(खालील घडलेली सत्य घटना नावे बदलुन)
अनिकेत आणि निकिता दोहोंचा संसार सुरु होऊन ५-६ वर्ष झाले होते. छान पैकी चालले होते. एक मुल होते. भाड्याच्या घरातुन एक २ बी.एच. के. फ्लॅट घेतला. फ्लॅट घेतांना सोसायटी, शेजारी पाहिले. फक्त चारच घरांची दुमजली ईमारत पाहुन जास्त त्रास नाही म्हणुन फ्लॅट घेतला. सुरवातीला २-३ वर्ष सगळे व्यवस्थित चालले होते. तस पाहता घरात ज्या छोट्या छोट्या कुरबुरी शिवाय बाकी सगळे ठीक ठाक. शेजारी एक पेट्रोल पंपावर काम करणारा. अनिकेत स्वतः शासकीय नोकरीत. वरचा फ्लॅटमध्ये एक दक्षिण भारतीय कुटुंब. त्याच्या शेजारी एक अविवाहित. चार कुटुंबे मेंटेनन्स काढण्याची गरज नाही. काम निघाले की पैसे जमा करुन पुर्ण करायचे. काम करतांना अनिकेतच्या शेजारी राहणारा वसंता स्वतःच पुढाकार घ्यायचा, काम करुन आणायचा. सगळ्यांना वाटायचे की भला माणुस. पण हळुहळु लक्षात यायला लागले की, वसंता त्यात त्याचा वाटा न टाकताच ईतरांकडुन रक्कम काढावयाचा आणि फसवायचा. अनिकेतने या बाबत सगळ्यात अगोदर कामे वाटुन घ्यायचे असे जाहीर केले. सोसायटीचे लाईट बील भरणे, पाण्याची टाकी लावणे, छोटे मोठे काम करणे, बागकाम बघणे ई.
काही दिवसांनी वसंताने त्याचे पेट्रोल पंपावरचे काम सोडुन दिले. सगळ्यांना एका बाबतीत नवल वाटायचे की पेट्रोल भरणारा माणुस ६ लाखाचा फ्लॅट कसा घेतो? घरची किंवा सासरची मदत नाही. पण विचारणार कोण? पळसाला पाने तीन त्याप्रमाणे सोसायटीत कुरबुरी दिसु लागल्या. अविवाहित निखिलने नवी दुचाकी घेतल्यानंतर काही दिवसातच त्याच्या गाडीवर खिळ्याने रेषा मारलेल्या दिसुन आल्या. त्यावरुन निखिलने वसंता वर आरोप लावला की तो ईतरांच्या प्रगतीवर जळतो. मारामारी पर्यंत गोष्ट गेली. सगळ्यांनी मधे पडुन ते थांबवले. त्यादिवशी वसंताची भाषा आणि दुसरे रुप पहायला मिळाले. काही दिवसांनी वसंताने सगळ्यांशी छोट्या मोठ्या भानगडी केल्या. अनिकेतला वाटु लागले की फ्लॅट घेतांना ज्या गोष्टींचा फायदा दिसत होता त्याच आता दोषात रुपांतरीत झाल्या होत्या.
त्यातच अनिकेत ने नवी कार घेतली. कार घेतल्यानंतर सगळ्यांना पेढे वाटले. सोसायटीमधील तीन सोडता इतर शेजार वर्ग येऊन गाडी पाहुन गेला. अनिकेत आणि त्याच्या पत्नीला आता हे सरावाचे झाले. त्यांनी मनावर घेतले नाही. असेच ३ वर्ष संपले. वसंताने जिम चालवायला घेतली सोसायटीत तो आणि त्याची राहणीमान यावर चर्चा सुरु झाल्या. त्याला भेटायला येणार्या लोकांबद्द्ल वेगवेगळ्या वावड्या पसरायला लागल्या. एक दिवस वसंताने अनिकेतला गाडी पार्किंग वरुन सुचना केली. ती अनिकेतने मानली. त्यानंतर वेगवेगळ्या सुचना सुरु झाल्यावर अनिकेतने विरोध सुरु केला. भांडण सुरु झाले. अनिकेतने त्याचे म्हणणे ठाम पणे मांडुन बाजु लावुन धरली. वसंताने अश्लील भाषेत शिवीगाळ करुन सगळ्यांसमोर अनिकेत आणि त्याच्या पत्नी, आई, वडीलांचा अपमान केला. मारहाणीची धमकी दिली. त्या दिवसानंतर दोघांमधील बोलणे संपले. वसंताने अनिकेतची गाडी उन्हात कशी राहील यासाठी दगड लावुन अडसर लावले. असेच वादावादी करीत दीड वर्ष संपले. एकदा वाद अनिकेतच्या पत्नीच्या बोलण्याने वाढला. तिच्या बोलण्याचे भांडवल करीत वसंताने भागातील एका "भाऊ" ला आणले. अनिकेतने माफी मागुन प्रकरण संपविले. गाडी पुन्हा मुळच्या जागेत आली. अनिकेतच्या पत्नीलाही आता सरकारी खात्यात नोकरी लागली होती. दोघांजवळ आता पैसा यायला लागला. पण वसंता आणि त्याच्यातील वाद संपायचे नाव घेत नव्हता. काहीतरी कारण व्हायचे आणि वसंता अर्वाच्य शिवीगाळ करायचा मारहाणीची धमकी द्यायचा. अनिकेतही आपल्या बाजुवर ठाम होता. मधील काळात अनिकेतच्या गाडीचा मागील लाईट कोणीतरी फोडला. त्याने स्वखर्चाने पार्किंग व दरवाज्याजवळ कॅमेरे बसवुन घेतले.
एप्रिल मध्ये अनिकेतने घराचे नुतनीकरण काढले. कॅमेरे बंद झाल्याचे पाहुन वसंताने परत गाडीपुढे दगड लावुन तिला मागे धकलली. अनिकेतने सरळ पोलिसात तक्रार दिली. एक महिना तसाच गेला. दाराजवळ चप्पल काढण्यावरुन वसंताचा मुलगा व अनिकेतची पत्नी यांच्यात वाद झाला. वसंताने त्यावरुन शिवीगाळ तर केलीच पण दारावर लाथा मारणे मुले आणुन धमकावणे केले. अनिकेतने पोलिसांना बोलावले. मागील तक्रारीची दखल घेण्यात आली. पोलिसांनी जागेची पाहणी करुन अनिकेतची बाजु बरोबर असल्याचे सांगितले.
थोड्या वेळाने अनिकेतला पोलिसस्टेशन मधुन फोन आला. तो तिथे गेल्यावर त्याच्यावर वसंताच्या बाईने तक्रार नोंदविल्याचे समजले. हवालदाराने दोघांना दमात घेतल्याचे नाटक केले. वसंताचे पाठीराखे गोळा झाले. आमदारासोबत राहणारे काही सभ्य समाजसेवक त्या हवालदारासोबत बोलतांना पाहुन अनिकेतने त्याच्या एका नातेवाईकाला फोन लावुन परिस्थितीची कल्पना दिली व मदत मागितली. त्यांनी लगेच पोलिस निरीक्षकांना भेटण्यास सांगितले. अनिकेत भेटुन आला. त्यांनी मिटींगला जायचे सांगुन सायंकाळी बोलावले. पण हवालदाराने दोघांना शांतता भंग करतात या नावाखाली बसवुन ठेवले. फोन जमा करुन घेतला. थोड्या वेळाने अनिकेतला समजायला लागले की त्याला त्रास देण्यासाठी दोघांना बसवले आहे. समोरची पार्टी व हवालदार मिळुन त्याच्यावर दबाव आणित आहेत. मग थोड्या वेळाने एका दुसर्या हवालदाराने अनिकेतचे बोलणे व त्याच्यावरचा दबाव पाहुन फोन परत दिला. अनिकेतच्या पत्नीला यातील काहीच माहित नव्हते. त्याने व त्याच्या मद्तनीस नातेवाईकाने ही बाब कोणालाच सांगितली नाही. चार तासांनी पोलिस निरीक्षक आल्यावर त्यांनीच अनिकेतला बोलावले. दोन शब्द दोघांना समजावुन त्याला सोडुन द्यायचा आदेश दिला. हवालदाराला हे समजल्यावर त्याने खात्री करण्यासाठी परत पो.नि. समोर मुद्दाम उभे केले.
मग हवालदारांनी सरळ सोडण्याएवजी वसंताच्या मध्यस्थांना बोलावणे पाठवले. त्या सभ्य माणसांनी अनिकेतला पोलिस ठाण्यातच दोन तीन हवालदारांसमोर दम भरला की परत त्रास दिला तर काही बरे वाईट घडु शकते. वसंताने व त्याच्या पत्नीचे अनिकेतच्या पत्नी बद्द्ल बरीच खोटीनाटी माहिती पोलिसाच्या मदतीने पसरविली. सायंकाळी चार वाजता अनिकेत घरी आला. पत्नीने विचारले काय झाले त्याने सांगितले विचारु नको. आणि वसंता आणि त्याच्या कुटुंबाबद्द्ल या पुढे काहीच विषय काढु नको.
गावगुंड व पोलिस यांच्या एकत्रीकरणामुळे एका सऱळ माणसाला कदाचित घर सोडुन दुसरीकडे जावे लागु शकते
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
अवघड आहे
हे नक्की वाचा
पहिल्यांदा बाईकवर चरा काढला
तुडवायला ?
पोलिसांनी बसवून ठेवले म्हणजे
कायद्या पुढे म्हणन्या ऐवजी
अरेरे!
ही सत्य घटना असेल तर एक गोष्ट
तीव्र असहम्त
+११११११११
आपल्याला अपेक्षा नसेल त्या
अनुभव कथन आवडले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake It Off... ;) :- Taylor Swiftपोलिस जमात ज्याम भित्री असते,आणी गावगुंड त्यांच्यापेक्षा जास्त
शांतता भंग
पांढरपेशा लोकांनी बदलावे
एकूणच परिस्थिती मनाला
मुद्दा क्रमांक 3 पटला.