सापुतारा (गुजरात मधील थंड हवेचे ठिकाण) आणि प्रवासातला अनुभव
रोजच्या दगदगीतुन एखादा long weekend आला की छान वाटतं. काहीजण ती सुट्टी घरी घालवतात तर आमच्यासाराखे काहीजण तीन दिवसात कुठे दौरा करता येईल याचा विचार करायला लागतात. असाच एक वीकेंडला धरून सोमवार १३ एप्रिलला ऑफिस मध्यला एकाच लग्न होतं. ते ही नाशिकमधे. सुजय, सुरेश, मोहित, धुम्रवर्ण आणि मी लग्नाला जायचा प्लान नक्की केला. आता सोमवारच्या लग्नाला लागुन आलेल्या वीकेंडला करायचं काय? जो तो आपल्या डोक्यातुन वेगवेगळे प्लान सुचवु लागला. शेवटी सर्वानुमते "सापुतारा..!" गुजरात मधलं एक थंड हवेच्या ठिकाण. तिकडे जायचे पक्कं झालं.
तसं हिल स्टेशनला जाण्यात आमच्यासाठी काही नवीन नव्हतं. पण गुजरात मधल्या टूरिस्ट पॉइंटला जाण्याबाबत आम्ही जरा जास्तच उत्साही होतो. कदाचित टीव्ही वरल्या "Gujarat Tourism" च्या जाहिरातीचा परिणाम असेल. अमिताभच्या रुबाबदार आवाजाने आणि पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींच्या आत्मविश्वासाने आम्हाला जरा जास्तच भुरळ घातली होती.
शुक्रवारी रात्री पुण्यातुन आम्ही नाशिकला प्रस्थान केले आणि आमच्या सापुतारा कम लग्न अशा प्रवासाला सुरुवात झाली. पहाटे ५ ला नाशिकला पोहोचल्यावर आम्ही सापुताऱ्याला जाणाऱ्या गाडयांची चौकशी केली. तेव्हा आम्हाला वणी पर्यन्त जा तिथून सारख्या गाडया चालू असतात असा सल्ला देण्यात आला. आम्ही खुशिखुशित वणीच्या बसमधे चढलो. एक-दिड तासांच्या प्रवासानंतर साधारण ७ वाजता आम्ही वणीला उतरलो. थोड़ा वेळ प्रतिक्षा केली असता असं जाणवलं की पहाटे पहाटे आम्हाला चौकशीवाल्याने शेंड़ी लावली होती. सारख्या गाडया चालू असतात हा सल्ला आम्हाला महागात पडला कारण वणीवरुन सापुताऱ्याला जाणाऱ्या सर्व गाडया नाशिकवरुन किंवा नाशिकमार्गे येतात. साधारण तास दोन तास वाट पहात आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि गुजरात टुरिसमच्या नावाने शंख करत होतो. अखेर ९.४५ ला GSRTC ची नाशिक - गोधरा बस आली. आम्ही पटकन मागच्या ५ सीट्स पकडल्या. वणीवरून सापुतारा दिड तासाचा प्रवास सुरु झाला.
आता गुजरात म्हटलं माझ्यासारख्याच्या डोक्यात सर्वसोईयुक्त, सर्वगुणसंपन्न, बेरोजगारी नसलेलं, दारुबंदी असलेलं एक आदर्श राज्य हीच संकल्पना. मोदिंची प्रचारसभेतली भाषणं, वेळोवेळी गुजरातच्या चांगुलपणाचे दिलेले दाखले ह्यामुळे या गुजरात बद्दल जरा जास्तच आकर्षण होत.
पण "दुरुन डोंगर साजरे" ही म्हणीचा वास्तवात उपयोग करता येईल असा एक अनुभव आम्हाला आला. गुजरात परिवहन मंडळाची बस महाराष्ट्राच्या हद्दीत एका थांब्यावर थांबली. गाडीचा वाहक अर्थात "कंडक्टर" मस्तपैकी थांब्यावर उतरून एका दारुच्या दुकानात गेला. ५-७ मिनीटांच्या प्रतिक्षेनंतर तो परत बस मधे आला, त्याचा वेश पहाता रस्त्यावरचे रस्ता कामगार पण व्यवस्थित असतात असा विचार आला. त्याने दारुसक्षम जे काही प्यायलं होतं त्याचे काही थेंब त्याने अंगावरही उडवून घेतले असावेत असा कयास आम्ही केला कारण प्रथमदर्शनी त्याच्या यूनिफ़ॉर्मवर त्याचे डाग दिसत होते. तिकिट काढ़ायला तो जेव्हा जवळ आला तेव्हा त्याच्या खिशात दारुची बॉटल सहज ओळखु येत होती. दोन मिनीटांच्या संवादात दारूच्या येणाऱ्या दर्पाने आमच्या शंकेवर शिक्कामोर्तब झाले. असो, पुढे गाडी एका ठिकाणी थांबली तिथे स्ट्रॉबेरी विकणारे बसले होते. गाडी आपल्या घरची असल्याप्रमाणे बराच वेळ थांबली होती. वणी ते सापुतारा रस्ताही काहीसा दुर्लक्षित होता. त्यात या बसला काहीच कंफर्ट नव्हता, चालक एखादा ट्रक चालवावा तसा बेडरपणे गाडी चालवत होता. अशा या नशेत असणारा वाहक आणि प्रवाश्यांचा जराही विचार न करता अतिशय विचित्र गाडी चालवणारया चालकासह या प्रवासाला दयावे लागले ६०₹.
अखेर आम्ही सापुताऱ्यात पोचलो, हवा एकदम थंडगार जाणवत होती. दोन तीन हॉटेल शोधल्यावर एक आमच्या बजेट मधलं हॉटेल मिळालं. प्रवासाचा थकवा जाणवत होता, एक एक डूलकी काढून आंघोळ उरकुन दुपारचं जेवणानंतर आम्ही सापुतारा दर्शन सुरु केलं. रोप वे, बोटिंग, होर्स राइडिंग, अशा ठेवणीतल्या एक्टिविटीज आम्ही खुप एन्जॉय केल्या. इको पॉइंट, रोज़ गार्डन असे काही पॉइंट्स पहिले आणि शेवटी आलो सनसेट पॉइंटला.. वडापाव आणि चहाचा आस्वाद घेत मावळतीचा सूर्य आम्ही पहात होतो. एखाद्या गोष्टीचा अस्त पाहण्यात असा कोणता आनंद आपल्याला मिळतो कोणास ठाऊक तरीही सनसेट पहायाला माझ्यासारखेच अनेक लोक जमले होते. सूर्यास्तासोबत आमच्या सापुतारा दर्शन ही जवळपास झाले होते. रात्रीच्या जेवणाने जरा आमचा हिरमोड केला खरा पण आइस क्रीम, बटाटा पोहे अशा सप्लिमेट्री फूड आणि गप्पा गोष्टी यामुळे त्याचा विसर पडला. लोकल मार्केट मधे फेरी मारत जेली चोकोलेट्स, स्ट्रॉबेरी, वेताच्या काठयांचे शो-पीस अश्या छोटेखानी खरेदीनंतर आम्ही हॉटेलवर परतलो. सकाळी घाईघाईत आवरुन आम्ही बसस्थानक गाठलं. MSRTC ची गाडी लागलेलीच होती. जाताना वणीच्या देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा बेत होता म्हणून वणीचचं तिकीट काढ़लं. लाल रंगाच्या परिवर्तन बसमधे बसल्यावर कालची गोधरा बस आठवली. कडक इस्त्रीतले खाकी कपडे, पॉलिश केलेले काळे बुट अशा नीतनेटक्या पोशाखातला वाहक पाहुन आम्ही धन्य झालो. प्रवाशांशी बोलण्याची रीत थोडक्यात त्याची Body Language एखाद्या वाहकाला साजेशी अशी होती. चालकानेसुद्धा मागे बसलेल्यांचा विचार करत गाड़ी चालवणे पसंत केले होते आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व GSRTC पेक्षा कमी किमतीत ५-१० नव्हे तब्बल १४₹ कमी तिकीटात. वणी सापुतारा अंतर ४३किमीचे त्यासाठी MSRTC ने घ्यावे ४४₹ आणि GSRTC ने घ्यावे ६०₹. १४₹ जास्त तिकिट घेऊनही पदरी काय तर दारूबाज वाहक आणि लो कंफर्ट बस?? पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी गुजरातमध्ये, सर्वगुणसंपन्न गुजरात, दारुबंदी गुजरात, साऱ्या पोकळ गर्जना. GSRTC आणि MSRTC च्या उदाहरणावरुन मी महाराष्ट्रात असल्याचा अभिमान वाटला.
मला कळलं नाही की मोदिजींनी केलेल्या गुजरातच्या वर्णनामधे ते अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरले की काय. दारू पिणारा कंडक्टर असेल तर महिलांनी कोणाच्या भरवश्यावर प्रवास करायचा. एका बाजुला विकासाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे बारीकसारीक गोष्टीकड़े कानाडोळा करायचा. कदाचित मोदीजी राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यामुळे त्यांचे गुजरातकडे दुर्लक्ष तर नसेल झाले? गुजरातला मोदींच्या सुशासनची पुन्हा गरज आहे का?असे अनेक प्रश्न एका दिवसात डोकावुन गेले. एका वाईट अनुभवावरुन थेट मोदीना लक्ष करणं म्हणजे अतिशयोक्ति जरी असली तरी गुजरात बद्दल आकर्षण ज्यांमुळे तयार झालं त्याना गृहीत धरण्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. एका मद्यधुंद कंडक्टर वरुन आपण जसं पूर्ण व्यवस्थेला लक्ष नाही केलं तरी गुजरातबद्दल माझ्या मनात जी प्रतिमा होती त्याला काही अंशी तडा हा गेलाच. म्हणतात ना First Impression is Last Impression असचं काहीसं.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Blank Space... :- Taylor Swiftनिदान आपले मंत्री संत्री आम्ही ग्रेट असं तरी म्हणत नाहीत.. जे आहे ते मान्य करतातनक्की का..?