Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रयतेचा राजा

श — शब्दबम्बाळ, Sun, 06/14/2015 - 12:14
एके दिवशी सहजपणे ओळी सुचत गेल्या आणि त्या मी लिहून काढल्या. काही सुधारणा असतील तर अवश्य सांगा! :) रयतेचा राजा हाती घेऊन तलवार अंगी लेऊन तो शेला, मातीतला वीर रणी लढाया चालीला… नको आहे त्यास मान अन सेवक चाकरीला, मायभूमीस ताराया तो जिद्दीने पेटला… शत्रू आहे मोठा द्वाड अन उत-मातलेला, जोडीस तयाच्या मोठे लष्कर सेवेला… कोणी म्हणे त्यास काळ, कोणी दैत्य माजलेला, घोड्यावर बसून जणू यमच आलेला… पण काळ्या मातीच्या वीराला नसे फिकीर कोणाची, ना दैत्य-दानवाची ना आलेल्या यमाची… करुनी गर्जना दिली घोड्यासी त्या टाच, अन शत्रूच्या दिशेने तो त्वेषाने चालीला… होते सैन्य थोडेफार अन सह्याद्री जोडीला, कडे-कपार्यान्मधून यांनी गाठीले शत्रूला… शत्रू होता बेसावध त्यास लगेच घेरला, गाजवुनी पराक्रम त्यास पुरता मारिला… होते हात जोडलेले अन चेहरा पडला, शत्रू सेनापती आता शरण तो आला… फुकाचा अहंकार अन सत्तेने माजला, रयतेच्या राजापुढे नतमस्तक जाहला! आशिष

प्रतिक्रिया द्या
1531 वाचन

💬 प्रतिसाद (6)
श
शब्दबम्बाळ Mon, 06/15/2015 - 11:19 नवीन
७४ वाचने आणि एकही प्रतिक्रिया नाही? छे!! :P
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 06/15/2015 - 12:25 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 06/15/2015 - 13:12 नवीन
खूप छान कविता. पोवाडा जास्त वाटला..
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 06/15/2015 - 15:30 नवीन
हो पोवाड्याच्या शैलीमध्येच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे! :) पण जमलाय का ते नक्की माहिती नाही!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 06/15/2015 - 15:58 नवीन
छान लिहिलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Sat, 06/20/2015 - 12:08 नवीन
सर्वांचे आभार! _/\_
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा