Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिनेसोटा लँडस्केप आर्बोरेटम

ज
जुइ
Sun, 05/24/2015 - 17:50
💬 19
नमस्कार, बऱ्याच वर्षांपासून आमच्या शहरातील लॅंडस्केप आर्बोरेटम पाहायचे ठरवत होतो. मात्र काहीना काही कारणामुळे ते मागे पडत होते. या लांब विकांताला मात्र आर्बोरेटम पाहायचा योग जुळून आला. मिनेसोटा विद्यापीठातील एक विभाग म्हणजेच लॅंडस्केप आर्बोरेटम. आर्बोरेटम जवळजवळ १,१३७ एकरांमध्ये पसरले आहे. १९०७ साली आर्बोरेटमच्या आजच्या जागेवर हॉर्टिकल्चर संशोधन केंद्र सुरू झाले. आर्बोरेटम चे संस्थापक आहेत Dr. Leon C. Snyder. १९५८ साली आर्बोरेटम लोकांसाठी खुले करण्यात आले. तोपर्यंत इथे सुमारे पाच हजार वेगवेगळ्या प्रजातींची झाडे लावण्यात आली होती. हे आर्बोरेटम शास्त्रज्ञ मंडळींनी चालवलेले उद्यान आहे, त्यामुळे लौकिकार्थाने ते आखीव रेखीव मात्र नाही. व्हिजिटर सेंटर समोरील या आकर्षक मोराने आमचे स्वागत केले. Lego Peacock आर्बोरेटम वर्षातून केवळ २ दिवसच (क्रिसमस व थँक्सगिविंग डे) बंद असते. तुम्ही येथे केव्हा जाता याला खूप महत्त्व आहे कारण वेगवेगळ्या झाडांच्या बहरण्याचे ऋतू वेगवेगळे असतात. आम्ही खास करून येथे ट्यूलिप्स पाहायला गेलो होतो. तरीही थोडासा उशीरच झाला जायला असे वाटले कारण की काही ट्यूलिप्स सुकू लागले होते. मात्र मोठ्या संख्येने बरेच ट्यूलिप अगदी ताजे दिसत होते. त्यांची झलक Tulips 1 Tulips 2 Tulips 3 Tulips 4 Tulips 5 ट्यूलिप्सच्या बागेतून फिरताना बाळगोपाळांचा उत्साह तर जाणवत होताच पण दुसरे बालपण सुरू असलेल्यांचाही काही कमी नव्हता. Tulips 6 ट्यूलिप बरोबरच असंख्य प्रकारची गुलाबाची झाडे रोझ गार्डनमध्ये होती. मात्र ती बाग अजून बहरली नव्हती. तिथेच असलेली काही कारंजी मात्र खूपच मोहक होती. Fountain Fountain रोझ गार्डनमधील हा एक गझीबो Gazibo Temple like structure ट्यूलिप्स व रोझ गार्डनव्यतिरिक्त इतर अनेक गार्डन्स आहेत जसे स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या विविध हर्ब्जचे गार्डन, चायनीज, जॅपनीज गार्डन इत्यादी. Benches Greenery दीड दोन तास भटकून झाल्यावर आम्ही खुल्या ट्राममधून मिळणारी तासाभराची गायडेड टूर घेतली. या ट्रामचा चालक अन टूर गाईड एक सत्तरीतला उमदा तरुण होता. त्याचे सहजशैलीतील वर्णन ऐकता ऐकता एक तास कसा निघून गेला ते कळले नाही. Tour Guide या टूरदरम्यान काढलेले फोटोज Curved trail Pink Trees Colorful Trees Girls near fountain येथे स्कल्पचर गार्डन आणि सध्या अमेरिकेतील बाळ गोपाळांचे आवडते असे लेगो वापरून तयार केलेल्या आकर्षक आकृत्या जागोजाग दिसल्या. Sculpture Garden नातवाला बागकाम शिकवणारे एक आजोबा. Grandpa grandson Butterfly Hummingbird Turtle व्हिजीटर सेंटरमधील गिफ्ट शॉपीमधून souvenirs खरेदी करून आमच्या या भेटीची सांगता झाली. Souvenir एकंदरीतच ही जागा खूप आवडल्याने येथे परत फॉल सीझनमध्ये परत जायचा मानस आहे. येथे विनामोबदला काम करणाऱ्या शेकडो हौशी स्वयंसेवकांना मन:पूर्वक धन्यवाद. टीप: फोटो मोठे करुन पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करावे.

प्रतिक्रिया द्या
10204 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
पद्मावति Sun, 05/24/2015 - 18:27 नवीन
वेगळ्याच ठिकाणाची छान माहिती मिळाली. फोटो तर फारच मस्तं....
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 05/24/2015 - 18:31 नवीन
दिल गार्डन गार्डन हो गया !
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Sun, 05/24/2015 - 18:40 नवीन
मस्त फोटो.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Sun, 05/24/2015 - 18:42 नवीन
आह्ह ! सुरेख फोटो आणि माहिती :)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 05/24/2015 - 19:21 नवीन
अप्रतिम फोटो आणि माहिती. 'लेगो' म्हणिजे काय, मज निरोपावे.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 05/24/2015 - 20:03 नवीन
भारतात आता काय म्हणतात ते ठाऊक नाही पण माझ्या लहानपणी ते मेकॅनो या नावाने ओळखले जायचे. इथली लहान मुले विविध लेगो गेम्स अन पझल्स खेळताना तासन तास घालवतात. लेगो हे कंपनीचे नाव आहे. कॉपियर यंत्राला जसे झेरॉक्स म्हंटले जाते तसे आता अमेरिकेत लेगोबाबत होऊ लागले आहे. लेगोलँड थीमपार्क्स पण प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षीचा द लेगो मूव्ही हा अ‍ॅनिमेशनपट इथे खूप चालला. आमच्या शहरातील मॉल ऑफ अमेरिका (अमेरिकेतील सर्वात मोठी मॉल) येथे लेगो कंपनीचे भव्य दालन आहे. त्याचे मी काढलेले दोन फोटोज. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
स
सुबोध खरे Sun, 05/24/2015 - 19:31 नवीन
फोटो फार छान आहेत
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 05/24/2015 - 19:43 नवीन
अफाट सुंदर पुष्पमालिका कुठे द्वयी ती, कोठे एका गूज सांगते हासून लाजून हळूच जाऊन कौतुक ऐका Image removed.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 05/24/2015 - 21:50 नवीन
खूप सुंदर फोटोज आणि उत्तम माहिती :)
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 05/25/2015 - 05:49 नवीन
फार सुंदर फोटो आणि माहिती.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 05/25/2015 - 11:13 नवीन
अप्रतिम फोटो आणि लेखनही झक्कास
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 05/25/2015 - 11:42 नवीन
कलरफुल्ल फोटो !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 05/25/2015 - 12:14 नवीन
झकास्स्स... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 05/25/2015 - 16:16 नवीन
दिल गार्डन गार्डन हो गया!!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 05/25/2015 - 17:32 नवीन
मस्त फोटू. निसर्गाचे फोटो आवडलेच पण लेगोज वापरून तयार केलेल्या प्रतिक्रुतीही आवडल्या. लेगो हा मुलांचा अगदी आवडीचा खेळप्रकार आहे. क्यालिफोर्नियातील लेगोलँड नंतर या चित्रांमध्येच प्रतिकृती पहावयास मिळाल्या.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/25/2015 - 17:36 नवीन
फोटो खुप अप्रतिम :)
  • Log in or register to post comments
ज
जुइ Tue, 05/26/2015 - 03:53 नवीन
फोटो सौजन्य: मिपाकर श्रीरंग जोशी. अमेरीकेत राहणार्‍या बर्‍याच मिपाकरांच्या घरी त्यांची शाळेत जाणारी मुले लेगोमय झाली असतील असा अंदाज आहे. त्यापैकी कुणी लेगोवर तपशीलवार लेख टाकल्यास आनंद वाटेल.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/26/2015 - 06:11 नवीन
खूपच छान!
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 05/26/2015 - 06:42 नवीन
फोटो कित्ती सुंदर !!!! लेगोवर तपशीलवार लेखाच्या प्रतीक्षेत....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा