एक थरारक प्रवास "किल्ले रांगणा" चा
ओळख किल्ल्याची
स्वराज्याच्या गडकोठाची सफर करण्याची मला खूप आवड आहे.. त्यात छ. शिवाजी राजांचा भक्त असल्याकारणाने त्यांचा इतिहास जवळून पाहण्याचा मोह तर खूपच. मला गडांना भेट द्यायला जास्त वेळ भेटत नाही. तरीही मी वेळ काडून गड किल्ल्यांना भेट देतो. आज पहायची इच्छा झाली तो इतिहासाचा साक्षीदार रांगणा किल्ला या किल्ल्याला पसिद्धगड असेही म्हणतात. समुद्र सपाटीपासून सुमारे ७७० मीटर उंचीवर असणारा हा किल्ला. शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) ने इसवी सन ११८७ च्या आसपास बांधला. बहामणी राजा महमद गवाण याने इसवी सन १४७० मध्ये जिंकला. १८५७ पर्यंत आदिलशहाच्या ताब्यात तर, १६५९ ला शिवाजी महाराजांनी विजापुरांकडून जिंकून घेतला, आणि १६६६ ला या गडाला पुन्हा विजापुरकरांनी ताबा मिळवला, ५ सप्टेंबर १६६६ मध्ये पुन्हा शिवाजी महाराजांनी जिंकला १६७०-७१ मध्ये शिवाजी महाराजांनी या गडाची डागडूगी केली. या डागडूगीसाठी ६००० होन खर्च केल्याची इतिहासात नोंद आहे…सकाळी सकाळीच किल्ल्याच्या दिशेने
अतिशय खडतर प्रवास.
एक भुयारी मार्ग
मारुतीराया
गणेश मंदिर
गणेशाची मूर्ती
जंगली जांभूळ, पेरूची झाडे, औदुंबर अशा जंगली फळांचा आस्वाद घ्यायला मिळाला.
पाषाणी दीपमाळ
रांगणा देवी (रंगाणाई)
बाजूलाच जवळ जवळ २०० ते ३०० मीटर उंचीची खोल दरी आणि तरीही तलाव तुडुंब भरलेला.
ही खोल दरी म्हणजे सह्याद्रीच वैभव, कुणा परक्याची, गनिमाची हिम्मत होणार नाही. यातून वाट काढायची.
जय शिवराय लेखक- गणेश पावले
किल्ले रांगणा वरील केमेराबद्ध केलेले काही क्षण..
आपला गणेश पावले ९६१९९४३६३७
💬 प्रतिसाद
(8)
प
प्रसाद गोडबोले
Fri, 05/29/2015 - 10:57
नवीन
मस्तच !!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 05/29/2015 - 11:27
नवीन
सुरेखच ! उन्हाचा सीझन उगीच निवडलात. हाल झाले असणार. फोटोतून अंदाज येतोय. असो.
ही शोकांतिका जवळपास सगळ्याच किल्लयांची आहे. काही मोजके वगळता.
असं म्हटलं की दुर्गवीर सारख्या संस्थांचं कौतुक करावं तितकं कमी वाटतं.
- Log in or register to post comments
G
ganeshpavale
Fri, 05/29/2015 - 11:49
नवीन
दुर्गवीर…. म्हणजे किल्ल्यांचे बुरुजच ते कितीही काळ उन्हात तळपू शकतात…
अजित दा… नितीनराव पाटोळे, संतोषदा हसुरकर… हि नावे हे गडकोट टिकवून ठेवतील.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 05/29/2015 - 11:54
नवीन
एक नंबर बोललात....
प्रचंड अभिमान वाटतो. नुसताच अभिमान नाही हातभाराची इच्छाही आहे. बघू कधी जमेल.
- Log in or register to post comments
G
ganeshpavale
Fri, 05/29/2015 - 12:20
नवीन
मी वेळ मिळाला कि जातोच
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 05/29/2015 - 12:25
नवीन
मस्तच.
रांगण्यासारखा आडरानातला किल्ला पाहायला मिळणे भाग्याचंच.
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Fri, 05/29/2015 - 15:38
नवीन
खरा रांगणा कोकणातून चढायचा. फक्त जेव्हा केव्हा जाल तेव्हा खालून वाटाड्या मात्र घेण्यास विसरु नका.......मी दोन तीन वेळा केला आहे......भयंकर छान.... एकदा जाऊन बघा...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 05/29/2015 - 15:51
नवीन
छान सफर.
रांगणा किल्ला संभाजीकाळात आणि नंतर तसा बर्यापैकी अॅक्टिव्ह होता. संताजी-धनाजी यांच्या स्वार्यांदरम्यान याचे नाव सापडते.
पंधराएक वर्षांमागे रांगण्यावर नाही, पण जवळच्या भुदरगड किल्ल्यावर गेलो होतो ते आठवलं. त्याचंही तसंच आहे- प्रचंड मोठं पठार. अन एक मोठ्ठं तळं आहे, पण खोली मात्र खूपच कमी.
- Log in or register to post comments