पाककृती

वांग्याचे काप

Primary tabs

अतिशय tasty असा हा वांग्याचा प्रकार. मुळात वांगे न आवडणा-यांना देखील आवडेल अशी ही recipe. अगदी पोळी बरोबर अथवा starter म्हणून नक्की hit आहे.

साहित्य:
१. एक लांबट जांभळे वांगे
२. चणा डाळीचे पीठ ४ मोठे चमचे
३. हळद, तिखट, मीठ चवीनुसार
४. १ मोठा चमचा रवा

कृती:
१. प्रथम वांग्याचे मध्यम जाडीचे काप करावे. सुरीने अथवा काट्याने त्याला दोन्ही बाजूने टोचे मारावेत.
२. एका ताटात चणा डाळीचे पीठ, रवा, हळद, तिखट, मीठ एकत्र करून घ्यावे. बेसन पीठ मध्ये १ मोठा चमचा रवा मिसळावा. त्यामुळे काप खुसखुशीत होतात. वांग्याचे काप या पिठात घोळवावेत. हाताने हलकासा दाब द्यावा जेणेकरून पीठ आतपर्यंत शिरेल.
३. आता gas वर तवा तापत ठेवावा. त्यावर थोडे तेल घालून हे काप दोन्ही बाजूने परतून घ्यावेत. झाकण ठेवू नये.

काही महत्वाचे:
१. कापांना पीठ लावून लगेच परतावेत. मध्ये वेळ गेल्यास त्यांना पाणी सुटते व काप मऊ होतात.
२. तिखट आणि मीठ स्वादापेक्षा थोडे जास्त घालावे. म्हणजे कापांना चांगली चव येते.
३. रव्यामुळे काप खुसखुशीत होतात.

yy
ww
cc
gg

------------------
धागा संपादित केला आहे.

अजया

छान पाकृ.सगळ्यांची आवडती!

अजून एक-दोन घटक मी वापरतो. ते म्हणजे चिंचेचा कोळ, तांदूळाचे पीठ वगैरे.
कापांना आधी मीठ लावावे. नंतर त्यावर चिंचेचा कोळ लावावा. नंतर हळद, तिखट लावावे.
चण्याच्या पिठात थोडे तांदळाचे पीठ मिसळावे.
तव्यावरचे काप मस्त चुरचुरीत आणि आकर्षक दिसत आहेत. लगेच उचलून खावे असेच. अभिनंदन.

छान दिसत आहेत काप.
अगदी आवडता प्रकार, मी ह्यात डाळीच्या पिठाऐवजी ज्वारीचे पिठ वापरते अधिक चुरचुरीत होतात.
फोटो छान आहेत.

वेल्लाभट

वांग्याचे काप... बाप !

परमप्रिय वांगे...
वा वा वा

आदूबाळ

वांग्यांबद्दलच एक गोंधळ माझ्या मनात आहे.

जाडजूड वांग्यांपैकी एक प्रकार म्हणजे गडद जांभळी वांगी. त्यावर पॅटर्न नसतो. दुसरी फिकी जांभळी - त्यावर उभा उभा जांभळा-पांढरा पॅटर्न असतो.

यातली कोणती या पाकृसाठी घ्यावी?

सूड

गडद जांभळी वांगी. त्यावर पॅटर्न नसतो

ही घ्यावीत.

दुसरी भरली वांगी करताना.

भुमन्यु

भरली वांगी करताना जळगावकडची हिरवी वांगी घेउन बघा, अजुन उत्तम!!!

पद्मावति

माझी फार अवाडति डिश. मस्त रेसेपी आणि सादरीकरण.

mdmagar

बेसन ऐवजी तांदळाचे पीठ वापरले तरी चव छान लागते . रवा घालण्याची गरज नसते .

मस्त आणि सहजसोपी दिसतेय!

बाकी पंढरपूरची वांगी १ नंबर हे जाता जाता सांगतो!

पीके

छ्या; कायतरीच काय. नरसोबा वाडीची मळितील ( क्रूष्णा नदी काठ्ची) वांगी सगळ्या जगात भारी....