टा वृत्तांत. काही खाजगी कारणास्तव येणं रद्द करावं लागलं. :(
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/15/2015 - 06:39 नवीन
आता कसं... कट्टा जबरा झाल्याच कळत... :) आजची स्वाक्षरी :- आरटीओ दलालांकडून वर्षांला ८०० कोटींपेक्षा जास्त फस्त! मुंबईत ‘पंधरावं वरीस धोक्याचं', १५ वर्षांखालील १८५ मुलींचा गर्भपात
  • Log in or register to post comments
स
सनईचौघडा Fri, 05/15/2015 - 06:42 नवीन
जबरी कट्टा. फणसाचे तळलेले गरे पाहुन तोंपासु.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Fri, 05/15/2015 - 11:11 नवीन
मस्त वृत्तांत आणि फोटो
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 05/15/2015 - 12:59 नवीन
चांगला झालाय कट्टा (मळमळ, कळ्क्ळ,.. )
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 05/17/2015 - 11:58 नवीन
आणि सुंदर फोटो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा