Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रिय समुद्रा

म — मिसळलेला काव्यप्रेमी, गुरुवार, 05/14/2015 - 08:40
प्रिय समुद्रा, कश्या रे तुझ्या लाटा आंधळ्या पुढची कातळावर फुटलेली दिसतच नाही.. मागून येऊन पुन्हा त्याच कातळावर आदळतात कां? कशासाठी?? फुटण्यासाठी ?! ------ प्रिय समुद्रा, तुला चंद्राची खुपच ओढ म्हणे का त्याला तुझी? किती वर्षांची साथ रे तुमची? कधी एकत्र बसून गप्पा मारतांना पाहीले नाही तुम्हाला! अशी कशी रे हि दोस्ती? स्पर्शातित! ----- प्रिय समुद्रा, तुझ्या पोटात अनेक वादळे असतात म्हणे.. पण मला कळत नाही त्यात नवल ते काय? इथे सगळेच आपापली वादळे घेऊन वावरतात.. त्या वादळांच करायच काय? हाच काय तो प्रश्न बाकी आहे.. ------ प्रिय समुद्रा, कसं वाटत रे? जेव्हा तुझ्याच किनार्‍याशी बसून तुला न विचारता, तुला साक्षीला ठेवून आयुष्यभराची साथ देण्याच्या आणाभाका घेणार्‍या जोडप्यांकडे बघून? कसा पाहतोस तू त्यांच्याकडे? रागाने? करुणेने? कि वात्सल्याने? ------ प्रिय समुद्रा, एकदा माझ्या घरी येशील? खुप गप्पा मारु वादळाच्या, घनगंभीरतेच्या, बुडणार्‍या जहाजांच्या, रंगीबेरंगी जलचरांच्या, मोत्यांच्या, रत्नांच्या आणि तुझ्या उदरात गडप होऊन आयुष्य संपवणार्‍या जिवांच्या करुण कहाण्यांच्या? तू कसं सामावतोस त्यांना याबद्दल एक विचित्र कुतुहल आहे मला... येशील? ----- प्रिय समुद्रा, तू एकदा खुप रागावला होता म्हणे एक मोठ्ठी लाट जन्माला घातलीस आणि दिली धाडून गरीब भाबड्या जिवांवर कां रे? ना ती लाट जिवंत राहीली ना ते जिव... फक्त एक प्रश्न राहीला कां? ----- प्रिय समुद्रा, तुला माहितीये? तुझ्या माझ्यात एक साम्य आहे तू ही वेडा आणि मी ही एकही लाट जिवंत राहणार नाही हे माहीत असूनही तु एकामागे एक लाटा जन्माला घालत राहतोस आणि मी एकदाही 'ती' किनार्‍यावर येणार नाही हे माहित असूनही रोज एक आशा जन्माला घालत राहतो.. असं कां रे? ---- प्रिय समुद्रा, आज आलो खरा मी तुझ्याकडे... शांततेसाठी आलो होतो जिव निववायला आलो होतो पण जाऊ दे.. चलतो मी.. |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४/०५/२०१५)

प्रतिक्रिया द्या
6250 वाचन

💬 प्रतिसाद (35)
व
वेल्लाभट गुरुवार, 05/14/2015 - 08:45 नवीन
छान !!! समुद्र हा त्याच्या भौतिकतेसारखाच एक गहन विषय आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/14/2015 - 08:48 नवीन
सुरेख... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व Why on earth is Narendra Modi going to Mongolia? Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li India’s foreign policy must continue to move past the parochial Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery guns
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/14/2015 - 09:36 नवीन
वाचताना खुप सोप्प्या पद्धतीने वाटतात ही मुक्तके.. पण कितीतरी खुप गहन प्रश्न दडलेले आहेत यात. मस्त वाटले वाचताना .. समुद्राला घरी येशिल म्हणणारे मुक्तक जास्त आवडले.. ---- शेवटच्या मुक्तकात गेलाच होता समुद्राकडे तर बोलायचे की जरा..
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 05/14/2015 - 09:21 नवीन
जबराटच, हाय क्लास जियो
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 05/14/2015 - 09:23 नवीन
प्रिय समुद्रा, तुझ्या पोटात अनेक वादळे असतात म्हणे.. पण मला कळत नाही त्यात नवल ते काय? इथे सगळेच आपापली वादळे घेऊन वावरतात.. त्या वादळांच करायच काय? हाच काय तो प्रश्न बाकी आहे..
हे विषेश आवडले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 05/14/2015 - 10:44 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
त
तिमा गुरुवार, 05/14/2015 - 15:39 नवीन
मिका ही कविता लिहून माझ्या मनांत अनेक वादळे जन्माला घातलीस रे पोरा ! खूप छान !
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 05/14/2015 - 11:44 नवीन
प्रिय समुद्रा, तुझ्या पोटात अनेक वादळे असतात म्हणे.. पण मला कळत नाही त्यात नवल ते काय? इथे सगळेच आपापली वादळे घेऊन वावरतात.. त्या वादळांच करायच काय? हाच काय तो प्रश्न बाकी आहे..
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 05/14/2015 - 11:46 नवीन
'मिका'क्लास कविता! भारीच्च! कसं सुचतं ओ ? ;)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 05/14/2015 - 12:29 नवीन
'मिका'क्लास कविता! धागा उघडल्याचं चीज झालं!
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 05/14/2015 - 13:35 नवीन
जोखडातून मुक्त आणि अर्थ्-भोवरे देणारी कवीता. जियो एक "मिका टच" म्हणतात तो हाच !!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/14/2015 - 14:13 नवीन
छान निबध्ध !
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 05/14/2015 - 14:35 नवीन
क्या बात है!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 05/14/2015 - 18:04 नवीन
आवडली कविता. माझ्या पोटात ही वादळे गड गड करत राहतात.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/14/2015 - 19:56 नवीन
मि.का. ,बस्स! नाम ही काफी है|
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 05/14/2015 - 20:05 नवीन
मिकाटच...अप्रतिम.
  • Log in or register to post comments
श
शलभ Fri, 05/15/2015 - 17:17 नवीन
अप्रतिम. आवडली.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 05/16/2015 - 06:50 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 05/16/2015 - 10:10 नवीन
"हाडाचा" कवी आहे ही नम्र नोंद कवीशी समक्ष भेट झालेला वाचक नाखु.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 05/16/2015 - 10:18 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ग
गवि Sat, 05/16/2015 - 14:03 नवीन
अतिशय उत्कृष्ट.मिका सिग्नेचर स्पष्ट उमटलेली सुंदर रचना..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/16/2015 - 15:03 नवीन
प्रिय समुद्रा, तुझ्या पोटात अनेक वादळे असतात म्हणे.. पण मला कळत नाही त्यात नवल ते काय? इथे सगळेच आपापली वादळे घेऊन वावरतात.. त्या वादळांच करायच काय? हाच काय तो प्रश्न बाकी आहे..
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 05/18/2015 - 15:35 नवीन
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 05/18/2015 - 15:35 नवीन
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 05/18/2015 - 15:36 नवीन
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 05/18/2015 - 15:37 नवीन
मस्त रे... तुझ्या लेखणीत तरल आणि आशयघन असं जबराट काॅम्बिनेशन आहे. खास मिका स्टाईल
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/18/2015 - 18:32 नवीन
समुद्राला विचारलेले प्रश्न त्याच्या लाटांसारखेच विरून जाणार आहेत अनुत्तरित!
  • Log in or register to post comments
अ
अर्व Wed, 05/20/2015 - 11:45 नवीन
प्रिय समुद्रा, एकदा माझ्या घरी येशील? खुप गप्पा मारु वादळाच्या, घनगंभीरतेच्या, बुडणार्‍या जहाजांच्या, रंगीबेरंगी जलचरांच्या, मोत्यांच्या, रत्नांच्या आणि तुझ्या उदरात गडप होऊन आयुष्य संपवणार्‍या जिवांच्या करुण कहाण्यांच्या? तू कसं सामावतोस त्यांना याबद्दल एक विचित्र कुतुहल आहे मला... येशील?
काहीतरी खास आहे या ओळीत.. समद्रासारखच घनगंभीर आणि पोटात खोल खोल अर्थ दडवलेलं
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 05/25/2015 - 13:41 नवीन
सही. एक्दम मिका स्टाईल.
  • Log in or register to post comments
फ
फिझा Tue, 04/19/2016 - 08:57 नवीन
खूप मस्त !! आवडली कविता !!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 04/19/2016 - 17:38 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 04/19/2016 - 17:39 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 04/19/2016 - 17:39 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Tue, 04/19/2016 - 18:04 नवीन
सुंदर काव्य आहे... अप्रतिम...
  • Log in or register to post comments
उ
उल्का Tue, 04/19/2016 - 18:08 नवीन
अप्रतिम! समुद्राकडे बघितल्यावर हे असेच काहिसे प्रत्येकाच्या मनी उमटत असावे जे तुम्ही खूप सुन्दरपणे शब्द्बद्ध केलय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा