सल्ला पाहीजे
माझी 12 वी 2013 ला झाली
नंतर मी ENGINEERING ला प्रवेश घेतला पण प्रथम वर्षात नापास झालो.
मी ENGINEERING सोडतोय
कृपया इतर काही संधीचे
मार्गदर्शन करावे
💬 प्रतिसाद
(92)
च
चिनार
Wed, 06/10/2015 - 12:43
नवीन
male prostitution ! हे याचं सभ्य नाव आहे.
गावरान नाव विचारू नको
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 06/10/2015 - 12:48
नवीन
=))
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 06/10/2015 - 13:16
नवीन
इतक्यात दहीहंडी फोडाची काय गरज व्हती का ?
- Log in or register to post comments
H
hitesh
Sat, 06/13/2015 - 03:16
नवीन
त्याला इतके रुमाल का ल्लागतात ?
- Log in or register to post comments
च
चिनार
Mon, 06/15/2015 - 12:22
नवीन
ह्या क्षेत्रातली एवढी डीट्टेल माहिती नाही रे हितेश मला..एखाद्याच काम कमी रुमालात होत असेल तर मला काहीही हरकत नाही..
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 06/16/2015 - 06:11
नवीन
तुमचं ते पेटंट वाक्य राहिलेच......पंत......करा.
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 06/16/2015 - 06:17
नवीन
ह्यावेळी सांभाळून घ्या इरसाल भाऊ..
आधीच , "इतके रुमाल का लागतात ते तुमच्या युवराजांना विचारा" असा सल्ला देण्याचा मोह महत्प्रयासाने आवरला आहे मी !!
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Wed, 06/10/2015 - 12:44
नवीन
"मी ENGINEERING सोडतोय" -- यावर स्टीव वॉ म्हणाला असता - ' तु तर वर्ल्ड्कपच सोडतोयस ' .
बाकी , ENGINEERING कडे केवळ नोकरीची संधी म्हणुन न बघता , त्या पदवी अभ्यासक्रमामुळे वेगवेगळे विषय शिकण्याची संधी म्हणुन बघ व कार्यरत हो .
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 06/10/2015 - 12:45
नवीन
बाबांचा निसो झाला काय?
साशंक नाखु
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 06/10/2015 - 12:56
नवीन
शिक्षण संपल्यानंतर नोकरी करणे हाच उद्देश असेल तर अभियांत्रिकीचे शिक्षण सर्वात उत्तम.
नोकरीच्या जेव्हढ्या संधी अभियांत्रिकिच्या शिक्षणामुळे उपलब्ध होतात तेव्हढ्या संधी जगाच्या पाठीवर इतर कुठल्याच शिक्षणाने मिळत नाहीत.
केटी, ब्याकलोग, मार्क्स वगैरे लोक पहिल्या नोकरीतच विचारतात. ती एकदा मिळाली की नंतर काळं कुत्रंही या गोष्टी विचारत नाही. फक्त नोकरी बदलताना आपण शिक्षनाने इंजिनियर आहोत हे सिद्ध करण्यासाठी पदवीचा कागद व्हेरिफ़िकेशनसाठी द्यावा लागतो एव्हढंच.
सांगण्याचा उद्देश हा की पुढे जाऊन नोकरीच करायची असेल तर केटया घेत, नापास होत का होईना, पण शिक्षन पुर्ण करा.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Wed, 06/10/2015 - 13:28
नवीन
त्या बिचार्या १९-२० वर्षांच्या पोराला काय काय सल्ले द्यायलात रे बाबानो...
जयंता,
नापास झालास ही अडचण सोडून इतर काही प्रॉब्लेम आहेत का रे? फी भरायची अडचण वगैरे? तसे असेल तर मोकळं लिही, घरचीच मंडळी आहे सगळी इथे.
- Log in or register to post comments
ल
लालगरूड
Wed, 06/10/2015 - 13:37
नवीन
लेखक कुठे गेला. :O सगळेच मिपाकर engineer आहे का इथले :-D :-D
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 06/10/2015 - 13:40
नवीन
तुमच्या या प्रतिसादाच्या बरोबर वरचा प्रतिसाद डॉक्टरांचा आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Wed, 06/10/2015 - 14:42
नवीन
शिक्षणाने मी इंजिनिअर नाहीये.
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Wed, 06/10/2015 - 14:24
नवीन
मित्रा, तुला इंजीनिअरिंग अजिबात आवडत नसेल / घरचांनी बळजबरी अॅडमिशन घ्यायला लावलं असेल तर गोष्ट वेगळी.
पण नापास झाला हे एकंच कारण असलं तर अजिबात सोडू नको. माझ्या बॅचला आम्ही ७ जण नापास न होता इंजीनिअर झालो, पण आता १० वर्षानंतर बघितलं तर ह्या ७ जणांपेक्षा बाकीच्या बऱ्याच मित्रांना, जे नापास झाले होते, चांगला पगार आहे, चांगल्या नोकऱ्या आहेत. पहिल्या नोकरीनंतर कोणाला तुझ्या मार्कांचं काय पडलेलं नसतं.
इंजीनिअरिंग ब्रांच चा तुला प्रॉब्लेम वाटत असला तर त्यातही तुला ४ वर्षाच्या डिग्री नंतर ऑप्शन आहेतच. तुला सोफ्टवेअर चा ऑप्शन आहे. टी.ई.एस. (टेक्निकल एन्ट्री स्कीम), बरेच कोर्सेस आहेत ज्या साठी ४ वर्षांची डिग्री लागते. अजून बरेच ऑप्शन आहेत.
लोक काय बोलतील असं वाटत असेल तर ते तर एकदम सोडून दे, लै दिवस नाही लक्षात रहात लोकांच्या :) ४ वर्षानंतर चांगली नोकरी लागली तर ती लक्षात राहील नक्की.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Wed, 06/10/2015 - 16:40
नवीन
ते वाचताहेत ना हे सगळं?
ओके. माझ्याकडून दोन शब्द.
तुम्हाला इंजीनीयरींगची आवडच असेल तर...
१. पहील्या वर्षी नापास झालात म्हणून नाउमेद होऊ नये. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे.
जो विषय अवघड जात असेल त्याचा क्लास लावा.
२. चांगल्या मित्रां बरोबर रहाणे. लेक्चर बंक मारणा-या मित्रांची संगत सोडून देणे.
३.नियमीत अभ्यास करणे. पुस्तक हातात घेतल्यानंतर , झोप अथवा कंटाळा येत असेल तर निग्रहपुर्वक त्यावर मात करणे. वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला/औषधे घेणे.
४. सर्वात महत्वाचे - एकदा केलीली चूक पुन्हा न करणे.
५. उत्तम गुण मिळाले तर कदाचीत कँपस इन्टेर्व्हुमधेच सीलेक्ट व्हाल. नाही झाले तरीही इंजीनियर्सला अजूनही डीमांड आहे.
तुम्हाला इंजीनीयरींगची आवडच नसेल तर,
१. अनिच्छेने इंजीनीयरींग करून पुढची ऐन उमेदीची वर्षे, पैसा वाया न घालवता आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घेणे.
२. आवडीच्या क्षेत्रात मात्र झोकून देऊन उत्क्रूष्टरीत्या शिक्षण पुर्ण करणे.
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Fri, 06/12/2015 - 07:41
नवीन
भावा सोडायचच ठरवलं आहेस तर एक चान्स घेऊनच सोड. तु आत्ता १ च वर्ष वाय. डी. आहेस.
सिलाबस कापी घे,जुन्या प्रश्नपत्रीका बघ, कारण किती जरी अवघड पेपर काढला तरी पेपर काढनारा मस्तर जुन्या प्रश्नपत्रीका थोडा तरी रेफर करतोच. मुख्य म्हन्जे नियमित अभ्यास कर. वन नाइट चा नाद असलाच त सोडुन दे. तु नक्की पास होशिल.
मि सोता फष्ट येर वाय.डी होतो पन नंतर परतेक वर्षी आल क्लेर विथ आबाव्ह ६० झालो ते हाच मंत्र वापरुन.
आजुन येक, लेक्चर प्राक्टीकल, सबमिशन आसलं काम वेळचावेळी केलं ना टर्मवर्क ला लय फायदा आसतो.
भावा एकदाच नेटानं भिड परत, येश वाट बघतय दोन पावलावर.
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Fri, 06/12/2015 - 11:18
नवीन
सिलाबस कापी घे,जुन्या प्रश्नपत्रीका बघ, कारण किती जरी अवघड पेपर काढला तरी पेपर काढनारा मस्तर जुन्या प्रश्नपत्रीका थोडा तरी रेफर करतोच. मुख्य म्हन्जे नियमित अभ्यास कर. वन नाइट चा नाद असलाच त सोडुन दे
आता ह्ये पन म्हाईत नसनारा म्हंजी मग त्यो विंजीनेरीगला का आला हो? ह्या असल्या गोष्टी त्यास्नी बारावीत कुनी सांगीतल्या नस्नार का ?
आन हल्ली पोरास्नी 'वन नाईट' म्हंजी कायतरी वंगाळ म्हाईत अस्तंय. उगा तसल्या गोष्टींची आट्वन करुन्श्यान दिऊ नगा.
आजुन येक, लेक्चर प्राक्टीकल, सबमिशन आसलं काम वेळचावेळी केलं ना टर्मवर्क ला लय फायदा आसतो.
च्यायला, ह्या असल्या गोष्टी मास्तरं सांगत न्हाईत व्ह्य पयल्या लेक्चरामंदी ?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 11:24
नवीन
या बाबत आधीच्या पिढीतल्या लोकांना काय अर्थ माहित होता?
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Fri, 06/12/2015 - 11:32
नवीन
@ कोमन म्यान
ते हायच वो पन हाजुक यक वेळ आठवन करुन दिली, उजळणी म्हणुन.
विंजनेरींग वाले वन नाइट ला सेम भर पुस्तक न ऊघडता पेपराच्या आदल्या रात्री जागुन अभ्यास करुन पेपर काढने (मिशन ४०) असाच अर्थ घेत्यात.
आन जो मास्तर मंडळाबरोबर वाकड्यात चालतो तो लय भारी आन सगळी लेक्चर करनारा, सबमीशन वेळेत पुर्ण करनारा, मास्तरांना डाऊट्स इचारनारा तो मात्र चाटु आसला ट्रेंड आजकाल जोरातय, त्यामुळच बाकी काय नाय बगा
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 11:56
नवीन
असेच्च वागायचे असेल तर नक्को करू इंजिनीअरींग...पुर्ण करायला खूप त्रास सुध्धा होईल आणि डोक्यात सुध्धा काहीही जाणार नाही...नावापुरते इंजिनीअर होशील
लोक काय बोलतात याला फाट्यावर मारायचे...सबमिशन वेळेत पूर्ण करण्यासारखे नाही दुसरे...जेव्हा दुसरे रात्र रात्र जागून सबमिशन पूर्ण करत असतात तेव्हा आपण तंगड्या पसरून लोळत पडलेलो असतो...इंटर्नल मध्ये कमी लागते तो बोनस
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 06/12/2015 - 12:26
नवीन
हे कोमन म्यान काय हे ?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 12:41
नवीन
सगल्यांच्या तलवारी बसू शकतील अशी कॉमन म्यान
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 06/12/2015 - 13:11
नवीन
ठ्ठो =))
मग खाटुक म्यान म्हणजे काय? खाटुकाची म्यान? हम्म...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 13:21
नवीन
नै...ती खाटूकची पर्सनल म्यान ;)
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 06/12/2015 - 14:25
नवीन
तो "खाटुक कमॉन" चा अपभ्रंश आहे !!!!!
सरावाने दोन्ही क मधील एका क (चा) मोड ऊडाला !!! हा का ना का !!
बॅट्या दुखावला नाहीस ना रे !
आजकाल दुखावण्याची साथ आली आहे रे म्हणून विचार ना !
आला पावसाळा ! आरोग्य संभाळा !!
घोष वाक्य नाखुस
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 06/12/2015 - 15:02
नवीन
ठ्ठो =)) =)) =))
नाखुस, तुमच्यावर रागवून चालेल कसं? रहायचंय म्हटलं आम्हांला इथं!
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 06/15/2015 - 05:58
नवीन
काळजी नसावी
मी स्वघोषीत प्रवक्ता * नाही त्या मुळे माझ्याकडून तुला कसलाही धोका+मोका नाही.
धन्यवाद
चिर्कुट नाखुस
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 06/13/2015 - 07:52
नवीन
ग्याजेट बेल्ट रे.
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Fri, 06/12/2015 - 13:00
नवीन
सामान्य मानुस
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Fri, 06/12/2015 - 13:18
नवीन
घाबरले की काय एव्हढे सल्ले पाहून?
़
की डायरेक्ट पुढच्या वर्षी पेढेच घेऊन येणारेत मिपाकरांना वाटायला?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 13:23
नवीन
पेढे???? =))
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Fri, 06/12/2015 - 13:31
नवीन
हो, पण तुमची शंका व्हॅलीड आहे. एका माहीतीतल्या पंटरचे इंजिनीयरींगचे इयर डाऊन मुलीत गुंतल्यामुळेच झाले आहे.
आता "गुंतल्यामुळे" या शब्दावर कोटी करायचा मोह टाळा . :-)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 13:58
नवीन
हा तो नव्हे :)
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Fri, 06/12/2015 - 14:23
नवीन
पण त्यांनी खरे कारण कुठे सांगितलेय कशामुळे नापास झालेत म्हणून !
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 20:17
नवीन
तेच तर ना...नाही संगीतले...तर मग आपण कोणताही निष्कर्श काढायला नक्कोच :)
- Log in or register to post comments
ज
जयंत माळी
Sat, 06/13/2015 - 07:32
नवीन
धन्यवाद
आपल्या चांगल्या-वाईट सल्ल्यांचा विचार नक्कीच करेन.
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 06/13/2015 - 09:05
नवीन
स्टीव्ह जाॅब्ज चं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायलाय का भाऊ?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 06/14/2015 - 17:37
नवीन
स्टीव्ह जाॅब्ज चं उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याआधी एकदा त्याचं अधिकृत चरित्र वाचावं. ते वाचल्यानंतर वाचणार्याचं मत बदलण्याची खुप शक्यता असते.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Sun, 06/14/2015 - 17:44
नवीन
मिपाकर मृत्युन्जय यांच्या मला आलेल्या खरडीमुळे हे विचार मनात आले. ते इथे मांडावेसे वाटले.
मिपावर कुणी माहिती, मार्गदर्शन, मदत मागितली तर प्रतिसाद देणारे केवळ त्या व्यक्तिला केंद्रस्थानी ठेवूनच उत्तरे देतात असे नाही. याच धाग्यावर मी अन अनेकांनी लिहिलेले प्रतिसाद शिक्षण प्रवासात धक्के खाणार्या प्रत्येकाला प्रेरणा देऊ शकतात. एखाद्याला जेव्हा ठेच लागते तेव्हा आपल्या पूर्वीही इतरांना अशाच ठेचा लागल्या आहेत अन त्यातून ते शहाणे होवून निघाले आहेत ही बाब नक्कीच हिंमत वाढवणारी ठरते.
मिपाचे मिपाकर असलेले अन नसलेले वाचक पाहता अशा चर्चा किमान शेकडो किंवा कधी कधी हजारो लोक वाचत असतात. माझ्या ओळखीचे अनेक लोक बर्याच वर्षांपासून मिपा वाचतात आवडलेलं इतरांना सूचवतात. कदाचित त्यांनी आजवर मराठीतून एक वाक्यही टंकलं नसेल पण वाचनखंड मात्र पडत नसतो.
परंतु बहुधा काही जण केवळ धागाकर्त्याला डोळ्यासमोर ठेवून प्रतिक्रिया देतात असेही दिसते. मी नवा असताना माझा तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता? हा अन काही महिन्यांपूर्वीचा मी उपवर तरुण असतो तर या काथ्याकुटांवरील काही प्रतिसाद वाचून असे वाटते की त्या प्रतिसादकांचे असे मत आहे की केवळ धागाकर्त्यालाच उर्जाबचत करायची आहे अन स्वतःचा विवाह जुळवायचा आहे :-) .
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Sun, 06/14/2015 - 18:18
नवीन
आम्हाला अकरावीच्या इंग्रजीसाठी युवकभारती या पाठ्यपुस्तकात स्व. खुशवंतसिंह यांचा टेकिंग स्टडिज सिरियसली हा पाठ होता.
आपल्या नर्मविनोदी शैलीने त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गांभीर्य वाढवण्याचा सल्ला दिला होता.
त्यात त्यांच्या आजीचे त्यांच्याबद्दलचे इंग्लंडवरून शिकून परत आल्यानंतरचे हिंदीतले वाक्य होते.
- Log in or register to post comments
न
नमकिन
Mon, 06/15/2015 - 14:39
नवीन
उमेद व प्राण सोडु नकोस.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2