प्रेम
तुझा हात माझ्या हाती,
शब्द फिके अशा एकांती,
प्रतिबिंब तुझे घेऊन झाली
सांज गुलाबी क्षितिजावरती...
किनारा असा फेसाळलेला,
आसमंत सारा गंधाळलेला,
बेधुंद करी त्या क्षणीचा जिव्हाळा
तुझ्याच डोळ्यांत सामावलेला...
होई अचानक तुझा स्पर्श वेडा,
हर्षीलाच जाई जीव हा बापडा,
चढु लागे धुंदी प्रेमाची जशी की
बने राजवर्खी हा ऋतू कोरडा...
किनाऱ्यावरी नाव रेंगाळणारी,
हिंडो कुठेही, विसावा किनारी,
असला दुरावा जरा काळ तरीही,
प्रेमच मिटवी त्या क्षणांची दरी...
- हृषीकेश
बियरचा ग्लास हाती असला तर, सेम अशाच भावना मनांत येतात.....बाडिस देवानू !