Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओला...स्पेन!

प
पद्मावति
Wed, 05/20/2015 - 16:25
💬 24
ओला!....स्पेन....! नेमेची येतो.....दर वार्षिप्रमाणे, मुलांच्या सुट्टीत कुठे जायचे यावर घरी चर्चा सुरू झाली. नुकताच झोया अख्तर चा ZNMD तिसर्यांदा बघितला होता त्यामुळे कुठे जायचं हे लगेच ठरल्या गेलं----स्पेन! स्पेन... अर्ध्या जगावर अधिराज्य गाजविलेलं एकेकाळचं एक बलाढ्य साम्राज्य. क्रिस्टोफर कोलमबस सारख्या अनेक खलाशांनी नवे जग शोधायला प्रस्थान ठेवले ते इथूनच. फुटबॉल, बूलफाइटस, फ्लेमिन्को नृत्य आणि पाब्लो पिकासो तसेच जगप्रसिद्ध वाइन्स आणि ऑलिव्स चा हा देश. इथे फिरायला जायची तर फारच उत्सुकता होती पण, हा देश तसा बराच पसरलेला असल्यामुळे आणि सुट्टी कमी असल्यामुळे आम्ही ठरवलंकी या वेळी या देशाच्या फक्त दक्षीण भागात फिरावं. या दक्षीण स्पेन ला म्हणतात आंड्युलिशिया. युरोप आणि आफ्रिका ह्या दोन खंडाना तसेच अट्लॅंटिक आणि भूमध्यासमुद्राला जोडणारा आंड्यूल्यूशिया हा भाग अतिशय निसर्गरम्यआहे. सियेरा मोरेना च्या पर्वतरांगा, कुठे राखरखीत वाळवंट तर कुठे ग्वाडॅल्क्विवियर नदीने सुजलाम् सुफलाम् झालेली हिरवागार झाडी, बारमहा स्वच्छ सूर्यप्रकाश, लांबलचक नितळ सागर किनारे आणि तिथे मिळणारा अप्रतिम सीफूड...त्यामुळे या भागात पर्यटकांची कायम वर्दळ असते. सर्वप्रथम ग्रॅनडा या ठिकाणी आणि मग सेविला या गावी जाण्याचे ठरले. Spain with Andulucia एकदा कुठे जायचे हे ठरवले की मग पुढच्या गोष्टी पटापट होतात. विमानाची तिकिटे, हॉटेल्स चा बुकिंग इत्यादी प्रकार पार पडले आणि शेवटी जाण्याचा दिवस उजाडला. सात एप्रिल ला सकाळी आम्ही मालागा च्या विमानतळावर येऊन पोहोचलो. मालागा हे स्पेन च्या किनारपट्टीवरील आतिशय लोकप्रिय बीच रिसॉर्ट आहे. वेळेच्या अभावी आम्ही मात्र तिथून लगेच टॅक्सी पकडून ग्रॅनडा कडे निघालो. मालागा ते ग्रॅनडा साधारण १.३० तासांचा रस्ता आहे. आमचा ड्राइवर अगदी हसतमुख होता मात्र त्याला इंग्रजी अजीबात समजत नव्हते म्हणून त्याच्याशी बोलायची मारामारी त्यामुळे आम्ही शांतपणे खिडकी बाहेर बघायला लागलो. बाहेर बघताना बाकी युरोप आणि स्पेन मधला फरक लगेच जाणवत होता. सर्वसाधारणतः युरोप मधे फिरताना वळणदार रस्ते, स्वच्छ निळसर तलाव, हिरवेगार डोंगर असा नजारा दिसतो. इथे मात्र सपाट कुरणे..अगदी हिरवीगार नाही, किंचित वाळलेली, दूरवर बुटक्या टेकड्या आणि त्यावर ऑलिव्स ची शेती....ऑलिव्स चे उत्पादन भरपूर. ग्रॅनडा मधे पोहोचेपर्यंत दुपार झालेली होती. उशाशी सीएरा निवाडा डोंगर आणि पायाशी भूमध्यासागर असलेलं हे एक टुमदार गाव. या प्रदेशावर प्रथम रोमन, मग इस्लामी सुलतान आणि मग कॅथलिक अशा अनेक वेगवेगळ्या संस्कृती, धर्माच्या राजांनी आक्रमणे केली आणि आपली संस्कृती या प्रदेशात रूजवीली. नॉर्थ आफ्रिकेतून इस्लामी टोळ्या जिब्रॉल्टर मार्गे स्पेन मधे शिरल्या आणि मग जवळजवळ पाचशे-सातशे वर्षं त्यांनी या देशात आपले बस्तान बसविले. साधारण चौदाशे नव्वद पर्यंत ही राजवट टिकून होती, मग मात्र ख्रिस्ती राज्यकर्त्यांनी त्यांचा पराभव करून त्यांना पार आफ्रिकेत हद्दपार केले. पण अजूनही या गावात इस्लामी संस्कृतीचा प्रभाव ना चुकता जाणवतो, इथल्या भाषेमधे, इमारतींच्या अवशेषांमधे, खाद्यपदार्थांमधे आणि हो, अगदी अरेबियन नाइट्स च्या गोष्टींची आठवण येईल अशा बझारांमधे देखील. हॉटेलात चेक इन केल्यानंतर सगळे थकून गेले होते त्यामुळे मुलांनी मस्तं ताणून दिली. संध्याकाळी गावात फेरफटका मारायला निघालो. हवेत किंचित गारवा होता तरीही एक स्वेटर पुरेसा होता. आमचं हॉटेल ज्या भागात होतं त्या भागाला म्हणतात अल्बाइझीन. हा भाग उंच टेकडीवर असल्यामुळे अतिशय चढाईचे आणि वळणदार रस्ते. रुंदी इतकी की जेमेतेम एखादी लहानशी गाडी आत येऊ शकेल. इथे बाहेरच्या गाड्यांना तर बंदीच आहे. एकतर स्थानिकांच्या गाड्या किंवा टॅक्सी एवढीच रहदारि. रस्त्यांनी चालतांना एकदम चढाव, अचानक वळण आणि मग उतार. चालतांना आजूबाजूला नजर टाकावी तिथे लालसर पिवळ्या कौलांची घरे, हिरवीगार सूचीपर्णी झाडे, नागमोडी पण अतिशय सुबक वळणाचे रस्ते. . . . आणि कुठूनही आपल्याकडे नजर खेचून घेणारा, ग्रॅनडा ची शान, त्याचा मानबिंदू ...... Al Hambra....!!....हिरव्यागार पाचूमधे जडलेला मोतीच जणू!! . .
<img src= . हा किल्ला म्हणजे फक्त ग्रॅनडा नव्हे तर संपूर्ण स्पेनच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादी मधे फार वरच्या क्रमांकावर आहे. खरतर, या गावातच रमत गमत चालायला मजा येत होती पण फार उशीर करून आम्हाला चालणार नव्हता. रात्री लवकर झोपून सकाळी किल्ला बघायला जायची उत्सुकता होती. रात्री झोपतांना खुणावतहोता..किल्ले..Al Hambra... यातील २ फोटो अंतरजाळावरून साभार घेतले आहेत... क्र्मश...
  • स्पेन--२---Al Hambra
  • स्पेन-३...Sevilla.
  • स्पेन...समाप्त.

Book traversal links for ओला...स्पेन!

  • स्पेन--२---Al Hambra ›

प्रतिक्रिया द्या
11589 वाचन

💬 प्रतिसाद (24)
ग
गणेशा Wed, 05/20/2015 - 16:30 नवीन
मस्त .. वाचत आहे.. येवुद्या आनखिन ...
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 05/20/2015 - 16:53 नवीन
वाचतोय.. पुभाप्र..
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 05/20/2015 - 17:05 नवीन
वाह्ह..!! वाचतो आहे!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 05/20/2015 - 17:45 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 05/20/2015 - 17:46 नवीन
सही. वाचतेय
  • Log in or register to post comments
ज
जुइ Wed, 05/20/2015 - 17:52 नवीन
पुढील भाग लवकर येउद्या!! यावरुन आठवले की For Few dollars more या सिनेमाच्या ३ भागांचे चित्रन आंड्युलिशिया येथे झाले आहे.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Wed, 05/20/2015 - 17:57 नवीन
दुवा परत देते:- For few dollars more
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 05/20/2015 - 18:11 नवीन
नविनच भाग कळला.वाचतेय.पुभाप्र.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 05/20/2015 - 20:03 नवीन
वाह! आणखीन एका मस्तं सफरीचे वर्णन वाचायला मिलणार छान लिहिले आहे वाचतेय.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/20/2015 - 21:57 नवीन
मस्त सुरुवात ! पुभाप्र.
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Wed, 05/20/2015 - 22:54 नवीन
वाह. मस्त सुरुवात. काही दिवसांपुर्वी युट्युब वर स्पेन भटकंतीचे काही व्हिडीओज पाहिले होते. त्यात एक व्हिडीओ ग्रानाडा बद्दलचा होता. हा दुवा. तेव्हापासुन ग्रानाडा लिस्टवर आहेच. अंडालुसियाबद्दल एका स्पॅनिश कलीग कडुन खूप ऐकले आहे. त्यामुळे या दोन्ही आमच्या यादीत असलेल्या ठिकाणांविषयी वाचण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 05/21/2015 - 02:38 नवीन
फोटू बघूनच बरे वाटले. सुरेख आलेत. तो किल्ला तर ग्रेट दिसतोय.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/21/2015 - 05:15 नवीन
सुंदर सुरुवात झाली आहे. वर्णनशैली अन फोटो खूप आवडले. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/21/2015 - 06:33 नवीन
वा. अगदी वेगळ्या भागाची सफर. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
प
पाटील हो गुरुवार, 05/21/2015 - 07:37 नवीन
शेवटचा फोटो अप्रतिम .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/21/2015 - 20:53 नवीन
खरच मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त! येकच नंबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटील हो
प
पगला गजोधर गुरुवार, 05/21/2015 - 08:32 नवीन
शीर्षक वाचून, मला क्षणभर वाटले कि 'स्पेन कसा काय बरे भिजला ?'... फ्रांसने डोक्यावर गाणे वैगरे गायले कि काय …।
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 05/21/2015 - 10:57 नवीन
नमस्कार मंडळी, मी मिपा ची नवीन सदस्य. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या पाठिंब्याने हुरूप आला आहे. नाहीतर मी जरा घाबरातच लिहायला सुरूवात केली होती. एक तर कधी लिखाणाचा अनुभव नाही, मराठी टंकलीखाणाचा तर नाहीच नाही. आपल्याला लिखाण जमेल का? चुका तर होणार पण फार तर नाही होणार नाही नं? अनेक प्रश्न पडले पण म्हटलं प्रयत्न तर करून पाहु. होतील काही चुका, पण त्या सुधारण्याचा मात्र नक्की मनापासून प्रयत्न करेन.....
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/21/2015 - 21:06 नवीन
Ola हा शब्द इंग्रजी मधूनच लिहायला हवा होता.
मेक्सिकन स्पॅनिशमध्ये Hola हे हॅलो या अर्थी वापरलं जातं. Ola कशासाठी वापरतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ट
टवाळ कार्टा Fri, 05/22/2015 - 07:11 नवीन
ओला सुध्धा चालते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
पद्मावति Fri, 05/22/2015 - 08:12 नवीन
माझी जरा Hola-----Ola, इंग्रजी---मराठी अशी गडबड होते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
स्नेहानिकेत गुरुवार, 05/21/2015 - 20:09 नवीन
अरे वा!!! ग्रानाडा मस्त एकदम !!!! सुरेख वर्णनशैली आणि मस्त फोटो..
  • Log in or register to post comments
उ
उमा @ मिपा Fri, 05/22/2015 - 12:15 नवीन
znmd मध्ये दिसलेला स्पेन अप्रतिम होता, तो पाहून तिकडे जाण्याची इच्छा न होईल असा माणूस विरळाच. तुमची इच्छा पूर्ण झाली याबद्दल आधी अभिनंदन! छान लिहिलंय वर्णन. शेवटचा फोटो अतिशय सुरेख.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 05/22/2015 - 12:25 नवीन
मस्त सुरुवात!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा