Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गॅलरीतला पालापाचोळा

श — शिव कन्या, Sun, 05/17/2015 - 04:15
या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा? कष्टाने खुरमुडले हात यांचे, पाठीवरती मऊच कसे होतात? कानाखाली लगावल्या कधी दोन, आज त्यांचे गालगुच्चे कसे होतात? या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा? देव सारे पाण्यात बुडले, तरी यांच्या श्रद्धा, गाथेसारख्या कशा बरे तरतात? बाग सारी उजाड झाली, तरी नातीसाठी दोन फुले कुठून बरे आणतात? या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा? मुलेबाळेलेकीसुना सगळे परके झाले, तरी यांच्या गार पडवीत इतके झोपाळे कसे बरे झुलतात? घरदारगावदेश सगळे कसे मागे पडले, तरी यांच्याच एका गॅलरीसाठी पावले कशी माघारी वळतात? या आज्ज्यांच्या गॅलऱ्या, अशा मऊशार कशा?
  • गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा
  • गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा
  • गॅलरीतला [ चौथा ] पालापाचोळा

Book traversal links for गॅलरीतला पालापाचोळा

  • गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा ›

प्रतिक्रिया द्या
2850 वाचन

💬 प्रतिसाद (2)
र
रुपी Tue, 05/19/2015 - 00:14 नवीन
छान .. भावपूर्ण!
  • Log in or register to post comments
झ
झंम्प्या Tue, 05/19/2015 - 05:25 नवीन
"देव सारे पाण्यात बुडले, तरी यांच्या श्रद्धा, गाथेसारख्या कशा बरे तरतात?" भारी जमलंय
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा