Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!

H — Hrushikesh Marathe, Wed, 06/03/2015 - 20:28
तुझं येणं,तुझं जाणं,तुझं असणं,तुझं नसणं, तुझं हसणं, तुझं दिसणं, सारं काही नवीनच, तरीही या नव्याचा मला ध्यास जडे..! मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...! मी करावे काम अन् तु फक्त करावा आराम तु म्हणावे चल निघुया अन् मी म्हणावे थांब, दिवसभर चालू आपले हे खेळ वेडे..! मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...! दिवस असला सोबत तरीही,रात्र स्वप्नांची कधीना सरे रात्रंदिवस संवाद आपुले, तरीही पडती हे क्षण अपुरे, क्षण सोबतचे आठवी मन, अन् रमे त्यातचं वेडे..! या नात्याची ओळख न उलगडे..! मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...! हृषीकेश

प्रतिक्रिया द्या
11987 वाचन

💬 प्रतिसाद (27)
स
सतिश गावडे गुरुवार, 06/04/2015 - 05:17 नवीन
तुझं येणं,तुझं जाणं,तुझं असणं,तुझं नसणं,
यावरुन सुशिंच्या कुठल्याशा कादंबरीतील नायकाने विवाहित नायिकेला उद्देशून म्हटलेल्या ओळी आठवल्या:
तुझं येणं जाणं तुझं हसणं तुझं रुसणं तुझ्या नुसत्या असण्यानं माझं जीवन समॄद्ध केलं तेव्हढं एक सांगायचं राहूनच गेलं...
छान लिहित आहात. मात्र प्रत्येक लेखनामध्ये किमान दोन तीन दिवसांचा अवधी द्या. लोकांना तुमचे लेखन वाचू द्या. त्यावर चर्चा करु द्या. असा अवधी दिल्याने तुमचे लेखन अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचेल.
  • Log in or register to post comments
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 05:44 नवीन
धन्यवाद सतीश..जरूर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
य
यशोधरा गुरुवार, 06/04/2015 - 05:25 नवीन
मी करावे काम अन् तु फक्त करावा आराम >> आँ? का म्हणे? बाकी कविता ओके. लिहित रहा.
  • Log in or register to post comments
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 05:42 नवीन
ऑफिस मधल्या नवीन रुजु झालेल्या कलीगला उद्देशुन कविता आहे. त्यात तो काम करत असतो आणि ती नवीन रुजु झाल्यामुळे तिला फारसे काही काम नसते.... अशा काहीशा अर्थाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पैसा गुरुवार, 06/04/2015 - 05:47 नवीन
तुम्ही मला २५ वर्षांपूर्वी का नाय भेटलात ओ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hrushikesh Marathe
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 05:56 नवीन
Kaa o..asa kaa :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/04/2015 - 05:59 नवीन
२५ वर्षांपूर्वीचं जौद्या, तुम्हाला इथेही खूप काम असतं म्हणे ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 06:00 नवीन
ha ha ha ha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/04/2015 - 09:24 नवीन
अज्जून पण वेळ नै गेलीये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 06/04/2015 - 11:48 नवीन
आता मी नोकरी सोडलीय. तेव्हा भेटले असते तर माझं काम त्यांच्या गळ्यात घालून माझ्या नवर्‍याबरोबर भटकले असते ना! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/04/2015 - 12:15 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यशोधरा गुरुवार, 06/04/2015 - 05:48 नवीन
मज्जाय मग. कोणतं ऑफिस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hrushikesh Marathe
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 05:59 नवीन
स्वानुभव नाहीये :D पण अशीच एक कल्पना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 06/04/2015 - 06:14 नवीन
हत तेरे की! काय उपयोग!कखयालीच पुलाव होय! पकवा मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hrushikesh Marathe
स
सतिश गावडे गुरुवार, 06/04/2015 - 05:57 नवीन
हल्ली सार्‍या आयटी कंपन्यांमध्ये अँटी हॅरॅसमेंट पॉलिसीज असतात. जरा जपून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hrushikesh Marathe
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 05:59 नवीन
Yup satish..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे गुरुवार, 06/04/2015 - 06:04 नवीन
तुम्ही "प्यार का पंचनामा" हा चित्रपट पाहिला नसेल तर जरूर पाहा.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/04/2015 - 14:12 नवीन
एक नंबर, तुफान, इ.इ. पिच्चर आहे. डोळे उघडल्याचा क्षण त्यात लैच्च भारी दाखवलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 06:28 नवीन
Pahilay :p
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 06/04/2015 - 08:05 नवीन
मी करावे काम अन् तु फक्त करावा आराम >
हे फारच आवडल्या गेले आहे!
  • Log in or register to post comments
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 06/04/2015 - 08:42 नवीन
Thanks :)
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 06/04/2015 - 12:04 नवीन
प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देण्याचे काम तुम्हाला कुणी आउटसोर्स केलंय काय? इमानेइतबारे करताय म्हणून विचारले. ;)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/04/2015 - 14:11 नवीन
प्रतिक्रिया की ओरतिक्रिया? अंमळ कन्फूजन झाल्याने विचारले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
व
वेल्लाभट गुरुवार, 06/04/2015 - 12:20 नवीन
चांगला प्रयत्न
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 06/04/2015 - 14:16 नवीन
असं प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देत बसू नये, एकाच प्रतिसादात सगळ्यांच आभारप्रदर्शन, उट्टं काढणं वैगरे उरकून टाकावं. हापिसात शष्प काम नसेल तर मात्र चालू द्या.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 06/04/2015 - 20:04 नवीन
म्हणूनच तर कुणाचे तरी काम करुन द्यायचे खयाली पुलाव चालले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
र
रातराणी गुरुवार, 06/04/2015 - 20:24 नवीन
छान आहे !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा