अशी सुरुवात होऊ शकते का???
जाता येता...सिग्नल ला थांबल...किवा तसेही..आपल्याला आजूबाजूला किती लोक दिसतात जे..संधी मिळताच रस्त्यावर पानांच्या आणि गुठ्क्याच्या पिचकार्या मारताना दिसतात..रस्त्यावरून जाताना गाडीवर फोन वर बोलणारे...रस्तावरून हिरोगिरी करत....इतर गाड्यांना कट मारणारे ....त्यांचाकडे बघून राग व्यक्त करण्या वतिरिक्त काहीही करत येत नाही ह्याचा राग येतो......जास्तीत जास्त रागाने बघ्ण्यावातिरिक्त काहीही करू शकत नाही......त्यातही जर समोर च्या व्यक्तीत जर लाज असेल तर ते दुर्लक्ष करतात किवा मग लाजेखातर सॉरी तरी म्हणतात.....पण काही निर्लज्ज माणस वर तोंड करून आपल्याकडेच असे बघतात कि आपणच काही चुकीच करतोय...किवा काहीतरी अपशब्द वापरतात........
मला एक कल्पना सुचली....तुम्हाला कशी वाटतेय सांगा...आणि ती खरोखर प्रत्यक्षात कितपत होऊ शकते हे देखील सांगा....
मला असे वाटते आज मोठ्या शहरांमध्ये किवा गावांमध्ये सुद्धा बेरोजगार तरुणाचे प्रमाण काही कमी नाही....साधारण १०/१२ किवा निदान एखाद्याला आहे त्या परीस्तीतून पुढे जायची इच्छा आहे अश्या तरुणांना ह्या मध्ये सहभागी होऊ द्यावे,शिक्षणाची तशी अट नाही...पण लिहिता वाचता येणारे आणि स्वतःच्या परीस्तीतीत सुधारणा करू इच्छा असलेल्यांना आणि ते स्वतः पूर्णपणे निर्व्यसनी असायला हवेत....ह्या लोकांना सरकार तर्फे एक अधिकृत ओळख पत्र द्यायचे...आणि अश्या लोकांना सिग्नल किवा रहदारी च्या रत्यावर उभे राहून जी जी लोक थुंकताना दिसतील..किवा कचरा टाकताना आणि...तेवढाच महत्वाच म्हणजे गाडी चालवताना फोन वर बोलताना दिसतील अश्या महाभागांना थांबून...त्यांना त्यांच्या गुन्ह्य प्रमाणे दंड आकारायचा.....हा दंड....सरकार तर्फे जाहीर करायचा..उदा :थुंकताना दिसला कि १००रु ,गाडी चालवताना फोन वर बोल्नार्यासाठी १००रु,कचरा करताना दिसला कि ५० रु अश्या किरकोळ पैसे...जे भरताना सामान्य किवा गरीब माणसाला जास्त...त्रास हि नाही झाला पाहिजे...पण त्याच्या मनात ह्या गोष्टी चा वचक बसला पाहिजे कि आपल्याला कोण बघत तर नसेल?
असे ४-५ वेळा दंड भरल्यानंतर तरी निदान हे पिचकारी मास्तर आणि फोन बोलणारे हिरो ....पुन्हा एकदा विचार करतील.....आणि ह्या सगळ्या तून दिवसभरात जी काही कमी होईल ती त्या पदावर नेमलेल्या व्यक्तीची मग दिवस भरात त्यांनी किती हि करावी...५००/१०००...जी काय असेल ती....त्यांच्या कष्टाचे फळ....त्यासाठी त्यांना वेगळा पगार द्यायची गरज नाही.....फक्त एका वरच्या अधिकार्य्कडे रोजच्या रोज कामावर जातोय कि नाही ह्याची नोंद झाली पाहिजे...आणि हि नेमलेली लोक...एखाद्या दुर्बलावर अन्याय तर करीत नाहीत न ह्या साठी cctv कॅमेर्याची मदत किवा वरिष्ठ अधिकार्याची मदत घ्यावी........ह्यातून ज्यांना खरच आर्थिक आणि कामधंद्याची गरज आहे त्यांना रोजगार मिळेल..आणि समाज कार्य होईल...आणि एकूणच...आपला परिसर आपला देश नवीन सुरुवात करेल...
मला असे वाटतेय ते तुमच्या समोर मांडतेय.....तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या....ह्या मध्ये सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून विचार मांडलेत..ह्या मध्ये कदाचित खूप चुका असू शकतील...पण तरीही मी माझे म्हणणे सांगतेय...
"वा: ... माऊली ... वा:. काय मजा आणलीत कट मारून! असा कट मारणं फार कमी वेळेला बघायला मिळतं..."
असं ओरडतो. आसपासचं पब्लिक हसायला लागतं. अगदी काळ्या-काचा-भाऊ-दादा-कॉर्पियोवालेही या अनपेक्षित हल्ल्याने एकदम शरमिंदा झालेले पाहिले आहेत!मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachi