Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

४. बोल ना रे बाबा काही...( समाप्त )

ग — गणेशा, गुरुवार, 05/14/2015 - 08:09
३. नको येवुस पोरी २. नको बोलु बाबा काही १. हरवली पोर माझी कविता नावाची ! मनोगतः शेवटी बापाच्या जाण्याने दु:खी झालेल्या लेकीचे(कवितेचे) हे काव्य ... समाजातील अश्या असंख्य दयनिय अवस्थेतील मिटल्या पापण्यात स्वप्ने दडलेल्या शेतकरी बापाचे चित्र सहज लिहिले गेले होते.. तुमच्या सर्वांचे आभार. - तुझ्या डोळ्यात बरसुन... कोरडीच ही कविता आसवांच्या ओळींसंगे बाबा... गहिवरलेली तुझी कविता मिटल्या पापण्यांच्या स्वप्नांत... अडखळणारी ही कविता तुझ्या आठवांच्या थेंबानी.. हेलावणारी तुझीच कविता माझं माहेर देऊळ तुच होता मायबाप क्षीण नसे कधी भाव तिथं पिर्तीचे होते गाव बोल ना रे बाबा काही सांग ना रे काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई रातीच्या गच्च पहार्‍यात... तव आठवांची ही टिपुस कविता वेदनेच्या अस्तित्व डोहात...खोल बुडालेली तुझी कविता डोंगरायेव्हड्या दु:खात सार्‍या... तुझ्यासाठी हसणारी ही कविता तुझ्याच साठी आज मात्र... शेवटचं रडणारी तुझीच कविता प्राजक्ताच्या फुलांनी दिले सर्वस्व झोकुनी चालावे का मी तुझ्यामागे सांग त्याच वाटेनी आसवांच्या पालखीत तव स्वप्नांची मुर्ती क्षितिजापल्याड उडलेले रिक्त भावनेंचे पक्षी बोल ना रे बाबा काही सांग ना रे काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई --शब्दमेघ

प्रतिक्रिया द्या
5765 वाचन

💬 प्रतिसाद (14)
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 05/14/2015 - 08:54 नवीन
मर मेल्या कशाला?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 05/14/2015 - 09:20 नवीन
हा भागही चांगला झाला आहे. शेवटी त्या बापाला मारणे गरजेचे होते का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/14/2015 - 11:57 नवीन
गरजेचे नव्हते खरे.. पण सर्व कवितेमधील बोलणे हे न भेटता दुरुनच झालेले आहे.. बापाची परिस्थीती-- पोरीच्या विचारांनी आयुष्य जगत असलेला बाप .. आणि सासरी असलेली मुलगी.. त्यामुळे समाप्तीला दूराव्यातील ही सर्वात दूरची पातळी वाटली होती.. तसे ही बाप वयाने मोठा.. शिवाय शेतात राबुन ..आयुष्य खंगलेले.. त्यामुळे शेवट त्याच्या मरणा नंतरचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नाखु गुरुवार, 05/14/2015 - 09:39 नवीन
भेट मगच बोलतो.. तूर्तास इतकेच बापूस नाखु
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/14/2015 - 11:08 नवीन
सुंदर आहे कविता.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 05/14/2015 - 11:49 नवीन
:( का रे असं ?????
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/14/2015 - 20:41 नवीन
शेवट झालाच .. शेवटी!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 05/15/2015 - 12:05 नवीन
धन्यवाद , सर्वांना त्या बापाचा शेवट झालेला कदाचीत आवडले नाही... त्याबदल दिलगीरी व्यक्त करतो... संपादित करता येत नाहिये, नाहि तर मनोगत लिहिलेल्या २ लाईन काढुन टाकल्या असत्या..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 10/09/2019 - 10:41 नवीन
इतर कविता वाचता वाचता, आपली जुनी कविता वाचावी म्हणुन पुन्हा ह्या ४ कविता सिरिज वाचल्या.. मस्त वाटल्या.. आजकाल कविता लिहावेसे वाटतच नाही हरवली कविता माझी
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 10/15/2019 - 05:42 नवीन
लिहित जा रे कविता. तुझ्यातला कवी मारु नकोस. तुझ्या कविता वाचायला खूप आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Sat, 10/19/2019 - 16:03 नवीन
धन्यवाद वल्ली मित्रा .. पण भटकंतीच्या , सायकलच्या आवडीने कवितेंवर मात केली . कदाचीत बाप झाल्यावर पण प्रायोरिटी बदलली असेल , आणि सभोवतालचे सारे विश्व च बदलले . त्यामुळे कविता बंद झाली . कदाचीत mee हाडाचा कवी कधी नव्हतो , ना मला माझ्या कविता तोंडपाठ , ना मला कविता ऐकवायला किंवा ऐकायला आवडतात . वाचायला आवडतात मात्र अजूनही ते हि नसे थोडके . तुझे विडंबने येऊदे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ग
गणेशा Sat, 10/19/2019 - 16:18 नवीन
धन्यवाद वल्ली मित्रा .. पण भटकंतीच्या , सायकलच्या आवडीने कवितेंवर मात केली . कदाचीत बाप झाल्यावर पण प्रायोरिटी बदलली असेल , आणि सभोवतालचे सारे विश्व च बदलले . त्यामुळे कविता बंद झाली . कदाचीत mee हाडाचा कवी कधी नव्हतो , ना मला माझ्या कविता तोंडपाठ , ना मला कविता ऐकवायला किंवा ऐकायला आवडतात . वाचायला आवडतात मात्र अजूनही ते हि नसे थोडके . तुझे विडंबने येऊदे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 10/20/2019 - 02:56 नवीन
माझीही विडंबने संपली आता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
म
मनिष Sun, 10/20/2019 - 20:42 नवीन
मलाही असंच वाटलं होतं काही वर्षांपुर्वी, पण परत येते कविता.... कधी ते नाही सांगता येतं, पण येते येवढं नक्की. मनापासून वाटल्याशिवाय मात्र लिहू नकोस. अवांतरः धामणस्करांची "बऱ्याच दिवसात कविता लिहिली नाही म्हणजे बऱ्याच दिवसात स्वतःला भेटलो नाही" वाचली आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा