भोगदासी........
घडयाळ्याचे काटे मध्यरात्रीकडे कलत असताना
जेव्हा सारे शहर निद्रेच्या अधीन होत असते
हरवलेल्या डोळ्यांनी, वखवखलेल्या नजरांमध्ये
तेव्हा ती आपलं गिर्हाईक शोधत असते
ओठांवर लाली,केसांत मोगर्याच्या माळा
सर्वांगावर मंद अत्तर दरवळत असते
वरकरणी लावलेल्या पावडरच्या थरांमागे
नशिबाने गंजलेला चेहरा लपवत असते.
रात्री घराकडे परतणारी जोडपी डोळ्यांत साठवूण
नकळत मग तीही मनातून सुखावत असते
त्याच्या बाहुत विश्वासाने विसावलेल्या तिच्याजागी
गुपचुप स्वतःची छबी नेऊन ठेवत असते
थंड वार्यासोबत वहावत आलेल्या त्याच्या
आठवणीने हलकेच मग आतून शहारत असते
त्याच्यासोबत रचलेला भातुकलीचा संसार आता
दररात्री एका नव्या नवर्यासंगे मांडत असते
जर दयायची होती गतपापांची शिक्षा देवा...
आजन्म भोगशिळा बनवले तरी चालले असते
रोज रोज लचके तोडुन घेण्यापेक्षा
दगड होउन जगणे कैकवेळा परवडले असते
देवानेही आपल्याला वाळीत टाकले आहे
"भोगदासी आहेस तु" हे मनाला बजावत असते
हरवलेल्या डोळ्यांनी, वखवखलेल्या नजरांमध्ये
पुन्हा ती आपलं गिर्हाईक शोधत असते
💬 प्रतिसाद
(18)
प
पैसा
Tue, 05/26/2015 - 18:38
नवीन
ओह!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 05/26/2015 - 19:14
नवीन
आवडेश.
- Log in or register to post comments
ल
लालगरूड
Tue, 05/26/2015 - 19:17
नवीन
छान
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Fri, 05/29/2015 - 16:44
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 05/29/2015 - 16:47
नवीन
अर्र!!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sat, 05/30/2015 - 07:03
नवीन
आवडली कविता
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Sat, 05/30/2015 - 07:08
नवीन
कविता आणि वेदना दोन्ही पोचलं.. आवडली
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 05/30/2015 - 08:35
नवीन
आणि अचूक
कवीता आवडली.
- Log in or register to post comments
त
तेजाभाई
Sat, 05/30/2015 - 08:42
नवीन
छान
- Log in or register to post comments
ग
गुनि
Sat, 05/30/2015 - 10:30
नवीन
ख्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Mon, 06/01/2015 - 17:18
नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Mon, 06/01/2015 - 17:47
नवीन
मागे एकदा आई बाबांना गावी सोडायला CST स्टेशनवर गेलो होतो.
कोकणकन्या सुटेपर्यंत 12 वाजून गेले.
आता माझ्याजवळ दोन option होते.
एकतर तिथून CR पकडून दादर पर्यंत जाऊन मग तिथून WR पकडून बोरीवली.
नाहीतर चर्चगेट वरून डायरेक्ट बोरीवली.
मी दूसरा पर्याय निवडला.
रात्रीची मुंबई फिरून तसेही बरीच वर्ष झाली होती. आज थोड्यावेळासाठी का होईना पुन्हा ती हौस भागवायला मिळणार होती. मग चान्स कशाला सोडा.
तसही CST वरून चर्चगेट काही जास्त अंतर नाही. मधल आझाद मैदान ओलांडल की झालं. आधीच CST ला TC सोबत झालेल्या प्लेट्फ़ोर्मच्या टिकिटाच्या गोधंळामुळे मला उशीर झाला होता. आणि CST वरून शेवटची लोकल किती वाजता असते ह्याची कल्पना नव्हती. मी घड्याळाकडे नजर ठेवून चर्चगेटच्या दिशेने निघालो. आझाद मैदानापाशी पोहचलो.
मैदानातून जाणार्या वाटेवर दिवे नव्हते. एक दिवा अलिकडल्या गेटवर तर दूसरा पलिकडल्या गेटवर.....मध्ये काही नाही फ़क्त अंधार.
अश्या अंधार्या वाटांवरच चोर लुटारुंची चलती असते हां नतद्रष्टी विचार मनात आला. तेव्हढ्यात गेटवर दोघे तिघे उभे असलेले दिसले. माझ्याकडेच रोखून पहात होते. मी मनातून थोडा घाबरलो पण चेहर्यावर घाबराल्याच्या खुणा न दाखवता त्यांची नजर टाळत तिथून लवकरात लवकर निघायला पहात होतो. उगाचच दूसरा पर्याय निवडला अस मला वाटत होत.
मी गेटवर पोहचतोय तोच त्या तिघांपैकी एकजण कुजबुजला
"साब चाहिए क्या??????"
मी दचकून वर पाहिल. तर ते तिघे माझ्याकडेच पहात होते. मला दोन मिनिट काही कळलच नाही की ते मला कश्याबद्दल विचारत होते ते. तेव्हढ्यात मला त्यांच्यामागे बांगड्यांची किणकिण ऐकू आली. त्या तिघांच्या मागे दोघिजणी उभ्या होत्या. चांदण्याची साडी, भडक मेकअप आणि चेहरयावर गिर्हाईकाला आजमावणारे हास्य.
"बोलो ना साब ..चाहिए क्या??????" त्या तिघांपैकी एकाने मला पुन्हा विचारलं
त्या प्रश्नांसरशी मी भानावर आलो. मला हां सगळा काय प्रकार आहे तो लक्ष्यात आला. मी काही न बोलता तिथून सरळ सरळ धूम ठोकली. एकजण पाठिमागुन मला हाका मारत होत त्यासोबत चेष्टेचे शेरे आणि जोरजोरात हसण्याचे आवाज येत होते.
मी तिथून जो पळत निघालेलो तो थेट चर्चगेट स्टेशनवर येउन थांबलो. सुदैवाने बोरिवलीची गाड़ी सुटतच होती. मी ती गाडी जीव लावून पकडली. गाडी सुसाट सुटली. खिडकीतून येणारया वार्यासोबत उखडलेला श्वास विसावला. आपल्या मागे आता कुणी नाही ह्याची खात्री पटली आणी डोक शांत झाल पण नजरेसमोरून त्या बायकांचा चेहरा काही जात नव्हता.
त्यांचा वागण्यातला भडकपणा, गिर्हाईकांशी लगट अन सगळ्यात महत्त्वाच म्हणजे त्यांच हसणं. वरवर कितीही बेफिकीर वाटत असल तरी त्या मागची व्यथा जाणवली
त्याच तिरिमिरीत ही कविता लिहिली गेली होती.
माझी ही कविता वाचुन तिला दाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपुर्वक आभार
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 06/01/2015 - 19:25
नवीन
तुम्ही दाखवलेली संवेदनशीलता समाजात झिरपावी अशी सदीच्छा व्यक्त करतो.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Tue, 06/02/2015 - 07:50
नवीन
Amen
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 06/02/2015 - 08:02
नवीन
:(
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/02/2015 - 08:09
नवीन
अप्रतीम !!!
आवडली !!
- Log in or register to post comments
च
चिगो
Tue, 06/02/2015 - 09:21
नवीन
कविता आणि त्यामागची भावना पोचली.. किंबहुना 'टोचली' म्हणणे बरोबर ठरेल..
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Tue, 06/02/2015 - 15:56
नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
- Log in or register to post comments