Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुणी जाल का

म — मित्रहो, Wed, 05/20/2015 - 16:43
काही वर्षापूर्वीचे गोष्ट आहे त्यावेळेला डीजीटल कॅमेरे नुकतेच आले होते. काढलेला फोटो लगेच दिसणे ह्या गोष्टीचे फार अप्रूप होते. त्यावेळेला पर्यटन स्थळी डिजीटल कॅमेरा गळ्यात घालून फिरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. मी काही कामानिमित्त गोव्याला गेलो होतो, एकटाच होतो. काम झाल्यावर पणजी जवळील मिरामार बीचवर बसलो होतो. सुरेख संध्याकाळ होती, सूर्य मावळत होता, तो तांबडा रंग पाण्यावर दिसत होता. गार हवा सुटली होती. अशा रम्य संध्याकाळी, अशा रम्य ठिकाणी एक नुकतेच लग्न झालेले जोडपे आले होते. हनीमुनला आले असावे. त्या बुवाला कदाचित तिचा पावलांपर्यंत पाणी असलेला फोटो घ्यायचा होता परंतु समुद्र मस्तीत होता. तो कधी गुडघ्यापर्यंत जात होता तर कधी तिच्यापर्यंत पोहचतच नव्हता. सुरवातीला ते एकाच जागी उभे होते. नंतर लाटेचा अंदाज बांधून मागे पुढे करीत होते कधी वेगात पुढे पळत होते तर कधी मागे जात होते. इतके करुनही जर फोटो काढला तर तो हवा तसा येत नव्हता. त्याचा हा प्रकार बघून बघनाऱ्यांचे छान मनोरंजन होत होते. सुरवातीला नवऱ्याला उत्साहाने मदत करनाऱ्या तिला नंतर मात्र कंटाळा यायला लागला. अंधार झाला पण शेवटपर्यंत हवा तसा फोटो आला नाही. निराश होउन ते निघून गेले पण त्याने त्या फोटोसाठी केलेला तो आटापिटा मात्र कायम लक्षात राहीला. (कवि अनिल यांची माफी मागून) कुणि जाल का, थांबवाल का, आटवाल का ह्या सागरा रात्री तरी धावू नकोस, सतावू नको ह्या प्रियकरा आधीच संध्याकाळची पायपीट आहे लांबली परत आता उभे राहूनी गात्रे माझी कावली त्या रातीला दिला तो हार कधीचा वाळला फोटोतच मधुचंद्राचा चौथा दिन मी मोजीला समजावूनी माझ्या जीवाला मी जरासे घेतले करता काय कपाळकरंटे हे योग असे जुळले सांगाल का त्या सागरा, की लाट आहे वाढली अशी उभीच इथे मी, फुका रात्र जागून काढली मित्रहो www.mitraho.wordpress.com

प्रतिक्रिया द्या
3699 वाचन

💬 प्रतिसाद (5)
श
श्रीरंग_जोशी Wed, 05/20/2015 - 16:49 नवीन
पुन्हा सवडीने वाचतोच. तोवर असेच शीर्षक असलेल्या पूर्वीच्या धाग्यांचे दुवे देतो.
  • कुणी जाल का? सांगाल का?
  • कुणी जाल का सांगाल का
  • (कुणि जाल का, सांगाल का..)
  • ((कुणि जाल का, सांगाल का..))
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 05/20/2015 - 17:52 नवीन
मस्त आहे!
  • Log in or register to post comments
अ
अर्व Wed, 05/20/2015 - 18:17 नवीन
=)
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 05/21/2015 - 03:54 नवीन
बाकी आजकाल कोकिळा रात्री खरेच उच्छद मांडतात !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/21/2015 - 13:11 नवीन
कविता छान आहे..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा