Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

६ जून - उत्साही नॉन-पुणेकरांचा कट्टा

ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 06/11/2015 - 12:20
💬 101
मागच्यावेळी "रानमळा"ला झालेल्या कट्ट्याला वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या मिपाकरांना बोलवायला जमले नाही...यावेळी काळ्या दगडावरची रेघ असणार्या मध्यवर्ती ठिकाणी होणार्या कट्ट्यामुळे पुणेकरांची जळजळ होऊ नये या उदात्त हेतूने पुण्यातसुध्धा कट्टा होऊन जाउदे असे ठरवले...अनायसे पनीर शेखसुध्धा पुण्यात होते (कट्टेवालोंको कट्टे का सिर्फ बहाना चाहिये). हा कट्टा करायचे ठरवले आणि त्यातच मुविंनी आकुर्डीच्या कट्ट्याची घोषणा केली त्यामुळे हा कट्टा होणार की नाही...झालाच तर मिपाकर येतील की नाही याची धाकधूक होतीच. पण नुसता कट्टा करायचे असे म्हटले आणि काय तो पुणेकरांचा "उत"साह दिसला...चक्क ३ धागे आणि जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त प्रतिसाद...प्रतिसाद + सूचना यांचा भडिमार नुस्ता...एखादा नवखा मिपाकर कैच्याकै हुरळून जाईल अश्याने (मी अनुभवी होतो म्हणून ठिक आहे :D ) काही जणांचा उतसाह इतका की पक्षी+तीर्थ कट्ट्यासाठी शुध्द सात्विक शाकाहारी जेवण मिळण्याचे ठिकाण सुचवले गेले (आता हा पुणेरी खौचट्टपणा होता हे मी लग्गेच ओळखलेले llllllluuuullllluuuu) बाकी सगळ्या हौश्या + नवश्या + गवश्यांनी भरलेल्या ३ धाग्यांच्या जवळपास साडेतीनशे प्रतिसादांत उपयोगाचे कैच नव्हते...यालाच पुण्यात चोखंदळपणा म्हणतात अशी जुनीच माहिती नव्याने समजली...काही अतीउतसाही मिपाकरांनी या चोखंदळपणाचा संबंध लग्गॆच पुण्यात (न झालेली) मेट्रो, पुण्यातले खड्डे याच्याशीही लावायचा प्रयत्न केला परंतू पुणेकरांनी त्यांना तितक्याच तत्परतेने फाट्यावर मारले...शेवटी पुणेकरच हो ते...स्वतःचा मुद्दा कितीही चुकीचा असो शेवटचे वाक्य स्वतःचेच असले पाहिजे हा अट्टहास =)) तर शेवटी कट्टा करण्यास काही टाळकी तरी जमली तर काहींनी व्यवस्थित टांग मारली त्यातील काही मानाचे टांगारू (पुराव्यासकट) नाखू (http://www.misalpav.com/comment/691942#comment-691942) मितान (http://www.misalpav.com/comment/692016#comment-692016) देवांग (http://www.misalpav.com/comment/692055#comment-692055) पिलीयन रायडर (http://www.misalpav.com/comment/692115#comment-692115) ठरल्याप्रमाणे ६ तारखेला संध्याकाळी पनीर शेख सगाकडे पोहोचले आणि दोघांनी मिळून शेजारीच सूडच्या घराकडे कूच (मराठीतला) केले...मी फ़ूरसूंगीहून व्हाया स्वारगेट सगाकडे पोहोचायला PMPML च्या कृपेने फक्त १ तास लागला. सूडच्या घरी पोचत असतानाच २ चेहरे खिडकीच्या गजांमधून डोकावून माझ्या दिशेने हातवारे करताना दिसले...इतके अतिउत्साही लोक मिपाकर सोडून दुसरे कोणी असूच शकत नै याची खात्री होतीच :) सूडच्या घरी मात्र अगदी दोन शेजारी मिळून रोजच्या शिळोप्याच्या गप्पा कराव्या तश्या गप्पा रंगल्या सूडचे घर म्हणजे खरोखर त्याने घरावर सूड उगवल्यासाराखेच आहे =)) मी जास्त काही सांगणार नै नाहीतर तो घर आवरायला लावेल ;) पण त्याच्याकडचे रसगुल्ले (पिणे अनिवार्य असणार्या पाकासकट) मात्र भन्नाट होते...बोलता बोलता असे समजले की सूड त्याच्या मावशीकडे(?) स्वारगेटला जाउन मग कट्ट्याला येणार होता. खाखोदेजा कारण १० मिनीटांत येतो सांगून तो जो सटकला ते जवळपास अर्ध्या-पाउण तासाने आला तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी सगाच्या घरी गप्पांचा अड्डा जमवला, बुवाबाजी करणारे एक अत्तरवाले सुध्धा विदाउट अत्तर आले (कदाचित अत्तरे खास लोक येणार असतील तेव्हाच जवळ बाळगीत असावेत :), आल्या आल्या लग्गेचच त्यांनी बूच लावण्याचे उपाय यावर एक काथ्या कुटला :) पनीरबाबा अत्तरबुवांशी गप्पा मारत असतानाच अचानक सगा "अरे मला कोणीतरी मिस कॉल देत आहे" असे बोंबलला...त्या नंबरला फोन करताच "अर्रे (आळश्यांन्नो) कुठे (उलथला) आहात...पोचलात का (शिंच्यांन्नो)...माझा इथे (सद्गुणांचा) पुतळा झालाय" अशी आर्तमग्न मधुर वाणी ऐकू आली. नेमक्या त्याच वेळी माझ्या चतुरभ्रमणध्वनीवरसुध्धा तस्साच मेसेज आलेला आणि मग लक्षात आले...धाग्यावर येणार असे न सांगून एक मृत्युंजय असणारा पुणेकर (तो पुणेकर आहे हे त्याचे मत) शोरबामध्ये पोहोचलेला...मग मात्र आम्ही कट्ट्याच्या ठिकाणी कूच केली...या वेळेस तरी ती मिपाप्रसिध्ध उडनमांडी बघायला मिळेल या आशेने पनीरबाबा बुवांच्या activa वर स्थानापन्न झाले परंतू त्यांची ती इच्छा अपूर्णच राहीली आणि नंतर कदाचित मत्स्याहार व सोनेरी पाण्याच्या आस्वादाने ती इच्छा विसरली गेली असावी ;) कट्टा सुरु करताना काही मिपाकरांची वेगवेगळ्या कारणांसाठी तीव्रतेने आठवण काढली गेली (मुवि, नाखू, वल्ली, औरंगजेब उचक्या लागलेल्या का?). सूड सुध्धा तोपर्यंत (एकदाचा) आला...मग जी धमाल सुरु झाली त्यातून शोरबाचे वेटरसुध्धा सुटले नाहीत :) प्रत्येकाने आपापल्या आवडीने सामिष/गवताळ खाणे आणि (झेपेल ते व झेपेल तितकेच) रंगीत पाणी मागवले...आणि मग आजकाल मिपावर सर्वांत लोकप्रिय असलेले गणपति व सरस्वती कसे आहेत याची चौकशी कथानायकाकडे करावी अशी बुवांना गळ घालण्यात आली (काही आगोबा मिपाकर यालाच गळाला लावणे असे बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही)...त्यातच ती सिंड्रेला आली आणि मग सिंड्रेलाची वैजू बनेल की बुवांचा पाद्री बनेल यावर एक दू दू संवाद रंगला :) पण बुवांनी विदेशी सिंड्रेला आणि विदेशी कार्बयुक्त पाणी एकमेकांत मिसळले की "लोहा ही लोहे को काटता है" या लॉजीकने विदेशी विदेशी क्यँसल होऊन ते देशी बनते असे शास्त्रीय कारण देऊन सिंड्रेलाची वैजू केली आणी तिचा आस्वाद घेतला (म्हणजे पेयाचा) ;) बुवांनी शिताफीने वैजूच्या गोष्टींवरून गाडी हळूच कोकणावर वळवली आणि मग नेहमी प्रमाणे कोकणातल्या भुतांच्या गोष्टी सुरु झाल्या. बोलता बोलता नकळत कोकणातल्या एका holy ghost चा पर्दाफाश त्या दू दू भुताने स्वत:च केला =)). मग प्रत्येकाने आपापले सुपर नॅचरल अनुभव कथन केले पण त्यामुळे एक इब्लिस मिपाकर मात्र टरकला ;) आणि लगेच त्या रात्रीचा त्याचा मुक्काम सगाकडे असेल असे सगाला न विचारताच जाहिर केले :D. कट्टा सुरु असतानाच चिमणूचा फोन येउन गेला, लगेच सगाब्रोब्र काहीतरी कुजबुजसुध्धा करून घेतली...तीर्थकट्टा असल्याने कोणाचे विमान किती हवेत आहे याची जमिनीवरुनच चाचपणी करून मिपावरील तीर्थंकरांबद्दलचे त्याचे अज्ञान उघड केले. या सगळ्या बरोबरच ह.भ.प.बुवांच्या सुरस कथा, गूळ पाडणे म्हणजे काय यांसारख्या कुतुहलांच्या विषयांबद्दल परिसंवाद झाले (तीर्थ म्हटले की असे विषय आपोआप येतात). गवताळ लोकांबरोबर बोलत असताना म्र्युत्युन्जय सगाचा गेल्या ३ वर्षांपासून शेजारी असल्याचा साक्षात्कार सगाला झाला :) न आलेल्या मिपाकरांपैकी काहीजण सक्काळपासून कोण येणार आहे, कोण आलेले आहेत असे सारखे थोड्या थोड्या वेळाने विचारात होते...पुढल्यावेळी त्यांनी कट्ट्याला कोण उपस्थित हवे आहे हे आधीच कळवावे...अपहरण फेम अन्या दातारांना वेळेत सुपारी पोचती केली जाईल :) हे सगळे होत असतानाच सगळ्यांना आणखी एका चकमकीची उत्सुकता होती जी ७ च्या कट्ट्याला होणार होती...अस्मादिक व अनाहितांची ऐतिहासिक भेट :D कसे भेटावे काय बोलावे असे सल्लॆ मिळत असतानाच मघासच्याच (घाबरलेल्या) इब्लिस डोक्यातून एक सुपीक कल्पना निघाली की मी ७ च्या कट्ट्याला एखादा दुसरा आयडी बनून जावे आणि अनाहिता माझ्याबाबत काय काय बोलतात हे आयडीचे वेशांतर करून जाणून घ्यावे. कोणता आयडी कोणता आयडी ठरवता ठरवता सध्ध्या मिपावर गाजत असलेल्या "दमामि" हा (माझाच???) आयडी मुक्रर झाला ;) (७ च्या कट्ट्याला काय काय झाले ते दुसर्या वृत्तांतात येईलच) कट्ट्याची सांगता पानाच्या ऐवजी खत्री आईस्क्रीमने झाली...आईस्क्रीम संपवता संपवता "एकापेक्षा जास्त मुलांची अव्यवहार्हता" यावर एक छोटा परिसंवाद झाला...सर्व संवादपटूमात्र अविवाहित आहेत ;) हा कट्टा पुण्यात झालेला तरीही तो नॉन-पुणेकरांचा* कट्टा होता... *बुवांचा संचार इहलोकी सर्वत्र असतो त्यामुळे बुवांना आम्ही पुणेकर मानत नाही :D

प्रतिक्रिया द्या
19182 वाचन

💬 प्रतिसाद (101)
ए
एस गुरुवार, 06/11/2015 - 12:29 नवीन
उत-साह उतू चाललेला दिसत आहे. गुड गुड! :-D
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 06/11/2015 - 12:32 नवीन
फोटु???
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 06/11/2015 - 12:46 नवीन
मस्तच. असा पाहिजे वृ वृ वृत्तांत हहपुवा . अवांतर :- हायला आमचं गुरुजी अकलुजला गेले आहेत म्हणुन. त्यांनी एकदा का हा वृ त्तांत चावला आपलं ते हे वाचला की तुला बुकललाच समज त्यांनी. गुरुजींचा एकमेव शिष्य पम्या कळ(ला)वेकर.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:45 नवीन
गुरुजींचा एकमेव शिष्य पम्या कळ(ला)वेकर.
तू तांब्या धरलेला नाहीस...तस्मात तू (ऑफिशीअल) शिष्य नाहिस वरचे वाक्य "मी शेंगदाणे खाल्ले नाहीत..." या चालीवर वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
स
सूड गुरुवार, 06/11/2015 - 12:58 नवीन
पुढल्या वेळी तुला घर आवरायला लावतो बघ!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:46 नवीन
रसगुल्ल्यांचा अख्खा डब्बा (तो सुध्धा रसगुल्ल्यांन्नीच भरलेला) देणार असतील तर येतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/11/2015 - 13:04 नवीन
फर्स्ट थिंग्स फर्स्ट. मी कट्ट्याला येणार हे आधीच जाहीर केले होते पण बहुधा ३ धाग्यांच्या महापूरात माझा प्रतिसाद वाहुन गेला. दुसरी गोष्ट म्हणजे मी पुणेकर नाही हे समजल्यावर निम्म्या मिपाकरांना आणि किमान चिनारला तरी तु खोटे बोलतो आहेस याची खात्री पटेल. तर इथे खुलासा करणे गरजेचे आहे की मी जन्माने अ पुणेकर असलो तरी कर्माणे पुणेकर आहे. (जगात या दोनच क्याटेगर्‍या असतात असे पुणेकरांना वाटते. पु लं देशपांडे मुळचे मुंबईकर असल्याने त्यांनी उगा ३ क्याटेगर्‍या काढल्या बाकी काही नाही) बाकी मिपाच्या जगप्रसिद्ध आशिका बद्दल झालेली चर्चा इथे का म्हणे उद्धृत नाही केली?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/11/2015 - 13:13 नवीन
मी कट्ट्याला येणार हे आधीच जाहीर केले होते पण बहुधा ३ धाग्यांच्या महापूरात माझा प्रतिसाद वाहुन गेला.
शक्यता नाकारता येत नाही
दुसरी गोष्ट म्हणजे मी पुणेकर नाही हे समजल्यावर निम्म्या मिपाकरांना आणि किमान चिनारला तरी तु खोटे बोलतो आहेस याची खात्री पटेल.
काहिही घोळ न घालता कट्ट्याला आलात...इतकेच पुरेसे आहे पुणेरीपणा अजून व्यवस्थित भिनला नाहीये हे दाखवायला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
च
चिनार Fri, 06/12/2015 - 14:29 नवीन
किमान चिनारला तरी तु खोटे बोलतो आहेस याची खात्री पटेल.
माझं नाव का आलं ते कळलं नाही.. हलकं घेतलंय...पण मुद्दा कळला नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 18:26 नवीन
असे जाहिरपणे सांगायचे नस्ते...आता नेक्ट टैम पासून जपून ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 06/12/2015 - 19:21 नवीन
बाकी मिपाच्या जगप्रसिद्ध आशिका बद्दल झालेली चर्चा इथे का म्हणे उद्धृत नाही केली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 19:35 नवीन
तुमने हे मिसल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मृत्युन्जय Sat, 06/13/2015 - 08:22 नवीन
हलकं घेतलंय...पण मुद्दा कळला नाही.. ऑ मुद्दा कळाला नाही? तुम्हीच ना ते? तेच ना तुम्ही? http://www.misalpav.com/node/30724
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Sat, 06/13/2015 - 09:37 नवीन
।होय . तो मीच.. पण त्याचा इथे काय सम्बन्ध ते कळल नाही... असो..... हलकच घेतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पैसा गुरुवार, 06/11/2015 - 13:05 नवीन
मस्त लिहिलंय!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/11/2015 - 13:14 नवीन
ठ्यांकू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नाखु गुरुवार, 06/11/2015 - 13:09 नवीन
वृत्तांत. फोटो कुठे "शीक" आहेत?
"फोटो नाय तर कट्टा नाय"
सदर अवरतरण सूड यांचेंकडून या धाग्यापुरते उसने घेतले आहे. सातचे कट्याबाब्त आम्चे बारा वाजले हे कबूल ! सात्-बाराचा नाखुस
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 06/11/2015 - 13:28 नवीन
पुन्हा एकदा फोटो नाहीत तर हा कट्टा झालाच नाही.. हे खयाली पुलावच आहेत!! आणि तुम्ही ५६ धागे आणि १५२७२८९२ प्रतिसाद द्याल तर कसं समजावं की नक्की काय ठरलय! ;) असो.. मी पुण्यात नव्हतेच ६-७ जुनला, नाही तर आलेच असते कट्ट्याला. मी ह्या कट्ट्यांच्या एकाही धाग्यावर प्रतिसाद न देताही मी मानाची टांगारु कशी हे कळाले नाही. मागे एका धाग्यावर "माहिती असतं, तर आले असते" असं म्हणलं ते केवळ १. कट्टा घरापाशी होता आणि २. मी रिकामी होते ह्या कारणांमुळे.. ती काय मी आजन्म कट्ट्याला येईनच अशी कमिटेमेंट केली नव्हती!! बरं ते ही असोच.. आठवण काढल्याबद्दल धन्यवाद! असेच खयाली पुलाव पकवत.. आपलं कट्टे करत रहा हो.. पुलावाची डिट्टेल रेसेपी आवडली!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:52 नवीन
तुम्ही ५६ धागे आणि १५२७२८९२ प्रतिसाद द्याल तर कसं समजावं की नक्की काय ठरलय! ;)
हे आम्ही नाही तर "चोखंदळ" पुणेकरांना समजायला हवे llllluuuuuullllluuuuuu
मी पुण्यात नव्हतेच ६-७ जुनला, नाही तर आलेच असते कट्ट्याला.
यावर एका मिपाकराची प्रतिक्रिया "आत्याबाईला मिश्या असत्या तर..." अश्शी होती
मागे एका धाग्यावर "माहिती असतं, तर आले असते" असं म्हणलं ते केवळ १. कट्टा घरापाशी होता आणि २. मी रिकामी होते ह्या कारणांमुळे.. ती काय मी आजन्म कट्ट्याला येईनच अशी कमिटेमेंट केली नव्हती!!
कट्ट्याला यायचे असेल तर घरापासूनचे अंतर हा मुद्दा गौण असतो...शिका जरा काहितरी मुंबैकरांकडून कट्ट्याला काय फक्त रिकामटेकडे/पेन्शनर मिपाकरच येतात? अभ्यास वाढवा llllluuuuuullllluuuuuu
आठवण काढल्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद :)
असेच खयाली पुलाव पकवत.. आपलं कट्टे करत रहा हो..
वो तो चालूईच रैगा
पुलावाची डिट्टेल रेसेपी आवडली!
भेटून वाचून आनंद झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ल
लालगरूड गुरुवार, 06/11/2015 - 13:33 नवीन
आवडला टवाळ लालगरूड :-D
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 06/11/2015 - 13:37 नवीन
झालेला वाटतं कट्टा!का मनाचे श्लोक लिहिले आहेस रे!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:53 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ख
खटपट्या गुरुवार, 06/11/2015 - 13:49 नवीन
मस्त व्रुत्तांत !! कट्टा मिसल्यामुळे हळहळ आणि जळजळ...
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 06/11/2015 - 14:03 नवीन
मस्त रे
  • Log in or register to post comments
द
दमामि गुरुवार, 06/11/2015 - 14:19 नवीन
अनाहिता माझ्याबाबत काय काय बोलतात हे आयडीचे वेशांतर करून जाणून घ्यावे. कोणता आयडी कोणता आयडी ठरवता ठरवता सध्ध्या मिपावर गाजत असलेल्या "दमामि" हा (माझाच???) आयडी मुक्रर झाला ;) अनाहितानी बिंग ओळखले हे खरे, म्हणतात ना, गिऱ्या लेकिन नाक उप्पर!:)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 06/12/2015 - 08:36 नवीन
गिऱ्या लेकिन नाक उप्पर
जर गिर्‍या असेल तर त्याला काहीही शक्य आहे, नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:54 नवीन
अनाहितानी बिंग ओळखले हे खरे, म्हणतात ना, गिऱ्या लेकिन नाक उप्पर!:)
संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या आणि इतके जळ्ळू नका ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
ज
जेपी गुरुवार, 06/11/2015 - 14:26 नवीन
फालतु लेख.अत्यंत हिणकस प्रतिसाद देणार होतो पण आवरत घेतो. मुळात प्रतिसादच देणार नव्हतो पण टक्या सारख्या मित्राला योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. (इनोप्रेमी)-जेपी किती करायचे ते कळवा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:55 नवीन
तुझे नाव टांगारूंच्या यादीत टाकायचे राहीले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/11/2015 - 16:03 नवीन
काही अपरिहार्य कारणामुळे २ही कट्टे हुकले, पण २ही कट्ट्याचा व्रुत्तांत एकदम खुसखूशीत. फोटो नाही टाकलेत तरी चालेल. मिपाकर नेहमीच आमच्या मनांत असतात. कट्ट्याला हजर राहू शकलो नाही, त्याची हळहळ मात्र अज्जून वाटत आहे.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा गुरुवार, 06/11/2015 - 16:14 नवीन
छान लिहिलंय, आवडेश .. तुझे पुणेकरांबद्दल चे सगळे कॉमेंट्स फाट्यावर मारण्यात आले आहेत मोठ्या मनाने, तुला तरी कधी कळायचा आमचा मोठेपणा, नाही का? ;) बाकी टका, अनाहिता तुझ्याबद्दल काही ही बोलत नाहीत हां, काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:57 नवीन
तुझे पुणेकरांबद्दल चे सगळे कॉमेंट्स फाट्यावर मारण्यात आले आहेत मोठ्या मनाने, तुला तरी कधी कळायचा आमचा मोठेपणा, नाही का? ;)
हम भाव नै देते lllluuuuulllluuuu
बाकी टका, अनाहिता तुझ्याबद्दल काही ही बोलत नाहीत हां, काळजी नसावी.
ते "कल्जी क्रू न ये" असे ल्हितात ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 06/12/2015 - 19:22 नवीन
अच्रत बव्लट मेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 19:35 नवीन
हे सुध्धा "अचत बव्लत" असे ल्हितात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
इ
इरसाल Sat, 06/13/2015 - 11:10 नवीन
माजेशी मय्तरी कर्नार कं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 06/14/2015 - 12:39 नवीन
खिक्क...हे कोणत्याच अनाहितेला + मिपाकरणींना (रंगा इज वॉचींग) विचारायचे नै....माझ्या टैपची इथे कुण्णीच्च नै :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
प
प्रीत-मोहर गुरुवार, 06/11/2015 - 16:32 नवीन
छान लिहिलाय. पण हा खयाली पुलावच आहे!!!! फोटो नाय तर कट्टा नाय श्रेय-अव्हेरः मा. मिपाकर
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत गुरुवार, 06/11/2015 - 18:23 नवीन
वृतांत आवडला पण फोटो कुठे आहेत?
  • Log in or register to post comments
ज
जुइ गुरुवार, 06/11/2015 - 19:44 नवीन
फोटो कुठे आहेत?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/11/2015 - 19:56 नवीन
अपवाद नसलेला मिपा नियम : "फोटो नाय तर कट्टा नाय" !
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 06/12/2015 - 12:25 नवीन
"फोटो नाय तर कट्टा नाय" !
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:40 नवीन
जल्ला तु पनं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 06/12/2015 - 13:13 नवीन
तरी मी सांगत होतो फोटो काढा, माझ्याकडे त्या हैदराबादी का कायशा कबाबांचा आणि रसगुल्ल्यांचा फोटो आहे. पण तुला अपलोड करावा लागेल. मला पिकासावर अपलोड करायची पावर नाय हापिसातून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 13:27 नवीन
फटू तु आणि गुर्जींनी काढलेत ना? गुर्जी दौर्यावर आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
इ
इशा१२३ गुरुवार, 06/11/2015 - 20:17 नवीन
झाला का कट्टा.बर .फोटो कुठ आहेत?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 06/12/2015 - 03:17 नवीन
फोन रिसिव्ह करायचं बटणं सापडलं का रे वेळेत तुला? =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/12/2015 - 12:58 नवीन
फोन रिसिव्ह करायचं बटणं सापडलं का रे वेळेत तुला? =))
माझ्याकडे अँड्रॉईड फोन आहे, त्याला स्वाईपचा पर्याय असतो...बटण नस्ते कै lllluuuuullllluuuuu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
य
यसवायजी Sat, 06/13/2015 - 10:01 नवीन
ओ टेकग्रू, अभ्यास कमी पडतोय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sun, 06/14/2015 - 12:40 नवीन
म्हांज्याकडे कार्बन १२+ आहे रे...गरिबांचा फोन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
म
मदनबाण Fri, 06/12/2015 - 03:40 नवीन
कट्टा झाला, फोटो ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Uncensored Trailer [Full Version] Nagrik Marathi Movie बोला विठ्ठल ! :- नागरिक
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा