Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ग्वाटेमालात घडलेली एक दुर्दैवी घटना

अ
अन्नू
Fri, 06/05/2015 - 06:28
🗣 24 प्रतिसाद
एखाद्या गोष्टीवर काय मत द्यावं मला खरंच कळत नाही, खासकरुन अशावेळी ज्यावेळी ती घटना अख्ख्या मानवजातीला काळीमा फासणारी असते! असं काही ऐकल्यावर बघितल्यावर- माणसाला कधी, माणूस म्हणून जगताच आलं नाही असं वाटतं. अनेक शतके उलटली प्राणी आपली हिंसक वृत्ती सोडून प्रेम करायला शिकले, पण माणूस मात्र रानटी तो रानटीच राहीला; किंबहुना त्याच्याही पलिकडे जाऊन निर्दयी आणि पाषाणहृदयी होत गेला. असं नसतं, तर अशा घटना वारंवार घडल्याच नसत्या. अलिकडेच व्हॉट्स-अ‍ॅप वर एक व्हिडीओ आला होता. म्हणजे अजुनही तो मोबाईलवर फिरतोय. मागच्याच महीन्यात मलेशियामध्ये एका सोळा वर्षाच्या तरुणीला जमावातल्या काही जणांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा तो व्हिडीओ होता. कारण काय तर- एका 68 वर्षाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या खूनाशी तिचा संबंध होता. खरं म्हणजे खून करणारे ते दोघे वेगळेच होते. पण ऐन वेळी ते तिथून निसटले. आणि ती मात्र लोकांच्या हातात सापडली. अर्थात त्यांच्या मारण्याबद्दल काही नाही पण त्या मारण्याचीही काही सीमा? अक्षरश: सैतानासारखं तिला तिथे मारण्यात आलं. चेहरा सुजून, अगदी नाकातोंडातून रक्त येईपर्यंत तिला, लाथा-बुक्क्यांनी तुडवण्यात आलं. केसांना धरुन कशाहीप्रकारे फरफटण्यात आलं. अशा वेळी एखादं जनावर बरं अशी तिची हालत त्या लोकांनी केली. आश्चर्याची गोष्ट अशी कि तिथे हजारोंच्या संख्येनं लोक उभे होते! पण कोणीही तिला वाचवायला किंवा मदत करायला पुढे आला नाही. निर्लज्जासारखे ते फोनमध्ये हे सर्व रेकॉर्ड करण्यात गुंतले होते! किती हीन आणि सडलेली मनोवृत्ती इथे दिसून येतेय? अशा प्रकारे मारताना- आणि ते नामर्दासारखं बघताना काहीच कसं वाटलं नसेल त्यांना? अर्थात हे इथेच संपत नाही. तिला मारुन झाल्यावर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला नंतर सर्वांदेखत जिवंत जाळण्यात येतं! आणि षंड वृत्तीचे लोक आपापले फोन पुढे करुन ते रेकॉर्ड करायला लागतात! शेवटपर्यंत ती किंचाळत राहते- तडफडत राहते. पण कोणापर्यंतही तिच्या वेदना पोहोचत नाहीत! कोणीही तिला मदत करायला धावत नाही. कि हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. उलट जाळ कमी झाल्यावर त्यातलाच एक तिच्या अंगावर आणखी पेट्रोल ओतून तिला पुर्णपणे जाळतो! किती निंदनीय घटना आहे ही! एका अपराधाबद्दल अशी भयानक शिक्षा? छे! डोकंच बधीर होतं ते बघितल्यावर. शेवटी एवढंच म्हणेन कि, एखाद्या शत्रुवरही असली वेळ कधी येऊ नये! :( :( हा व्हिडीओ कदाचित तुमच्याही व्हॉट्स-अ‍ॅपवर आला असेल, किंवा नसेलही. पण तो न बघणंच बरं. कारण त्याची भयानकता ही तितकीच जास्त आहे. ही बातमी तुंम्हाला या लिंकवर वाचायला मिळेल. ************************* सूचना : लेखातली घटना मलेशिया या आशियाई देशात नाही तर ग्वाटेमाला या दक्षिण अमेरिकेतल्या देशात घडली असल्याने गैरसमज टाळण्यासाठी लेखाच्या शिर्षकात योग्य ती सुधारणा केली आहे. *************************

प्रतिक्रिया द्या
10229 वाचन

💬 प्रतिसाद (24)
न
नक्शत्त्रा Fri, 06/05/2015 - 06:59 नवीन
भयानक!!!
  • Log in or register to post comments
G
gogglya Fri, 06/05/2015 - 07:18 नवीन
सगळ्यांन्नी निव्वळ व्हीडीओ पुढे पाठवण्यातच समाधान मानले! बाकी काहीही प्रतीक्रिया नाही, निषेध तर दुर राहीला. भयानक परीस्थीती आहे.
  • Log in or register to post comments
अ
अन्नू Fri, 06/05/2015 - 08:02 नवीन
सगळ्यांन्नी निव्वळ व्हीडीओ पुढे पाठवण्यातच समाधान मानले!
खरं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya
म
मृत्युन्जय Fri, 06/05/2015 - 09:10 नवीन
मला वाटते कित्येक लोकांनी व्हिडीयो पाहणे टाळले असावे. अश्या कित्येक लोकांमध्ये मी सुद्धा एक आहे. मलाही एका ग्रुपवर हा व्हिडीयो आला होता तो मी न पाहता डिलीट केला. एखाद्या घटनेवर रिअ‍ॅक्ट व्हायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असु शकते. शिवाय दूर ग्वाटेमालात घडलेल्या घटनेवर भारतात बसलेल्या व्यक्तीन व्हॅऑट्सअ‍ॅपवर प्रतिर्किया देण्यात काही फारसे प्रयोजनदेखील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya
ब
बदामची राणी Fri, 06/05/2015 - 07:43 नवीन
सुन्न करणारी घटना. ऑफिसच्या ग्रुपवर ही क्लीपिंग पाहिली. खरोखरच आश्चर्य म्हणजे 89 पैकी एकाही मेंबरने प्रतिक्रिया दिली नव्हती.
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 06/05/2015 - 08:49 नवीन
आप्ल्या मते , प्रतिक्रिया नव्हत्या हे चांगले झाले की वाईट? कारण इतरांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत हे सांगून आपण आपली प्रतिक्रिया काय होती ते गुलदस्त्यातच ठेवले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बदामची राणी
झ
झंम्प्या Fri, 06/05/2015 - 07:44 नवीन
सुन्न करून टाकणारा प्रकार... आजकाल माणसातला मानुंस हरवून जनावर जागं होतंय असं वाटायला लागलंय. बोथट भावना, स्वकेंद्रीत मनोवृत्ती, आणि विभत्च गोष्टींची आवड. !!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 06/05/2015 - 08:13 नवीन
बाकी काहीही प्रतीक्रिया नाही, निषेध तर दुर राहीला.
89 पैकी एकाही मेंबरने प्रतिक्रिया दिली नव्हती.
इथे किंवा ग्रुप मधे प्रतिक्रीया देवून काय होणारे? निषेधाचे भाकड चार शब्द बोलुन/लिहुन काय होणारे? उगाच आजुबाजुच्या लोकांवर टीका करण्याला काय अर्थ आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अन्नू Fri, 06/05/2015 - 10:31 नवीन
इथे किंवा ग्रुप मधे प्रतिक्रीया देवून काय होणारे? निषेधाचे भाकड चार शब्द बोलुन/लिहुन काय होणारे?
होणार काहीच नाही, पण निदान एका व्यक्तीमध्ये निर्माण झालेली तिव्र निषेधाची- विरोधाची भावना, जर पुढच्या इतर चार लोकांत जरी निर्माण झाली तरी- भविष्यात असल्या होणार्‍या घटनांना वेळच्यावेळीच विरोध दर्शवला जाईल आणि अशा हिंसक घटनांना कुठेतरी पायबंद बसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
र
रवीराज Sat, 06/06/2015 - 04:23 नवीन
इथे किंवा ग्रुप मधे प्रतिक्रीया देवून काय होणारे? अहो ते ग्वाटेमालातले जाउद्या, इथे आपल्या आसपास अशा संवेदनशुन्य घटना घडतात तेव्हाही सर्वसामान्यांवर फार काही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
म
मदनबाण Fri, 06/05/2015 - 08:15 नवीन
असे आणि अनेक व्हिडीयो पाहुन माणसातला राक्षस कसा असतो त्याचे दर्शन घडते, ISIS वाल्यांचे व्हिडीयो पहाल तर काय अवस्था होइल ? बोकडा सारखे माणसाला कापतात ! हे साले सगळे राक्षसच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Fri, 06/05/2015 - 08:25 नवीन
ती घटना मलेशियामधली नाही.... Guatemala City येथील आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/05/2015 - 09:12 नवीन
व्हिडियो क्लिप बघवत नाही, केवळ क्रूर. जिथे ही घटना घडलीलोक किती शांतपणे त्यात सामील होतात आश्चर्य वाटतं ! :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 06/05/2015 - 09:45 नवीन
अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी घटना! त्या ठिकाणी न्यायव्यवस्था स़क्षम नाही म्हणुन काय झाले, कायदा हातात घेण्याचा अधिकार या लोकांना कोणी दिलाय? मग जनावरे व माणसांमध्ये फरक तो काय?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 06/05/2015 - 10:18 नवीन
मलाही ही क्लीप आली होती. मी जास्त वेळ पाहु नाही शकलो. आणि डीलीट केली. पण ज्या महाभागाने ती पाठवली होती त्याने असे लीहीले होते की "ये क्लीप इतनी फॉरवर्ड करो की मोदीजी तक जानी चाहीए, और उनको भी पता चले की उनके राज मे भारत मे स्त्री पर कीतना अत्याचार हो रहा है"
  • Log in or register to post comments
अ
अन्नू Fri, 06/05/2015 - 10:48 नवीन
मलाही ही क्लीप आली होती. मी जास्त वेळ पाहु नाही शकलो. आणि डीलीट केली.
योग्य केलंत.
पण ज्या महाभागाने ती पाठवली होती त्याने असे लीहीले होते की "ये क्लीप इतनी फॉरवर्ड करो की मोदीजी तक जानी चाहीए, और उनको भी पता चले की उनके राज मे भारत मे स्त्री पर कीतना अत्याचार हो रहा है"
तो बिचारा काँग्रेसवाला असेल! बाकी दोन-तीन महीन्यांपुर्वी आपल्या इथे महाराष्ट्रातही अशी एक घटना घडली होती. अर्थात त्याचे कारण वेगळे होते आणि तिला जाळली वगैरे नव्हती त्यांनी, पण अशाच प्रकारे तिला पब्लिक प्लेसमध्ये मारहाण करण्यात आली होती. आणि त्याचे असेच व्हिडीओ शुटींगही करण्यात आले होते. आत्ता संदर्भ लक्षात नाही, पण दोन दिवस तरी यावर न्युज चॅनेलवर चर्चा चालली होती. पुढे काय झाले माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्रसाद प्रसाद Fri, 06/05/2015 - 10:19 नवीन
विषयांतराबद्दल क्षमस्व- २ दिवसापूर्वी पोलीस स्टेशन समोर एका युवकाने जाळून घेतले, पोलीस त्याच्यावर विनाकारण शारीरिक अत्याचार करत होते, असे काहीसे प्रकरण होते. काहीसे म्हणण्याचे कारण, बातमी भयानकच होती आणि TV9 आणि जय महाराष्ट्र या दोन मराठी वाहिन्यांनी सदर प्रकार live चित्रित करून दाखवला. त्यामुळे हि बातमी पुढे पहावलीच नाही. सदर घटना महाराष्ट्रातील होती. ह्या चित्रीकरणाचे फारसे डीटेल्स मी येथे देत नाहीये, पण सदर पेटवून घेतलेल्या व्यक्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत दाखवले होते असे हीच बातमी पाहणाऱ्या अनेकांनी सांगितले. झाला प्रकार निसंदेह अमानुषच होता, पण तो परत परत दाखवणे हे ही अमानुषच होते. कायद्याने अशी चित्रीकरणे दाखवणे संमत आहे का? आणि ह्या न्यूज चॅनेलवाल्यांनी अशी भयानक बातमी दाखवली/परत परत दाखवली ह्यावर त्यांच्या न्यूज चॅनेलवर, प्रसारण मंत्रालयाकडे/अधिकाऱ्याकडे काही तक्रार दाखल होऊ शकते का?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 06/05/2015 - 10:51 नवीन
ह्या व्हिडिओत नक्की कोण जनावर आहे हे सांगता येइल का? भारतातीलच घटना आहे. https://www.youtube.com/watch?v=tuY7vcV1Jjw
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 06/05/2015 - 13:04 नवीन
..मलेशिया नव्हे.मध्य अमेरिका खंडातल्या ग्वाटेमालात झालंय हे. .संदर्भ पूर्ण सोडून "स्त्रीची समाजात काय स्थिती आहे बघा" अशा प्रकारे भारतातल्या स्थितीबाबत कॉमेंट करुन बरेचजण शेअर करताहेत. ..ग्वाटेमालात कायद्यावर लोकांचा भरोसा राहिला नाहीये..खंडणीखोरी अन न दिल्यास खून हे कॉमन..ती मुलगी खुद्द गन धारक खंडणीखोर होती असं तिथल्या मीडियाने म्हटलंय. ..काहीच जस्टिफायेबल नाही..फक्त संदर्भासहित पहावे.
  • Log in or register to post comments
अ
अन्नू Fri, 06/05/2015 - 15:22 नवीन
..मलेशिया नव्हे.मध्य अमेरिका खंडातल्या ग्वाटेमालात झालंय हे.
हो- हे एक चुकलंच
..ग्वाटेमालात कायद्यावर लोकांचा भरोसा राहिला नाहीये..
म्हणून काय असलं बिभत्स कृत्य करायचा त्यांना अधिकारच प्राप्त होतो की काय? मग त्या खुन्यांत आणि यांच्यात फरक राहतोच कुठे? सॉरी- पण मी त्या तरुणीची बाजु घेतोय किंवा तिचं समर्थन करतोय अशातली बाब नाही. पण खंडणीखोर लोकांबरोबर होती म्हणून तिला असं अमानुष आणि क्रुर पद्धतीनं जाळून मारणं आणि त्याचा जल्लोष करणं हे मला तरी पटत नाही. याचे सविस्तर वर्णन एका जर्नालिस्टने या लिंकवर केले आहे-- http://www.smh.com.au/world/girl-16-burnt-alive-by-guatemalan-lynch-mob-20150525-gh8xyk.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Fri, 06/05/2015 - 16:33 नवीन
..अधिकार प्राप्त होत नाही..अर्थातच.. माझ्या प्रतिसादातलं शेवटचं वाक्य पहा.
काहीच जस्टिफायेबल नाही..फक्त संदर्भासहित पहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू
म
मृत्युन्जय Sat, 06/06/2015 - 08:30 नवीन
..काहीच जस्टिफायेबल नाही..फक्त संदर्भासहित पहावे. अगदी नेमके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
श
श्रीरंग_जोशी Sat, 06/06/2015 - 04:36 नवीन
जमावाचे मानसशास्त्र हा एकदम गुंतागुंतीचा विषय आहे. इतर वेळी अगदी सामान्य असणारी माणसे हिंस्त्र पशुपेक्षाही अधिक हिंस्त्र वागू शकतात. या घटनेवरून तीन महिन्यांपूर्वी आपल्या देशात घडलेली ही घटना आठवली :-( . Dimapur: Lynched Nagaland man came from family of Armymen, not Bangladesh
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 06/06/2015 - 14:08 नवीन
मलेशियातही नुकतीच बॉर्डरवर रोहिंग्या रिफ्युजी लोकांवरच्या अत्याचारांची नृशंस घटना घडली आहे. शोधायला गेलात तर रोजच्या रोज अशा लाखो घटना मिळतील. अज्ञानात सुख असतं. अग्निपथ या चित्रपटातलं एक वाक्य मला आठवतं अशा घटना पाहिल्या की..,"कहने के लिये तो यह एक शहर है...".
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा