मिसिंग यु, सद्दाम !
इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!!
http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Beheading.jpg
💬 प्रतिसाद
(189)
प
पुण्याचे वटवाघूळ
Tue, 06/02/2015 - 10:31
नवीन
माझा आक्षेप दुटप्पीपणावर आहे.एकीकडे अमेरिकेला नावे ठेवायची (शब्द कुठलेही असले तरी) आणि दुसरीकडे त्याच अमेरिकेत जायला धडपडायचे हा दुटप्पीपणा आहे. काही लोक म्हणतात की अमेरिकन लोक चांगले असतात पण अमेरिकन सरकार हरामखोर आहे.पण मग असे म्हणणारे भारतीय त्याच हरामखोर अमेरिकन सरकारच्या भारतातील दूतावासात जातात आणि त्याच हरामखोर सरकारकडून मिळालेला व्हिसा (एच-१) आपल्या सी.व्ही वर मोठ्या अभिमानाने मिरवतात.हल्ली अपॉइन्टमेन्ट सिस्टिममुळे रांगेत उभे राहावे लागत नाही.पण मी सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेत गेलो (सन १९९९) त्यावेळी रात्री ३ पासून कॉन्सुलेटपुढे रांगेत उभे राहणारे लोक होते. हा दुटप्पीपणा नाहीतर काय आहे? एकीकडे इराकमध्ये अमेरिकेने लोक मारले म्हणून मगरीचे अश्रू ढाळायचे आणि दुसरीकडे त्याच अमेरिकेत जाऊन प्रोजेक्ट करायचे, अमेरिकन इकॉनॉमीमध्ये आपल्या परिने खारीचा वाटा उचलायचा आणि त्याच अमेरिकन सरकारचे हात बळकट करायचे ते सगळे चालते अशांना.
शेवटी काय की तुम्ही त्या देशाचे नागरिक नसूनही तुम्हाला तिथे जायला मिळते, तिथल्या चांगल्या लाईफस्टाईलचा उपभोग घेता येतो आणि बक्कळ पैसे साठवता येतात या सगळ्यात अमेरिकन सरकारचा काहीच वाटा नाही? ठिक आहे तुम्ही तिथे जाता ते उपकार करायला नाही आणि तुम्ही जे काम करता त्याचा फायदा त्यांनाही होतो.पण त्यातून तुमचा फायदा काहीच होत नाही का? म्हणजे आपला फायदा होत असेल तिथे त्याच हरामखोर अमेरिकन सरकारपुढे रांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत.
समजा असे समजले की अमेरिकन सरकार सर्व व्हिसाच्या अर्जदारांनी सोशल मिडियावर कुठल्याही भाषेत काय लिहिले आहे हे तपासून मग व्हिसा देत असेल तर ही सगळी हरामखोर कंपनी कशी चिडीचूप होईल बघा. मग अमेरिका किती थोर याचे गोडवे गायलाही हे कमी करणार नाहीत.
शेवटी आपला स्वार्थ साध्य होत असेल की सगळे काही चालते.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Tue, 06/02/2015 - 10:54
नवीन
पण,
एच-१ म्हणजे हरामखोर-१ का?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Tue, 06/02/2015 - 11:17
नवीन
समजा असे समजले की अमेरिकन सरकार सर्व व्हिसाच्या अर्जदारांनी सोशल मिडियावर कुठल्याही भाषेत काय लिहिले आहे हे तपासून मग व्हिसा देत असेल तर ही सगळी हरामखोर कंपनी कशी चिडीचूप होईल बघा.
वटवाघूळ यांच्याशी दणकून सहमत
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/02/2015 - 11:53
नवीन
श्रीरंगरावांशी सहमत आहे. पाकिस्तान सरकार व आर्मी हरामखोर आहे म्हणजे एखादा सर्वसामान्य 'पाकडा' हरामखोर असेलच असे नाही.
अन राहता राहिला ढोंगीपणाचा मुद्दा, ढोंगी तर आपण आहोतच पण या केसमध्ये ते लागू होत नाही. पण काळापहाड साहेबांनी उपस्थित केलेले लॉजिकच अजून ताणल्यावर त्यातला फोलपणा दिसून येईल.
अमेरि़का हरामखोर आहे तर मग तिकडे ऑनसाईटची संधी मिळाल्यास कशाला जायचे?
जर तिकडे जाऊन त्यांचे पैसे पगाररूपाने आपल्या देशात आणता येत असतील तर का नाही जायचे? तेवढीच अद्दल घडणार नाही का हरामखोरांना? तेवढीच लूट अजून येईल आपल्या देशात, नै का? तस्मात सैद्धांतिकरीत्याही अमेरिकेला शिव्या घालणे आणि संधी मिळाल्यास तिकडे पळणे या भूमिकेत दुटप्पीपणा नाही. भले मग वापरलेले लॉजिक कितीही हास्यास्पद असो.
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Tue, 06/02/2015 - 12:24
नवीन
याला शुध्द मराठीत मल्लीनाथी म्हणतात. स्वतःची ऑनसाईट ऑपॉर्ट्यूनिटी असल्यास आपण स्वतःही ढोंगी दिसू नये म्हणून का खटाटोप हा?
लूट आणा हो पण मग ती लूट आणून दोन बी.एच.के चे फ्लॅट, फॅट बॅन्क बॅलन्स इत्यादीमध्ये भरणार असाल तर ती लूट स्वतःसाठी झाली हो. ती लूट दान थोडीच करणार आहात?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/02/2015 - 12:36
नवीन
काय पायजे ते समजा. मूळ आक्षेपच इतका हास्यास्पद आहे की त्याचे प्रत्युत्तरही असेच येणे क्रमप्राप्त आहे.
माझ्या रूपाने देशालाही थोडे का होईना पैसे मिळतातच. अन मीही देशाचाच एक भाग आहे.
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Tue, 06/02/2015 - 13:19
नवीन
पण तो पैसा हरामखोरांच्या देशात जाऊन आणि हरामखोरांची चाकरी करून मिळालेला असतो त्याचे काय?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/02/2015 - 13:29
नवीन
त्यात तर अजून आनंद आहे. हरामखोरांचा पैसा अतिशय अत्यल्प प्रमाणात का होईना आपण हडपू शकलो हे समाधान नाही काय? =))
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 06/02/2015 - 13:30
नवीन
हा स्वदेशासाठी केलेला त्याग असतो ;) :)
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/02/2015 - 12:38
नवीन
फ्लॅट घेतले की रियल इस्टेट सेक्टर ला बूस्ट मिळतो, सरकारला सर्व्हिस चार्जेस, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे मिळतात, एजंट लोकांना फ्लॅट भाड्याने देता येतो, भाड्याने घेणार्यांवर किराणा मालाची दुकानं चालतात, फ्लॅट मध्ये काम करणार्या लोकांना रोजगार उपलब्ध होतो, झाडूवाले, रद्दीवाले, चहा टपरीवाले, फूलवाले यांची दुकानं चालतात. म्हणजे एका फ्लॅट मुळे बर्याच प्रकारे इकॉनॉमीला चालना मिळते.
बँकेची लिक्विडिटी वाढते, बँक ते पैसे कर्ज देवू शकते, कर्ज घेणारा त्यातून उद्योग उभा करू शकतो, बँक कर्मचार्यांना काम मिळते, कर्जाच्या एजंट लोकांना काम मिळते. म्हणजे परत इकॉनॉमीला चालना मिळते.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 06/02/2015 - 13:09
नवीन
मी माझ्या मुनशीपालीटी,आमदार्,खासदार्,राज्यसरकार, आणि केंद्र सरकार यांना नेहमी चांगलेच म्हणायचे.
अगदी हबीब तन्वीर प्रहार मध्ये पोलिसांना म्हणतो "कोई प्रोब्लेम नही ". कुणीतरी लिंकाळे अड्कवा इथे.
चला मिपा सशक्त व्हावे म्हणूनही टिका-टिप्पणी करू नका (अन्यथा मिपावर येऊ नका)
घाबरट नाखु
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Tue, 06/02/2015 - 13:15
नवीन
देअर यू गो. मग त्याच न्यायाने भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या पैशानेही इकॉनॉमीला चालना मिळते. मग ते पण समर्थनीय व्हायला हवे. हरामखोरांची चाकरी करून मिळालेला पैसाही हरामच नाही का?
- Log in or register to post comments
व
वॉल्टर व्हाईट
Wed, 06/03/2015 - 00:07
नवीन
बरं बरं, राहिलं बुवा. आम्ही आहोत हरामखोर, बास ?
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 06/02/2015 - 13:18
नवीन
काळा पहाड , बॅटमॅन आणि श्रीरंग भाऊ
अमेरिकत जाऊन पैसा कमावणे (मग तो स्वत: साठी असो किंवा देशासाठी) ह्यात काहीही वावगं नाही. प्रत्येकाने भरपूर पैसा कमवावा आणि त्याला वाट्टेल तसा खर्च करावा. काहीही आक्षेप नाही
पण एक अवांतर प्रश्न :
अमेरिकत गेलेल्या काही (किंवा बहुतांश) भारतीयांना रुपयाची किम्मत घसरली की फार आनंद होतो आणि वाढली की दु:ख होतं. कारण रुपयाच्या चढ उतारावर त्यांची गंगाजळी अवलंबून असते. अश्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांना काहीही देणघेण नसते.हे वर्तन समर्थनीय आहे का ?
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Tue, 06/02/2015 - 13:21
नवीन
अहो त्याला आक्षेप कोणाचाच नाही हो. आक्षेप जिथे जाण्यासाठी जीव वरखाली होतो त्याच देशाला हरामखोर वगैरे म्हणण्यावर आहे. म्हणजे ज्या ताटात खायचे त्याच ताटात ह*यचे या प्रवृत्तीला.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/02/2015 - 13:29
नवीन
पण रुपयाची किंमत घसरली की वाईट हे कोण सांगितलं? रुपया स्ट्राँग म्हणजे इकॉनॉमी स्ट्राँग असं नस्तं कै. कित्येक वेळा तर रुपयाचं डिव्हॅल्यूएशन ही एक विचारपूर्वक केलेली स्टेप असते.
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 06/02/2015 - 13:40
नवीन
मी गृहीत धरतो की माझ्या प्रश्नाचा रोख तुम्हाला कळला आहे !
तरीसुद्धा तुमच्या मुद्द्याला प्रतिसाद देतोय..
मी रोज होणाऱ्या पाच -दहा पैशांच्या चढ उतरविषयी बोलत नाहीये . ६०-६२ रुपयांवरून USD ची किंमत जेंव्हा ६८ वर गेली होती तेंव्हा ती एक भारत सरकारची विचारपूर्वक स्टेप होती असे मला तरी वाटत नाही.
कृपया मुळ प्रश्नावर उत्तर द्यावे. माझा हेतू कोणावर टीका करण्याचा नसून ही मानसिकता समजून घेण्याचा आहे.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/02/2015 - 14:01
नवीन
अहो मी तुमच्या मूळ प्रश्नाचंच उत्तर देतोय.
तुम्ही म्हणालात,
रुपयाचं डिव्हॅल्यूएशन झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला धोका उत्पन्न झाला तरी अमेरिकेतल्या भारतीयांना त्यांच्या पैशाला जास्त किंमत येत असल्यामुळे आनंद होतो हा तुमचा मुद्दा आहे.
माझं म्हणणं असं आहे की रुपया घसरला की भारतीयांना आनंद होतो हे खरंच आहे. पण त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तुम्ही स्ट्राँग आणि वीक या शब्दांच्या ढोबळपणामुळे एका विशिष्ट प्रकारे गृहीत धरत आहात. डिव्हॅल्यूएशनमुळे इकॉनॉमी वर काय परिणाम होईल हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं आणि ती गोष्ट इतकी साधी नाही. त्यामुळे डिव्हॅल्यूएशन म्हणजे वाईट हे गृहीतकच चुकीचं आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 06/02/2015 - 14:08
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Tue, 06/02/2015 - 16:00
नवीन
+१
आणि इथे अनिवासी भारतीयच नव्हे तर भारतात राहूनच आयात्/निर्यात करणारेही त्यानुसार आनंदी/दु:खी होतील कारण इथे आनंदी होणारे फक्त ट्रेडर म्हणून आनंदी असतात आणि प्रत्यक्षात भारतीय अर्थव्यवस्थेस सक्रीय हातभार लावत असतात.
डिव्हॅल्यूएशनने आनंदी होणारे अनिवासी भारतीय तर रुपयांचा दर वाढलेला असताना परकीय चलन विकून (आणि रुपये विकत घेऊन) ही घसरण थांबवण्यात सक्रिय सहभाग घेतात असेही म्हणू शकता.
म्हणून दुसर्या बाजूने बोलायचे झाले तर जर तुम्ही असे मानत असाल की डिव्हॅल्यूएशनने (मग ते ५० पैसे असो की १० रुपये) रुपया कमजोर (आणि पर्यायाने अर्थव्यवस्था कमकुवत) होतोय तर तुम्ही अशी आशा करायला हवी की डिव्हॅल्यूएशनने आनंदी होणारे अनिवासी भारतीय अजून वाढायला हवेत. :)
- Log in or register to post comments
च
चिनार
Wed, 06/03/2015 - 06:01
नवीन
ओके !
या विषयावर ज्ञान नसल्यामुळे वरील प्रश्न विचारला होता.
विनिमय दर, कच्च्या तेलाचे भाव, सोने चांदीचा भाव आणि एखाद्या देशाची अर्थव्यवस्था याचा परस्परांशी काय संबंध आहे हे सांगू शकाल का ?
वेगळा धागा काढला तर उत्तम ..
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 06/03/2015 - 01:13
नवीन
डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव घसरल्यास मला आनंद होतो. निर्यात हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असल्याने अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण अशा वेळी तुलनेत कमी होतो. बाकी परदेशात राहणार्या भारतीयांपैकी एक असल्याने देशाची परकीय गंगाजळी थेट वाढवण्यास अमीबाएवढा का होईना आपला वाटा असतो याचेही समाधान असते.
कुठलाही सामान्य माणूस पहिले स्वतःचा फायदा तोटा बघणार. एखाद्याने २००६ मध्ये १० लक्ष रुपयांना घेतलेला फ्लॅट २०१४ मध्ये ४० लक्ष रुपयांना विकला गेल्यास आनंद मानणारा माणूस पाहायला मिळतो की त्याच वेळी घरांच्या किमती अवाजवी वाढल्याने सर्वसामान्यांचे जिणे अवघड होताना पाहून मनापासून दु:खी कष्टी झालेला पाहायला मिळतो?
इथे आम्हाला जेव्हाही भारतात बनलेल्या वस्तु जसे कपडे वगैरे दुकानात दिसतात तेव्हा खरेदी करायच्या वेळी आवर्जुन त्यांना प्राधान्य देतो.
अवांतर - गेली अनेक वर्षे डॉलर रुपया विनिमय दर बर्यापैकी स्थिर आहे. जुलै २०१३ मध्ये काही दिवसांसाठीच हा भाव ₹६८ प्रति डॉलर वर गेला होता.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 06/01/2015 - 16:08
नवीन
अरेवा. अजब तर्कट लावून भारतीय ढोंगीपणाचे सरकटीकरण केल्याबद्दल अभिनंदन.
इथे अमेरिकेतच काय गल्फ आणि इतर मुस्लिम देशांमधे नोकरीस असणारेही लोक आहेत. मुस्लिमांचा प्रचंड राग करणारे विप्रोमधे हिरिरिने काम करायला जातात.
एखाद्या देशाची परराष्ट्र धोरणं आणि एखाद्या कामकरी माणसाचं पोटपाणी याचा तुम्ही जबरदस्त संबंध लावलाय. वा, मजा आली.
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Mon, 06/01/2015 - 17:53
नवीन
हे वाचून मात्र मस्त मनोरंजन झाले बघा. आमचे कामकरी हिंजवडीला २ बी.एच.के घेतात. आपला दोन बी.एच.के कलिगच्या २ बी.एच.के पेक्षा ५० स्क्वेअर फूट कमी असेल तरी ते त्यांना कमीपणाचे वाटते. म्हणून कुठेतरी रो-हाऊस घेतात नाहीतर सेकंड होम म्हणून दुसरा फ्लॅट घेतात. असे हे कामकरी लोक :)
अमेरिकेविषयी इतका राग असेल तर कोणी जायला सांगितले आहे तिथे? कोणाचाही आग्रह नाही.
रच्याकाने का हो मिसळपावचा सदस्य नसलेले लोक सदस्य व्हायला धडपडत असतील आणि त्याचवेळी मिसळपावला 'हरामखोर' संकेतस्थळ म्हणत असतील तर त्यात तुम्हाला काहीच ढोंगीपणा वाटणार नाही का हो?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 06/02/2015 - 10:45
नवीन
कामकरी हा शब्द वर्किंग प्रोफेशनल या अर्थाने घेतलाय साहेब. गरिब, हातावर पोट असणार्या मजूराचा अर्थ तुम्ही काढताय.
तसेही भारत सरकार विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करत होते म्हणून बरेच लोक ठो-ठो करायचे. त्यांनाही देश सोडून जायला सांगायला पाहिजे, नाही?
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Tue, 06/02/2015 - 10:59
नवीन
असेच लोक सौदी अरेबियात गेले तर त्यांना हाकलायचा सौदी सरकारला नक्कीच हक्क आहे आणि तसे त्यांनी केले तरी त्यात काहीच चुकीचे नाही. एकीकडे एका विशिष्ट धर्माचे नावही सहन होणार नाही आणि दुसरीकडे त्याच विशिष्ट धर्माच्या सर्वात महत्वाच्या दोन प्रार्थनास्थळांचा प्रतिपालक असे बिरूद मिरविणार्या राजाच्या सरकारने दिलेल्या व्हिसासाठी खटपट करणे हा पण तसाच दुटप्पीपणा झाला.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 06/02/2015 - 11:36
नवीन
रावसाहेब. ते व्हिसा व्हिसा सोडून द्या. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल काय? भारत सरकारची धोरणं पटत नाहीत तरी भारतात राहणार्यांना तुम्ही ढोंगी म्हणाल काय?
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Tue, 06/02/2015 - 11:43
नवीन
का बरं? नाही सोडणार व्हिसा व्हिसा. कारण माझा मुद्दा अमेरिकेचा व्हिसा मिळावा म्हणून जीव वरखाली होत असलेल्यांविषयी आहे.
माझा मुद्दा अमेरिकेचे नागरिक नसलेल्या पण अमेरिकेत जाण्यासाठी आसुसलेल्या आणि त्याच वेळी अमेरिकेला हरामखोर म्हणणार्या लोकांविषयी आहे.अमेरिकन नागरिकही अमेरिकन सरकारवर टिका करतच असतात आणि तो त्यांना त्या देशाच्या नागरिकत्वाबरोबर मिळालेला अधिकार आहे. माझा मुद्दा त्यांच्याविषयी नाहीच. माझा मुद्दा इथल्या हरामखोर कंपनीविषयी आहे. इतकी अमेरिका आवडत नसेल तर कशाला जाता तिथे?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/02/2015 - 11:48
नवीन
बरं नका सोडू पण शांत व्हा. उगीच रक्तदाब वाढेल तर काय घ्या?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 06/02/2015 - 12:01
नवीन
बरं बरं. पण कुणी अमेरिकेविरुद्ध बोलतंय तर तुमचा का जीव वरखाली होतोय? जगात शांतता राहावी म्हणून जगाचा नागरिक म्हणूनही कोणत्याही देशाच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. फसलेल्या अमेरिकन धोरणांमुळे भारताला झळ पोचत असेल तर अमेरिकेवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. अशा भारतीयाला कामानिमित्त अमेरिकेत जावे लागत असेल तर त्यात काय ढोंगीपणा आहे? कित्येक अमेरिकन मुस्लिम देशांना शिव्या घालत असतील पण त्यांनी मुस्लिम देशात जाणे सोडले काय?
तुमचं अमेरिकाप्रेम इतकं उफाळून आलंय की त्या नादात इथल्या सदस्यांना तुम्ही चक्क हरामखोर म्हणत आहात? की काही वैयक्तिक स्कोर सेट्लिंगचा मामला आहे?
बायदवे, तुम्ही हरामखोर हा शब्द वापरून ही चर्चा कुठल्या कुठे नेऊन ठेवली आहे. आशा आहे तुम्हाला या शब्दाचा योग्य अर्थ माहित असेल.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/02/2015 - 12:09
नवीन
जर अमेरिकेचा ढोंगीपणा चालतो तर भारतीयांनीच काय घोडं मारलंय? आमचाही सो कॉल्ड ढोंगीपणा चाललाच पाहिजे, नै का?
(मुळात आहे ती भूमिका ढोंगी म्हणावी का इथून सुरुवात आहे. समजा ती भूमिका ढोंगी आहे असे सिद्ध झाले तरी मग एकतर कुणाचाच ढोंगीपणा सहन करायला नको किंवा सगळ्यांचा करा. असं एकाला एक न्याय अन दुसर्याला दुसरा असला प्रकार नको.)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 06/02/2015 - 12:18
नवीन
मक्काय्तर...
जिथं रुपये-डॉलर-पाउंड्स-युरो-दिनार-रुबल्स चा प्रश्न येतो तिथं माणसानं खमक्या क्यापीटालिस्ट व्हावं. तेवढं सोडलं तर बाकी जगात ढोंगीपणाशिवाय काय नाय असं आमच्या बाचं ठाम मत हाय.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/02/2015 - 12:29
नवीन
पण मला तर ते म्हंतात ते बरोबर दिस्तंय. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरणार्यांनी चीन वर टीका करू ने. हॉलिवूड मूव्हीज बघणार्यांनी अमेरिकेवर, जपानी कार/कॅमेरा वापरणार्यांनी जपानवर, वाईन पिणार्यांनी शरद पवारांच्यावर, आधार कार्ड असणार्यांनी युपीए वर आणि बुलेट ट्रेन मधे बसणार्यांनी (जेव्हा होईल तेव्हा) मोदींवर टीका करू ने.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 06/02/2015 - 12:30
नवीन
_/\_ _/\_ _/\_
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/02/2015 - 12:40
नवीन
टीका करण्यात नक्की प्रॉब्लेम काय आहे? वरील एंटिटीज़ काही घटकांचा पुरवठा करतात म्हणजे कै उपकार करत नाहीत. आज शरद पवार आहेत, उद्या दुसरा कुणीतरी येईल. टीका केली तर जणू त्या घटकांचा पुरवठा बंद होईल अशी भीती आहे की काय तुम्हांला? =))
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/02/2015 - 12:43
नवीन
मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/02/2015 - 12:46
नवीन
चालुद्यात निरर्थक अत्मरंजन. =))
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/02/2015 - 12:47
नवीन
एकूणच काही जणांच्या धोतराच्या सोग्याला हात घातला आहे मी असे दिसते :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/02/2015 - 12:50
नवीन
तो तुमचा समज आहे.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/02/2015 - 12:52
नवीन
एकूणच आपण तर बुवा या दोन वाक्यांवर बेहद्द खूष आहे. एकूणच कुठेही वापरता येतातः
१. एकूणच मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.
२. एकूणच काही जणांच्या धोतराच्या सोग्याला हात घातला आहे मी असे दिसते :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/02/2015 - 12:57
नवीन
अगदी अगदी.
अशा वनलायनर्सचा एक शेप्रेट धागा पायजे. तूर्त वनलायनर असे:
१. तो तुमचा समज आहे.
२. आपणास मुद्दा कळालेला नाही.
३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात.
४. चालुद्यात निरर्थक अत्मरंजन! ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
५. एकूणच मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.
६. एकूणच काही जणांच्या धोतराच्या सोग्याला हात घातला आहे मी असे दिसते :)
तरी तबियतदार मिपाकरांनी या लिष्टीत यथाशक्ती यथामती भर टाकून सहकार्य करावे ही विनंती!!!! ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊ
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Tue, 06/02/2015 - 13:59
नवीन
७. बाकी तुमचं चालु दया. :)
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Tue, 06/02/2015 - 12:39
नवीन
एकूणच मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/02/2015 - 12:42
नवीन
कसली मिरची आणि कसले झोंबणे? मनोरंजन केल्याबद्दल खरे तर तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Tue, 06/02/2015 - 12:38
नवीन
करा की टिका.
अमेरिकेत जावे लागत असेल? असो अमेरिकेत जायला लोक तरसत असतात नुसते. आणि परत दुसर्या तोंडाने अमेरिकेला हरामखोर म्हणतच असतात.हा दुटप्पीपणा आहे एवढेच.
हरामखोर हा शब्द या चर्चेत नक्की कुणी आणि कुणाला सगळ्यात पहिल्यांदा वापरला आहे हे वाचा. या शब्दाचा वापर मी इतरांसाठी करत आहे हा जावईशोध लावल्याबद्दल तुम्हाला नोबेल पारितोषिकच द्यायला हवे.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/02/2015 - 12:40
नवीन
बापरे, पैसा तैं वर डायरेक्ट टीका..
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 06/02/2015 - 12:44
नवीन
हे तुमचेच वाक्य आहे. हे नक्की कुणासाठी आहे?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/02/2015 - 12:46
नवीन
एकूणच मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 06/02/2015 - 12:48
नवीन
काय सारखं मिरची-मिरची करताय ओ मिरचीसेठ?
(सरफरोश प्रेमी) बॅटमॅन.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 06/02/2015 - 15:30
नवीन
अशानेच मिरच्या महाग होतात हे मी आपल्या निदर्शनास आणून देत आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »