प्रेम करुन करुन दमावं
प्रेम करुन करुन दमावं
असं आमच्या आयुष्यात कधी घडलंच नाही,
आणि तसं काही घडण्यासाठी कधी कोणी आमच्या प्रेमात पडलंच नाही.
प्रेमात होकार मिळवणार्याची गावात मोठी वट आहे,
समोरुन जर नकाराचा 'रेड' सिग्नल आला तर लगेचच गावच्या 'मजनु' चा डाग आहे
सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय,
त्याला जर करीना पटतेय तर आमचच घोड कुठ अडलंय.
आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचेसुध्दा क्लासेस आहेत,
तरी सुध्दा नकार मिळणार्याच्या ओठी तर मद्याचेच चिकटलेले ग्लास आहेत.
आता तर मीही म्हणतो नाही मिळाली प्रेयसी तर नसू दे,
लग्नानंतर येईलच की बायको,
फिर यारो डरना कायको?
-------------------
लेखन संपादित केले आहे
💬 प्रतिसाद
(15)
ज
जेपी
गुरुवार, 06/11/2015 - 08:36
नवीन
बाब्बौ...
असो आता सत्काराला येतो..
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 06/11/2015 - 08:46
नवीन
..पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी.
.कॉपीराईट रजिस्टर करुन घेणे.. :)
..हा विनोद झाला..
लिहीत रहा.शुभेच्छा.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 06/11/2015 - 19:28
नवीन
ठ्ठो!!! =))
काही विशेष जाहिराती आठवल्या.
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 06/11/2015 - 20:24
नवीन
ROFL =)) साष्टांग दंडवत, गवि..
'आजकल के असंतुष्ट पारीवारीक जीवन का कारण है स्ट्रेस' टाईपातल्या ताकाला जाऊन भांडं लपवणार्या जाहिराती आठवल्या..
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 06/11/2015 - 08:57
नवीन
:) बरं.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 06/11/2015 - 09:01
नवीन
मी फेसबूकवर आहे काय???
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 06/11/2015 - 09:29
नवीन
अगदी असंच काही नाही. मराठी आंतरजाल सर्व प्रकारच्या वयोगटातील, सर्व प्रकारच्या शैक्षणिक थरांतील लोकापर्यंत पोहचलंय याची ही निशाणी आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 06/11/2015 - 09:39
नवीन
नावातील उकार राहिल्याने असेलही कदाचीत!
- Log in or register to post comments
ख
खमक्या
गुरुवार, 06/11/2015 - 09:35
नवीन
चिन्ट्, ही कविता आधी कुठे प्रकाशित केली होती का?
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 06/11/2015 - 14:32
नवीन
ओह् ओक्के, त्याला तुमच्यात प्रेम म्हणतात होय!!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 06/11/2015 - 14:45
नवीन
हाहाहाहाहाहाहाहाहाह
हाहाहाहाहाहाहाहाहहा
ह्ह्पुवा
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 06/11/2015 - 15:08
नवीन
जो गोडवा 'मुळ' लिखाणात होता तो शुद्धीकरण केल्याने हरवला ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/11/2015 - 16:13
नवीन
धीरज...
मत हारना!
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
गुरुवार, 06/11/2015 - 17:06
नवीन
व्वा !
पहिल्याच लायनीत अख्ख्या कवितेचा अर्थ समजला. एकदम भारी लाईन.
प्रेम करुन करुन दमावं
दमल्यानंतर परत प्रेम करावं.
मला पण जमली कविता !
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 06/11/2015 - 19:12
नवीन
चिन्टभाव, ही कविता तुमच्या आवाजात रेकार्ड करून इथे ऑडियो टाका ना. (नक्की कोणत्या चालीत म्हणायची आहे ते कळेल.)
- Log in or register to post comments