Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंचकर्माविषयी माहिती हवी आहे

स
स्पा
Tue, 06/09/2015 - 03:48
🗣 22 प्रतिसाद
वय : ५५ आजार: शुगर,लठ्ठपणा, हाय बिपि, अस्थमा जवळच्या नातेवाईकांना पंचकर्म करुन घ्या च , असा सल्ला वारंवार दिल्या गेल्या आहे.त्याबद्दल असे चित्र दाखवले आहे की थेट पोटात शिरुन रोगाचा खात्मा. detoxification. इथे कोणाला पंचकर्माचा अनुभव आहे का? हे प्रकरण कितपत रिस्की आहे? याचा उपयोग खरच होतो का? जालावर माहिती पेक्षा जाहिरातबाजीच जास्त दिसली. मिपावर आधी यावर काही चर्चा झाली असल्यास क्रुपया लिंक द्यावी. कळावे - स्पावड्या

प्रतिक्रिया द्या
9330 वाचन

💬 प्रतिसाद (22)
क
कंजूस Tue, 06/09/2015 - 05:55 नवीन
सायन स्टेशनच्या बाहेर जवळच आयु्र्वेदिक कॅालेज +रुग्णालय(मोफत) आहे.सकाळी ८ ते १२ संध्याकाळी ५ ते ७ .रविवारी बंद योग्य सल्ला +औषधे मिळतात. रुगणास ठेवताही येते.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Tue, 06/09/2015 - 06:31 नवीन
पंचकर्ममध्ये वासंतीक वमन केले आहे. गेली वर्षे नियमीत करतो आहे. पंचकर्म म्हणजे शरीरशुध्दी असे म्हणतात. माझ्या सोबतचे मित्र आयुर्वेदात एमडी केलेले आहेत त्यांच्या सल्ल्याने मी स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने हे केले आहे. यात वमन शिवाय विरेचन, बस्ती, आदी अन्य प्रकार सुध्दा आहेत. मला एसीडीटीचा त्रास होता. त्यासाठी विरेचन करावे असे होते मात्र त्याचा काळ पावसाळ्यात असतो असे होते आणि नेमका पावसाळा शक्य होत नव्हतं. त्यामुळे वासंतीक वमन केले. मी एक आठवडा रोज थोडं थोडं प्रमाण वाढवत तूप घेतले. माझ्या डॉक्टरने असे सांगीतले होते की तूप हे शरीरात सर्वत्र पसरते व अशुध्दी आपल्या पोटात जमा करते. असे करता करता सहाव्या दिवशी मात्र मला खुप डोकेदुखी व्हायला लागली होती. तेव्हा डॉक्टरने रक्तमोक्षण असा प्रकार केला म्हणजे थोडं रक्त काढलं. असं केल्यावर डोकेदुखी एकदम थांबली. त्यावर डॉक्टरचे मत असे होते की काढलेले अशुध्द रक्त होते म्हणून आराम पडला. दुसरे दिवशी म्हणजे वमन करण्याच्या दिवशी सकाळी गरम करून थंड केलेले दुध प्यायला दिले. पोटभरून दुध पिल्यानंतर एक ग्लास दुधात मदनफळाचे चुर्ण मिसळून दिले. ते घेतल्यानंतर दहा मिनीटात आपोआप उलटीचे वेग यायला लागले. सगळे दुध परत आले... त्यानंतर मिठाचे कोमट पाणी दिले असे करता करता शेवटी जेव्हा पित्तं पडले तेव्हा डॉक्टरांच्या भाषेत पित्तांतक वमन झाले असे म्हणून वमन झाले असे घोषीत झाले. एवढं करता करता माझा जीव निघाल्यासारखा थकवा आला होता. खुप झोप आली होती. काही औषधे देऊन डॉक्टरने झोपण्यास परवाणगी दिली. रात्री पासून पुढची सात दिवस लघु आहार घ्यायला सांगीतला. म्हणजे तांदळाच्या लाह्या हळद मिठामध्ये भाजून खान्यास दिल्या. नंतर मुगाची खिचडी आदी दिला. पुढची दहा दिवस दुध पुर्णपणे बंद सांगीतले होते. ह्या दरम्यान खुप हलके जाणवत होते. नंतर काही दिवसांनी सगळं पुर्वपदावर आलं. गेले तीन वर्षे वमन केल्याने नेमके काय सुधारले ते सांगता यायचे नाही. मात्र माझ्या अ‍ॅसीडीच्या त्रासामध्ये ८० टक्के आराम पडला. खुप जास्त प्रमाणात अ‍ॅसीडीटी होती. काही खाल्लं तरी आणि नाही खाल्लं तरी त्रास व्हायचा. आता तसे नाहीये. वर माझा अनुभव विचारल्यामुळे माझा अनुभव तेवढा दिला. माझ्या आईने सुध्दा वमन करावे असे मला वाटत होते मात्र वमन म्हणजे उलटी करण्यात खुप थकवा येतो असे असल्यामुळे मी आमच्या ओळखीच्या डॉक्टरला विचारले त्या म्हणाल्या की त्यांच्या शक्तीला साजेसे वमन करता येईल. यावर्षी आईचे सुध्दा वमन उत्तम झाले. माझ्यासारखा त्रास झाला नाही. पुण्यात अपोलो टॉकीज जवळ शेट ताराचंद हॉस्पीटल आहे. तेथे माझा मित्र रजिस्टार होता त्याने सांगीतले की तेथे पंचकर्म उत्तम पध्दतीने व मोफत केले जाते. अधिक माहीती तेथे मिळेल. - नीलकांत
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 06/09/2015 - 06:51 नवीन
निल्स :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/09/2015 - 07:06 नवीन
रिस्क नक्कीच नाहीये. उपयोग होतो पण तो कायमस्वरुपी टिकत नाही कारण त्यानंतर सगळी पथ्ये पाळणे आपल्याला जमत नाही. खाण्या-पिण्यावर कंट्रोल ठेवता येणार असेल तरच पंचकर्म करुन घेण्यात अर्थ आहे नाहीतर काही दिवसात पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. मी अ‍ॅसिडीटीसाठी वमन, विरेचन आणि बस्तीचे काही सेशन करुन घेतले होते. तीन वर्ष काही त्रास झाला नाही. पण आता अ‍ॅसिडीटी परत डोके वर काढतीये. पण तीन वर्षे मिळाली हे ही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 06/09/2015 - 07:30 नवीन
बाबा पाटिल हे अधिक माहिती देउ शकतील असे वाटतेय.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा नाईक Tue, 06/09/2015 - 09:09 नवीन
सायटीका साठी हे (पंचकर्म) उपचार किति उपयोगी आहेत? कोणाला अनुभव आहे का?
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Tue, 06/09/2015 - 15:12 नवीन
http://ayurvedandpanchakarma.com/arthritis-treatment-in-pune/ हे ही पाहुन घ्या.http://blog.ayurvedandpanchakarma.com/search/label/Arthritis%20%26%20Paralysis%3ATotal%20care
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा नाईक
प
पद्मावति Tue, 06/09/2015 - 12:00 नवीन
बालाजी तांबे यांचे कार्ला या गावात ( पुणे किंवा मुंबई च्या अजूबाजुला) केंद्र आहे. तिथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूप छान असतात असे ऐकले आहे. तिथे चवकाशी करू शकता.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 06/09/2015 - 12:03 नवीन
पिचू फेम तांबे यांच्यापासून लांबच रहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
र
रेवती Tue, 06/09/2015 - 12:54 नवीन
अहो मुनिवर, ट्रीटमेंट काय तेवढीच असते का? अनेक वर्षांपूर्वी केस गळू नयेत म्हणून मी त्यांची ट्रीटमेंट (पुण्यातील शाखेत) घेतली होती. खूप उपयोग झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ज
जिन्क्स Tue, 06/09/2015 - 12:57 नवीन
तांबेंच्या केंद्रात पंचकर्म साठी १४ ते १८ महिने waiting आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
र
रेवती Tue, 06/09/2015 - 12:52 नवीन
चांगल्या वैद्यांच्या सल्ल्याने, देखरेखीखाली पंचकर्म केल्यास्/करवून घेतल्यास खूप हलके, छान वाटते. तब्येतीच्या लहानसान तक्रारी बर्‍याच आवाक्यात येतात/ संपतात. माझ्या बघण्यात अनेक नातेवाईक हे उपचार घेतात. मीही २ दा पंचकर्म करून घेतले असता लाभदायक ठरले आहे. नक्की काय फरक पडला असे बोट दाखवून सांगता येणार नाही पण एकूणच बरे वाटले. अतिव्यायामाने मला काही त्रास सुरु झाला होता तो अक्षरश: जादू झाल्यासारखा संपला. माझी चूक लक्षात आली व व्यायाम बेतानेच सुरु केला. हे प्रत्येकासाठी वेगळे असावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 06/09/2015 - 13:04 नवीन
धन्स ताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
स्पंदना Tue, 06/09/2015 - 14:14 नवीन
माझ्या आईंना करायला लावले होते. वमन हा प्रकार त्यात नसावा, पण मसाज, स्टिम आणि काढे असा एकूण प्रकार होता असे बोलण्यावरुन जाणवले. आईंचे वजन कमी होउन त्यांना हलके वाटले असे त्या म्हणतात. म्हणजे सुस्ती, अशक्त्पणा जाउन ताजे तवाने वाटते. चालताना त्रास होत नाही,दम लागत नाही इत्यादी. एकूण पंचकर्म हल्ली जोरात आहे भारतात असा याचा अर्थ, पण एकदम छू मंतर वगैरे काही होत नाही हे लक्षात घेणे.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Tue, 06/09/2015 - 15:56 नवीन
http://ayurvedandpanchakarma.com/panchakarma-treatment-in-pune/
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Tue, 06/09/2015 - 15:57 नवीन
http://ayurvedandpanchakarma.com/diabetes-treatment-in-pune/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 06/10/2015 - 07:48 नवीन
वैद्य विनय वेलणकर, सी - ००१ भुषण अपार्टमेंट सावरकर रोड, डोंबोली फोन नंबर : ०251 2449137
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 06/10/2015 - 13:53 नवीन
बरेचदा आयुर्वेदातील जाणकार सांगतात की , साखरेचा वापर टाळा व त्याऐवजी मधाचे सेवन करा . याबद्दल शंका अशी आहे की - चहा बनविताना त्यामध्ये ( दुध+ चहापुड+पाणी यांचे आधण) साखरेऐवजी मध (द्रव स्वरुपातला) मिसळला तर चालेल का ? का मध तापविल्यास खराब होतो ? तसेच मध हा घन स्वरुपांमध्ये आयुर्वेदीक दुकानांमध्ये मिळतो का ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 06/10/2015 - 14:01 नवीन
माझ्या मते चहाच टाळा. त्याऐवजी ग्रीन टी सुरू करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सिरुसेरि Wed, 06/10/2015 - 14:43 नवीन
"माझ्या मते चहाच टाळा. त्याऐवजी ग्रीन टी सुरू करा." अगदी बरोबर . मी केवळ एक कुतुहल म्हणुन विचारले . ज्यांना चहाशिवाय चैनच पडत नाहे अशांसाठी , मी विचारलेल्या प्रश्नांवर काही माहिती आहे का ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 06/10/2015 - 15:19 नवीन
अहो, मी त्याचसाठी ते सांगितलं होतं की चहा टाळा. लेमन अँड हनी वाली ग्रीन टी घ्या. फेश वाटेल चहासारखंच. जर तुम्हाला मधुमेह किंवा तत्सम आजार ज्यात साखर चालत नाही नसतील तर साखरेने काही होत नाही. ज्यांना चहाशिवाय चैन पडत नाही त्यांनी चहात साखरेऐवजी मध टाकणे तेही आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे जरा 'डायट कोक' पिण्यासारखे वाटते. बाकी काही नाही. चहा करण्याच्या कैक पद्धती आहेत. पण कुतूहल असेल तर मधवाली पद्धत योग्य राहील, पण चहा नेहमीसारखा होणार नाही. हे वाचा: http://www.livestrong.com/article/473403-how-to-sweeten-tea-with-honey/ http://www.shape.com/healthy-eating/diet-tips/ask-diet-doctor-tea-honey-vs-coffee-sugar http://www.benefits-of-honey.com/tea.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सिरुसेरि Wed, 06/10/2015 - 16:03 नवीन
धन्यवाद . थोडा या प्रश्नांवरही प्रकाश टाका - १. ग्रीन टी मध्ये दुध मिसळत नाहीत असे आढळते . असे का ? ग्रीन टी हा दुध व पाणी यांच्या मिश्रणाबरोबर घेतला तर चालतो का ? २. मध हा घन स्वरुपांमध्ये आयुर्वेदीक दुकानांमध्ये मिळतो का ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा