शेयर बाजारातला परतावा. मिथके आणि वस्तुस्थिती
ह्या धाग्यात टाकलेले टेबल कोणी मला नीट टाकुन देवु शकेल का?
शेयर बाजारा वर एक धागा आणि वरचे प्रतिसाद वाचले. त्यावरुन काही फार सोप्या सजेशन वाचण्यात आल्या, म्हणुन विचार केला की गेल्या ५ वर्षात नक्की काय झाले आहे ते बघावे. हा विदा आहे, ज्याचा त्याने बघुन त्यातुन अर्थ काढावा. ह्या तक्त्यातल्या सर्व कंपन्या प्रचंड मोठ्या वगैरे आहेत, आणि त्या जवळपास ५०-६० टक्के शेयर मार्केट रीप्रेसेंट करतात.
ज्या सुचना बघण्यात आल्या त्या थोडक्यात अश्या
१. निफ्टी इंडेक्स फंड मधे गुंतवणुक करावी आणि निश्चिंत व्हावे. खाली बघा, निफ्टीने ५ वर्षात ९.९ टक्क्याच्या रेट नी वार्षिक परतावा दिलेला आहे.
२. चांगली मॅनेजमेंट आणि आपल्याला कळणारा धंदा असला तर गुंतवणुक करावी. टाटा समुहाचे उदा दिले होते. खालच्या तक्त्यात बर्याच टाटा समुहाच्या कंपन्या आहेत, त्यांचे काय झाले आहे गेल्या पाच वर्षात ते बघा. टीसीएस सोडली तर परताव्याच्या बाबतीत अंधार आहे. तश्याच चांगली मॅनेजमेंट असणार्या इंफोसीस, विप्रो, लार्सन, महींद्रा, रीलायन्स अश्या पण कंपन्या आहेत त्यांचे ही बघा. स्टेट बँक आणि भेल चे पण काय झाले ते बघावे. ( एकतर चांगली मॅनेजमेंट म्हणजे काय? हा खरा प्रश्न आहे )
थोडक्यात बरोबर ५ वर्षापूर्वी जर निफ्टी इंडेक्स फंड कोणी घेतला असता तर त्याला १० टक्के परतावा मिळाला असता. किंवा कोणी हे खालच्या लिस्ट मधले सर्व शेयर सारख्याच प्रमाणात ५ वर्षापूर्वी घेतले असते तर १०.२% वार्षिक परतावा मिळाला असता.
महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची तर ह्या परताव्यातील बरासचा भाग ( ७० टक्के ) फक्त गेल्या एका वर्षातला आहे. म्हणजे मोदी निवडुन आले नसते तर आत्ता हा परतावा ३-४ % इतकाच असता.
तुम्ही जर धोका पत्करत असाल तर त्या साठी कीती परतावा मिळाला पाहीजे हे ज्याचे त्याने ठरवावे.
Company Price on 17-May-2010 Today's Price CAGR
-------------------------------------------------------------------------
Nifty 5150 8260 9.9%
BHEL 466 230 -13.2%
Tata Power 127 73 -10.5%
Tata Steel 531 363 -7.3%
Reliance 1020 873 -3.1%
Tata Motors 434 519 3.6%
SBI 225 287 5.0%
Tata Chemicals 339 443 5.5%
Tata Global Bev 107 147 6.6%
Wipro 387 538 6.8%
L&T 1110 1591 7.5%
Infosys 1307 1960 8.4%
Bajaj Auto 1081 2186 15.1%
M&M 519 1243 19.1%
ITC 131 326 20.0%
Dr. Reddy 1404 3496 20.0%
TCS 744 2509 27.5%
HUL 240 841 28.5%
Sun Pharma 156 946 43.4%
माझे दोन शब्द :
१. शेयर बाजारात सहज रीतीने पैसे कमावणे २००७ पासुन अवघड झाले आहे. सध्याच्या काळात विप्रो, इंफोसिस रीलायंस सारख्या दहा वर्षात पैसे १०० पट करणार्या संधी येणार नाहीत ( त्याला ही कारणे आहेत पण ती आत्ता नकोत )
२. कंपनी मोठी आहे, तिची प्रोडक्ट चांगली आहेत म्हणजे तिच्या शेयर मधुन चांगला परतावा मिळेलच असे नाही.
३. शेयर मधे जर पैसे मिळवायचे असतील तर खरेदी विक्री करत रहाणे गरजेचे आहे. ही समजुन उमजुन करायची गोष्ट आहे. त्या साठी खूप वेळ घालायला लागत नाही. आठवड्यात एकदा २ तास डाटा जमवून नजर टाकली तरी चालेल. पण चुकीचे समज बाळगु नयेत. ह्यात कुठला ही सोप्पा मार्ग आणि शॉर्ट कट नाही.
४. चॅनेल वर फक्त सक्सेस स्टोरीज ऐकायला मिळतात, पण ती फक्त एकच बाजू असते.
Company Price on 17-May-2010 Today's Price CAGR Nifty 5150 8260 9.9% 1.603883 BHEL 466 230 -13.2% 0.493562 Tata Power 127 73 -10.5% 0.574803 Tata Steel 531 363 -7.3% 0.683616 Reliance 1020 873 -3.1% 0.855882 Tata Motors 434 519 3.6% 1.195853 SBI 225 287 5.0% 1.275556 Tata Chemicals 339 443 5.5% 1.306785 Tata Global Bevarages 107 147 6.6% 1.373832 Wipro 387 538 6.8% 1.390181 L&T 1110 1591 7.5% 1.433333 Infosys 1307 1960 8.4% 1.499617 Bajaj Auto 1081 2186 15.1% 2.022202 M&M 519 1243 19.1% 2.39499 ITC 131 326 20.0% 2.48855 Dr. Reddy 1404 3496 20.0% 2.490028 TCS 744 2509 27.5% 3.372312 HUL 240 841 28.5% 3.504167 Sun Pharma 156 946 43.4% 6.064103