Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काशिद बिच आणि बिर्ला मंदिर

ज
जगप्रवासी
गुरुवार, 06/11/2015 - 12:29
💬 20
या रविवारी अलिबागच्या फणसाड अभयारण्यात जायचं प्लान केला होता पण तो प्लान काही कारणाने रद्द करावा लागला. म म्हटलं आता निघायचं फिक्स केल आहे तर कुठेतरी फिरून येऊ म्हणून मग काशिद बिच ला जायचं फिक्स केल. आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे घरातून बाहेर जाण्यासाठी तसा विरोधच होता पण रविवारी सकाळी वातावरण नीट असल्यामुळे मग ग्रीन सिग्नल मिळाला आणि सकाळी ७ वाजताच बाइकला किक मारून काशिद कडे प्रस्थान केलं. घरून निघताना काहीच खाल्ल नसल्यामुळे मग वडखळ नाक्याला थांबून वडा मिसळ हाणली, आणि त्या दुकानातली चहा इतकी आवडली कि दोन कप चहा घशाखाली कधी उतरली ते कळाल पण नाही. पोटोबा एका ठिकाणी छोटया डबक्यात कमळ फुललेली बघितल्यावर सौ नी गाडी थांबवायला लावली. मग थोडासा क्लिकक्लिकाट केला. कमळ कमळ १ जस जस अलिबाग जवळ येऊ लागल तस नारळांच्या झाडांची दाटी वाढू लागली आणि सोबत गारवा पण वाढू लागला. रणरणत्या उन्हात त्या थंडगार सावलीत गाडी चालवायला मजा येत होती. अखेर ज्यासाठी इतके दूरवर प्रवास करून आलो होतो त्याच पहिल दर्शन झाल समुद्र बिच वर पोहोचल्यावर मात्र थोडी निराशा झाली कारण गिरगाव चौपाटी प्रमाणे तिथे गर्दी झाली होती. बीच बीच बीच तिथे फिरताना या महाशयांची स्वारी करण्यासाठी लोकांची गर्दी होती उंट उंट आणि ह्या गाड्या एकदम दिमाखात रांगेत आपल्या पाळीची वाट बघत उभ्या होत्या गाडी एका दुकानात कपडे बदलण्यासाठी विचारणा केल्यावर कळल कि वीज नसल्यामुळे पाणी नव्हत आणि त्यामुळे समुद्रात खेळून आल्यावर अंघोळीसाठी पाणी नसणार म्हणून पाण्यात न जाता फक्त बीच वर फिरत होतो. एक चिमुरडा तिथे स्वतःचा किल्ला बांधण्यात मग्न होता किल्ला तिथे पर्यटकांसाठी झोपाळे बांधून ठेवले आहेत, कोनीही यावे कुठल्यापण झोपाळ्यावर झोप काढावी कोणीच त्रास द्यायला येत नव्हत. मग भटकून थकल्यावर तिथल्याच एका झोपाळ्यावर अंग टाकून दिले. वरती माडांच्या झावळ्यांची गार सावली, मस्त हवा म काय लगेच ब्रह्मानंदी टाळी लागली ती सौ च्या आवाजाने मोडली. मग तिथून जवळच असलेले बिर्ला मंदिर बघायला निघालो. इथून जवळ असणारे कोरलई किल्ला, रेवदंडा किल्ला बघितलेले असल्यामुळे परत गेलो नाही. वाटेत एक मंदिर लागल, त्यात राधा कृष्णाची छान मूर्ती पाहून स्वतःच्याही नकळत हात जोडले गेले. मंदिरातल्या घंटेवर कलाकुसर केली होती. राधा कृष्ण घंटा गरुड बिर्ला मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे, तिथे कॅमेरा, मोबाईल, बैग न्यायला बंदी असल्यामुळे तिथले फोटो काढता आले नाहीत. त्या मंदिरातल्या मुर्त्या अप्रतिम आहेत, बघतच राहाव्यात अशा. गणपती, महालक्ष्मी, शंकर पार्वती आणि माझी आवडती राधाकृष्णाची मूर्ती. मन एकदम प्रसन्न होऊन जात. आदित्य बिर्ला ग्रुप तर्फे या मंदिराची देखभाल केली जाते, एकदम साफ स्वछ अस हे मंदिर आहे. इथली शांतता एकदम हवीहवीशी वाटणारी, मोबाईल ला बंदी असल्यामुळे माणस चक्क एकमेकांशी इथे बोलताना दिसतात. आभाळ भरून यायला लागल होत, म्हणून मग कॅमेरा, मोबाईल, पाकीट तत्सम वस्तू प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ठेवल्या आणि पहिल्या पावसात भिजायला तयार झालो. काळे ढग असेच काही फोटो मोकळ आकाश२ मोकळ आकाश फिरते राहा, आपला जगप्रवासी

प्रतिक्रिया द्या
7360 वाचन

💬 प्रतिसाद (20)
स
सुनील गुरुवार, 06/11/2015 - 12:48 नवीन
आदित्य बिर्ला ग्रुप तर्फे या मंदिराची देखभाल केली जाते
अजून बिर्लाच? विक्रम इस्पातची मालकी गेल्या सहा वर्षांत आदित्य बिर्लांकडून गोयंका आणि गोयंकाकडून जिंदाल अशी हस्तांतरीत झाली तरी गणपती मंदिर अद्याप बिर्ला मंदिरच?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/11/2015 - 12:53 नवीन
धागा छान पण ........... चहा आवडली??????????????????????????????????????????????????????????? चहा घशाखाली उतरली???????????????????????????????????????????????????? आता हे असे महाराष्ट्राच्या कुठल्या भागात बोलतात म्हणे? कुठेतरी बोलत असणारच हे नक्की कारण मराठी दर शंभर मैलांवर बदलते म्हणे
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 06/11/2015 - 14:54 नवीन
आम्ही रायगडकर बोलतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
र
रुपी गुरुवार, 06/11/2015 - 23:03 नवीन
धागा छान आहे. पण मला वाटते असे बोलत असलो तरी लिहिताना मात्र शुद्ध मराठीत लिहिण्याची काळजी लेखकांनी घेतली पाहिजे. साहित्य संपादकांनी फोटो, दुवे अशा तांत्रिक बाबींबरोबरच लेखनात या गोष्टींतही मदत करावी असे मनापासून वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अगम्य Fri, 06/12/2015 - 02:25 नवीन
पु ल यांनी मुंबईकरांचे वर्णन करताना "चाय पिली" असा प्रयोग केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सिरुसेरि गुरुवार, 06/11/2015 - 13:02 नवीन
वेपारी लोक 'मसालानी चाय पिली' असे बोलतात . असे वाचले आहे .
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 06/11/2015 - 14:48 नवीन
कटवड्याचा फोटो बेक्कार कातिल आहे...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/13/2015 - 17:03 नवीन
+++१११ चक्क लाळगळेरी अवस्था झालेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कंजूस गुरुवार, 06/11/2015 - 16:50 नवीन
फणसाडचीच हद्द या काशिद रस्त्याला लागून आहे.फार सकाळीच गेलो तर पक्षी दिसतात.
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील गुरुवार, 06/11/2015 - 17:01 नवीन
कमळाच्या फुलांनी भरलेलं 'डबकं'? तो कुरूळ गावाचा तलाव आहे. काशिदला उंट, गाड्या, दुकानं! पूर्वीचं काशिद राहिलं नाही...
  • Log in or register to post comments
ज
जुइ गुरुवार, 06/11/2015 - 23:51 नवीन
तेवढे फोटो मोठे करुन टाका.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 06/12/2015 - 01:22 नवीन
फोटोज व वर्णन आवडले. पहिल्या फोटोत गाडीच्या किल्ल्या रसभंग करत आहेत.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 06/12/2015 - 06:26 नवीन
कटवड्याचा फोटो आवडल्या गेलेला आहे. बाकी फोटो मस्तच पण या फोटोतली तर्री पाहून वारल्या गेलेले आहे.... यावेळी पनवेलला घराकडे गेल्यावर चक्कर मारली जाईल :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/12/2015 - 06:58 नवीन
मस्त ! कलाकुसर केलेली घंटा विशेष आवडली... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Uncensored Trailer [Full Version] Nagrik Marathi Movie बोला विठ्ठल ! :- नागरिक
  • Log in or register to post comments
श
शिल्पा नाईक Fri, 06/12/2015 - 07:59 नवीन
छोट डबकं?... अहो तो बराच मोठा तलाव आहे अन त्यात खुप सारी कमळं नेहमी फुललेली असतात... ते सिमेंटच कमळ दिसलं नाही का तिथे?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/12/2015 - 10:06 नवीन
मस्त ... आवडली ट्रीप... नुकतेच ६ महिन्यांपुर्वी काशीद बिच वर टेंट मध्ये राहिलो होतो .. मस्त एकदम... नेहमीच्या काशीद बिच पेक्षा ५०० -७०० मिटर आनखिन पुढे.. त्यामुळे गर्दी नव्हती.. कोणी नव्हते... रात्रीच्या लाटांचा आवाज.. पहाटेचे शितल वारे.. अहाहा.. निळा समुद्र आण सकाळनंतर तेथे आलेले डॉल्फीन ( नक्की तेच का माहीत नाही काही म्हणातात त्या सारखे दिसणारेच ते मासे आहेत ) क्रिकेट खेळत असल्याने डोल्फिन कॅमेरात घेता आले नाही... बाकी बिर्ला मंदिर आवडले नव्हते...
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 06/13/2015 - 22:46 नवीन
वीज नसल्याने पाणी नाही पर्यटनाच्या सुविधा सुधारण्यास भरपूर वाव आहे टेंट ची कल्पना भारी आवडली जलचरांची खादाडी केल्याचा कोणताही पुरावा लेखात न टाकल्या बद्दल सौम्य निषेध
  • Log in or register to post comments
च
चारु राऊत Sun, 06/14/2015 - 08:59 नवीन
आमच्या तळ्याला डबक म्हणता? :(
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 06/15/2015 - 11:27 नवीन
विशेष् करुन <<मोबाईल ला बंदी असल्यामुळे माणस चक्क एकमेकांशी इथे बोलताना दिसतात.>> हे वाक्य भयानक आवडले.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 06/15/2015 - 11:28 नवीन
मोबाईल ला बंदी असल्यामुळे माणस चक्क एकमेकांशी इथे बोलताना दिसतात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा