मत्सर ...
आधी पावसाची, पावसाळ्याची चाहूल लागायची ती वातावरणात होत जाणार्या बदलाने. झाडांवर फुलणार्या कोवळ्या पालवीने आणि वळिवाच्या साक्षीने मदहोश करणार्या मृदगंधाच्या मादक सुवासाने. आजकाल ती लागते सोशल नेटवर्क्सवर पडणार्या कुत्सित स्टेटस अपडेट्सने.. उदा. आता पावसाच्या कवितांचा पाऊस येणार वगैरे..वगैरे...
पण त्याला पर्याय नाही तसेच पावसाच्या कवितांनासुद्धा पर्याय नाही....
गंमतच आहे सगळी...
त्याला माझाही...
अगदी माझाही मत्सर वाटावा?
ओके, अॅग्रीड...! मी आलो की ती सुखावते..
मी पाहीलेत, माझ्या आगमनाने...
तिच्या अंगोपांगी फुललेले निशिगंध,
मी अनुभवली आहेत, माझ्या ....
ओझरत्या स्पर्शानेही शहारून आलेली तिची गात्रे!
कधी कधी नकळत तिच्या हनुवटीवर रेंगाळते माझी नजर...
आणि मग ती हरवते...
तो संतप्त होतो, रुसतो, चरफडतो...
तिला म्हणतो,
तू अशीच आहेस...
तो आला की मला विसरतेस...., मला पण?
तुला खरं सांगू...
ती तर मला आवडतेच रे...
पण तुझा तो रुसवा पण मोहवून टाकतो,
प्रेमाचं असंच असतं बघ...
त्याला कुणाशीच वाटणी मान्य नसते...
मग वाटणीदार माझ्यासारखा सखा का असेना !
अरे वेड्या, तुला कळत कसे नाही?
तिच्या हरवण्यात तर मज्जा आहे खरी,
त्यावेळी ती कसली गोड दिसते माहितीये?
तिला तशी मुग्ध बघीतली ना...
की मग मलादेखील उत्साह येतो...
आणि मग...
मी आनंदाने, भरभरून बरसायला लागतो...!!
विशाल...
💬 प्रतिसाद
(13)
ए
एक एकटा एकटाच
Sat, 06/13/2015 - 07:57
नवीन
मस्त आणि मस्तच!!!!!!!
- Log in or register to post comments
ग
गुनि
Sat, 06/13/2015 - 08:33
नवीन
चिम्ब झालो
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 06/13/2015 - 10:15
नवीन
बाहेर संततधार पडणार्या पावसात ही कविता वाचते आहे!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 06/13/2015 - 16:58
नवीन
लै मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Mon, 06/15/2015 - 05:19
नवीन
धन्यवाद मंडळी _/\_
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/19/2015 - 03:54
नवीन
पाऊस म्हटलं की ती आलीच पाहिजे.
आणि ती म्हटली की पाऊस आलाच पाहिजे.
मला तिला आणि पावसाला कवितेत वाचायला आवडतं. :)
तेरे मशरुफ रहने का अंदाज तुझे तनहा न कर दे
रिश्ते फुरसत के नहीं तवज्जो के मोहताज होते है
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Fri, 06/19/2015 - 06:10
नवीन
मनःपूर्वक आभार डॉक _/\_
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Fri, 06/19/2015 - 06:24
नवीन
खरय दिलीप सर पाऊस आणि सखीचे नाते जर वेगळेच आहे। पाऊस म्हटलं की ती आलीच पाहिजे.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Fri, 06/19/2015 - 23:08
नवीन
अरेच्च्या ही कशी काय राहून गेली वाचायची? भन्नाट आहे!
- Log in or register to post comments
र
रुपी
Sat, 06/20/2015 - 01:05
नवीन
फार आवडली..
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Sat, 06/20/2015 - 05:39
नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 06/20/2015 - 07:56
नवीन
आवडली...
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sat, 06/20/2015 - 09:25
नवीन
मस्त आवडली
- Log in or register to post comments