Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चित्रकार पिंटू [बालकविता]

व — विदेश, Mon, 05/25/2015 - 09:13
आमचा पिंटू चित्रकार छान चित्र काढताना पाठीची कमान .. जिराफाला असते गेंड्याची मान उंटाला दिसती हत्तीचे कान .. भूभूचे शेपूट सरळ असते हम्माचे शेपूट वाकडे दिसते .. मोरपिसारा कोंबड्याला असतो कोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो .. झुरळ असते काढलेले हातभर मिशा त्याच्या फक्त चिमूटभर .. इवल्याशा सशाला पाय कावळ्याचे सिंहाला नेमके पाय बगळ्याचे .. मुंगीचा डोळा वाघाला दिसतो घुबडाचा डोळा चिमणीला असतो .. चित्र रंगवताना डोलावतो मान म्हणतो स्वत:च "वा वा छान".. चित्रात भरताना विविध रंग स्वत:चे भरतो रंगाने अंग आमचा पिंटू चित्रकार छान मोठ्ठा झाल्यावर होणार महान .. ! .

प्रतिक्रिया द्या
1782 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मदनबाण Mon, 05/25/2015 - 12:38 नवीन
मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 05/25/2015 - 17:15 नवीन
छोटू, पिंटू.. छान असतात तुमच्या बालकविता !!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/25/2015 - 17:37 नवीन
माझ्या चित्रकलाशैलीवर कविता केल्याबद्दल धन्यवाद. फार पुर्वी मी माकड काढायला घेतलं की घोडा किंवा गाढवसदृष्य प्राणी निघत असे ह्याची आठवण झाली/
  • Log in or register to post comments
व
विदेश Tue, 05/26/2015 - 18:15 नवीन
मदनबाण, नीलमोहर, कॅप्टन जॅक स्पॅरो ... सर्वांचे आभार !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा