सत्यनारायण..

नमस्कार मंडळी,
येत्या रविवारी इथे .. माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायचा मानस आहे. कोणाकडे त्या पूजेची मराठीतून एम पी ३ आहे का? किंवा कोणत्या साईटवर ऑडीओ पूजा मिळू शकेल .. हे सांगेल का कोणी?
आपल्याकडे असल्यास मला कळवा. मी माझा गुगल पत्ता व्य. नि. मधून कळवेन.

धन्यवाद.

- प्राजु

माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायचा मानस आहे. कोणाकडे त्या पूजेची मराठीतून एम पी ३ आहे का? किंवा कोणत्या साईटवर ऑडीओ पूजा मिळू शकेल .. हे सांगेल का कोणी?

पूजा सांगायला मी येऊ का? दोन बियर सुटतील इतकी दक्षिणा घेईन! :)

तात्याभट.


पूजा सांगायला मी येऊ का? दोन बियर सुटतील इतकी दक्षिणा घेईन


आम्ही सव्वा बाटलीत भविष्य सांगायचो. ( पाव बाटली साठी आख्खी एक बाटली लागायचीच ना . अशी वायली कशी करता येनार?)पन नंतर बुर्जीपाव मोफत पाहिजे अशी अट होती. तसे आम्ही अल्पसंतुष्टीच.
प्रकाश घाटपांडे

प्राजुताई,

काही जण पूजा सांगण्याच्या बहाण्याने फक्त `तीर्था'ची अपेक्षा करतायंत. प्रसादाची नाही. असो.

तुम्हाला एखाद्या सत्शील, सदाचारी ब्राह्मणाला जेवायला घालायचंय का? जरूर कळवा. दक्षिणा म्हणून फक्त पुणे-अमेरिका (न्यू जर्सी का काय ते अमेरिकेतच आहे ना? आमचे भूगोलाचे वांधे आहेत!) यायचा - जायचा खर्च दिलात, म्हणजे झालं!

आपल्या कडे न.पा. च्या निवडनुकीत उमेद्वार सत्यणारायन करीतात... अन मग त्या-त्या वेळी महाग असलेल्या वस्तू (जसे कधी कांदे-बटाटे) भेट म्हणून देतात.

येथे सध्या निवडणुकांचा हंगाम आहेच... सत्यनारायण करून तिर्थ प्रसादा ऐवजी (वा सोबत) गॅसोलीन वाटलेत तर!! ... थांबा आत्ता ही कल्पना ओबामा अन मॅकेन च्या चंबूत कळवतो.

आपला,
(प्रसादभक्षक) भास्कर
आम्ही येथे वसतो.