काही दिवसांपूर्वी एका जुन्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. गप्पा चालल्या होत्या. तिच्या जॉब बद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, 'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर ट्रेडिंग करते घरी बसुन. मागे मी 'रिच डॅड पुअर डॅड' वाचलं आणि माझे डोळे खाड्कन उघडले!'
हा 'डोळे उघडणे' हा मोठा विलक्षण आणि दुर्मिळ प्रकार आहे! ज्याचे डोळे उघडतात त्याचे आयुष्य पार बदलून जाऊ शकते. बदल कसा आणि किती होणार ते डोळे कोणत्या बाबतीत आणि किती उघडले यावर अवलंबून असते. माझ्या या मैत्रिणीचे डोळे पैशाच्या बाबतीत उघडले आणि तिच्या करिअर मध्ये थोडा बदल झाला. पण काही लोकांचे डोळे असे उघडतात कि त्यांचे आयुष्य तर पार बदलून जातेच पण इतर लोकांवर, समाजावर, जगावरही त्याच्या परिणाम होतो. उदा. वाल्याचे डोळे उघडले आणि त्याचा वाल्मिकी झाला! न्यूटन चे डोळे उघडले आणि जगात काय काय बदल झाले! बुद्धाचे डोळे उघडले आणि बौद्ध धर्म अस्तित्वात आला!
कुणाचे डोळे पैशाच्या बाबतीत उघडतात, कुणाचे प्रेमाच्या, कुणाचे प्रकृतीच्या, कुणाचे अध्यात्माच्या, कुणाचे आणखी कशाच्या…
पण कुणाचे डोळे कधी, का आणि कशाबाबतीत उघडतील हे मात्र कुणीही सांगू शकणार नाही. ईट इज अ ग्रेट मिस्टरी! आणि एकदा डोळे उघडले कि मगच कळतं कि अरे! आत्तापर्यंत डोळे बंदच होते कि! :)
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मिपाकरांचे डोळे कधी उघडतील
+११११११११११११
खरंय..
लेखनविषय: मुक्तक हे फार आवडले
काका ,..
'मुक्तक' बरोबर आहे कि नाही?
डोळे बंद असेल तर सुंदर आणि
डोळे उघडणे गरजेचे.
कशाला ओ!
'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर
हाहा
असंच कै नै.
+१
माझा रोख हा साधारणत:
सहमत.
सहमत.
पुस्तकाचा दोष नाय. वाचनारा
डोळे उघडलेच पाहिजेत.
:D
:-) दंबुक न वापरता बार काढलात
शेर !
'पथिक'? प्रेरणा वाले का?
आभार!
दिवसाढवळ्या
नैना ठगलेंगे