Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुचाकी घेतली पण... काही शंका

म
म्हया बिलंदर
Sat, 05/23/2015 - 20:27
🗣 109 प्रतिसाद
बरेच दिवस वेगवेगळे पर्याय शोधुन, माहिती काढुन, चार लोकांना विचारुन शेवटी एक दुचाकी घेतली. ऐपत ६००००/-(कमि/जास्त), रोज चा वापर ६०-८०कि.मी(कधि कधि १०० देखिल), आणि सर्वात महत्वाचं "मि स्प्लेंडर किंवा पॅशन वर बस्णारच नाहि" अशी हिची धमकी अस्ल्याने चाळुन चाळुन शेवटी हिरो चि आय स्मार्ट ठरवली.(स्प्लेंडरच पण हिला नाही समजलं) गाडी विकणारा प्रामाणिक पणे त्याचं काम करित होता. तो-"सर कंपनी तो १०२ बोलती है, लेकिन गाडी ७५-८० तो देगी." मी-"किसीने खरिदी है पय्ले?" तो-"अरे, बोहोत." मी-"उन्कु, कितना दिया." तो-"किसीने ८० बोला किसीने ९०, एक सरने तो १०५ बताया, लेकिन हमें सच नहि लगता." मी-"तो, क्या क्या खबरदारी लुं, तो ज्यादा एवरेज देगि?" तो-"५०० कि.मी. तक ४० कि स्पीड से दोडाईये, ज्यादा एवरेज देगी.बाकी रेग्युलर सर्विसींग और चेकअप." (आणखी बरिच प्रश्नोत्तरे..) त्याने त्याचं काम चोख केलं. पैसे मोजले, टाकी भरली, गाडी थेट गावि. गाव जास्त लांब जरी नसलं तरी जाणं-येणं, थोडं फार फिरणं, असं करत करत गाडी पहिल्यांदा रिजर्व ला लागली तेव्हा माझ्या हिशोबाने गाडी ने ६० चि सरासरी दिली. त्याने सांगितलेले सगळे नियम पाळुन काळजी घेउन सुद्धा हे म्हणजे खुपंच कमि झालं. त्याला फोन केला, त्याने गाडी घेउन बोलवलं. पहिल्या सर्विसींग साठी चे ५०० कि.मि. झाले होते म्हणुन सर्विसींगलाच घेउन गेलो. यावेळेस मेकॅनिकला रडकहाणि सांगितली. तो-"अवो सर, १००० कि.मी. ला कुठं एवरेज मिळ्तो का?" मी-"मग?" तो-"कमित कमि २०००-३००० तरी." मी-"मग तो पर्यंत?" तो-"गाडी ४० ने चालवायची, एक दोन सर्विसींग होऊ द्या, एवरेज काढुन देउ ना तुम्हाला." संध्याकाळी गाडी घेतली. वापरली. पुन्हा तेच, जरा फरक नाही. लावला टोल्-फ्री ला फोन. टोल्-फ्री ला फोन लावल्यावर जो अनुभव येतो तोच.(हे दिल्लीत बसलेले होते. सगळं हिंदीत.) भावनारहीत सांत्वन, फुकट्चे सल्ले आणि फिक्कट शब्दात तक्रार नोंदणी. फायदा ईतकाच झाला की त्यांनी ती तक्रार विक्रेत्याला पोहोचवली व फोन वरुन वरचंच सगळं मराठीत झालं व विक्रेत्याने हि बोलवलं. गाडी घेउन गेलो, तर यावेळेस मेकॅनिक लोकांचे मुकादम/पर्यवेक्षक/सुपरवाईजर किंवा आणखी काही, असे जे कोणी असतात ते मला भेटले. रड्कहाणी पुन्हा. पण या सरांनी कमित कमि २-३ सर्विसींग होउ द्या आपण एवरेजचं करुन देउ, असा भरवसा दिला, आणि एकदा गाडी आणा आपण एवरेज चेक करुन घेउ असंही सांगितलं. ऑफिससमोरच्या गॅरेज वाल्याला एकदा विचारलं तर त्याने तर थेट ५००० कि.मी. नंतर एवरेज मिळेल असं सांगितलं. दरम्यान हे एवरेज काढणं/ चेक करनं म्हणजे नेमकं काय याची चौकशि केली तर समजलं की गाडी ला एक बाटली लावुन, त्याची नळी पेट्रोल च्या ठिकाणी बसवतात व त्या बाटलीत १०० मि.लि. पेट्रोल टाकुन गाडी चालवायची, गाडी जे अंतर कापेन गुणिले १० कि भेटलाच गाडीचा एवरेज. हा.का.ना.का. सांगितल्याप्रमाणे गाडी घेउन गेलो. ते नळी, बाटली जोडणे सोपस्कार पार पाडले, आणि विक्रेत्याचा तोच पहिला माणुस सोबत घेतला. गाडी ६.८ कि.मी. पळाली. त्याने हि एवरेज कमि देतेय असं कबुल केलं, व आता दुसर्‍या सर्विसींग ला आणा किंवा एकदिवस गाडी ठेउन जा असा सल्ला दिला. आता शंका. १) कंपनी सांगते त्यापेक्षा किती कमि एवरेज ची अपेक्षा ठेवावी? २) अपेक्षित एवरेज केव्हापासुन मिळतो? ३) अपेक्षित एवरेज मिळण्यसाठी गाडी किती वेळ(किंव किती कि.मी पर्यंत) कमि गतिने चालवावि? ४) १००मि.लि. चे परिक्षण किती विश्वासार्ह आहे? ५) १००मि.लि. च्या परिक्षणाची काही नोंद वगैरे नस्ल्याने काही फरक पडेन का? ६) ईतकं करुनही जर गाडी कमिच एवरेज देत असेल तर, पुढची कारवाई काय असावी? i-Smart घेउन i-Fool झालो की काय असं वाटलं म्हणून ईथे विचारलं

प्रतिक्रिया द्या
24527 वाचन

💬 प्रतिसाद (109)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/23/2015 - 20:41 नवीन
दादानु इंजिनं नवीन असा. जरा जपुन चालवा. ४०-५० किमीप्रतितास ठेवाच शिवाय एका प्रवासामधे १०० किमी पेक्षा जास्तं अंतर चालवु नका किमान ३००० किमी होईपर्यंततरी. त्या गाडीनी किमान ७०-८० दिलं पाहिजे अ‍ॅव्हरेज.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 05/23/2015 - 22:14 नवीन
कंपनी सांगते ते वजा २० धरून चालावे नॉर्मल बाईकसाठी.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 05/24/2015 - 00:25 नवीन
एक रोचक शंका आहे. वाहन क्षेत्रातील तज्ञ मंडळी यावर योग्य माहिती देऊ शकतील. माझी पहिली दुचाकी (कायनेटिक लुना सुपर) घेतल्यानंतर माझं निरिक्षण होतं की टाकी जवळपास फूल भरली की गाडी किंचित का होईना (अर्धवट भरण्याच्या तुलनेत) थोडे अधिक अ‍ॅव्हरेज देते. मग मला नेहमी टाकी फूल करण्याची सवय लागली ती कायमचीच. २००५ साली युनिकॉर्न घेतल्यावर मी ₹ ५०० चे पेट्रोल भरत असे. बरेचदा पेट्रोल पंपावर काम करणारे आश्चर्याने बघायचे कारण बरेच चारचाकीचालकसुद्धा एवढे एकदम नाही भरायचे. देवाच्या कृपेने माझ्या गाडीतले पेट्रोल कधी चोरीला नाही गेले. पंपवाल्यांनी गंडवल्याचे काही वेळा घडले पण भरल्या टाकीतून पेट्रोल मात्र नाही गेले. तसं पाहिलं तर टाकीत किती पेट्रोल आहे याने गाडीचे अ‍ॅव्हरेज बदलायला नको पण कदाचित थोडे थोडे पेट्रोल अनेकदा भरताना काही पेट्रोल वायूरुपात परिवर्तित होऊन उडून जाते. असे घडण्याचे प्रमाण एकदम टाकी फूल केल्याने कमी होत असेल. अन ते न उडालेले पेट्रोल आपल्याला अधिक अ‍ॅव्हरेज देत असेल. मान्य आहे हा खूप बाळबोध तर्क आहे पण विषय उपस्थित झालाच आहे तर मांडून घेतो. बाकी गाडी कुठे कशी किती चालवली जाते. चालकाचे व चालकामागे बसणार्‍याचे वजन किती हे घटकही अ‍ॅव्हरेज ठरवण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात. टायरमधील हवेचा दाब योग्य तेवढा ठेवणे हा सुद्धा महत्वाचा घटक असतो. बाकी गेल्या काही वर्षांत चारचाकी चालवताना क्रूझ कंट्रोलवर चालवल्यानेही थोडे अधिक अ‍ॅव्हरेज मी मिळवत आहे. माझे हापिसातले सहकारी तर चेष्टा करतात की गाडी २५ मैल/तास पेक्षा कमी वेगात क्रूझवर चालवता आली असती तर पार्कींग लॉटमध्येही मी क्रूझवरच चालवली असती ;-) .
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंद Sun, 05/24/2015 - 09:50 नवीन
बरोबर तर्क आहे तुमचा..रिजर्व्ह वर असेल तर थोड कमी होत average
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ट
टवाळ कार्टा Sun, 05/24/2015 - 07:35 नवीन
थोड्या वेळाने सविस्तर लिहितो...
  • Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर Sun, 05/24/2015 - 07:41 नवीन
खरंच वाट पाहतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 05/24/2015 - 08:28 नवीन
तुम्ही पहा तो लावेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हया बिलंदर
ट
टवाळ कार्टा Sun, 05/24/2015 - 08:29 नवीन
वाट असे कोण लिहिणार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 05/24/2015 - 08:30 नवीन
वाटेविषयीचं बोलतोय मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 05/24/2015 - 11:34 नवीन
आणि सर्वात महत्वाचं "मि स्प्लेंडर किंवा पॅशन वर बस्णारच नाहि" अशी हिची धमकी अस्ल्याने चाळुन चाळुन शेवटी हिरो चि आय स्मार्ट ठरवली.(स्प्लेंडरच पण हिला नाही समजलं)
अश्या रिक्स घेउ नये...मिपावरचे अनुभवी सांगतीलच असे केल्याने काय काय होउ शकते ;)
गाडी विकणारा प्रामाणिक पणे त्याचं काम करित होता. तो-"सर कंपनी तो १०२ बोलती है, लेकिन गाडी ७५-८० तो देगी." मी-"किसीने खरिदी है पय्ले?" तो-"अरे, बोहोत." मी-"उन्कु, कितना दिया." तो-"किसीने ८० बोला किसीने ९०, एक सरने तो १०५ बताया, लेकिन हमें सच नहि लगता." मी-"तो, क्या क्या खबरदारी लुं, तो ज्यादा एवरेज देगि?" तो-"५०० कि.मी. तक ४० कि स्पीड से दोडाईये, ज्यादा एवरेज देगी.बाकी रेग्युलर सर्विसींग और चेकअप." (आणखी बरिच प्रश्नोत्तरे..)
हे त्याने ब्रोब्र सांगितले
पैसे मोजले, टाकी भरली, गाडी थेट गावि.
हे चूक केले...नव्या गाडीला नव्या नवरीसारखे वागवायचे असते ;) एका दिवसात ४०-५० किमीपेक्षा जास्त चालवू नये
पहिल्यांदा रिजर्व ला लागली तेव्हा माझ्या हिशोबाने गाडी ने ६० चि सरासरी दिली.
व्यवस्थित आहे
१) कंपनी सांगते त्यापेक्षा किती कमि एवरेज ची अपेक्षा ठेवावी?
७०+ मिळायला काहिच हरकत नाही...७५+ सुध्धा मिळेल जर आरामात ४०-५५ मधल्या स्पीडला गियर्स सारखे न बदलता, क्लच न वापरता चालवली तर
२) अपेक्षित एवरेज केव्हापासुन मिळतो?
पहिले २००० किमी जर ४५ स्पीड्च्या वर न नेता चालवलीत आणि पुस्तकात दिल्याप्रमाणॅ सर्विसिंग केली...ऑईल बदलले तर
३) अपेक्षित एवरेज मिळण्यसाठी गाडी किती वेळ(किंव किती कि.मी पर्यंत) कमि गतिने चालवावि?
पहिले २००० किमी जर ४५ स्पीड्च्या वर न नेता चालवावी
४) १००मि.लि. चे परिक्षण किती विश्वासार्ह आहे?
जास्त नाही...वेगवेगळ्या पध्धती आहेत
५) १००मि.लि. च्या परिक्षणाची काही नोंद वगैरे नस्ल्याने काही फरक पडेन का?
शष्प फरक पडेल :)
६) ईतकं करुनही जर गाडी कमिच एवरेज देत असेल तर, पुढची कारवाई काय असावी?
i-Smart साठी कमी अ‍ॅवरेज म्हणजे ६० च्या खाली :)
i-Smart घेउन i-Fool झालो की काय असं वाटलं म्हणून ईथे विचारलं
अजिबात नाही...मस्त बाईक आहे...ट्राफिक साठी उत्तम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सदस्यनाम Sun, 05/24/2015 - 10:03 नवीन
म्हया, मी हिरोच्या जवळपास सगळ्या गाड्या चालविलेल्या आहेत. अगदी जुन्या सीडी हन्ड्रेड किंवा स्लीक पासुन ते करिझ्मा पर्यन्त. १०० एवढे जास्त अ‍ॅव्हरेज देणार्‍या गाड्या अपवादात्मक असतात. तांत्रिक मला काही जास्त कळत नाही पण १०० सीसी च्या हिरो ५५ ते ६० देतातच. १२५ ते १५० सीसी च्या हिरो ४५ ते ५० देतात. करिझ्मा अजुन थोडे कमी. आयस्मार्ट ही तर जुनीच स्प्लेंडर एनेक्सजी आहे. ते क्लच दाबुन चालू करायची आयडीय फक्त नवीन आहे. त्यामुळे अ‍ॅव्व्हरेज ला काही जास्त फरक पडत नाही. आग्दी वेगळी टर्मिनॉलॉजी किंवा तंत्र वापरुन नवीन मॉडेल आणण्यापेक्षा कॉस्मेटीक फेस लिफ्ट चे प्रकार टू व्हीलर मध्ये जास्त आहेत. १०० सीसी हिरो मध्ये वेगळे ईंजिन म्हणले तर फक्त पॅशन एक्स्प्रो चे आहे. व्हर्टिकल सिलिंडर. ती प्रेफर केली असते तर ६५ ते ७० मायलेज आहे. माझ्या पॅशन प्रो चे ६५ ते ७० नियमित आहे (२ वर्शे झाली). असाच ११० मायलेज चा दावा टीव्हीएस च्या सेंट्राने केला होता. कायनेटीक च्यालेंजरने(सध्या ही महिन्द्रा पंटेरो आहे, आणि जुनी व्हेलॉसिटी म्हणजेच महिन्द्रा सेण्ट्युरो) पण केला होता. अ‍ॅक्चुअली रोडवर त्या ६५ ते ७० देत होत्या.
  • Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर Sun, 05/24/2015 - 10:38 नवीन
गाडी जुनी झाल्यावार कमि एवरेज देते(असं ऐकलंय).हि आत्ताच ६० देतेय पुढे आणखी कमि दिल्यावर झालोच कि i-Fool. पॅशन ला हिचा विरोध होता ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदस्यनाम
प
पॉइंट ब्लँक Sun, 05/24/2015 - 11:25 नवीन
कॅप्टन जॅक स्पॅरोंशी सहमत. दोन हजार किमी चालवून झाली कि मायलेज स्टेबल होईल. पण मायलेज बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते. १. तुमची चालवण्याची पद्धत. एकदम अक्स्लरेट करणे. ब्रेकचा अति वापर, गियर शिफ्ट करण्याचा कंटाळा आणि गरज नसतान क्लच दाबणे ह्या मुळे मायलेज कमी मिळू शकते. हि तुमची पहली गाडी असेल तर तुमचा हात बसायला थोडा वेळ लागेल. २. पेट्रोल कुठल्या पंपावर भरता. शेलवर पेट्रोल भरले की चांगले मायलेज मिळते हा वैयक्तिक अनुभव आहे. ३. गाडीचे आयडलिंग/ ट्युनिंग /टायरचे एअर प्रेशर बिघडले असेल तर मायलेज मध्ये फरक पडू शकतो. ४. गाडी कुठे आणि कशा परिस्थितीत चालवता. शहरात बंपर टु बंपर ट्राफिक किंवा गावाकडचा खराब कच्चा रस्ता, घाट, ह्या परिस्थितित मायलेज कमी मिळेल. त्यामुळे १०० मिमि त्याने बर्यापैकी सपाट आणि मोकळ्या रस्त्यावर चालवली असेल तर मिळालेले मायलेज कमी म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर Sun, 05/24/2015 - 13:29 नवीन
हो तशी पय्लीच म्हणायची. पण गाडी चालवण्याचा अनुभव बर्‍यापैकी अस्ल्याने गाडी देखील बर्‍यापैकीच चालवतो. पेट्रोल मिळेल तसं भरतो, पण तुम्ही म्हण्ताय तर शेल सुरु कर्तो. गाडीचे आयडलिंग/ ट्युनिंग /टायरचे एअर प्रेशर नियमीत चेक्णार. शहरात बंपर टु बंपर ट्राफिक मधेच गाडीचा वापर जास्त होणार आहे. कच्चा रस्ता, घाट सहसा नाही होणार. १००मि.लि. त्याने शहरातच वळणावळणाच्या पण सपाट आणि कमि रहदारीच्या रस्त्यावर चालवलेली. माय्लेज कमिचीच तर भिती आहेना सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
म
म्हया बिलंदर Sun, 05/24/2015 - 13:23 नवीन
धन्यवाद. अगदिच फूल(Fool)लो नाही असं वाटायला लागलंय. सर्विसींग्,ऑईल बदलने, चाकातली हवा, ई. काळजी घेणं सुरुच ठेवतो(शेवटपर्यंत). पुन:श्च सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
स
सदस्यनाम Sun, 05/24/2015 - 15:45 नवीन
सर्विसींग्,ऑईल बदलने, चाकातली हवा, ई. काळजी घेणं सुरुच ठेवतो(शेवटपर्यंत).
३५ ते ४५ चा एकॉनोमी झोन, गुळ्गुळीत रस्ते, सुरळीत ट्राफिक, रोबोटीक चालवणे (वेळच्या वेळी गिअर, क्लच, ब्रेक) हे पण केल्यावर का मायलेज पडणार नाही? म्हणजे दगडाचे सूप झाले म्हणा की. अशी कल्जि घेतली तर कुठलीही गाडी मायलेज देते.(अगदी कंपनी फॉल्ट नसेल तर) मग आयस्मार्ट कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हया बिलंदर
ट
टवाळ कार्टा Sun, 05/24/2015 - 15:53 नवीन
कारण त्यांनी विकत घेतली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदस्यनाम
स
सदस्यनाम Sun, 05/24/2015 - 15:58 नवीन
कळले तुझ्या ऑटो कन्स्लटंट ज्ञानाचे रहस्य. ;) असो. दोघांनाही शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 05/24/2015 - 16:15 नवीन
छान...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदस्यनाम
ल
लालगरूड Sun, 05/24/2015 - 16:26 नवीन
फक्त 100ml वर एवरेज चेक करने म्हणजे मुर्खापना आहे. जर accleration मधे variation न करता चांगल्या रोड वर 40~45 च्या constant स्पीड ने गाड़ी चालवली तर चांगला एवरेज देते.गाडीची देखबाल सुध्धा गरजेची आहे. oil वेळीच बदलावे.
  • Log in or register to post comments
अ
अलबेला सजन Mon, 05/25/2015 - 06:04 नवीन
साधारण महिन्याच्या शेवटी गाडी रिझर्व्ह ला लागली की किलोमीटर रिडिंग लिहून ठेवा. त्यानंतरच्या पूर्ण महिनाभरात एकूण किती रुपयांचे पेट्रोल टाकले हे सुद्धा लिहून ठेवा. महिन्याच्या शेवटी गाडी महिन्याच्या पुन्हा गाडी रिझर्व्ह ला लागली की रिडिंग घ्या. ह्या दोन रिडिंग मधला फरक हे तुमचे पूर्ण महिन्याचे चालवलेले किमी. आता महिन्याभरातील पेट्रोलची सरासरी प्रति लिटर किमत भागिले पूर्ण महिन्यात टाकलेल्या एकूण पेट्रोलची किंमत गुणिले चालवलेले एकूण किमी हा येईल तुमच्या गाडीचा average. आपण महिनाभर गाडी वेगवेगळ्या जागी चालवतो. कधी बाजारात कधी हायवेला तर कधी घाटातून. कधी खूप ट्राफिक असेल तर कधी पूर्ण रस्ता मोकळा असेल. त्यामुळे या पद्धतीने जर average काढलात तर तो एकदम व्यवस्थित येईल व तो नक्कीच तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल. जर आपण गाडीची देखभाल वेळच्यावेळी व व्यवस्थित करत असू व आपला वेग हा ताशी ४०-५० च्या दरम्यान असेल तर १०० cc ची गाडी ही ६० – ७० या दरम्यान average देणारच. कंपनीने दिलेला average हा ६० किलोचा माणूस ताशी ४० किमी वेगाने गाडी चालवत अतिशय सरळ व खड्डेमुक्त रस्त्याने ट्राफिक नसताना जात असेल तेव्हा काढलेला average असतो. त्यामुळे ती नेहमी dramatic figure असते. मी या पद्धतीने माझ्या होंडा शाइन चा रेकॉर्ड ठेवला आहे. मला १२५ cc असताना सुद्धा ६०-६५ च्या दरम्यान average गाडी घेतल्यापासून ते आत्तापर्यंत मिळत आहे.
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Tue, 05/26/2015 - 07:34 नवीन
७ वर्षे जुन्या होंडा शाईनचा माझाही अनुभव सारखाच. जवळपास ६० चा average देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलबेला सजन
क
कौन्तेय गुरुवार, 06/04/2015 - 16:30 नवीन
गाडी रिझर्वला आली की मीटर रीडिंग नोंदवून ठेवावे (मोबाईलने फोटो मारून ठेवणे उत्तम) व पेट्रोल भरतेवेळी किती भरले आहे ते नीट समजावे म्हणून आपली सोयिस्कर सवय टाकून 'दोसौ का डालो, पाचशेचं टाका' असे न करता एक - दोन - तीन - पाच - दहा अशा पूर्णांक लीटरमधे पेट्रोल भरावे. क्रेडिटकार्डाने पैसे दिल्यास पूर्णांक लीटरचे अचूक पैसे अदा करण्यात पंपवाले कटकट करत नाहीत. पुढच्या वेळेस गाडी रिझर्वला आली की वजाबाकी, गुणाकार, भागाकार करून सहज एव्हरेज काढता येते. माझी क्यालिबर १९९८ ते २००३ पर्यंत ७० ते ६० अशा उतरत्या क्रमाने एव्हरेज देत असे. पहिले काही दिवस एव्हरेज काढायची, त्यावरून आर्थिक गणिते मांडायची, आपण फसवले गेलो वा नाही ते ठरवण्याची, दुसर्‍यांच्या गाड्यांकडे भिरभिरत्या नजरेने बघायची बरीच हौस असते. पण एकदा का आपल्या हिच्याशी गट्टी जमली, एकमेकांच्या खाणाखुणा पटायला लागल्या की मग उरतं केवळ आनंदाचं सहचरण! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलबेला सजन
म
म्हया बिलंदर गुरुवार, 06/04/2015 - 16:37 नवीन
पण एकदा का आपल्या हिच्याशी गट्टी जमली, एकमेकांच्या खाणाखुणा पटायला लागल्या की मग उरतं केवळ आनंदाचं सहचरण! :-)
मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय
म
मार्मिक गोडसे Mon, 05/25/2015 - 07:31 नवीन
आता महिन्याभरातील पेट्रोलची सरासरी प्रति लिटर किमत भागिले पूर्ण महिन्यात टाकलेल्या एकूण पेट्रोलची किंमत गुणिले चालवलेले एकूण किमी हा येईल तुमच्या गाडीचा average. गाडीच्या अ‍ॅव्हरेजचा आणी पेट्रोलच्या दराचा काहीही संबंध नाही. अ‍ॅव्हरेज प्रती लिटर काढायचे असते (रिक्षावाले पेट्रोलच्या किंमतीने काढतात त्याचे कारण वेगळे आहे). रिझर्व ते रिझर्व १ लिटर पेट्रोल टाकूनही गाडीचे अ‍ॅव्हरेज काढता येते. कंपनीने दिलेला average हा ६० किलोचा माणूस ताशी ४० किमी वेगाने गाडी चालवत अतिशय सरळ व खड्डेमुक्त रस्त्याने ट्राफिक नसताना जात असेल तेव्हा काढलेला average असतो. त्यामुळे ती नेहमी dramatic figure असते. ह्या पद्धतीने मी गाडिचे अ‍ॅव्हरेज काढून बघीतले तरीही कंपनीने दावा केलेले अ‍ॅव्हरेज मिळत नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 05/25/2015 - 09:11 नवीन
सहमत. कंपनी जे अ‍ॅवरेज सांगते त्याला तारांकित केले असते. तारांकित म्हणजे 'आम्ही चक्क खोटे बोलत आहोत' असा अर्थ घ्यावा. कंपनीने काढलेले अ‍ॅवरेज नियंत्रीत वातावरणात असते. तिथे वार्‍याचा अवरोध, खड्डे, चालणे-थांबणे-वळणे आणि इतर अनेक गोष्टी ज्या सामान्यपणे ग्राहकाच्या चालवण्याच्या वातावरणात असतात त्या लॅबटेस्ट मधे उपस्थित नसतात. त्यामुळे गाडीचे अ‍ॅवरेज ८५ वैगेरे देणारच. साधे १० किलो वजन वाढवले तर बाइकचा अ‍ॅवरेज अंदाजे ५-७ किमी ने कमी होतो. एकदा या सगळ्याचा अनुभव, माहिती नसतांना मी आणि वडील असे दोघे (वजन: ९० किलो प्रत्येकी) बजाज प्लॅटीनावर एका दिवसात सुमारे ३०० किमीचा प्रवास ताशी ९० च्या वेगाने केला होता. तेव्हा ७०-७५ च्या अ‍ॅवरेजनुसार टाकलेले पेट्रोल परतीच्या वाटेवर अचानक संपले आणि आम्हाला फार भटकावे लागले. नंतर अंदाज काढला तेव्हा गाडीने ४० चा अ‍ॅवरेज दिला होता. चारचाकीचा अनुभव आहे की अनावश्यक भार गाडीतून काढला तर अ‍ॅवरेजवर १०-१५% परिणाम होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
आ
आदिजोशी Mon, 05/25/2015 - 11:43 नवीन
तारा टाकून त्या तार्‍याच्या अर्थ सोबत दिलेला असतो. आयडीअल रायडींग कंडिशन्स मधे ते अ‍ॅव्हरेज काढलेले असते. त्यामुळे वास्तवाच्या जवळपास जाणारी फिगर हवी असेल तर ऑटोमोबाईल मॅगझीन्सचे रिपोर्ट वाचावे. कंपनी आयडीअल कंडिशन्स मधले अ‍ॅव्हरेज का देते: दोन उत्तर आहेत. १. ते अ‍ॅव्हरेज लोकांसाठी जास्त अपिलिंग असते. २. प्रत्यक्ष वापरात दुचाकीचे अ‍ॅव्हरेज बदलणारे ४-५ डझन व्हेरिएबल्स असतात. ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन एक फिगर काढणे अशक्य आहे. एकच बाईक २ वेगळ्या जणांनी चालवली की अ‍ॅव्हरेज बदलते. त्यामुळे आयडीअल कंडिशन्स हा हाईयेस्ट नंबर धरावा. त्याहून जास्त मिळणारच नाही. नीट चालवली तर त्याच्या जवळपास मिळू शकते. माझ्या मामाची केबी ४ एस नियमीतपणे ७०-७५ चा अ‍ॅव्हरेज द्यायची. जाहिरातीत ८० म्हटले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 05/25/2015 - 12:14 नवीन
'तारांकित म्हणजे खोटे' हे उपरोधमिश्रित आहे. नमूद केलेला अ‍ॅवरेज मिळेलच याची कोणतीही खात्री कोणतीही कंपनी कधीच देत नाही. किंबहुना देऊच शकत नाही. त्यामुळे जाहिरातीतल्या आकड्यावर आंधळा विश्वास ठेऊ नये, सावध असावे असं म्हणायचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ट
टवाळ कार्टा Mon, 05/25/2015 - 12:24 नवीन
त्यामुळे जाहिरातीतल्या आकड्यावर आंधळा विश्वास ठेऊ नये, सावध असावे असं म्हणायचं आहे.
जाहिरातीत दिलेल्या आकड्याच्या जवळपास जाणारे अ‍ॅवरेज मिळू शकते (तितकेच कधीही मिळणार नाही कारण ते कंपनीच्या कंट्रोल्ड टेस्ट कंडिशनमध्ये असते) पण त्यासाठी बाईक थंड डोक्याने शांतपणे बाईकच्या मॅन्युअलमध्ये दिल्याप्रमाणे चालवावी लागते क्लच व ब्रेकचा कमीत कमी वापर करावा...गीअर्स कमी वेळा बदलावे उदा. नेहमीच्या रस्त्यावर स्पीडब्रेकर कुठे असतो हे माहित असते...स्पीडब्रेकर यायच्या आधी अ‍ॅक्सलरेट करणे बंद करावे...गाडी आपोआप स्लो होउन स्पीडब्रेकर पार करेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मार्मिक गोडसे Mon, 05/25/2015 - 12:40 नवीन
त्यामुळे आयडीअल कंडिशन्स हा हाईयेस्ट नंबर धरावा. त्याहून जास्त मिळणारच नाही. जास्तची अपेक्षा कोण करतेय? जर का कंपनी असा दावा करते तर ती कंपनी तिच्या अधिकृत सर्विस सेंटरला आयडीअल कंडिशन्समध्ये गाडिचे अ‍ॅव्हरेज काढून का देत नाही? दूध का दूध पानी का पानी समोरच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आदिजोशी Mon, 05/25/2015 - 12:51 नवीन
बाईक कंपन्यांचे टेस्ट ट्रॅक्स असतात. त्यांना भेट देऊन तुम्ही खातरजमा करू शकता. तशी परवानगी मिळते की नाही हे माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ट
टवाळ कार्टा Mon, 05/25/2015 - 13:27 नवीन
मिळेल की....कंपन्या ज्या टेस्ट कंडिशन वापरतात, जसे चालवणार्याचे वजन गुळगुळीत रस्ता ठरवलेल्या वेळेत गीअर चेंज ठरलेला स्पीड अज्जिबात ब्रेक न वापरणे अज्जिबात टर्न न मारणे अज्जिबात क्लच न वापरणॅ अतिरिक्त वजन नसणे हे आणि आणखी काही फॅक्टरर्स असतील ते सांभाळा..मग मिळेल माई मोड ऑन रे गोडश्या, कंपनीने सांगितलेला अ‍ॅवरेज हा इंजिनसाठी सर्वात आदर्श परिस्थिती असतानाचा असतो...जर तुला तशी परिस्थिती निर्माण करता आली तर तुलाही मिळेल अ‍ॅक्चुअल कंडिशन मध्ये आदर्श अ‍ॅवरेजचा हट्ट करणे हे मार्मिकपणाचे नाही तर #@$#@! पणाचे आहे असे ह्यांचे मत माई मोड ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
क
काळा पहाड Mon, 05/25/2015 - 12:05 नवीन
सुमारे ३०० किमीचा प्रवास ताशी ९० च्या वेगाने केला होता
माझा सल्ला आहे की हे असले उद्योग पुन्हा करू नयेत. कार असेल तर या स्पीडला अर्थ आहे तो सुद्धा पु.मुं. एक्स्प्रेस वे वर. बजाज प्लॅटिनाचे ब्रेक्स उपयोगी पडणार आहेत का या स्पीड ला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 05/25/2015 - 12:20 नवीन
धन्यवाद, खरंच त्यानंतर तो मूर्खपणा केला नाही कधी. विशेष म्हणजे ब्रेक्स कमकुवत होते त्यावेळेस हे अजून एक महान प्रकरण. रस्ता मोकळा आणि चांगला असल्याने वेगाचे काही वाटत नव्हते आणि नशिब बलवत्तर म्हणून काही दुर्घटना झाली नाही असे म्हणू शकतो. पण नंतर असे काही केले नाही आणि करणारही नाही. दुचाकीला तसाही रामराम ठोकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
न
नितीन पाठक Mon, 05/25/2015 - 11:08 नवीन
हिरो चि आय स्मार्ट घेतली आहे त्याबद्दल अभिनंदन..... आता हिरो चि आय स्मार्ट घेतलीच आहे तर स्मार्ट पणे सौ. ना घेउन फिरावयास जा, आपली कामे करा. नवीन गाडी चालवयाचा "थ्रील" अनुभवा. मजा करा. " अ‍ॅवरेज चा विचार कशाला करता ? १० कमी मिळेल किंवा १० जास्त मिळेल ..... सारखे सारखे अ‍ॅवरेज चा विचार करून नवीन गाडीच्या ड्रायव्हिंग चा मूड कमी करू नका. २००० किमी झाल्यावर अ‍ॅवरेज चा विचार करा .....
  • Log in or register to post comments
स
सदस्यनाम Mon, 05/25/2015 - 12:46 नवीन
नितिन मालक तुम्हीच खरे स्मार्ट. तुम्हीच खरे हिरो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक
म
म्हया बिलंदर Tue, 05/26/2015 - 06:42 नवीन
विटामिन "एम" तुटपुंजा असल्याने एवरेज चा विचार करतोय. गाडी चा जो काही थ्रिल आहे तो अनुभवतोयंच पण पहिली गाडी अस्ल्याने काही शंका आल्या त्या विचारल्या हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक
म
मदनबाण Mon, 05/25/2015 - 12:29 नवीन
मला एक प्रश्न विचारावासा वाटतो आहे... तो म्हंणजे कोणते इंजि.ऑइल सर्वात उत्तम आहे ? अनेक कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे फायदे सांगतात, प्रत्येक सर्व्हिस सेंटरवाले त्यांचे ठराविक ऑइलच टाकतात ! मग आपल्या बाईकच्या मॉडेलसाठीचे बेस्ट ऑइल कसे ठरवावे ? {इंजि.ऑइल बरोबर ३एम टाकणारा}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 05/25/2015 - 12:32 नवीन
बाईकच्या मॅन्युअल मध्ये ऑईल टाईप दिलेला असतो (जसे 20w40) त्याच specification चे टाकावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Mon, 05/25/2015 - 12:35 नवीन
ओक्के. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 05/25/2015 - 19:30 नवीन
प्रत्येक सर्व्हिस सेंटरवाले त्यांचे ठराविक ऑइलच टाकतात???
चुकीचे आहे. म्यानुअलनुसारच ऑइल टाकले गेले पाहिजे. बाकी वेगळे ऑइल वापरून/ बदलून सुधारणा होते, But, Try at your own risk! बरेच लोक सांगतात की सिंथेटिकपेक्षा त्याच डेन्सिटीचे मिनरल ऑइल चांगला पर्फोर्मंस देते. पण मला स्वतःला अनुभव नाही. शक्यतो आपण विकत घेऊन सर्व्हिस सेंटर वाल्यांना द्यावे आणि आपल्या समोरच ऑइल बदलून घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 05/26/2015 - 07:19 नवीन
चुकीचे आहे. म्यानुअलनुसारच ऑइल टाकले गेले पाहिजे. मला असे म्हणायचे आहे, की बजाज सेंटरवाले त्यांचे ठरवुन दिलेले आणि होंडावाले त्यांचे ठरवुन दिलेले ऑइलच टाकतात, आपल्याला हव्या त्या ब्रॅडचे ऑइल निवडण्याचा पर्याय नसतो.... बरेच लोक सांगतात की सिंथेटिकपेक्षा त्याच डेन्सिटीचे मिनरल ऑइल चांगला पर्फोर्मंस देते. याचा विचार करायला हवा... बजाजवाले म्हणतात :- http://www.bajajauto.com/services_genuine_oils.asp अजुन इकडेही गेलो :- https://in.answers.yahoo.com/question/index?qid=20120102031506AAgwT2r आता माझ्या १३५ एलएससाठी Bajaj DTS-i 10000 SAE 20W50 of API ‘SL’, JASO MA Grade असे मॅन्ञुअल मधे दिले आहे...मग 20W50 चे कोणते मिनरल ऑइल वापरता येउ शकते ? जाणकारांनी यांच्यावर "फोकस" टाकावा. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
ट
टवाळ कार्टा Tue, 05/26/2015 - 07:51 नवीन
Castrol किंवा कोणत्याही दुसर्या मोठ्या कंपनीचे वापरा...पण ऑईल स्वतः विकत घेउन सर्विस सेंटरला स्वतःच्या समोर बदलायला सांगावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
त
तुषार काळभोर Tue, 05/26/2015 - 10:15 नवीन
शेल ३: १००-१२५ सी सी गाड्यांसाठी (अंदाजे २५०-२७० रुपये प्रति लिटर) शेल ५: १५०+ सी सी गाड्यांसाठी ( रुपये ४०० प्रति लिटर- मी माझ्या युनिकॉर्नमध्ये हे वापरतो) नाही मिळाले तर बेस्ट ऑफ रेमेनिंग लॉटः कॅस्ट्रॉल ४टी: (अंदाजे २३०-२५० रुपये प्रति लिटर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 05/28/2015 - 06:27 नवीन
काल मी Motul 7100 20w50 इंजि. ऑइल टाकले. हे फुल सिंथेटिक आहे,आणि त्यामुळेच महाग देखील आहे. {८०० रु./प्र.लि } Image removed. हे ऑइल टाकल्यावर परफॉर्मन्स मधे फरक जाणवला आहे. :) सिंथेटिक ऑइल वापरण्याचे फायदे :- Why Synthetics? Synthetic oil vs. conventional oil

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
म
म्हया बिलंदर गुरुवार, 05/28/2015 - 06:39 नवीन
हे सी.सी. स्पेसिफीक असतं का? म्हणजे १०० सी.सी. साठी वेगळं, १२५ साठी वेगळं...??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 05/28/2015 - 06:47 नवीन
बाईक मॅन्यूअल मधे जे स्पेसिफिकेशन आहे त्याच स्पेसिफिकेशनचेच ऑइल वापरावे... काल जालावर वाचतान एक मत असेही वाचले :- From layman speak, if recommended is 20W50, you can go for a grade lower than 20 and higher than 50, for ex. 10W60. But it is not preferred to go for a grade like 10W30.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हया बिलंदर
म
मार्मिक गोडसे Mon, 05/25/2015 - 18:45 नवीन
अ‍ॅक्चुअल कंडिशन मध्ये आदर्श अ‍ॅवरेजचा हट्ट करणे हे कोण करतेय असा हट्ट?
जर का कंपनी असा दावा करते तर ती कंपनी तिच्या अधिकृत सर्विस सेंटरला आयडीअल कंडिशन्समध्ये गाडिचे अ‍ॅव्हरेज काढून का देत नाही? दूध का दूध पानी का पानी समोरच होईल.
हा माझा प्रतिसाद वाचला नाही वाटतं ?
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी गुरुवार, 05/28/2015 - 08:26 नवीन
टक्याने लिहिलेले हे वाचले नाही का? मिळेल की....कंपन्या ज्या टेस्ट कंडिशन वापरतात, जसे चालवणार्याचे वजन गुळगुळीत रस्ता ठरवलेल्या वेळेत गीअर चेंज ठरलेला स्पीड अज्जिबात ब्रेक न वापरणे अज्जिबात टर्न न मारणे अज्जिबात क्लच न वापरणॅ अतिरिक्त वजन नसणे हे सगळं सर्विस सेंटर मधे कसं बरं रिप्लिकेट करणार????? गाडी स्टँडवर लाऊन अ‍ॅव्हरेज काढता येत नाही, त्यासाठी ती चालवावी लागते. टक्याने लिहिलेल्या सगळ्या क्लुप्त्या वापरून काढा अ‍ॅव्हरेज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/28/2015 - 08:45 नवीन
मला हेवनवासी झालेल्यांची आठवण येते आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा