Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फक्त तू नाही आहेस..................

झ — झंडुबाम, गुरुवार, 06/11/2015 - 19:58
रोज सकाळी उठल्यावर आरसा बघितला की जाणवतं जे तुझ्या डोळ्यात दिसतं ते आरशात दिसत नाही आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस नंतर अंघोळ करताना दिसतात शरीरावर तुझ्या अस्तित्वाच्या खुणा एक एक खूण म्हणजे तू लिहिलेली एक कविताच मग पुन्हा पुन्हा कवितांची आवर्तनं आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस एकटा असताना तुझा गंध जाणवतो खूप जवळ उभी आहेस वाटून जातं पण एक जीवघेणी शांतता असते सगळीकडे तुझा मोहक आवाज कुठेच नसतो आणि मग जाणवतं की फक्त तू नाही आहेस रात्री आकाशाकडे एकटक बघणं होतं चंद्र रोजच्यासारखाच असतो पण चांदण्यात तू नसतेस तेव्हा तुझी एक एक आठवण माझ्या डोळ्यातून ओघळत असते आणि मग जाणवतं कि फक्त तू नाही आहेस फक्त तू नाही आहेस..........................................

प्रतिक्रिया द्या
1542 वाचन

💬 प्रतिसाद (7)
स
सतिश गावडे गुरुवार, 06/11/2015 - 20:09 नवीन
छान आहे कविता. मात्र "फक्त तू नाही आहेस" हे खटकलं. ते "सिर्फ तुम नही हो" चं भाषांतर वाटतं. "फक्त तू नाहीस" हे योग्य वाटतं.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 06/12/2015 - 08:24 नवीन
+१. चांगलं लिहिताय. फक्त या सूचनेचा विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वपाडाव Fri, 06/12/2015 - 08:53 नवीन
अगदी. अगदी. हिन्दी किण्वा उर्दु गझल (अनुवादित) छापल्यासारखे वाटून गेले... आशय छान...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ल
लालगरूड गुरुवार, 06/11/2015 - 20:18 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 06/11/2015 - 20:51 नवीन
चांगली आहे.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 06/12/2015 - 17:14 नवीन
भा पो
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 06/12/2015 - 17:14 नवीन
भा पो
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा