दीपक कुवैत आणि प्यारे ह्यांच्या बरोबर झालेला ठाणे कट्टा - १५ जून २०१५
या पुर्वी मी कधी कट्टा व्रुत्तांत लीहील्या नसल्याकरणाने (कधी कट्ट्याला गेलोच नाही :)) मुविंनी यावेळचा कट्टा व्रुत्तांत लीहीण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी जरी वुत्तांत लीहीत असलो तरी कट्ट्याला उपस्थीत सर्व मिपाकर प्रतिसादामधे आपापला व्रुत्तांत लीहू शकतात्/लीहावा. असो.
तर होणार होणार म्हणताना दीपक कुवेत यांचा ठाणे कट्ट्याचा दीवस उजाडला. या कट्ट्याला दोन उत्सवमुर्ती होत्या, एक दीपक कुवेत पनीरवाले आणि दुसरे अल्जीरीयाचे प्यारे.
या वेळेस ट्क्याने काहीही गोंधळ होउ न देता अमीत गार्डन हे ठीकाण पक्के करुन टाकले. (असेही पुणे कट्ट्याच्या गोंधळाला टका जबाबदार नव्हताच. असे माजे स्पष्ट मत हाये. बाकीच्यांचे काहीही असो.) त्यामुळॅ फक्त कोण कोण येणार याचीच चर्चा चालू होती. मी, टका आणि मामलेदार कळव्यातलेच असल्यामुळे आम्ही येणारच होतो. यजमानच होतो आम्ही. संध्याकाळी ७:०० ची वेळ काही गोंधळ न घालता ठरली असल्यामुळे मी कामावरुन लवकर निघून ६:३० लाच घरी येऊन बसलो. कारण कट्टा ठीकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर होते.
बरोबर ७:३० वाजता प्यारे यांचा अमित गार्डनच्या नामफलकाबरोबर घेतलेला सेल्फी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर थडकला. आणि त्याखाली प्रश्न "कोणी हाय का?". लगेच टकाने मला अमित गार्ड्नकडे कूच होण्याची आज्ञा दीली. ५ मिनिटात येतो असे टायपून मी अमित गार्डन येथे पोहचलो. पोहोचल्यावर मी प्यारे यांना लगेच ओळखले आणि माझी ओळख करुन दीली. दीवसभराच्या धावपळीने प्यारे थकल्यासारखे वाटत होते. हाय हलो आणि जुजबी विचारपूस झाल्यावर आम्ही अमित गार्डनमधे बसण्याचा निर्णय घेतला. पण मिसळपाव या नावाने आरक्षण आहे का अशी विचारपूस केली असता तेथील द्क्षिण भारतीय माणसाने आमच्याकडे विचित्र प्रश्नार्थक नजरेने पाहीले. शेवटी ७/८ लोकांचे आरक्षण असल्याचे कळले.
तिकडे टका डॉ. खरे यांची कळवा स्थानकावर वाट पहात होता. थोड्याच वेळात तो मुवि, भटक्या खेडेवाला, कंजूष, विनोद१८ आणि उत्सवमुर्ती दीपक पनीरवाले यांना घेउन आला. डॉक नंतर येणार असे कळले. सर्वांनी आपापली ओळख करुन देताच, मुवि यांनी बैठकीचा ताबा घेतला. आल्या आल्याच मुवींनी "हा कट्टा एका त्रासदायक डूआयडी चा मिपावरील शेवटाच्या प्रित्यर्थ होणार असल्याचे जाहीर केले". लगेच डूआयडीवर चर्चा सुरू झाली. डूआयडी कसे ओळखावेत, त्यांना कसे तोंड द्यावे, त्यांच्या त्रासापासून कसे वाचावे याबाबतीत बराच खल झाला. तसे काही चांगले डूआयडीदेखील आहेत मिपावर...वगैरे.
दरम्यान परत टका कळव्यात जाउन डॉ. खरे यांना घेउन आला. मामलेदार यांनी यायला जमणार नसल्याचे कळवले. (मामलेदार, आपको जनता माफ नही करेगी.) :) अजून एक मिपाकर पम्या हे कळव्यात राहतात असे कळल्याने त्यांनाही बोलावण्याचा प्रयत्न झाला पण त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही.
माझी ही मिपाकरांबरोबर पहीलीच भेट असल्यामुळे थोडे दडपण आले होते. पण सर्व मिपाकर आपण वर्षानुवर्षे भेटत आहोत अश्या रीतीने बोलू लागल्याने दडपण गळून पडले.
विनोद१८ यांनी आपली परखड मते मांडायला सुरवात केली, मिपाचा ईतिहास, बाकीची मराठी संस्थळे यावर साधक बाधक चर्चा झाली. कंजूष हे बराच पायी प्रवास करतात त्यामुळे त्यांना पारसिकनगरचे डोंगर दर्या यांची ईत्यंभूत माहीती असल्याचे कळले. भटक्या खेडेवाला यांनी दोन्/तीन सुंदर पुस्तकांची नावे सांगीतली. मिपाचा डोलारा कसा चालतो, कोण कोण संपादक आहेत याबद्दल मुविंनी छान माहीती दीली. मागील ६ तारखेच्या कट्ट्याचे फोटो का नाही टकले यावर चर्चा झाली. डूआयडी वर प्रतिबंध घालण्याचे काही जालीम उपाय डॉ. खरे यांनी सुचवले. तसेच त्यांनी धुम्रपान आणि तंबाखू याचे शरीराच्या अंतर्गत भागात काय परीणाम होतात हे सांगीतले. ह्रुदयविकारवरही त्यांनी खूप छान माहीती दीली. एकंदर कट्ट्यावरच्या गप्पा रंगत चालल्या होत्या.
दरम्यान दोनवेळा वेज प्लॅटर येउन गेले, त्याचे फोटो बहूतेक कंजूषकाकांकडे आहेत. ते ईनोसहीत प्रकाशीत करण्यात येतील. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन गट पाडून पेय आणि वेगवेगळे पदार्थ मागवण्यात आले. बाजूलाच उल्हास नदी आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे डासांचा त्रास होत होता. मी सर्व सदस्यांना आमच्या निसर्गरम्य परीसराबद्दल माहीती दीली, पण सर्वच सदस्य आमच्या भागाबद्दल माहीती ठेउन होते. दोन तीन वेळा स्टार्टर आणि पेय येउन गेल्यामुळे सर्वांची पोटे भरली होती. त्यामुळे परत मेन कोर्स मधे कोणाला ईंटरेस्ट नव्हता. म्हणून मग दाल खीचडी (की खीचडा?) मागवण्यात आला.
मधून मधून मी आणि कंजूष कट्ट्याचे फोटो काढत होतो. हॉटॅल मालकाने बाजुलाच रांगेत मांडून ठेवलेल्या खुर्च्यांचा वापर करुन काही फोटो काढण्यात आले.
७:३० ला सुरू झालेला कट्टा ११:०० वाजेपर्यंत संपत नव्हता, शेवटी बील मागवून निघायचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर साहेबांनी स्वयंस्फुर्तपणे ज्यांना मुब्रा स्थानकाकडे जायचे होते त्यांना मुंब्र्यात सोडायची जबाबदारी घेतली. टकाने घेतलेली कार कामाला आली. उत्सवमुर्ती प्यारे यांनी टकाच्या घरी जायचा निर्णय घेतला व दुसरे उत्सवमुर्ती दीपक कुवेत यांना मी मुब्र्यात सोडून आलो.
अशा रीतीने कधी संपूच नये असा वाटणारा हा कट्टा संपान्न झाला..
डावीकडून उभे - भटक्या खेडेवाला, मुवि, प्यारे आणि टका.
बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. सुबोध खरे.
रंगलेल्या गप्पा.
दोन उत्सवमुर्ती
डावीकडून उभे - भटक्या खेडेवाला, मुवि, प्यारे आणि टका.
बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. सुबोध खरे.
रंगलेल्या गप्पा.
दोन उत्सवमुर्ती
💬 प्रतिसाद
(160)
म
मदनबाण
Tue, 06/16/2015 - 08:59
नवीन
चला खटपट्या साहेब शेवटी कट्टेकरी झाले तर ! ;) बाकी कायअप्पावर अपडेट स्टेटस आणि फोटो पाहिलेत. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 06/16/2015 - 09:02
नवीन
माझा थोडक्यात हुकला!
फोटो दिसत नाहीत.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
गुरुवार, 06/18/2015 - 07:44
नवीन
इथला पण आणि पुण्याचा पण ...
व्याप आहे साला
(त्रस्त)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 06/16/2015 - 09:38
नवीन
चर्चा वजा-जाता,सगळं अगदी 6तारखे सारखच झालय हो! ;-)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/16/2015 - 09:40
नवीन
तुमचा ६ तारखेचा व्रुत्तांत अजून आला नाय
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/16/2015 - 09:40
नवीन
नै...थोडे वेगळेपणा होता की....सिंडरेला आणि वैजू नव्हत्या =))
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 06/16/2015 - 10:00
नवीन
@ खटपट्या ===> आता लिहायला सुरुवात केलीच आहेस, तर अजुन तुझे लेख येवू देत.
लवकरच (बहुदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात) ठाण्याला अजुन एक कट्टा होत आहे.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 06/16/2015 - 11:10
नवीन
वृत्तांत बर्यापैकी बरा. फोटो दिसत नाहीयेत.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/16/2015 - 12:25
नवीन
कंजूष यांनी दीलेल्या लिंका डकवलेल्या आहेत. विचारतो त्यांना
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 06/16/2015 - 12:27
नवीन
दिसत नसल्याने फक्त समालोचन वाचले
धन्य्वाद
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/16/2015 - 12:31
नवीन
या ठिकाणी साहीत्य संपादकांची मदत मिळेल का ? खालील लींका वापरलेल्या आहेत.
http://s5.postimg.org/9ln4fr3if/WP_20150615_23_09_00_Pro.jpg
http://s5.postimg.org/6g2ipjkw7/WP_20150615_21_26_28_Pro.jpg
http://s5.postimg.org/52avu8lmv/WP_20150615_20_59_44_Pro.jpg
http://s5.postimg.org/9s0tiucnb/WP_20150615_20_26_55_Pro.jpg
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 06/16/2015 - 13:27
नवीन
१)
२)
३)
४) 
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 06/16/2015 - 13:27
नवीन
१)
२)
३)
४) 
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 06/16/2015 - 13:46
नवीन
नुसते मोकळे चौकोन दिसतायेत...
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
Tue, 06/16/2015 - 11:16
नवीन
पुढच्या वेळी नक्की येणार हो !!!
( बाबा पनीरवाले व प्यारे अल्जीरियावाले यांना न भेटता आल्यानं निराश !)
बाकी ते बाबा पनीरवाले खाद्यंतीला कधी बोलावणार काही कळलं का?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 09:44
नवीन
तु मानाचा टांगारू होतास =))
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 06/16/2015 - 11:28
नवीन
जब्बरदस्त पोटशूळ उठला आहे. इनोने काम भागायचे नाही.
युएईत कोणी आहेत का मिपावाले? एक गल्फी (सेल्फीच्या चालीवर) कट्टा करून टाकू.
सुंदर आटोपशिर वर्णनाने कट्टा आवडल्या (मिपावर असेच म्हणतात नं?) गेला आहे.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/16/2015 - 12:25
नवीन
धन्यवाद !!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 06/16/2015 - 13:01
नवीन
माझा पहिला कट्टा त्याच्या सोबतच झाला.
मजा करा.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 06/16/2015 - 12:32
नवीन
कट्टा दीपक साठी आयोजित करण्यात आला होता. मी योगायोगाने मुंबईत असल्याने कट्टयाला उपस्थित होतो त्यामुळे कट्टयाचे शीर्षक बदलण्यात यावे ही नम्र विनंती.
कट्टा छानच झाला.
रोम रोम में बसा 'मिपाधर्म' संस्कार है चा प्रत्यय आला.
बाकी मिपा हिमनगासारखं वर 1/8 आणि खाली 7/8 आहे यात दुमत नाही!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 09:44
नवीन
याबाबत आणखी लिहा की काही =))
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 06/18/2015 - 06:08
नवीन
आमाला पावर नाय!
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Tue, 06/16/2015 - 12:43
नवीन
छान झालेला दिसतो कट्टा,
स्वाती
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 06/16/2015 - 13:17
नवीन
सुरुवात
एक सुवेनिअर फोटो घेताना दिपक 
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 06/16/2015 - 13:19
नवीन
मस्त .... प्यारे .. आपको बहोत दिनो बाद देखा
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/16/2015 - 13:49
नवीन
आपको दीख रहे है मतलब बाकी लोगोंको भी दीखने चाहीये फोटोज.
- Log in or register to post comments
न
नूतन सावंत
Tue, 06/16/2015 - 13:53
नवीन
छान झालेला दिसतो कट्टा.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 06/16/2015 - 13:55
नवीन
मजा केलेली दिसतेय! पुणे कट्टा आणि मुंबईकट्टा यात पुणे आणि मुंबई इतकाच फरक दिसतोय!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/16/2015 - 13:56
नवीन
अस्णारच ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 06/16/2015 - 14:02
नवीन
आम्हा मुंबईकरांचे पाणीच निराळे.
असो,
जास्त चोखंदळपणा न करता, चार मिपाकर ठरवतील ते कट्ट्याचे ठिकाण.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 09:44
नवीन
आणि एकाने ठरवलेले ठिकाण बाकीचे "लगेच" मान्य करतात हो ;)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 06/16/2015 - 13:58
नवीन
मस्त झालेला दिसतोय कट्टा. एक तरी ठाणे कट्टा करायचा आहे. आमच्या गावात आम्ही अजुन कट्टा करु शकलेलो नाही याचा सल आहे मनात. काहिनाही तर किमान वडापाव कट्टा करुयात ठाण्याला. साला तो राजमाता आणि दुर्गाचा वडापाव म्हणजे जीव की प्राण. लय लय लय लय वर्षे झाली खाउन. मिस माय ठाणे डेज :(
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 06/16/2015 - 15:04
नवीन
कधीही या म्रुट्युंजय,
रच्याकने, राजमाता आणि दुर्गाच्या वडापाव ईतकाच गजानन चा वडापावही खूप प्रसीद्ध आहे.
५वी ते १०वी, गजाननच्या वडापाववर जगलेला - खटपट्या. =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 09:44
नवीन
तु ये तुला फुकट देतो =))
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 09:53
नवीन
कुंजविहार सोडून....
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 09:55
नवीन
चालेल की...मी पाँसर करायला तयार आहे ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 10:11
नवीन
तुम कट्टा आखो.
हम आयेंगा.
(वडा-पाव प्रेमी) मुवि.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 10:24
नवीन
कट्टा तुम्हीच जाहिर करा...भजी आणि वडापाव कट्टा
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
गुरुवार, 06/18/2015 - 09:47
नवीन
@ टक्क्या , खटपट्या:- आपल्या कळव्यात मनिषनगरला गेट क्रमांक १ जवळ पण एक गुरुकृपा वडापाववाला आहे. त्याच्याकडचे सगळेच पदार्थ खुप छान आहेत. उदा. इडली, मेदुवडा, अळुवड्या, ढोकळा वगैरे
पण वडापावसाठी लोक खास जातात. खुप गर्दी असते तिथे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 06/18/2015 - 09:53
नवीन
नाय रे...तो इतका खास नसतो...त्यापेक्षा गेट नं.२ ला संध्याकाळी एक वडापावची गाडी लागते...तिथे खाउन बघ...भारी आहे टेस्ट
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 06/18/2015 - 10:10
नवीन
कैतरीच. गेट नं. ३ वरचा वडापाव खाल्लाय का?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 06/18/2015 - 11:28
नवीन
पम्या तू फक्त बोलतोस, येत नाहीस कट्ट्याला.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 06/17/2015 - 10:23
नवीन
मी पण पाँसर व्हायला तयार हाये. तसे ठाण्यात बरेच काही बघण्यासारखे आहे.
संपूर्ण पश्चिम भारतातील सर्वात मोठे जैन मंदीर ठाण्यात आहे.
अतिशय प्राचीन अशी पारशी अग्यारी ठाण्यात आहे
अतीशय प्राचीन ठाणे बंदर जीथुन आखाती देशात मालाची ने आण होत असे.
अतीप्राचीन असे ठाण्याचे मासुंदा तलाव त्या शेजारील सेंट जॉन बॅप्टीस चर्च.
१५० वर्षे जुने ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय.
उपवन
येउर
अशी बरीच पहाण्यासारखी ठिकाणे ठाण्यात आहेत. कट्यासाठी उपवन्/येउर ही ठीकाणे उत्तम..
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 10:27
नवीन
मंदिरे बघून डायरेक्ट उपवन/येउर =))
मानसिक म्हातारे अजूनच सिक होउ शकतात आणि हिरवट मने आणखीनच हिरवीजर्द होउ शकतात
उपवन/येउर बरेच बदलले आहे आता ;)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 06/17/2015 - 10:49
नवीन
गजाननचा वडापाव मी कसा खाल्ला नाही? च्यायला कुठे आहे हे? गेल्या ५ -१० वर्षात उघडले आहे का? माझ्या आठवणी २० वर्षापुर्वीच्या आहेत. ठाणे म्हणजे माझा सॉफ्ट कॉर्नरः
१. राजमाता आणि दुर्गाचा वडापाव
२. मामलेदार आणी गोखलेची मिसळ
३. जनसेवाचे आइसक्रीम
४. अलोकची सॉफ्टी
५. कुंजविहारचे कागदाच्या लगद्याची लस्सी
६. कुंजविहारचा वडापाव (याचे आकर्षण केवळ याच्या साइज मुळे आण्णि अनलिमिटेड चटण्या, कांदा आणि मिरच्यांमुळे. बाकी चव ठीकठाक)
नॉस्टेल्जिक झालो राव.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 06/17/2015 - 12:09
नवीन
मराठी माध्यमातील बेडेकर शाळा आहे त्यापुढे गेल्यावर एक चौक लागतो. त्या चौकातच आहे "श्री गजानन वडापाव"
आणि आत्ताचा नाहीये, फार्फार जूना आहे. २० वर्षाच्याही पूर्वीचा...ईथली चटणी एकदम फेमस आहे. एक वडापाव घेउन लोक फक्त चटणीबरोबर दोन पाव संपवतात. पीठले असते तशी दीसते दीसायला.
ही पहा अशी (फोटो दीसेल की माहीत नाही)

- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 06/17/2015 - 17:38
नवीन
यातली मामलेदारची आणि गोखलेंची मिसळ अजूनही तग धरून आहे आणि बाकी सगळं इतिहासजमा झाल्यातच आहे. तसं म्हणायला ही सगळी ठिकाणं अजूनही चालू आहेत, पण पहिल्यासारखी प्रसिद्धी नाहीये आणि गर्दीही फार नसते.
राजमाताचा वडा आणि तिथली चटणी हा त्याचा युएसपी होता, पण अलिकडे बेसनाचं कच्चं आवरण घातलेला बटाट्याचा गोळा, पिठल्यालाही लाजवेल अशी बेसनाची चटणी. साहजिकच लोकांचा ओढा कमी झालाये.
कुंजविहारच्या मिसळीत फार पूर्वी झुरळ मिळाल्याची बातमी आली होती, तिथून पुढे या वडापावालाही घरघर लागली.
आलोकच्या सॉफ्टीला पूर्वी जी चव मिळायची कालांतराने ती बदलली, त्याचबरोबर नाशिकच्या 'फेमस मटका कुल्फी' बर्यापैकी जोर पकडला, त्यामुळे आलोकची सॉफ्टीही खूप मागे पडलीये.
नेहमी वेगळं आणि चटपटीत खाण्याच्या जीभेच्या सवयीमुळे ठाण्यात मी नेहमी नव्या ठिकाणांच्या शोधात असतो, त्यातून काही ठिकाणं तिथल्या अप्रतिम दर्जाच्या चवीमुळे आता आवडीची झाली आहेत.
१) पाचपाखाडीतल्या प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी
२) देवांगची मटका कुल्फी, रबडी वाटी
३) गोखलेतली उपवासाची मिसळ
४) सुरूची मिसळ हाऊस! (हे आता अलिकडे सापडलेय. इथे मिसळ खाल्यानंतर मामलेदारची मिसळही मला फारच फिकी वाटू लागलीये)
५) भास्कर कॉलनीतला हनुमानाच्या मंदिरासमोरचा वडापाव
६) श्रद्धा स्नॅक्स सेंटरचे समोसे आणि मूगभजी(हे खूप जूने आहे)
- हाडाचा ठाणेकर
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 17:48
नवीन
टका आणि खटपट्या,
जायचे का?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 06/17/2015 - 19:28
नवीन
मी कवा बी तयार हाय.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 21:08
नवीन
मला कधीही चालेल...रोजचा रस्ता आहे माझा
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »