Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आपली लिपी टिकेल का ?

उ
उगा काहितरीच
Fri, 05/22/2015 - 15:00
🗣 38 प्रतिसाद
आपल्यापैकी कितीजण मराठीत अंक व्यवस्थीत लिहु शकतात ? असतील थोडेफार सन्माननिय अपवाद. पण बहुतेक जण तर नाही लिहु शकणार. आपली मराठीत अंक वगैरे लिहीण्याची सवयच मोडली असे नाही का वाटत ? मराठी ५ व्या इयत्तेत असल्या पासुनच आपण इंग्रजीतच अंक लिहीत आलोय. बहुतेक लोकांच्या ऑफिसमध्येही आकडेमोड इंग्रजीतच होते. त्यामुळे साहजीकच आपली मराठीतुन अंक लिहीन्याची सवय मोडली. द्या सोडुन ! whatsapp , facebook, किंवा इतर कुठल्याही messenger वर चॅटींग करताना किती जण मराठीत करतात ? उगा इंप्रेशन मारायला नाही , कामासाठी आवश्यक असनारी चॅटींग जसेकी कुठ आहेस, कधी येतोय वगैरे. असतील थोडेफार महाभाग पण बहुतेक जण तर kuthay ? kadhi yenar ? असंच करत असतात. आहे सोपं इंग्रजीत लिहीनं , बहुतेक सर्व अ‍ॅप करतात मस्त सपोर्ट इंग्रजीला. म्हणुन पडली सवय. द्याना सोडुन ! खरंच हे सोडुन देणं म्हणजे आपल्या लिपीला सोडुन देणं नाही का ? मी भाषा नाही म्हणत - बोलतो आपण पूष्कळ मराठी. पण लिपीच काय ? ती टिकेल का ? ती टिकन्यासाठी काय करता येईल असे तुम्हाला वाटते ? का कुठे लावुन ठेवावा एखादा रोझेटा स्टोन? :( डिसक्लेमर... माझा इंग्रजी ला विरोध नाही . इंग्रजीची अनिवार्यता मला माहीत आहे. इंग्रजी न शिकणे म्हणजे काळाच्या किमान १०० वर्षे मागे जाणे . इंग्रजी न वापरणे म्हणजे सहजासहजी उपलब्ध असणारे ज्ञानसाठे नाकारणे. ढिगाने उपलब्ध असणारे चित्रपट, संगीत, साहित्य व तंत्रज्ञान नाकारणे. रोझेटा स्टोन

प्रतिक्रिया द्या
7505 वाचन

💬 प्रतिसाद (38)
आ
आजानुकर्ण Fri, 05/22/2015 - 15:09 नवीन
इंग्रजी आकडेमोड म्हणजे काय हे नक्की कळले नाही. इंग्रजी अंक म्हणजे रोमन अंक. (I II III IV V वगैरे) मी कधीही इंग्रजीतून आकडेमोड केली नाही. माझ्या माहितीतील कोणीही या अंकांचा वापर करुन आकडेमोड करत नाही. तुम्ही ज्याला इंग्रजी अंक म्हणताय (1 2 3 4 5 वगैरे) ते हिंदू-अरेबिक अंक आहेत. हिंदुस्तानातून (मुस्लिम जगामार्गे) पाश्चात्य जगात पोचलेले अंक. आता तुम्हाला हिंदू अंक टिकावे वाटताहेत की मराठी अंक टिकावे वाटताहेत हे आधी ठरवावे लागेल असे वाटते. ;) मराठीतून अंक लिहिल्याने नक्की काय साध्य होईल तेही सांगा.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Fri, 05/22/2015 - 15:24 नवीन
इंग्रजी अंक म्हणजे रोमन अंक. (I II III IV V वगैरे) मी कधीही इंग्रजीतून आकडेमोड केली नाही. माझ्या माहितीतील कोणीही या अंकांचा वापर करुन आकडेमोड करत नाही. तुम्ही ज्याला इंग्रजी अंक म्हणताय (1 2 3 4 5 वगैरे) ते हिंदू-अरेबिक अंक आहेत. हिंदुस्तानातून (मुस्लिम जगामार्गे) पाश्चात्य जगात पोचलेले अंक.
हे माहित नव्हतं ! धन्यवाद नवीन माहितीबद्दल.
मराठीतून अंक लिहिल्याने नक्की काय साध्य होईल तेही सांगा.
मी आग्रह नाही करत आहे. केवळ उदाहरण दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ट
टवाळ कार्टा Fri, 05/22/2015 - 17:35 नवीन
रोमन आकडे माहित नाहित???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Fri, 05/22/2015 - 19:44 नवीन
ओ साहेब , ते अरेबिक वगैरे नव्हतं माहीत . आम्ही समजायचो १ २ ३ ४ म्हणजे मराठी आणि 1 2 3 4 म्हणजे इंग्रजी . रच्याकने तुम्ही रोमन अंकानी आकडेमोड करता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
स्वप्नांची राणी Sun, 05/24/2015 - 20:50 नवीन
ओ साहेब, तुम्ही उगा काहितरीच च्यालेंज देऊ नका हां टकाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
स
संदीप डांगे Fri, 05/22/2015 - 15:16 नवीन
ढिगाने उपलब्ध असणारे चित्रपट, संगीत, साहित्य नाकारणे >> हितेश मोड ऑनः नाकारल्याने काही फरक पडत नाही. हितेश मोड ऑफ.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 05/22/2015 - 15:18 नवीन
च्यायला, हा लेख देवनागरीत लिहून एकप्रकारे तुम्हीच लेखातल्या भावनेच्या विरुद्ध बोलताहात असं वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/22/2015 - 16:53 नवीन
पुन्हा एकदा मोडीलिपीत लिहायची वेळ येणार रे बॅटमना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 05/22/2015 - 16:58 नवीन
आयला मज्जाच की हो मग माई. मग पुन्हा एकदा ध चा मा होणार. ध चा मा कशाला, लो चा के सुद्धा होईल. कारण मोडी लिपी ही लिहायला जितकी सोप्पी तितकीच वाचायला अवघड आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बॅटमॅन Fri, 05/22/2015 - 17:00 नवीन
"ते समयी बाजीरावसाहेबांसमवेत २०० लोक होते" ऐवजी "ते समयी बाजीरावसाहेबांसमवेत २०० केक होते" असं वाचता येतं. त्यामुळे केकचा शोध गोर्‍यांच्या अगोदर खुद्द पेशवाईतच लागलेला आहे असे नवीन संशोधनही येऊ शकते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पिंपातला उंदीर Sat, 05/23/2015 - 17:46 नवीन
बेकार हसलो ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ख
खटपट्या Fri, 05/22/2015 - 17:54 नवीन
मी व्हत्सप्प्स वर मराठीत लीहीतो. कोणाला अँड्रॉईड्वर मराठीत टंकायचे असेल तर मदत करायला तयार आहे. मराठीत लीहील्याने वाचायलाही सोपे जाते (हा माझा अनुभव आहे) मोठ्मोठे मराठी लेख जर रोमन लिपी वापरून लीहीले असतील तर वाचायला बराच वेळ लागतो.
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Fri, 05/22/2015 - 18:27 नवीन
जशी विन्डोज मधे 'बरह'आहे तसे काही अॅन्ड्राॅईड मधे आहे का? भ्रमणध्वनीमधुन टंकन करतांना खुपच अडचणीचे होते.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Fri, 05/22/2015 - 18:35 नवीन
खालील साईटवर जाउन विडीओ पहा. मी विडीओ पाहुन गुगल हिंदी इनपुट कीबोर्ड डाउनलोड केला. कॉनफीगर केला. मराठी टाईप करायला मजा येते. https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.inputmethod.hindi&hl=en
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
व
विलासराव Sat, 05/23/2015 - 08:51 नवीन
अनेक आभार! यानिमित्ताने आम्ही मराठी लिहायला सुरवात केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
उ
उगा काहितरीच Fri, 05/22/2015 - 19:48 नवीन
स्पर्श मराठी किबोर्ड वापरून लिहीत असतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
र
रामपुरी Fri, 05/22/2015 - 18:16 नवीन
हो टिकेल
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Fri, 05/22/2015 - 18:17 नवीन
आम्ही मराठी जपणार.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/23/2015 - 09:13 नवीन
उगा काहितरीच काय ?! नक्की टिकेल मराठीची देवनागरी लिपी !
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 05/23/2015 - 14:07 नवीन
मोडी लिपी टिकवायची आहे की देवनागरी हे एकदा ठरवूया बुवा. मधूनच कोणीतरी उठतो आणि मोडीच्या र्‍हासाबद्दल अश्रू ढाळतो.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 05/24/2015 - 12:19 नवीन
मोडीचा र्‍हास कै इतक्या लौकर होत नाही. अलीकडे जागोजागी मोडी वर्गांचे मोड उठलेत. जालावरून आणि ऑफजाल अशा दोन्ही सोर्सेसकडून हे समजलेलं आहे. सांगलीच्या मथुबाई गरवारे गर्ल्स कॉलेजात तर यूजीसी अप्रूव्ह्ड १ वर्षाचा मोडी सर्टिफिकेट कोर्सही सुरू झालाय आता. महाराष्ट्र शासनाचे वर्गही दरवर्षी सुरू असतातच, पण डिमांड वाढली आहे. कैक शहरांत मोडीचे प्रायव्हेट क्लासेस सुरू झालेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुनील Sun, 05/24/2015 - 13:25 नवीन
बरोबर आहे पण ते नवीन काही लिहिणे ह्या उद्देशासाठी नसून जुनी कागदपत्रे वाचण्यासाठी असावे. (जे योग्यदेखिल आहे कारण हजारो मोडी लिपीतील कागदपत्रे अद्याप वाचली गेली नसल्याचे समजते. न जाणो इतिहासावर काही नवा प्रकाश पडू शकतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ख
खटपट्या Sun, 05/24/2015 - 14:01 नवीन
नाही हो, आत्ताच कोणीतरी सावरकरांवरचे एक पुस्तक मोडी लीपीत अनुवादीत केले आहे. थांबा, लिंक मिळाली की डकवतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चिमिचांगा Sun, 05/24/2015 - 16:58 नवीन
(जे योग्यदेखिल आहे कारण हजारो मोडी लिपीतील कागदपत्रे अद्याप वाचली गेली नसल्याचे समजते. न जाणो इतिहासावर काही नवा प्रकाश पडू शकतो.)
खि खि खि! त्यासाठी मोडी लिपी यायची काय गरज आहे? ते ब्रिगेडी पहा, त्यांना मोडीच काय, काहीच वाचता यायची मारामार असताना केवढाली इतिहास'निर्मिती' करतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ब
बॅटमॅन Mon, 05/25/2015 - 04:07 नवीन
हो अर्थात त्यासाठीच आहे. तरी त्यासोबत मोडीतील मासिके, मोडी लेखन, इ. देखील सुरू आहे, तस्मात मॉडेस्ट रिव्ह्यव्हल चालू आहे असे म्हणायला हरकत नसावीसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
च
चित्रगुप्त Sun, 05/24/2015 - 18:50 नवीन
जालावरून आणि ऑफजाल..... ऑफजाल हे अफजल सारखे वाटते. 'जालातीत' कसे वाटते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 05/25/2015 - 04:08 नवीन
हाहा, अगदी अगदी. बंगाली उच्चार वाटतो. बाकी जालातीत पेक्षा जालबाह्य असे म्हटलेले बरे, कारण जे सध्या जालावर नाहीत ते जालावर कधी येऊच शकत नाहीत असे नाही, म्हणजे त्या अर्थाने ते जालातीत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Sat, 05/23/2015 - 17:37 नवीन
आपल्या पिढीपर्यंत देवनागरी टिकून असली तरी पुढल्या-पुढल्या पिढ्यांमधे देवनागरीचा उपयोग कमी कमी होत जाण्याची शक्यता बरीच आहे. माझे वडील व त्यांचे भाऊ आपसात मोडीतच पत्रव्यवहार करायचे, परंतु आम्हा भावंडांना मोडी येतच नाही. माझी मुले देवनागरी वाचू शकतात, पण लिहीत नाहीत, नातवंडांना कदाचित अशी काही लिपी असते, हेही ठाऊक असणार नाही...
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sun, 05/24/2015 - 10:34 नवीन
आपल्या भाषेच्या लिपीला देवनगरी लिपी म्हणतात. सुदैवाने तीच लिपी आपल्या राष्ट्र भाषेची आहे जी विंग्रजी शाळेत अजूनपर्यंत शिकवली जाते. पुढील काही पिढ्या ही लिपी अस्तित्वात राहीन मात्र ह्या लिपीच्या माध्यमातून मराठीतून अभिव्यक्त होणे कमी कमी होत जाईल.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 05/24/2015 - 13:32 नवीन
आणखी काही पिढ्यांनंतर मराठी ही रोमन लिपीतूनच लिहिली गेली तर आश्चर्य वाटणार नाही. मुळात मोडीतून देवनागरीत येण्याचे मुख्य कारण छपाई हे नवे तंत्रज्ञान होते. आणि अगदी याच कारणामुळे आता देवनागरीतून रोमन असा प्रवास होण्याची शक्यता खूपच आहे.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 05/24/2015 - 16:37 नवीन
सुनीलराल एकदम बैलाच्या डोळ्यात मारला कि! पण असे होऊ नये यासाठी काय करता येईल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ह
हुप्प्या Mon, 05/25/2015 - 03:46 नवीन
संगणक, त्यातील अक्षरे साठवायची युनिकोडसारखी सर्वमान्य (स्टँडर्ड) पद्धती यामुळे देवनागरीच काय, मोडीही संगणकावर लिहिणे शक्य आहे. आजचे आधुनिक तंत्रज्ञान तडजोडी करायला भाग पाडत नाही. वापरणार्‍याला जे हवे ते तसेच्या तसे देण्याकडे त्याचा कल असतो. कमी खर्चात, निर्दोष व चोख काम करणे हे ह्या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. अरबी, उर्दू, पर्शियन अशा अनेक लिप्यांमधे किचकट नियम आहेत. अक्षरांच्या स्थानावर त्याचे वळण ठरते. आकडे एका दिशेने लिहिणार तर अक्षरे दुसर्‍या दिशेने वगैरे. चिनी लिपीतही हाच प्रकार. ती लिपी वापरणारे पुरेशा संख्येने असतील तर आधुनिक काळात देवनागरी टिकायला काही अडचण नाही. अर्थात हा संघर्ष असणार आहे. फक्त रोमन लिपीच बरी असे म्हणणारे आळशी, देवनागरी प्रतिगामी आहे, मोडी ब्राह्मणी आहे ती संपलेलीच बरी म्हणणारे तथाकथित पुरोगामी ह्यांना पुरून उरणारे देवनागरी प्रेमी असतील तर ह्या लिप्या अनेक शतके टिकून रहातील. चांगले साहित्य, लेख, कविता पुस्तकी स्वरुपात वा ब्लॉगच्या रुपात देवनागरीत उपलब्ध होत असतील तर लोक ती लिपी वाचण्याचे कष्ट घेतीलच. मराठी, हिंदी, नेपाळी, कोकणी अशा अनेक भाषा देवनागरी वापरतात. त्यामुळे ही लिपी जाणणारे, वापरणारे भरपूर आहेत. काही बाबतीत ह्या भाषेत लिहिणे हे इंग्रजीपेक्षा जास्त सोपे आहे. मी तरी ह्या विषयात आशावादी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सांगलीचा भडंग Sun, 05/24/2015 - 23:10 नवीन
नाही टिकली तर दुसरी शिकू . लिपी चा जाज्वल्य अभिमान नसल्यामुळे फार विचार केला नाही
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 05/25/2015 - 04:54 नवीन
माझा उत्तरभारतीय रुम पार्ट्नर मराठी भाषेला हींदीची स्लँग म्हणतो. त्याचा युक्तीवाद असा की मराठी ही सुद्धा हींदी प्रमाणे देवनागरीत लीहीली जाते. जर दोन भाषा एकाच लीपीत लीहील्या जात असतील तर त्या एकमेकांच्या बोलीभाषा म्हणणे योग्य आहे का? मला नक्की माहीत नाही पण कोकणी भाषा सुध्दा देवनागरीत लीहीली जाते बहुदा. तसेच नेपाळीसुध्दा. (चू.भू.दे.घे.) म्हणून त्यांना हींदीच्या बोलीभाषा बोलणे योग्य होणार नाही. कोकणी तर माझ्या उत्तरभारतीय मित्राला सौद ईंडीयन भाषा वाटते. :)
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 05/25/2015 - 09:41 नवीन
अशा वेळी आपण सांगू शकतो की जगातल्या कितीतरी भाषा रोमन लिपीत (थोडा-फार फरक करून) लिहिल्या जातात. पण म्हणून त्या एकमेकांच्या बोली-भाषा ठरत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Tue, 05/26/2015 - 04:49 नवीन
बरोबर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सौन्दर्य Tue, 05/26/2015 - 00:00 नवीन
देवनागरी लिपीत लिहिलेली मराठी भाषा, लिपी स्वरूपात अजून तरी टिकून आहे. जिथे नवीन पिढी शिक्षणच इंग्लिश माध्यमातून घेते आहे तिथे देवनागरी लिपीत स्वताला व्यक्त करणे नक्कीच कठीण जाणार आहे. नवीन पिढी मराठी बोलेल, समजेल फार फार तर वाचूही शकेल परंतु लिहिणे थोडे अवघड होणार आहे. मी स्वता कॉम्प्युटरवर गुगल इनपुट टूल्स वापरून देवनागरीत लिहितो. इतकेच कशाला मायक्रोसोफ्ट ऑफिसच्या विविध सुटसमध्ये देखील देवनागरीत लिहितो. whatsappवर देखील देवनागरीत लिहितो जे मराठी आणि हिंदी भाषिक, इंग्रजी नीट न समजणाऱ्या व्यक्तींना फार सोयीचे पडते. माझ्या ७५ वर्षे वयाच्या सासूबाई देखील देवनागरी लिपी वापरून स्मार्टफोन वरून मेसेज पाठवतात.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 05/26/2015 - 03:53 नवीन
लिहली गेली तर नक्कीच टिकेल ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;) Ellie Goulding
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा