Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुचाकी घेतली पण... काही शंका

म
म्हया बिलंदर
Sat, 05/23/2015 - 20:27
🗣 109 प्रतिसाद
बरेच दिवस वेगवेगळे पर्याय शोधुन, माहिती काढुन, चार लोकांना विचारुन शेवटी एक दुचाकी घेतली. ऐपत ६००००/-(कमि/जास्त), रोज चा वापर ६०-८०कि.मी(कधि कधि १०० देखिल), आणि सर्वात महत्वाचं "मि स्प्लेंडर किंवा पॅशन वर बस्णारच नाहि" अशी हिची धमकी अस्ल्याने चाळुन चाळुन शेवटी हिरो चि आय स्मार्ट ठरवली.(स्प्लेंडरच पण हिला नाही समजलं) गाडी विकणारा प्रामाणिक पणे त्याचं काम करित होता. तो-"सर कंपनी तो १०२ बोलती है, लेकिन गाडी ७५-८० तो देगी." मी-"किसीने खरिदी है पय्ले?" तो-"अरे, बोहोत." मी-"उन्कु, कितना दिया." तो-"किसीने ८० बोला किसीने ९०, एक सरने तो १०५ बताया, लेकिन हमें सच नहि लगता." मी-"तो, क्या क्या खबरदारी लुं, तो ज्यादा एवरेज देगि?" तो-"५०० कि.मी. तक ४० कि स्पीड से दोडाईये, ज्यादा एवरेज देगी.बाकी रेग्युलर सर्विसींग और चेकअप." (आणखी बरिच प्रश्नोत्तरे..) त्याने त्याचं काम चोख केलं. पैसे मोजले, टाकी भरली, गाडी थेट गावि. गाव जास्त लांब जरी नसलं तरी जाणं-येणं, थोडं फार फिरणं, असं करत करत गाडी पहिल्यांदा रिजर्व ला लागली तेव्हा माझ्या हिशोबाने गाडी ने ६० चि सरासरी दिली. त्याने सांगितलेले सगळे नियम पाळुन काळजी घेउन सुद्धा हे म्हणजे खुपंच कमि झालं. त्याला फोन केला, त्याने गाडी घेउन बोलवलं. पहिल्या सर्विसींग साठी चे ५०० कि.मि. झाले होते म्हणुन सर्विसींगलाच घेउन गेलो. यावेळेस मेकॅनिकला रडकहाणि सांगितली. तो-"अवो सर, १००० कि.मी. ला कुठं एवरेज मिळ्तो का?" मी-"मग?" तो-"कमित कमि २०००-३००० तरी." मी-"मग तो पर्यंत?" तो-"गाडी ४० ने चालवायची, एक दोन सर्विसींग होऊ द्या, एवरेज काढुन देउ ना तुम्हाला." संध्याकाळी गाडी घेतली. वापरली. पुन्हा तेच, जरा फरक नाही. लावला टोल्-फ्री ला फोन. टोल्-फ्री ला फोन लावल्यावर जो अनुभव येतो तोच.(हे दिल्लीत बसलेले होते. सगळं हिंदीत.) भावनारहीत सांत्वन, फुकट्चे सल्ले आणि फिक्कट शब्दात तक्रार नोंदणी. फायदा ईतकाच झाला की त्यांनी ती तक्रार विक्रेत्याला पोहोचवली व फोन वरुन वरचंच सगळं मराठीत झालं व विक्रेत्याने हि बोलवलं. गाडी घेउन गेलो, तर यावेळेस मेकॅनिक लोकांचे मुकादम/पर्यवेक्षक/सुपरवाईजर किंवा आणखी काही, असे जे कोणी असतात ते मला भेटले. रड्कहाणी पुन्हा. पण या सरांनी कमित कमि २-३ सर्विसींग होउ द्या आपण एवरेजचं करुन देउ, असा भरवसा दिला, आणि एकदा गाडी आणा आपण एवरेज चेक करुन घेउ असंही सांगितलं. ऑफिससमोरच्या गॅरेज वाल्याला एकदा विचारलं तर त्याने तर थेट ५००० कि.मी. नंतर एवरेज मिळेल असं सांगितलं. दरम्यान हे एवरेज काढणं/ चेक करनं म्हणजे नेमकं काय याची चौकशि केली तर समजलं की गाडी ला एक बाटली लावुन, त्याची नळी पेट्रोल च्या ठिकाणी बसवतात व त्या बाटलीत १०० मि.लि. पेट्रोल टाकुन गाडी चालवायची, गाडी जे अंतर कापेन गुणिले १० कि भेटलाच गाडीचा एवरेज. हा.का.ना.का. सांगितल्याप्रमाणे गाडी घेउन गेलो. ते नळी, बाटली जोडणे सोपस्कार पार पाडले, आणि विक्रेत्याचा तोच पहिला माणुस सोबत घेतला. गाडी ६.८ कि.मी. पळाली. त्याने हि एवरेज कमि देतेय असं कबुल केलं, व आता दुसर्‍या सर्विसींग ला आणा किंवा एकदिवस गाडी ठेउन जा असा सल्ला दिला. आता शंका. १) कंपनी सांगते त्यापेक्षा किती कमि एवरेज ची अपेक्षा ठेवावी? २) अपेक्षित एवरेज केव्हापासुन मिळतो? ३) अपेक्षित एवरेज मिळण्यसाठी गाडी किती वेळ(किंव किती कि.मी पर्यंत) कमि गतिने चालवावि? ४) १००मि.लि. चे परिक्षण किती विश्वासार्ह आहे? ५) १००मि.लि. च्या परिक्षणाची काही नोंद वगैरे नस्ल्याने काही फरक पडेन का? ६) ईतकं करुनही जर गाडी कमिच एवरेज देत असेल तर, पुढची कारवाई काय असावी? i-Smart घेउन i-Fool झालो की काय असं वाटलं म्हणून ईथे विचारलं

प्रतिक्रिया द्या
24527 वाचन

💬 प्रतिसाद (109)
अ
अनिरुद्ध.वैद्य Mon, 05/25/2015 - 19:22 नवीन
थोडा क्लिष्ट उपाय आहे, पण इफेक्टिव: रेड लाईन कोणत्या आर पी एम ला सुरु होते ते बघा. साधारण ७ ८ हजार आरपीएमला रेड लाईन सुरु होते. त्याला ३ ने भागा, म्हणजे साधारण २ - २.५ हजार आरपीएम. ही तुमची कोणत्याही गीअरमध्ये इंजिन आरपीएमची लिमिट. ४५ ची लिमिट सगळे सांगतात, पण आरपीएमची लिमिट फॉलो नाही केली तर अर्थ नाही, कारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या गीअरमध्ये सुद्धा हा स्पीड गाठता येतो. गाडी घेतल्यापासून साधारण ३ - ३.५ हजार किमी हे नियम वापरून गाडी चालवा. एकदा इंजिन ट्यून झालं, की मग मायलेज व्यवस्थित मिळेल. बाकी म्हणजे, टायर प्रेशर व्यवस्थित ठेवा. लांबच्या प्रवासाला जाणार असाल तर साधारण ४ ५ नी प्रेशर जास्त ठेवा. दर एक तासानी १० मिनिटे ब्रेक घ्या. पेट्रोल शेल किंवा व्यवस्थित माहितीतल्या पंपाहूनच भरा. हे सगळे जेनेरिक उपाय पण स्प्लेंडरचे ड्रायविंग टेक्निक समजून घ्या. आणि व्यवस्थित वापरा. सुरुवातीस कमी मायलेज असतो, तो वाढतो २ ३ सर्व्हिसिंग नंतर.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 05/26/2015 - 06:42 नवीन
थोडा क्लिष्ट उपाय आहे, पण इफेक्टिव: रेड लाईन कोणत्या आर पी एम ला सुरु होते ते बघा. साधारण ७ ८ हजार आरपीएमला रेड लाईन सुरु होते. त्याला ३ ने भागा, म्हणजे साधारण २ - २.५ हजार आरपीएम. ही तुमची कोणत्याही गीअरमध्ये इंजिन आरपीएमची लिमिट.
हे माहित नव्हते...पण समजा १०० cc च्या बाईकची रेडलाईन समजा ७५०० आहे तर २५०० आर्पिएमला गीअर बदलले पाहिजे...बहुतेकदा १०० cc च्या बाईकला ४ गीअर असतात...अशाने ती बाईक कधीही अंदाजे ५०-५५ किमीप्रता पेक्षा जास्त स्पीडने जाणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 05/26/2015 - 09:43 नवीन
हे समीकरण फक्त पैल्या ३ हजारीसाठीच आहे. अर्थात नंतरही हे ठेवता येते. क्रुझ मोड गेअर मध्ये (चौथा (४ गिअर इंजिन) आणि पाचवा (५ गिअर इंजिन), गेअर टू ट्रान्समिशन १:१ रेशो) कितीही दामटा, कारण जेवढी पॉवर होतेय, ती १:१ नुसार सगळी ट्रान्समिशनला जाते, सो मायलेज जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
म्हया बिलंदर Tue, 05/26/2015 - 06:59 नवीन
Image removed. सर नाही समजलं ओ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
ट
टवाळ कार्टा Tue, 05/26/2015 - 07:09 नवीन
आरपीएम मीटर नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हया बिलंदर
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 05/26/2015 - 09:48 नवीन
आरपीएम मीटर नाहीये. मॅन्युअलमध्ये प्रती गिअर वेग किती असावा ह्याचा तक्ता असेल. तो पाठ करा आणि त्या मर्यादेच पालन करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हया बिलंदर
ब
बाबा पाटील Tue, 05/26/2015 - 08:41 नवीन
इ.स.वी.सन १९९९ ते २००३ या काळात स्प्लेंडर सरासरी ७० ते ७५ एव्हरेज द्यायची बुवा. दोनशे रुपयात महाबळेश्वरची ट्रीप व्हायची त्या काळात आताच काही माहित नाही राव.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 05/26/2015 - 09:53 नवीन
माझी काही मित्रमंडळी अजूनही ९८-९९ च मॉडेल वापरतात. काहीही प्रॉब्लेम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
स
संदीप डांगे Tue, 05/26/2015 - 11:04 नवीन
९८-९९ स्प्लेंडर जबरदस्तच होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
त
तुषार काळभोर Tue, 05/26/2015 - 11:14 नवीन
१. हिरोहोंडा सीडी१००: २००३ मॉडेल वापर २०१० पर्यंत वापर बहुतेक पुणे शहरात, रोज ८०-१२० किमी, रोज एव्हढा प्रवास होत असताना पेट्रोल वाचवणे भाग होते. मग वेग ३५-४० किमी प्रति तास, ठराविक पंपावर पेट्रोल भरणे(मी भरायचो: रेसकोर्सच्या पुढे सेंट मेरी जवळच्या पंपावर) , दर ३००० किमी ला ऑईल बदलणे व दर ५०००-६००० किमीला सर्विसींग, हवा दर आठवड्याला तपासणे(मल्याळी दुकानदाराकडेच) इत्यादी. अ‍ॅव्हरेज ७०+ किमी प्रति लिटर २. हिरो होंडा प्लेजर: २०१२ मॉडेल आतापर्यंत वापरः वडील्/बहीण्/बायको यांच्याकडून हडपसर-लोणीकाळभोर-मांजरी-फुरसुंगी परिसरात रोज २०-४० किमी अ‍ॅव्हरेज= ४५-५० किमी ३. होंडा युनिकॉर्नः मॉडेल २००९ आतापर्यंत वापरः लोणीकाळभोर-हडपसर-पुणे शहर-लोणीकंद रोज साधारण ३०-५० किमी अ‍ॅव्हरेज=५०-५५ किमी (याच्यात शेलचं ऑईल, ७०% वेळा शेलचं साधं पेट्रोल, इतरवेळी भारत पेट्रो. च्या पंपावर, ६०००-७००० किमीला सर्विसींग, शहरी भागात ४० चा वेग, महामार्गावर ७०-९० किमी प्रति तास) रोज १०० किमी फिरण व्हायच तेव्हा काही क्लॄप्त्या समजल्या होत्या/शोधल्या होत्या/माहिती झाल्या होत्या. चालवण्याच्या बाबतीत मी हे करायचो (अजूनही करतो) : १. अचानक वेग वाढवणे/ब्रेक लावणे शक्य तेव्हढे टाळणे. जर अनपेक्षित पणे समोर काही आले तरच ब्रेक दाबणे. नाहीतर पुढच्या रस्त्याचा अंदाज घेऊन ब्रेक लावावा लागू नये, अशी गाडी चालवणे. २. ३५-४० किमीप्रतितास किंवा ३००० आरपीएम हे आकडे सब्जेक्टिव असतात. गाडी शक्य तितक्या वरच्या गियर मध्ये चालवणे, पण त्या गियरच्या कमीत कमी वेगात. म्हणजे मी युनिकॉर्न ५व्या गियरवर ४०-४५ च्या वेगात चालवतो. अशी चालवली की (३५-४० किमीप्रतितास किंवा ३००० आरपीएम) हे आपोआप होते. ३. सिग्नलला ३० सेकंदापेक्षा जास्त गाडी चालू स्थितीत उभी करायची नाही. (हे २ मिनिटे म्हटले जाते, पण मी ३० सेकंद पाळतो. मुळात नियम मोडणे मानवत नसल्याने २-३ सेकंद असताना गाडी सुरू करतो. प्लेजर व युनिकॉर्न बटनस्टार्ट आहेत, तर सीडी १०० अर्ध्या किकवर चालू व्हायची) ४. फुल्ल टाकी नसेल तर हिंदकाळून पेट्रोलचं बाष्पीभवन जास्त होतं. मी टाकी 'नेहमीच' फुल्ल ठेवतो. २-३ लिटर कमी झालं की टॉपअप करतो.) अवांतरः सुरक्षेसाठी: मी हेल्मेट वापरतो, आणि मला त्याचा अभिमान आहे. हेल्मेट घातल्यावर मान दुखते, आजू बाजूच नीट दिसत नाही, नीट ऐकू येत नाही, केस गळतात, ही सर्व कारणं मला पटत नाहीत. जरी त्यातील एखादे वा सर्व खरी असली तरी जीवापेक्षा ते महत्वाचे नाही. लोक ४००० चा मोबाईल घेउन त्याला स्क्रीनगार्ड लावतात, पण डोक्याला स्क्रॅच येऊ नये म्हणून हेल्मेट वापरत नाहीत, हा फालतुपणा आहे.
  • Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर Tue, 05/26/2015 - 11:33 नवीन
१. अचानक वेग वाढवणे/ब्रेक लावणे....
सहमत
२. ३५-४० किमीप्रतितास किंवा ३००० आरपीएम....
चालेल.
३. सिग्नलला ३० सेकंदापेक्षा....
सर ही गाडी आपोआप ५-१० सेकंदात बंद होते आणि क्लच दाबला कि सुरू. मि देखील सिग्नल पाळतो.
४. फुल्ल टाकी नसेल तर....
यापुढे काळजी घेत जाईन.
अवांतरः सुरक्षेसाठी: मी हेल्मेट....
१०० वेळा सहमत. मि हेल्मेट शिवाय गाडी चालवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ट
टवाळ कार्टा Tue, 05/26/2015 - 13:24 नवीन
कचकून हाबिणंदन....माझ्यासारखे बाईक चलवणारे कोणीतरी आहे मिपावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
उ
उगा काहितरीच Tue, 06/23/2015 - 10:29 नवीन
अजून १ (बोक्याने सीट फाडलेली गाडी सध्या पुण्यात चालतेय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
भ
भुमन्यु Tue, 05/26/2015 - 11:33 नवीन
अवांतरः सुरक्षेसाठी: मी हेल्मेट वापरतो, आणि मला त्याचा अभिमान आहे. हेल्मेट घातल्यावर मान दुखते, आजू बाजूच नीट दिसत नाही, नीट ऐकू येत नाही, केस गळतात, ही सर्व कारणं मला पटत नाहीत. जरी त्यातील एखादे वा सर्व खरी असली तरी जीवापेक्षा ते महत्वाचे नाही. लोक ४००० चा मोबाईल घेउन त्याला स्क्रीनगार्ड लावतात, पण डोक्याला स्क्रॅच येऊ नये म्हणून हेल्मेट वापरत नाहीत, हा फालतुपणा आहे.
यासाठी सहमत. लोकं हेलमेट हे पोलिसांसाठी वापरतात. ही शोकांतिका आहे की आपण हेलमेट घालावे यासाठी सरकारला दंड करावा लागतो. अशी पण वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 05/26/2015 - 12:00 नवीन
हेल्मेट म्हंटले की पुणे आठवते... पुणे म्हटले अर्थातच पुणेकर... आता हेल्मेट आणि पुणेकर म्हंटले की हॅ.हॅ.हॅ... हेल्मेटसक्ती जाता जाता :- नारायण ! नारायण ! चला माझी गंधर्व लोकात चक्कर टाकायची वेळ झाली ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/26/2015 - 16:22 नवीन
आगलावबाण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
नितीन पाठक Tue, 05/26/2015 - 12:37 नवीन
जर आपणास शक्य असेल तर स्प्लेंडर च्या दोन्ही चाकांमध्ये साधी हवा न भरता नायट्रोजन भरा. लांबच्या प्रवासात टायर गरम होत नाही. धक्के बसत नाही. चालवतांना आरामदायक वाटते. सध्या जास्त पॉवरच्या मोटारसायकल्स मध्ये नायट्रोजन च भरतात. कदाचित अ‍ॅवरेज मध्ये सुध्दा फरक पडेल.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 05/28/2015 - 07:17 नवीन
आय स्मार्टने डिक्लेअर केलेले (जाहिरातबाजी केलेले) मायलेज ह्यावरुन होन्डा आणि हिरो मध्ये शाब्दिक मारामारी झाली आहे. ओरिजिनल इन्जिन होन्डाने डेव्हलप केले आहे त्यामुळे ते त्याचा आधार घेउन १०२ वर आक्षेप घेत होते. एकॉनोमिक टाइम्स मध्ये उत्तरं प्रत्युत्तर आहेत. हिरो कडुन टेक्निकली काहि फारसं उत्तर आलेल वाटल नाही. पण बेसिक इन्जिन स्प्लेन्डर्चच असल्याने ६५-७० च्या रेन्ज मध्ये येइल अव्हरेज. त्यापेक्षा जास्त आलं तर बोनस म्हणुन खुश व्हा. वर बरेच सल्ले दिलेत गाडी चालवण्याच्या पद्धतीसाठी ते योग्यच आहेत. शिवाय पहिल्या सर्व्हिसिन्ग नंतरच एव्हरेज कॅलक्युलेट करायला सुरवात करा. सुरवातीचे २००० किमी हे एन्जिनचे रनिन्ग इन असते त्यामुळे गाडी सोबत दिलेल्या पुस्तकात दिलेया कोष्टकप्रमाणेच त्या त्या गीअरला स्पीड ठेवा. त्यात पहिल्या २ हजार मध्ये किती स्पीड ओलान्डू नये ह्याची सुचना असेल ती देखील काटेकोरपणे अमंलात आणा. हॅप्पी बायकीन्ग. :)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 05/28/2015 - 07:21 नवीन
ते बायकीन्ग हे बाइकीन्ग असे वाचा. उगा अनर्थ नको. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 06/24/2015 - 03:34 नवीन
दुवा द्याल काय ह्या होंडा वि. हीरो चा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
ट
टवाळ कार्टा Wed, 06/24/2015 - 09:43 नवीन
http://articles.economictimes.indiatimes.com/2015-05-03/industry/61768129_1_scooter-india-honda-motorcycle-hero-motocorp http://www.thehindu.com/business/Industry/honda-disputes-heros-fuel-economy-claim-of-1025-kmlitre/article7167019.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 06/24/2015 - 16:45 नवीन
थेंकु सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
झ
झकासराव Fri, 06/26/2015 - 07:16 नवीन
धन्यवाद टकाजी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मदनबाण गुरुवार, 05/28/2015 - 09:09 नवीन
कोणाला बाईक Chain Lube स्प्रे चा अनुभव हाय का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 05/28/2015 - 09:11 नवीन
सर्व्हिस सेंटरवाल्यालाच सांगायचे ते करायला....सेपरेट घ्यायची गरज नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 05/28/2015 - 09:31 नवीन
आमाला फ्री भेटलत … ५०० किमी झाले की करा ल्युब! तशी शेपरेट घ्यायची गरज नाई. २ मिनटाच काम असते. सेंटरवाल्यालाच पकडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मदनबाण गुरुवार, 05/28/2015 - 09:36 नवीन
ओक्के...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
म
म्हया बिलंदर गुरुवार, 05/28/2015 - 13:29 नवीन
परवाच सरांसोबत अ‍ॅक्टिवा वर प्रवास करत होतो. सुरु करतानाच पुढच्या चाकात कमी हवा असल्याचं सरांच्या निदर्शनास आणुन दिलं. पंपावर जाउन हवा भरली, तर त्याने हि, "कदाचीत पंक्चर असेल चेक करुन घ्या." असा सल्ला दिला. साधारण १०-१५ कि.मि. नंतर एका पंक्चर वाल्याकडून चेक केलं तर त्याने ते कसलंतरी पाणी चाकावर ओतुन जिथे बुडबुडे आले तिथे दाभणासारखी सुई भस्सकन घातली आणि दुसर्‍या तसल्याच सुईने एक चिक्कट दोरा त्यात ओवला. झालं. असं एकेक करुन त्याने ६ पंक्चर काढले.
  1. ट्युब्लेस टायर्सचे पंक्चर असेच काढतात का?
  2. एकाच वेळेस ६ पंक्चर होते की त्याने काहीतरी करुन ६ पंक्चर काढले?
  3. ट्युब्लेस टायर्स पंक्चर होउनही लौकर कळत नसेल तर कसे लक्ष ठेवावे?
  4. ट्युब्लेस टायर्सची ट्युबवाल्या टायर्स पेक्षा वेगळी काय आणी कशी काळजी घ्यावी?
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 05/28/2015 - 14:37 नवीन
पंक्चरवाल्याची चालुगिरी असा एक धागा शोधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हया बिलंदर
स
सत्याचे प्रयोग गुरुवार, 05/28/2015 - 14:53 नवीन
ह्या हिशोहिने त्य हुशेन बोल्ट्ला पण हरविन कुणी
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 06/23/2015 - 09:12 नवीन
ह्या हिशोहिने त्य हुशेन बोल्ट्ला पण हरविन कुणी
अगागागागा.. अरे भाई, कहना क्या चाहते हो? पारच वाट लागली डोस्क्याची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग
म
म्हया बिलंदर गुरुवार, 06/25/2015 - 14:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
क
कौन्तेय गुरुवार, 06/04/2015 - 16:36 नवीन
दुचाकीस्वारांच्या जातीत महिला भरपूर संख्येने असूनही या चर्चेत कितीशा महिलांनी मत नोंदवलं आहे?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 06/24/2015 - 10:06 नवीन
दुचाकीस्वारांच्या जातीत महिला भरपूर संख्येने असूनही या चर्चेत कितीशा महिलांनी मत नोंदवलं आहे?
मुद्दा बरोबरय पण १. इथे मोटरसायकलवर चर्चा चालली आहे. बहुतांश महिला स्कुटर प्रकारच्या दुचाकी चालवितात त्यामुळे त्यांना या धाग्यात इंटरेस्ट नसणे शक्य आहे. २. महिलांना तांत्रिक बाबींपेक्षा सुरक्षा आणि / किंवा स्कुटरचे बाह्यरुप कसे आहे यात जास्त रस असावा असे वाटते. उदा. कोणता रंग जास्त चांगला दिसेल ? लुक्स कसे आहेत वगैरे वगैरे. जाणकार म्हैला जास्त प्रकाश टाकू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय
ट
टवाळ कार्टा Wed, 06/24/2015 - 10:45 नवीन
म्याचींग म्हणतात त्येला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Wed, 06/24/2015 - 10:55 नवीन
व्हयं गां. इसारलूच व्हतू बगा म्यां. आत्ता आठिवलं. आमी लयचं जालं तर काळ्या / निळ्या इजारीवर कंच्याबी रंगाची बंडी घालतू. देवा, एक डाव मापी द्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
काळा पहाड Wed, 06/24/2015 - 15:21 नवीन
नाहीतर रस्त्यावर गुलाबी, व्हायोलेट, क्रीम, पिस्ता अशा रंगाच्या मोटरसायकली दिसल्या असत्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Wed, 06/24/2015 - 15:44 नवीन
बस ??? पुरुषांचे रंगांचे ज्ञान स्त्रियांपेक्षा फारच कमी असते. तुम्ही वांगी कलर, मोरपंखी कलर, रानी कलर, आंबा कलर अशी रंगांची नावे ऐकली आहेत काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
मुक्त विहारि Wed, 06/24/2015 - 16:24 नवीन
बहुदा त्यांचे लग्न व्हायचे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
म्हया बिलंदर गुरुवार, 06/25/2015 - 17:31 नवीन
पिवळट हिरवा, हिरवट जांभळा, जांभळट निळा, नवरट डांबरी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
वैभव जाधव Fri, 06/26/2015 - 14:20 नवीन
ह्ये सगळे कलर अपाचे नायतर यामाहा एफ्झी आणि वेस्पात मिळतात. नशीब चटणी कलर मागत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हया बिलंदर
त
तुषार काळभोर Fri, 06/26/2015 - 14:47 नवीन
चिंतामणी कलर माहितेय का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हया बिलंदर
म
म्हया बिलंदर Fri, 06/26/2015 - 17:25 नवीन
नाही ओ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
म
मार्मिक गोडसे Mon, 06/15/2015 - 06:54 नवीन
हे सगळं सर्विस सेंटर मधे कसं बरं रिप्लिकेट करणार????? गाडी स्टँडवर लाऊन अ‍ॅव्हरेज काढता येत नाही, त्यासाठी ती चालवावी लागते.
परंतू तुम्ही म्हणता तसेही गाडीचे अ‍ॅव्हरेज काढले जात नाही. गाडी एका जागी उभी करुनच ही टेस्ट केली जाते. खाली दिलेल्या लिंकनी कदाचीत तुमचे समाधान होइल अशी आशा करतो. http://www.bikesindia.org/reviews/how-realistic-the-certified-fuel-efficiency-mileage-figures-are.html बाईकच्या कंपनीला अशी सुविधा अधिकृत सर्विस सेंटरला देणे अशक्य नाही. कदाचीत आपले पितळ उघडे पडेल अशी बाईक कंपनीला भीती वाटत असेल. म्हणून मी जर का कंपनी असा दावा करते तर ती कंपनी तिच्या अधिकृत सर्विस सेंटरला आयडीअल कंडिशन्समध्ये गाडिचे अ‍ॅव्हरेज काढून का देत नाही? दूध का दूध पानी का पानी समोरच होईल. असे म्हटले होते.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 06/15/2015 - 06:57 नवीन
खिक्क...कस्ले विनोदी लिहिता हो...सविस्तर प्रतिसाद नंतर देईन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Tue, 06/23/2015 - 08:29 नवीन
खिक्क...कस्ले विनोदी लिहिता हो...सविस्तर प्रतिसाद नंतर देईन
मी बाइकचे अ‍ॅव्हरेज काढण्याच्या डायनो टेस्टबद्दल लिहिलेय. त्यात विनोदी असे काय आढळले? अजून कोणत्या वेगळ्यापद्धतीने बाइकचे आयडीअल कंडिशन्समध्ये अ‍ॅव्हरेज काढत असतील तर ते जाणून घ्यायला आवडेल. सविस्तरच द्या. ज्ञानात भर पडणे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 06/23/2015 - 08:49 नवीन
अर्रे हा प्रतिसाद द्यायचा राहूनच गेलेला विनोदी यासाठी लिहिले कारण बाईकचा standard average हा ARAI या मान्यताप्राप्त संस्थेकडून आलेला असतो...उठसूठ कितीही वेळा टेस्टिंग केले तरी त्यात बदल होऊ शकत नै तसेच जर बाईक कंपनीने असे उठसूट कोणाही सोम्या-गोम्यासाठी (तुम्ही त्यातले नै असेच आपण समजू) सर्व्हिस सेंटरमध्ये टेस्टिंगची सोय ठेवली तरी नेहमी तेच तेच रिझल्ट मिळणार पण त्यासाठी सर्व्हिस सेंटरला त्याचा मेंटेनंस किती? ते लोक सरळ फाट्यावर मारणार असा non-productive खर्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Wed, 06/24/2015 - 14:42 नवीन
फुस्स !
उठसूठ कितीही वेळा टेस्टिंग केले तरी त्यात बदल होऊ शकत नै
असहमत. असे ARAI छातीठोकपणे सांगू शकत नाही. कंपनी बनविलेली प्रत्येक गाडी ARAI कडून टेस्ट करून घेत नाही. असे असते तर एकाच कंपनिच्या सारख्याच मॉडेलच्या दोन वेगवेगळ्या बॅचच्या बाइकच्या अ‍ॅव्हरेजमध्ये फरक पडला नसता. माझ्या चुलत भावाची नवी कोरी स्प्लेन्डर ४५ च्या पुढे अ‍ॅव्ह्रेरेज देत नव्हती. कंपनिच्या अधिकृत सर्विस सेंटरला नियमीत सगळ्या सर्विस करूनही गाडीच्या अ‍ॅव्ह्रेरेजमध्ये काहीही फरक पडला नाही. सर्विस सेंटरवाले गाडीत दोष आहे हे मानायला तयार नव्हते. मी स्वतः गाडीचे अ‍ॅव्हरेज काढून बघीतले पुन्हा रिझल्ट तोच. शेवटचा उपाय म्ह्णून गाडीचे ब्लॉक पिस्टन बाहेरच्या गॅरेजवाल्याकडून बदलले. महिन्याभरात गाडीने ६० च्या पुढे अ‍ॅव्हरेज दिले. कंपनीने अ‍ॅव्हरेजच्या बाबतीत दावा जरूर करावा त्याचबरोबर जबाबदारीही घ्यावी. वाटल्यास टेस्टिंगचे पैसे घ्यावेत. जो ग्राहक अ‍ॅव्हरेजसाठी गाडी घेतो तो आयुष्यभर पेट्रोलवर ज्यादा पैसे खर्च करण्यापेक्षा टेस्टिंगला पैसे देण्यास नक्कीच नकार देनार नाही. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/24/2015 - 14:47 नवीन
व्यवस्थित स्लेंडर ४५ चा अ‍ॅव्हरेज देणे शक्यच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ट
टवाळ कार्टा Wed, 06/24/2015 - 14:47 नवीन
व्यवस्थित चालवली तर स्लेंडर ४५ चा अ‍ॅव्हरेज देणे शक्यच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा