Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेपाक्षी - एक अदभुत स्थापत्य

प
पॉइंट ब्लँक
Sat, 05/30/2015 - 12:14
💬 32
सुचना : धाग्यात फोटो खुप जास्त आहेत, पूर्ण उघडण्यास वेळ लागू शकतो भारतातील सर्वात मोठा नंदी, लटकणारा खांब, मुरल पेंटिंग आणि सुंदर शिल्पकाम इतक्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी पाहायची संधि मिळते लेपाक्षीला. लेपाक्षी हे आंध्रातील अनंतपूर जिल्ह्यातील एक गाव. बेंगलोरपासून जवळपास १५० किमी अंतरावर. ह्या गावात विजयनगर काळातील विरभद्राचे मंदिर आहे. लेपाक्षीचे पौराणिक महत्व असे सांगितले जाते की, रावण ज्यावेळी सीतेचे हरन करून नेत होता तेंव्हा जटायूने त्याच्याशी युद्ध केले. रावणाने जटायुचे दोन्ही पंख कापून टाकले आणि जटायु जमिनीवर कोसळला. आणि ती जागा लेपाक्षी. पुढे राम सितेच्या शोधात इथे आले आणि त्यांना जखमी अवस्थेतील जटायुने सर्व व्रुतांत सांगितला. रामाच्या आशीर्वादाने त्याला इथे मुक्ती मिळाली. सती आणि महादेवाचा विवाह इथेच झाला. आणि अगत्स्या मुनींनी इथे वीरभद्राची स्थापना केली. मंदिराचा इतिहास. विरुपन्ना आणि विरान्ना नायक हे दोघे भाऊ विजय नगर साम्राज्याचे खजिनदार होते. त्यांनी विरभद्र स्वामींची मूर्ती सापडल्यावर त्यांनी मंदिराचे निर्माण करायचे ठरवले. आणि त्यासाठी राज्याचा खजिना राजाची परवानगी ने घेता वापरला. मंदिराचे बांधकाम अर्ध्याहून अधिक पूर्ण झाल्यावर राजाला ही बातमी समजली. चिडलेल्या राजाने विरुपन्नाचे डोळे फोडण्याची सजा सुनावाली. विरुपन्नला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्याने स्वत:च चाकून आपले डोळे काढले. मंदिराचा निर्माण अर्ध्यावरच थांबला. मंदिराचे तीन मुख्य भाग आहेत. गर्भगृह, नाट्य मंडप आणि कल्याणमंडप. कल्याणमंडपाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. मंदिर एका उंच चबुर्‍यावर बांधले आहे. DSC_0378 थोड्या पायर्‍या चढून वर गेल्यावर मंदिराचे प्रवेशद्वार दिसते DSC_0387 आत गेल्यावर मुख्य मंदिर building प्रवेशद्वारावरील अप्सरांचे फोटो. DSC_2131 entrance DSC_2209 प्रवेशद्वारातून आतील नजारा DSC_2138 नाट्यमंडप DSC_2144 नाट्यमंडपातील सर्व खांबांवर विविध मूर्त्या कोरल्या आहेत. आणि इथच दडलं आहे एक आश्चर्य. हँगिंग पिलर अर्थात छतातून लटकनार एक खांब. त्याचा थोडासा इतिहास पाहूया. ह्या मंदिराचे रचनाकार होते विश्वकर्मा ब्राह्मण. विजयनगर साम्राज्यातील बर्याच मंदिरांचा निर्माण विश्वकर्मा ब्राह्मण करत. ह्या मंदिरात प्रत्येक खांबावर विविध मूर्त्या कोरल्यामुळे निर्माण मंदिराचा समतोल बिघड्ला. तो पूर्ववत करण्यासाठी हा खांब छतामधून लटकवण्यात आला. हा खांब पूर्वी सरळ होता. इंग्रजांच्या काळात कुण्या एका इंजिनियर अधिकार्याने मंदिरा भेट दिली, हा लटकता खांब काय त्याला पटेना. त्याने अव़जड यंत्रे वापरून खांब हलवण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर मंदिरातील इतर खांब हलू लागले. काहि तिरपे झाले तर काही जागच्या जागी फिरले. खालच्या फोटोतील हाच तो मधला खांब. आजही कापड किंवा कागद खांबाखालून आरपार नेता येते. DSC_0897 मंदिरच्या बाजूला असणारा अर्धवट राहिला कल्याण मंडप. इथे शिव-सतीच्या विवाह सोहळा उभारण्यात येणार होता. ruins मंदिराच्या मागे एक भव्य नाग आणि शिवलिंग आहे. हे कामगारांनी त्यांच्या फावल्या वेळेत बनवले होते. DSC_2321 आणि मंदिराबाहेर असलेला प्रचंड मोठ नंदि. Nandi आता मंदिरातील इतर फोटो पुन्हा एकदा नागलिंगेश्वर Nagalingeshwar मंदिराचे भव्य पटांगण lepakshi4 अर्धवट बांधकाम lepakshi2 मंदिराचा कळस lepakshi1 कार्तिकेय kartikeya मंडपातील खांबावर कोरलेले देव gods लक्ष्मीची मूर्ती godess लक्ष्मीचा क्लोज अप godess2 नागलिंगेश्वराच्या मागे असलेला मोठा गणपती ganesh मंदिराचा आवार DSC_2365 अर्धवट मंडप DSC_2345 DSC_2341 DSC_2337 DSC_2296 DSC_2284 DSC_2247 DSC_2236 DSC_2230 आता मंदिराच्या आतील फोटो DSC_2228 DSC_2224 नर्तिका DSC_2195 तीन पायांचा भृंगी. हा देवांचा नृत्य शिक्षक. DSC_2172 किती मस्त पोझ आहे पाहा DSC_2170 बाजूने फोटो DSC_2152 महादेव भिक्षुकाच्या वेषात. DSC_2164 चंद्रदेव DSC_2158 सती महादेवाला भिक्षा देताना DSC_2148 मंदिराच्या आवाराचे फोटो DSC_2127 DSC_2126 DSC_2120 DSC_2110 DSC_2107 DSC_2100 DSC_0655 मंदिराच्या छतावरील रंगकाम DSC_0736 DSC_0735 DSC_0734 DSC_0733 DSC_0732 DSC_0731 DSC_0728 DSC_0727 DSC_0725 DSC_0724 DSC_0723 DSC_0722 DSC_0721 DSC_0720 DSC_0719 DSC_0718 DSC_0717 DSC_0716 DSC_0715 DSC_0713 DSC_0711 DSC_0710 DSC_0707 DSC_0706 लेपाक्षी फारच छोटं गाव आहे. जेवणाची फारशी सोय इथं नाही. बेंगलोर हैद्रबाद हायवेवर जेवण करणे जास्त सोईस्कर राहील.

प्रतिक्रिया द्या
9465 वाचन

💬 प्रतिसाद (32)
स
सस्नेह Sat, 05/30/2015 - 12:29 नवीन
अतिभव्य आणि अतिसुंदर ! पूर्वजांच्या कलादृष्टीला आणि कसबाला सलाम . आणि इथे हे नयनरम्य शिल्प दाखवल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 06/01/2015 - 12:31 नवीन
मेजवानी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ज
ज्योत्स्ना Sat, 05/30/2015 - 13:08 नवीन
हे ठिकाण माहितच नव्हते.खूप सुंदर ठिकाण आणि खूप सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 05/30/2015 - 13:30 नवीन
मस्तच ! "साले आम्हीच कपाळ करंटे नविन निर्माण करणे दूर आहे तेच विद्रूप करण्यात आणि हेळसांड करण्यात धन्यता मानत आलो आहे." लेण्याद्रीला भिंतीवर अनामिक प्रेम्-वीर खुणा वाचलेला प्रत्यक्षदर्शी नाखु
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 06/01/2015 - 06:20 नवीन
सुदैवाने दक्षिणेत हे खुळ फारसं पोचलेलं नाही. काय आनंद मिळतो लोकांना असं करून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
स्पंदना Sat, 05/30/2015 - 13:34 नवीन
किती सुंदर मुर्त्या आहेत? अन त्या दिडशहाण्या इंग्रजाचा फार राग आलाय. वर्षानुवर्षे उभे राहीलेले हे मंदिर जणु त्याच्या शहाणपणाशिवाय पूर्णत्वाला जाणारच नव्हतं.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 06/01/2015 - 06:22 नवीन
एकदा सत्ता हातून गेलीकी, असा अपमान सहन करावा लागतं. मुघल, पोर्तुगिज आणि ईंग्रज ह्यांनी सर्वांनी नासधुस केली आहे आपल्या देशात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/30/2015 - 13:37 नवीन
फोटो सुंदर आलेत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 05/30/2015 - 13:39 नवीन
नंदी आणि नागोबा ए वन!
  • Log in or register to post comments
म
मितान Sat, 05/30/2015 - 15:05 नवीन
आहाहा !!! सुंदर !!!!
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 05/30/2015 - 15:48 नवीन
अप्रतिम हा एकच शब्द सुचतोय !!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 05/30/2015 - 15:58 नवीन
अप्रतिम!!!आणि धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 05/30/2015 - 16:45 नवीन
सुंदरच आहे मंदिर. टिपिकल विजयनगर शैली. प्रवेशद्वारावरील मूर्ती अप्सरा नसून गंगा आहे. ती मकरारूढ असून डोक्यावर जलकुंभ धारण केलेला आहे. भित्तीचित्रांवरील ब्रह्मा, विष्णू, महेश, तुंबरु आदी सहजच ओळखू येत आहेत. ह्याशिवाय विजयनगराच्या सम्राटांचे राजचिन्ह वराह असल्याने ते बर्‍याच ठिकाणी रंगवलेले दिसतेय. एव्हढेच नव्हे तर एका चित्रात वराह मुसलमानांवर चक्क हल्ला करण्याच्या पावित्र्यात दिसत आहे.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 06/01/2015 - 06:23 नवीन
प्रवेशद्वारावरील मूर्ती अप्सरा नसून गंगा आहे. ती मकरारूढ असून डोक्यावर जलकुंभ धारण केलेला आहे.
दुरुस्तीबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कपिलमुनी Sat, 05/30/2015 - 17:00 नवीन
सुंदर फोटो. बाकी धागा २ भागात विभागून टाकला असता तर उत्तम झाले असते
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 06/01/2015 - 06:24 नवीन
बरोबर आहे तुमचं. पुढल्या वेळेस काळजी घेइन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मुक्त विहारि Sat, 05/30/2015 - 17:00 नवीन
वाखूसा....
  • Log in or register to post comments
ज
जुइ Sat, 05/30/2015 - 18:57 नवीन
भव्य मूर्ती आणि मंदिराच्या आतले फोटो खूप चांगले आले आहेत. माझ्या मते लेखनात पूर्णविराम व 'आणि' यांच्या जागा चुकल्या आहेत.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 06/01/2015 - 06:25 नवीन
नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/30/2015 - 21:15 नवीन
फारच सुंदर आहे हे मंदीर. भरपूर फोटोंमुळे त्याचे मस्त दर्शन झाले. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 05/31/2015 - 07:35 नवीन
पाच सात फोटो इथे देऊन बाकीचे कलादालनात दिले तर धागा लवकर उतरेल.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 05/31/2015 - 09:20 नवीन
हे ठिकाण माझ्या हित यादीत आहे .आपले फ़ोटो मस्त.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/02/2015 - 11:12 नवीन
आमच्या डोंबोलीचे पण नांव असू द्या. (आपला मेहुणा) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
पाटील हो Mon, 06/01/2015 - 07:05 नवीन
भन्नाट
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/01/2015 - 07:20 नवीन
अप्रतिम ....
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Mon, 06/01/2015 - 12:39 नवीन
फारच सुरेख.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 06/01/2015 - 15:57 नवीन
रंगवलेली चित्रं आवडली.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 06/01/2015 - 17:51 नवीन
अप्रतिम आहे, चित्रे फार आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 06/01/2015 - 18:13 नवीन
खरच अद्भुत आहे हे मंदिर. तुम्हीहि छान वर्णन केले आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 06/01/2015 - 22:26 नवीन
अप्रतीम. नागलिंगेश्वर आणि हँगिंग पिलरचे फोटो पाहिले होते अगोदर, पण बाकी पहिल्यांदाच पाहतो आहे. शिवाञ म्यूरल्स शिल्लक आहेत हे अतिशयच भारी. बहुत धन्यवाद पॉइंट ब्लँक साहेब, लय आवडले फटू.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 06/02/2015 - 00:31 नवीन
इतके सुंदर फोटो, माहिती आणि वर्णन पुरवल्याबद्दल खूप खूप आभार. तुमच्या सोबत लेपाक्षीला फिरुनच आलो असे वाटायला लागले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 06/02/2015 - 13:01 नवीन
अप्रतिम आहेत फोटो!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा