Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग १

ग
गवि
Fri, 06/12/2015 - 07:36
🗣 106 प्रतिसाद
सदस्यहो.. हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या बातम्या सतत ऐकू येतात. अनेकदा एखादी बातमी खूप इंटरेस्टिंग असते आणि कोणाशीतरी ती शेअर करावीशी वाटते. पण खूप लिहायला वेळ नसतो. खूप लिहायला एकदम सुचतही नाही. पण मित्रांमधे बातमीचा उल्लेख केला की सर्वांची मिळून त्यावर चर्चा रंगते. मॅगीबंदी असो किंवा म्यानमारमधली कारवाई..(ती आपल्याच हद्दीत झाली म्हणे).. इत्यादि.. बातमीचा मजकूर , हेडलाईन, आणि तिची मूळ लिंक शेअर करणं.. तसंच त्यावर वेगवेगळे दृष्टिकोन असलेल्या लोकांना आपापली मतं देता येणं या कारणांसाठी कोणीही या धाग्यात बातमी आणि प्रतिसाद लिहू शकेल. वाचनाच्या सोयीसाठी शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यावेळच्या एखाद्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच नवा भाग सुरु करण्यात येईल. सध्या मुंबईत ईस्टर्न फ्रीवेवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या जबरदस्त अपघाताची बातमी चर्चेत आहे. मॅगी थोडीथोडी मागे पडते आहे. म्यानमारच्या हद्दीत लष्करी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे नेते आता इतर "शेजारी देशांना" गर्भित इशारे देताहेत. हे आधीपेक्षा वेगळं धोरण असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात सुटी सिगरेट विकण्यावर बंदी आली आहे. चांगलं आहे. बाकी जगात काय विशेष ?
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
36729 वाचन

💬 प्रतिसाद (106)
क
कंजूस गुरुवार, 07/30/2015 - 05:17 नवीन
आइडिआ आणि एरटेलने 3G data महाग केला कालपासून ३००रु/१जीबी. रिलाअन्सने थोडे दिवस प्रमोशनल ओफर दिली रु२९० /३जी अनलिमेटिड रेग्युलर १९७रु/३जी/१जीबी कालपासून विंडोज १० सुरू झाली.pc/tablet/mobile सर्वांसाठी एकच ओएस.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 07/30/2015 - 06:28 नवीन
हिंदी महासागरातील Réunion या फ्रेंच बेटाच्या किनार्‍यावर मोठ्या विमानाच्या विंग फ्लॅपचा तुकडा वाहून आला आहे. हा तुकडा एम एच ३७० या फ्लाइटच्या विमानाचा असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या १७ महिन्यांत प्रथमच या अपघातग्रस्त विमानाचा एखादा अवशेष प्रत्यक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बातमी: Debris Is Thought to Come From Malaysia Airlines Flight 370. मिपाकर गवि यांचा या अपघाताबाबतचा लेखः MH370 - फ्लाईट डीलेड..
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 07/30/2015 - 12:46 नवीन
फ्रांस पासून लई लांब बेट घेऊन ठेवलाय ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Mon, 08/10/2015 - 14:46 नवीन
काही महिन्यांपूर्वी मी रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंटरी प्रकल्पाविषयी मिपावर लिहिले होते. या डॉक्युमेंटरीचा विशेष शो स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी पुण्यात आयोजित केला गेलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. लोकवर्गणीच्या माध्यमातून या प्रकल्पाला मदत करणार्‍या लोकांच्या नावाची यादी शेवटी दाखवली आहे. त्यात काही मिपाकरांचीही नावे आहेत. Image removed. RSVP via FB.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 08/17/2015 - 01:44 नवीन
आज योगायोगाने काही प्रेरणादायी वाचायला मिळालं. वाईट लोकांच्या वाईट कर्मांविषयी नेहमीच चर्चिलं जातं. पण कधी चांगल्या लोकांच्या सकारात्मक योगदानाविषयी कळलं की समाधान वाटतं. अशीच एक प्रेरणादायी घडामोड. Take a Gander at This Amazing, Yet Little Known, 9-11 Story संबंधीत माहितीपट.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 08/17/2015 - 18:51 नवीन
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची प्रसिद्ध उपहारगृहांबाबत खालील लेखांत वाचायला मिळाले. A Walk Down Memory Lane: Country's Famous Pre-Independence Eateries Part I, Part II. यातील पंचम पुरीवालाबाबत मिपावर लेखन झालं आहे.
  • पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!
  • पंचम पुरीवाला, ऑप.जी.पी.ओ, मुं.४००००१
तसेच पुण्यातील आप्पांची खिचडी मी आठ वर्षांपूर्वी खाल्ली आहे :-) .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा