Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जगावेगळे... !

व — विशाल कुलकर्णी, Tue, 06/09/2015 - 07:20
जगावेगळे मागणे मागतो मी तुझी याद नाही विसर मागतो मी स्मरावे तुला ना प्रभो मी कधीही तुझ्या दुश्मनांना शरण मागतो मी नको शाश्वती जीवनाची दयाळा हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी किती आजवर मीच केलीत पापे नको श्वास आता, अभय मागतो मी इथे माजले धुर्त स्वार्थांध सारे जमावे मला वाकणे.., मागतो मी नुरे पात्रता रे तुला प्रार्थण्याची 'हरामीपणा' थोडका मागतो मी जगाला कळेना विनंत्या मनाच्या विषाचाच जहरीपणा मागतो मी कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'? जगावेगळ्या मागण्या मागतो मी ! विशाल..

प्रतिक्रिया द्या
3337 वाचन

💬 प्रतिसाद (19)
म
मदनबाण Tue, 06/09/2015 - 07:46 नवीन
नको शाश्वती जीवनाची दयाळा हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी क्या बात है,वाह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- भिगी भिगी भिगी जादु भरी लम्हों की ये राते... :- Thakshak
  • Log in or register to post comments
स
स्वीत स्वाति Tue, 06/09/2015 - 07:59 नवीन
लिहिलि आहे कविता
  • Log in or register to post comments
द
दमामि Tue, 06/09/2015 - 08:16 नवीन
विकु, मस्तच रे!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 06/09/2015 - 08:22 नवीन
अजून एक मस्त कविता विशाल दा पुन्हा एकदा champion........
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Tue, 06/09/2015 - 08:53 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Tue, 06/09/2015 - 10:37 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 06/09/2015 - 10:42 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
च
चिनार Tue, 06/09/2015 - 10:50 नवीन
जबराट !
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 06/09/2015 - 10:50 नवीन
अजुन एक दर्जेदार रचना..
  • Log in or register to post comments
श
शशांक कोणो Tue, 06/09/2015 - 10:55 नवीन
विशाल कुलकर्णी छान लिहिली आहे कविता ........
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/09/2015 - 10:55 नवीन
धन्यवाद मंडळी _/\_
  • Log in or register to post comments
ग
गरजू पाटिल. Tue, 06/09/2015 - 13:38 नवीन
विशालदा... ला ज वा ब*
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/09/2015 - 13:54 नवीन
सुंदर अभिव्यक्ति.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 06/09/2015 - 13:58 नवीन
नको शाश्वती जीवनाची दयाळा हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी
हे विशेष आवडलं.
  • Log in or register to post comments
स
सटक Tue, 06/09/2015 - 14:42 नवीन
अप्रतिम....गझलचा बाज आहे..मक्ता छान! कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'? जगावेगळ्या मागण्या मागतो मी ! (मनी रात्र काळी, 'सेहेर' मागतो मी !)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/09/2015 - 15:26 नवीन
मनी रात्र काळी, 'सेहेर' मागतो मी ! वाह, क्या बात आवडेश, आवडेश ! लिहायला बसलो तेव्हा गझलच डोक्यात होती, पण नंतर जाणवलं की भुजंगप्रयात वापरून गझलेपेक्षाही सुंदर कविता होवू शकेल. म्हणून मग गझलेचा मोह टाळला. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सटक
स
सटक Tue, 06/09/2015 - 16:24 नवीन
छानच जमली आहे! व्रुत्तरचना नामशेश होण्याच्या मार्गावर आहे आता! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/09/2015 - 15:27 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार _/\_
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 06/10/2015 - 18:37 नवीन
खास रचना! सुरेख!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा