"दादा गुंठामंत्री. काय त्यो रुबाब, त्ये अंगावरलं मणभर सोनं, काळ्या काचंवाली कार्पियो, ह्याप्पी बड्डेवाले फ्लेक्श. जिमिनीचा पयसा पान्यागत वहातोया."
विचारात गढलेल्या त्याला धूळ उडवीत येणार्या गाडीनं जागं केलं. लगबगीनं बंगल्याचं फाटक उघडलं गेलं. गाडीतून टक्कल उतरलं. मागून एक पोरगी आणि काही माणसं.
बाकीची मंडळी ढोसायला बाहेर गेली. "लिलावात उचलली. धा हजारात." पुसटसं ऐकलं त्यानं.
रात्र वाढली तसा तो त्याच्या खोपटात पडला. ते आवाज ओळखीचे होते त्याला. मध्ये पडायची हिंमत नव्हतीच कधी.
दिवस उजाडला. टक्कल तांबारलेल्या डोळ्यांनी स्कॉर्पियोत बसून निघून गेलं. कालची माणसं आता परत आली.
चादरीत गुंडाळलेल्या तिला दोघांनी उचलून गाडीत टाकली. धूळ पुन्हा उडाली.
ओरडला तो.
"मा***द".
मनातल्या मनात.
(सत्यघटनेवर आधारीत)
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
भयंकर
निःशब्द :'(
वाचवत नाहीये..
हम्म
अगदी याच भावना
अशा घटना म्हणजे जगरहाटीच
भयानक आहे.
लिलाव ?! भेंडी...
............
:(
सुन्न.....
अरे बापरे :(
वाचव्त नसली..
????
वाचल्यानंतर पहिल्यांदा तोंडात
अजून खूप काही जाणवलं
हा वांझोटा संताप बाहेर पडतो
छे... वाचायलाच नको होती.....
गोष्ट वाचुन जेवढा राग आला...
भयाण …
पावर
शिव्या सुचत नाहीयेत....
:-(
नडतो फक्त आपला नकर्तेपणा.
नडतो
:(
भीती याची
मुक्तक.
स्वॅप्स,
वाचून सुन्न झालं हो, म्हणून
+१
+१
स्वैप्स तुमचा दृष्टिकोण समजला
चौदाशेच्या आसपास वाचने होऊनही त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाले नाही
अस्वस्थ झाले मन :(
दहा हजार
नि:शब्द...
निशब्द
सुन्न करणारी कथा
(सत्यघटनेवर आधारीत) असल्याने
सुन्न करणारी कथा .
परिणामकारक
मा***द