यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर: पिंपरी दुमाला
असंच कधीतरी, कुठूनतरी पुणे-नगर रस्त्यावर रांजणगावच्या आसपास पिंपरी दुमाला येथे एक शिल्पसमृद्ध यादवकालीन मंदिर आहे ह्याची माहिती मिळाली होती. नक्की ठिकाण कुठे ते माहित नव्हते. मग काय निघालो शोधत आम्ही.
पेरणे फाटा ओलांडल्यावर दोन तीन ठिकाणी विचारतच जावे लागले. एका ठिकाणी डावीकडचा रस्ता पिंपरी दुमाला येथे जातो अशी माहिती मिळाली. तिथून घुसलो. चांगला डांबरी रस्ता थोड्याच वेळात कच्च्या खडबडीत रस्त्यात रूपांतरीत झाला. मग अतिशय लहानलहान वाड्या लागू लागल्या. ठिकठिकाणी विचारत खराब रस्त्याने एकदाचे पिंपरी दुमाला येथे जाऊन पोहोचलो.
गाव तसं लहान. मंदिर गावात शिरल्याशिरल्यानंतर थोडं पुढं आहे. सोमेश्चर मंदिर हे आजचं नाव. पूर्वीचं काय ते नक्की माहित नाही. मूळात मूळचं मंदिर शिवाचंच होतं की काय अशी शंका मंदिर नीट पाहिल्यावर मनात उभी राहते. गावकर्यांनी मंदिराला छानसं कुंपण घातलंय. मंदिर नीटनेटकं ठेवलंय. पण मूळच्या मंदिरावर रंगरंगोटीचे दुर्दैवी अविष्कार ह्या मंदिराच्याही वाट्याला आलेत.
पूर्वी हे भूमिज शैलीत बांधलेले मंदिर असावे. आज शिखराचा भाग आधुनिक आहे. तर मंदिराच्या अंगाचा भाग १००/२०० वर्षांपूर्वी भग्नावस्थेतून जीर्णोद्धारीत केलेला आहे. सभामंडपाचा भाग जीर्णोद्धारीत दिसत असून गाभार्याच्या बाह्य भाग हा मूळाच्याच शैलीत दिसतो. ह्या जीर्णोद्धारात मूळाच्या अनेक मूर्तींची जागा बदललेली येथे स्पष्टपणे दिसते. इतकेच नव्हे तर आवारात असलेले वीरगळही भिंतींमध्ये आधाराचे दगड म्हणून लावल्याचे येथे आढळते. मंदिराच्याच शेजारी खोलवर बांधून काढलेली एक अतिशय देखणी पुष्करिणी आहे.
पिंपरी दुमाला सोमेश्वर मंदिर
मंदिराच्या पुढ्यात नंदीमंडप आहे तर आवारात एका बाजूला यज्ञवराह आणि मत्स्याची मूर्ती आहे. यज्ञवराह म्हणाजे विष्णूचा तिसरा अवतार-वराहवतार. हा जेव्हा वराहाच्या पूर्ण रूपात दाखवला जातो तेव्हा तो यज्ञवराह म्हणवला जातो तर जेव्हा शिर वराहाचे आणि धड विष्णूचे अशी मूर्ती असेल तेव्हा तो नरवराह म्हणू ओळखला जातो. यज्ञवराहाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगावर विष्णूच्या लहानलहान असंख्य मूर्ती कोरलेल्या असतात तर सुळ्यांवर पृथ्वी धारण केलेली असते आणि पायातळी नाग असतो जे पाताळाचे प्रतिक मानले जाते. पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी यज्ञवराहाच्या मूर्ती आहेत- लोणी भापकर, पिंपरी दुमाला आणि चाकणचे चक्रेश्वर मंदिर.
इथली यज्ञवराहाची मूर्ती अत्यंत भग्न झालेली आहे. त्याच्याच बाजूला मत्स्याची मूर्ती आहे. सुरुवातीला ही मूर्ती पाहून ही कासवाची असावी असे वाटून माझी गफलत झाली होती. पण नीट पाहता हीचे तोंड मत्स्याशी जास्त मिळतेजुळते आहे. हा विष्णूचा पहिला अवतार मत्स्यावतार.
यज्ञवराह
मत्स्यावतार
मत्स्य आणि वराह
मंदिराच्या पुढ्यातला नंदीमंडप
चला तर आता मंदिराच्या बाह्यांगाचा एक फेरफटका मारूयात. पण तत्पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी लावून ठेवलेली एक विष्णूमूर्ती बघूयात.
ही इथली सर्वात देखणी मूर्ती. कित्येक शतकांच्या उनपावसाच्या मार्याने आज ही बर्यापैकी झिजली आहे. समभंग मुद्रेत ही मूर्ती असून शंख, चक्र, गदा ही आयुधे स्पष्ट दिसत आहेत तर पायापाशी गरुड विष्णूला प्रणाम करीत आहे. बाजूला इतर काही अनुयायी दिसत आहेत. नक्षीदार प्रभावळीत मस्तकाच्या वर गणेशमूर्ती कोरलेली असून डावी उजवीकडे बहुधा ब्रह्मा आणि महेश आहेत. ही मूर्ती सोडून मंदिराच्या आवारात इतरही असंख्य भग्न विष्णूमूर्ती आहेत.
विष्णूमूर्ती
चला तर आता मंदिराच्या बाह्यांगाचा एक फेरफटका मारूयात.
मंदिरांच्या बाह्यभागावर सुरसुंदरी, वादक, ऋषी, भैरव, चामुंडा, विष्णू, गणेश, महावीर तसेच काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीही येथे आहेत. इथल्या मूर्ती तशा देखण्या नाहीत. बहुधा १३/१४ व्या शतकात यादव राजवट संपता संपता हे मंदिर बांधले गेले असावे. साहजिकच मूळच्या शैलीतली वैशिट्ये कायम राहूनही देखणेपणाचा मात्र येथे लोप झालेला दिसतो.
बाह्यभिंतींवरील सुरसुंदरी.
सुरसुंदरींच्या मध्ये मधेच वीरगळ चिणलेले दिसतात.
येथे काही मैथुनशिल्पे सुद्धा आहेत.
इथल्या एका भिंतीवर खूप आगळीवेगळी शिल्पे आहेत. कावड घेतलेला पुरुष, मोठे वृषण असलेला पुरुष, बाळाला जन्म देत असलेली स्त्री.
आगळीवेगळी शिल्पपट्टीका
बाळाला जन्म देणार्या स्त्रीची प्रतिमा मी लोणी भापकर येथील मंदिरावर पण पाहिलेली आहे. अशा शिल्पांचा उद्देश काय असेल ते कळात नाहीत पण बहुधा सृजनाचे प्रतिक म्हणून अशी शिल्पे कोरली जात असावी.
पिंपरी दुमाला येथील जन्मदात्र्या आईची प्रतिमा
भिंतीत चिणलेले वीरगळ येथे ठायी ठायी दिसत राहतात. इथल्या वीरगळाअंचे वैशिष्ट्य म्हणाजे हे वीरगळ त्रिस्तरीय आहेत. सहसा वीरगळ ४ स्तरांचे असतात. सर्वात वरचा थर शिवपिंड व नमस्कार करणारा वीर, दुसरा थर वीराला अप्सरा कैलासास घेऊन जाताना. तिसरा लढाईचा थर तर चौथा धारातीर्थी पडलेला वीर. येथे मात्र अप्सरांच्या थराचा अभाव दिसतो.
शिल्पपट्टीकेच्या शेजारीच ऋषी, जैन साधक अशा काही प्रतिमा आहेत.
सभामंडपाचा भाग संपवऊन आपण आता गर्भगृहाच्या बाह्यभागाशी येतो. येथे मंदिराचा मूळाचा भाग कायम राहिलेला दिसतो. इथल्या भिंतीवर जागोजागी विविध मूर्ती आहेत. इथल्या कोष्ठांमध्ये तसेच त्यांछ्या आजूबाजूला देखील मूर्ती कोरलेल्या दिसतात.
तप करणारा ऋषी
ऋषी, गोमटेश्वर, अनुयायी आणि गणेश
इथल्या देवकोष्ठात भैरवाची मूर्टी देखील आहे. हाती कपाल आणि खट्वांग, डमरू आणि त्रिशूळ, गळ्यात नरमुंड आणि संपूर्ण नग्न अशी ही भैरवाची प्रतिमा
भैरव
भैरवाच्याच जोडीला येथे नंदीवर बसलेल्या शिवाची मूर्ती देखील आहे.
शिव
मंदिराचा पार्श्वभाग
इथल्या भिंतींवर मातृशक्तीचे प्रतिक असलेल्या काही मूर्ती आहेत.( मातृका नव्हेत) पैकी एकीच्या एका हाती आंब्याचा घोस तर दुसरे हाती बीजापूरक धारण केलेले दिसते. तिच्याच बाजूला दर्पणसुंदरी आहे. तर दोघींच्या मध्ये एका सुंदरीने हाती नाग पकडलेला आहे.
बीजापूरक धारण केलेली स्त्री आणि दर्पणसुंदरी
त्याच्याच जवळपास विषकन्येची एक मूर्ती आहे. विषकन्येसोबतच असितांग भैरव आणि सुरसुंदरी आहेत.
विषकन्या जवळून
सुरसुंदॠ अभिसारिका प्रियकराला भेटायला नटूनथटून चालली आहे तर तिला एक मर्कट त्रास देते आहे. ती त्या मर्कटला एक थप्पड देते आहे. तिच्याच शेजारी डावीकडे एक घंटानाद करणारी पुरुषमूर्ती आहे.
सुरसुंदरी अभिसारिका
चामुंडेची एक अतिशय देखणी मूर्ती येथे आहे. अस्थिपंजर शरीर, खोबणीतून बाहेर आलेले डोळे, विचकलेल्या दाढा, लांबट स्तन, गळ्यात विंचू आणि नरमुंडमाला, हाती डमरू अआणि त्रिशुळावर नरमुंड आणि पायातळी प्रेत ही चामुंडेची वैशिष्ट्ये येथेही आहेत. ही चामुंडा ओठांमध्ये बोट ठेऊन शीळ घालत आहे.
चामुंडा
चामुंडेच्या शेजारी वेताळगण आणि सुरसुंदरी पुत्रवल्लभा आहे. पुत्रवल्लभा म्हणजे कडेवर लहान बाळ घेतलेली स्त्री.
सुरसुंदरी पुत्रवल्लभा
ह्या मूर्तीशेजारीच नटराज शिव आहे.
मंदिराचे बाह्यांग
एके ठिकाणी भिंतीत कठोर तप करणारा ऋषी आणि नागप्रतिमा आहे.
परत येथे जैन साधक किंवा महावीर आणि नागप्रतिमा दिसते.
सुरसुंदरी आणि वादक
मंदिरांच्या बाह्यांगाचा फेरफटका मारून आपण मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस प्रतिहारी तसेच सेवक कोरलेले आहेत. सभामंडप नक्षीदार स्तंभांवर कोरलेला असून स्तंभांच्या जंघ्यांवर विविध प्रकारची शिल्पे, किर्तीमुखे आणि नक्षी इत्यादी कोरलेली आहेत.
प्रवेशद्वारावरील प्रतिहारी
सभामंडप
स्तंभांवरील काही शिल्पे -वाली आणि सुग्रीव
तीन पुरुष आणि चार पाय असलेले आभासी शिल्प
वादक
पुन्हा एकदा चामुंडा
गर्भगृहाचे दारावर देखील प्रतिहारी कोरलेले असून मंदिरातील सर्वात देखणे स्तंभ तेथेच आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
सोमेश्वर महादेव
गाभार्यातून बाहेर पडून पुष्करिणीपाशी गेलो. अतिशय देखणी पुष्कर्णी आहे ही. पूर्णपणे बांधीव. खोलवर उतरत गेलेली.
येथून अगदी जवळच दुसरे एक लहानसे मंदिर आणि तेथेच एक भव्य पुष्करिणी आहे. ती मात्र आवर्जून पाहालायच हवी. रामेश्वराचे ते मंदिर.
रामेश्वर मंदिर
रामेश्वर पाहिल्यावर तिथून निघालो तर रांजणगाव ७ किमी अशी पाटी दिसली. अतिशय चांगला रस्ता. ह्या रस्त्याने रांजणगावच गणपती, मंदिराचे आवारातील सतीशिळा आणि वीरगळ पाहून घरी परतलो.
काही टिपलेले क्षण

💬 प्रतिसाद
(69)
क
कंजूस
Wed, 06/17/2015 - 16:50
नवीन
हा पिंपरी दुमालाचा लेख प्रथमच लिहित आहात का? कारण याचा उल्लेख वल्ली यांच्या इतर लेणी आणि मंदिरांच्या संदर्भांत आलेला आहे. मला असे म्हणायचे आहे की या मंदिराचीच माहिती देणारा लेख आहे वाटतं. फोटो थोडे उमटले आहेत ते आवडले.बाकीचे पाहिल्यावर आणखी विचारेन.
जाण्यासाठी दौंड स्टेशन सोयिस्कर पडेल का?रांजणगावला राहून एक दिवसात पाहून येता येईल?
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 06/17/2015 - 17:00
नवीन
हा वल्लींचाच आयडी आहे बहुधा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 17:03
नवीन
रांजणगावला राहून एक दिवसात पाहून येता येईल?"
वल्लींना हायजॅक करून, वेरूळ आणि पुण्याच्या आसपासची, लेणी बघू या का?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 06/17/2015 - 18:14
नवीन
पुण्याहूनही अर्ध्या दिवसात अगदी सहज पाहून होतं.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 06/18/2015 - 03:13
नवीन
पॉइंट नोटेद....
पुढची पुणे ट्रिप तुमच्या सवडीनुसार आखू.
आकुर्डीहून,बेडशी लेणी आणि हे मंदिर, एका दिवसात करता येईल का?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 06/18/2015 - 05:22
नवीन
एका दिवसात करता येतील पण दोन्ही ठिकाणं विरुद्ध दिशांना आहेत.
त्यापे़षा बेडसे, भाजे, कार्ले ह्या तीन लेण्या एका दिवसात करता येतील किंवा भुलेश्वर, पिंपरी दुमाला हे एकत्र जोडता येतील.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 06/17/2015 - 18:13
नवीन
हो.
ह्या मंदिरावर पहिल्यांदाच लिहितोय. सुरसुंदरींच्या निमित्ताने यातील काही तुरळक छायाचित्रे इतरत्र आली होती.
दौंड खूपच गैरसोयीचे आहे. पुण्याला उतरून नगरच्या दिशेने जाणारी कोणतीही बस पकडून रांजणगावला उतरायचे. तिथून जीप किंवा सहा आसनी मिळू शकेल.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 06/17/2015 - 17:01
नवीन
शिल्पे भारी आहेत. ते ३ लोक चार पाय शिल्प अगदीच गंडलय पण.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 17:01
नवीन
पुढच्या पुणे भेटीत, मुलाला घेवून वल्लींबरोबरच वेळ काढावा लागणार.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/17/2015 - 17:14
नवीन
सर्व फोटो पाहिले.शेवटून तिसरा वीरगळच आहे का? सुरसुंदरी आणि दर्पणसुंदरी कशी ओळखायची?अभिसारिकेला नेहमी मर्कटच का भेटतो ?तिचे शिल्प मनोरंजनार्थ असावे.
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 06/17/2015 - 17:20
नवीन
सहिच रे, चंडिकेचे शिल्प लय ड्यांजर वाट्टय
अवांतर : वल्ली च चांगले होते, नया नाम मे मज्जा नय
- Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज
Wed, 06/17/2015 - 17:53
नवीन
नेहेमी प्रमाणेच उत्तम लेख आणी डीट्टेलवार माहीती.
अवांतराबाबत स्पाला +१००.. पुर्वीचे वल्लीच जास्त चांगले होते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 18:04
नवीन
आज शेक्सपियरने सांगीतलेले "नावांत काय आहे?" हे वाक्य बर्यापैकी पटले.
(कुणी लिहिले आहे? ह्या पेक्षा काय लिहिले आहे? हे बघणेच जास्त योग्य.)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 06/17/2015 - 20:17
नवीन
@ पुर्वीचे वल्लीच जास्त चांगले होते.>> बगा बगा! आम्मिच येकटे नै बोलत! :-\
दू दू दू नामांतरित हत्ती! :-\
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 06/18/2015 - 02:47
नवीन
लेणी,शिल्पकला इत्यादीसाठी "वल्ली"च राहू द्या.टारगटपणासाठी "टल्ली" नाव घ्या हवेतर.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/18/2015 - 03:02
नवीन
लेणी दगड़ शिल्प मंदिर चामुंडा वीरगळ इ इ वल्लीच आयडी चांगला होता.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/18/2015 - 03:08
नवीन
गजेंद्रपावकवल्ली - हे ही चालेल! :-D
म्हणजे त्यात हत्ती+आगोबा+वल्ली ,असं सगळच येइल. ;-) शिवाय संस्कृत वाटत असलेने आपोआपच हुच्च ही नै का झालं? ;-)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 06/17/2015 - 17:36
नवीन
मस्त लेख आणि फोटो.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 06/17/2015 - 17:48
नवीन
वीरगळामध्ये असलेले चार थर अनुक्रमे वरपासून खालपर्यंत प्रक्रियेचे दर्शक आहेत असं मानलं, तर वरून दुसर्या अप्सरेच्या थराचं प्रयोजन कळलं नाही.
म्हणजे:
१. वीराने शंकराची भक्ती केली
२. अप्सरा वीराला स्वर्गात घेऊन गेल्या (???)
३. वीराने युद्ध केलं
४. वीर धारातीर्थी पडला
१-३-४-२ हा क्रम जास्त बरोबर वाटतो.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 06/17/2015 - 18:10
नवीन
नाही नाही.
वीर धारातीर्थी पडल्यावर तो कैलासाप्रत पोचलाय हे सर्वात वरचा थर दाखवत असतो. सर्वात वरचा थर सगळीकडे सारखाच असतो.इतर तीन थर मात्र बरेचवेळा बदलत असतात.
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Wed, 06/17/2015 - 18:06
नवीन
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आणि रोचक लेख.
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 06/17/2015 - 18:10
नवीन
लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.या शिवमंदिरात एवढ्या जैन प्रतिमा कशा आहेत?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 06/17/2015 - 18:16
नवीन
यादवांचे काही महाल जैन घराण्यातले होत शिवाय जैन धर्माला त्यांचा राजाश्रय होता त्यामुळे यादव, शिलाहार यांच्या राजवटीतील कित्येक मंदिरांवर जैन प्रतिमा अगदी सर्रास दिसतात.
- Log in or register to post comments
म
मनोज श्रीनिवास जोशी
Wed, 06/17/2015 - 18:17
नवीन
मंदिरांकडे बघण्याची नवी दृष्टी देणारा लेख आवडून राहिला आहे!
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 06/17/2015 - 19:12
नवीन
बाळाला जन्म देणारी स्त्री म्हणजे लज्जागौरी.
या देवळातली सगळी शिल्पे एका कालखंडातली वाटत नाहीत. काही जुन्या पद्धतीची आहेत तर काही तेवढीशी प्रमाणबद्ध नाहीत.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 06/18/2015 - 05:25
नवीन
बाळाला जन्म देणारी स्त्री म्हणजे लज्जागौरी नव्हे. लज्जागौरी ही बाळाशिवाय आणि उत्तानपादासनात असते.
इथली शिल्पे फारशी प्रमाणबद्ध नाहीत कारण बहुधा हे मंदिर राजाश्रयविरहित असावे व कोण्या धनिकाने बांधले असावे. अर्थात हा केवळ तर्कच. तसा कुठलाही पुरातत्वीय पुरावा येथे नाही.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 06/18/2015 - 07:30
नवीन
रा.चिं.ढेर्यांचे लज्जागौरी वाच प्लीज. हे पुढे दिलेले अठराव्या शतकातील काष्ठशिल्प आहे. अशी शिल्पे कुरुंदवाड आणि गोव्यातील कुर्डी येथे मिळायाचा उल्लेख आहे.

- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 06/18/2015 - 13:16
नवीन
हे पुस्तक आता वाचलेच पाहिजे.
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/17/2015 - 19:19
नवीन
यज्ञवराहाची अवस्था बघून वाईट वाटलं.
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/17/2015 - 19:22
नवीन
रच्याकने, त्या मत्स्यावताराच्या मूर्तीत चार पाय आणि शेपूट दिसतेय तरी तो मत्स्यावतार कसा?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 06/18/2015 - 05:27
नवीन
ते माशाचे पर आणि शेपूट समजावेत. येथील शिल्पाकृतीचे मुख कासवमुखाशी कुठल्याह्ही प्रकारे जुळत नाही मात्र ते मत्स्यमुखाशी चांगलेच जुळते तसेच कासवाचे कवच पण येथे दिसत नाही.
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 06/18/2015 - 11:14
नवीन
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.
त्या शिल्पात मत्स्यावताराच्या शेपटाचा विशिष्ट आकार आणि खवल्यांचाही अभाव दिसत आहे. मत्स्यावताराचे शिल्प हे एका बाजूने असल्याचे सर्वत्र पाहिलेले आहे, तर कूर्मावतार हा टॉप व्ह्यू म्हणजेच वरून घेतल्याप्रमाणे चित्रांत/शिल्पांत पाहिलाय. त्यामुळे हा मत्स्यावतार असावा ह्या तुमच्या मताशी थोडा असहमत आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/18/2015 - 11:19
नवीन
असेच म्हणतो. कासवाचे कवच म्हटले तर देवळांमधल्या शिल्पांत नेहमी नरम पाठीचे कासवच दाखवतात, कवच अॅज़ सच जाणवते कुठे?
शिवाय शेपटाचा विशिष्ट आकार नसलेला मत्स्यावतार अन्यत्र कुठे पाहिला आहे का?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 06/18/2015 - 11:38
नवीन
तसा मत्स्यावतार मी अन्यत्र पाहिल्याचे स्मरते.
अर्थात हिंदू मायथॉलोजिकल शिल्पं ही तशी बर्याच वेळा हायब्रीड असतात.
वरील शिल्प कदाचित मत्स्य नसून कूर्म असेलही पण तसे छातीठोकपणे सांगता येणार नाहीच.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 06/18/2015 - 12:20
नवीन
there you go!! याचाच अर्थ तो 'मत्स्यच आहे' असंही छातीठोकपणे सांगता येणार नाही.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/18/2015 - 14:51
नवीन
धन्यवाद.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 06/17/2015 - 20:38
नवीन
नेहमीप्रमाणे मस्त
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 06/17/2015 - 21:52
नवीन
मंदिर सुंदर आहे. चांगली माहिती!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 06/18/2015 - 06:43
नवीन
लै भारी..
भेट द्यायला हवीच एकदा !
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
गुरुवार, 06/18/2015 - 07:47
नवीन
एका विस्मृतित गेलेल्या मंदिराची छान माहिती दिली. फोटो पण सुंदर आहेत.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/18/2015 - 08:15
नवीन
खास वल्ली-ष्टैलचा प्रचेतस यांचा लेख ! :)
माहित नाही कुठून कुठून लेणी आणि देवळे शोधून काढतो हा माणुस. मग मस्त फोटो आणि वर्णनाने भुरळ घालतो. अश्याने बघायच्या गोष्टींची यादी वाढत जाऊन फक्त महाराष्ट्र पहाण्यातच सगळं आयुष्य जाईल आणि दुसरीकडे भटकायला वेळच उरणार नाही ना ?! ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/18/2015 - 08:42
नवीन
@ माहित नाही कुठून कुठून लेणी आणि देवळे शोधून काढतो हा माणुस. मग मस्त फोटो आणि वर्णनाने भुरळ घालतो. अश्याने बघायच्या गोष्टींची यादी वाढत जाऊन फक्त महाराष्ट्र पहाण्यातच सगळं आयुष्य जाईल आणि दुसरीकडे भटकायला वेळच उरणार नाही ना ?! ;)>> +++१११ हम्न्ये ये सफ़र आगुबाबा पत्थरवाले के साथ किया है| आगुबाबा से लाइव्ह सुनने में जितना मज्जा आता है,वैसाही मजा इदर पढने में भी आता है|
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 06/18/2015 - 08:44
नवीन
हे ठिकाण "मोराची चिंचोली" नजीक आहे काय? चिंचोलीला जाऊन ३ वर्षे झाली म्हून चौकशी.
धन्याशेठ बरोबरच्या इतर सजीव शिल्पांची नावे काय?
चौकस नाखुस.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 06/18/2015 - 12:04
नवीन
मोराच्या चिंचोलीजवळच आहे पण रांजणगावच्या खूपच जवळ आहे.
इतर सजीव शिल्पे म्हणजे बुवा आणि वप्या. अडीच वर्षांपूर्वी येथे गेलो होतो. :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/18/2015 - 09:20
नवीन
लेख खूप आवडला. या निमित्ताने महाराष्ट्रातील यादवकालीन व त्याअगोदरच्या काळात बांधलेल्या देवळांची लिस्ट कुठे मिळेल काय? किमान पुणे जिल्ह्यातील अशी लिष्ट मिळाली तरी बास.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 06/18/2015 - 09:45
नवीन
संध्याकाळी काही टंकतो
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/18/2015 - 09:47
नवीन
धन्यवाद, लिष्टीचा इंतजार आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 06/18/2015 - 11:56
नवीन
पुण्यातील काही.
१. यवतचा भुलेश्वर
२. पूरचा कुकडेश्वर
३. (नारायण्)पूरचा नारायणेश्वर
४. सासवडचा संगमेश्वर
५. सासवडचा चांगावटेश्वर
६. खिरेश्वरचा नागेश्वर
७. नायगावचा सिद्धेश्वर
८. माळशिरस-यवत
९. नाझरे- कोथळे
१०. लोणी भापकर
यातली शिल्पसमृद्ध अशी पिंपरी दुमाला, भुलेश्वर, नागेश्वर, लोणी भापकर आणि काही प्रमाणात चांगावटेश्वर अशी इतकीच आहेत.
बाकी पुण्याजवळची अजून काही नगर-सातारा जिल्ह्यात आहेत.
पेडगाव- लक्ष्मीनारायण, बाळेश्वर, मल्लिकार्जुन, भैरवनाथ
भिगवणाच्या अलिकडे-पळसदेव
रतनवाडीचे अमृतेश्वर
अकोले येथील सिद्धेश्वर,
टाहाकारी येथील एक मंदिर.
आणि बाकी कित्येक अशी आहेत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/18/2015 - 14:52
नवीन
अतिशय धन्यवाद.
यांपैकी कुकडेश्वर आहे ते पूर गाव नक्की कुठेय?
शिवाय- नारायणेश्वराच्या एंट्रन्सवरतीही चांगावटेश्वर असा शिलालेख कोरल्याचे पाहिले आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 06/18/2015 - 15:04
नवीन
पूरचा कुकडेश्वर म्हणजे चावंड किल्यानजीकचं एक लहानसं गाव. जुन्नर-नाणेघाट मार्गावर.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »