मिसिंग यु, सद्दाम !
इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!!
http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Beheading.jpg
यालाच तर राजकारण म्हणतात. नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. "वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा" अर्थात राजकारण हे वेश्येप्रमाणे अनेक रूपे बदलणारे असते.अगदी सहमत रे. नैतिक अनैतिकता हे फक्त शब्दभ्रमाचे प्रकार आहेत राजकारणामधे.नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे.अगदी-अगदी ! नैतिकता-अनैतिकता या कालसापेक्ष किंवा फारतर स्थितीसापेक्ष संकल्पना आहेत असे माझे मत आहे.नियम क्रमांक १ :
"या जगात हितसंबध हेच अग्रगण्य आणि अचल असतात, मित्र आणि शत्रू त्यावर अवलंबून बदलू शकतात."नियम क्रमांक २ :
"नियम क्रमांक १ समजू-उमजू न शकणारे एक तर नष्ट होतात किंवा त्या नियमांचे पालन करणार्यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गुलाम होतात."मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What are Chinese submarines doing in the Indian Ocean, far from China’s maritime backyard? :- Chellaney.net